रावण म्हणजे केवळ खलनायक की एक थोर विद्वान राजा?
रामायणातील राक्षसांचा राजा म्हणून ओळखला जाणारा रावण हा पराक्रमी, वेदपंडित, कट्टर शिवभक्त आणि महान शासक होता—असा वेगळा दृष्टिकोन मांडणारी कादंबरी म्हणजे “रावण : राजा राक्षसांचा”.
या भागात लेखक व उद्योजक शरद तांडळे यांच्याशी झालेल्या सखोल संवादातून आपण जाणून घेतो—
पुराणकथा, साहित्य आणि कलेत रावणाला दुर्गुणी का ठरवण्यात आलं? रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र, वीणा व बुद्धिबळ यांसारख्या निर्मितींशी जोडल्या गेलेल्या या असामान्य बुद्धिमत्तेच्या पुरुषाला इतिहासाने खलनायक का केलं?
सर्व देवांना पराभूत करणारा, विविध दैत्य-दानव व भटक्या जमातींना स्थैर्य व समृद्धी देणारा आणि सोन्याची लंका घडवणारा हा महान राजा—त्याच्या मनाचा वेध घेणारी ही चर्चा म्हणजे एक विचारप्रवर्तक प्रवास.