या विभागात आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघायला मिळतील.
कैलास मानसरोवर यात्रा ही जगातील सर्वात पवित्र यात्रांपैकी एक असली तरी ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत कठीण आहे. या पॉडकास्टमध्ये नेपाळचे श्री विकास कांडेल कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर सखोल माहिती देत आहेत.
April 18, 2026
ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि श्रीकांत दादरकर ( विद्याधर गोखले यांची कन्या व जावई ) तसेच अण्णांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर यांची मुलाखत घेतली आहे.
July 11, 2026
तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही? मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅमही माहिती नसेल. हा एक भन्नाट खेळ आहे.
दिवसाला ४२ किलोमीटर धावायचं, स्वतःचं सामान स्वतः धावताना वाहून न्यायचं, सलग ५ दिवस धावायचं! तेही डेझर्टमधून!!
डेझर्ट म्हणजे नो मॅन्स लँड!!!
March 12, 2021
शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील धडे नव्हे; शिक्षण म्हणजे आयुष्य घडवण्याची, विचारांना दिशा देण्याची आणि माणूस घडवण्याची अखंड प्रक्रिया. अशा या शिक्षणविश्वात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आणि आपल्या असामान्य योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले आदरणीय श्री. सुरेंद्र दिघे सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. शालेय अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता, नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवले. त्यांच्या शिक्षणाकडे पाहण्याच्या व्यापक दृष्टीकोनामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध झाले आहे.
July 21, 2026

तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही?
मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅमही माहिती नसेल.
हा एक भन्नाट खेळ आहे.
दिवसाला ४२ किलोमीटर धावायचं, स्वतःचं सामान स्वतः धावताना वाहून न्यायचं, सलग ५ दिवस धावायचं! तेही डेझर्टमधून!!
डेझर्ट म्हणजे नो मॅन्स लँड!!!
भयानक थंडी, सोलून काढणारं ऊन, बोचरे वारे, सपासप बसणारे पावसाचे फटकारे!!!
ही डेझर्ट्स कोणती? ती किती आहेत, त्यांना पार करताना काय स्थिती होते,
जगात हाताच्या बोटावर मोजता येणारे डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅम करणारे आहेत आणि त्यात आहे एक मराठी माणूस!
मुलुंडमध्ये लहानाचा मोठा झालेले आणि आता अमेरिकेत राहणारे अतुल पत्की!!
एक थरारक भेट, एक थरारक अनुभव, एक अविस्मरणीय माणूस!
संवादिका : धनश्री प्रधान दामले
संकल्पना : निनाद प्रधान
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
विशेष आभार : नितीन आरेकर
Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
www.marathisrushti.com/mstv
www.oeostudios.com
Music: https://www.bensound.com
Desert - Conventionally it is known as the No Man's Land. There are few such deserts in the world that pose a great challenge to mankind. And there are a few of them where a unique sports event takes place every year.
This event is, the Desert Marathon. And there is a Grand Slam of these Desert Marathons!
And there is Only Indian who has won the title of Desert Marathon Grand Slam Winner. He is a Maharashtrian, having roots in Mulund, a suburb of Mumbai and now staying in Mumbai.
"Atul Patki" is interviewed by Anchor Dhanashree in this 3 part series.
संवादिका : धनश्री प्रधान दामले
संकल्पना : निनाद प्रधान
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
विशेष आभार :
Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
www.marathisrushti.com/mstv
www.oeostudios.com
Music: https://www.bensound.com
March 12, 2026
नवीन वर्षासोबत आपण नवे संकल्प आणि नवी स्वप्नं घेऊन पुढे जातो. पण या स्वप्नांमागे धावताना नकळत आपण मनःशांती गमावत तर नाही ना?
Time – 01:18:07
January 2, 2026
आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो.
October 9, 2025
मराठी, गुजराती आणि हिंदी रंगभूमीवर व चित्रपटांमध्ये आपली नाममुद्रा उमटवणारे, चतुरस्त्र अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि त्यांच्या पत्नी चारू जोशी यांच्याशी दिलखुलास गप्पा!
या गप्पा रंगवत आहेत धनश्री प्रधान-दामले
July 5, 2020
पुणे आणि नाशिकहून मुंबई एअरपोर्टला पोहोचण्यासाठी विश्वासार्ह, वेळेवर आणि किफायतशीर शेर कॅब सेवा म्हणजेच – के.के. ट्रॅव्हल्स. अनुभवी ड्रायव्हर्स, सुरक्षित प्रवास आणि आरामदायी गाड्या हे त्यांचे वैशिष्ट्य. जाणून घेऊया ह्या पॉडकास्ट मध्ये के.के. ट्रॅव्हल्स ह्या ब्रँड ची कहाणी.
May 30, 2026
Exotic Gringo या नावाने वाचकांना जगभराची सफर घडवणार्या सुप्रसिध्द Travel Blogger आणि Brand Consultant कौशल कारखानीस यांच्याशी आपली संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा….
July 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti