(User Level: User is not logged in.)

पॉडकास्ट

या विभागात आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघायला मिळतील.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते गिरीश परदेशी

    नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते गिरीश परदेशी

    एक चित्रपट व मालिका कलाकार असूनही रंगभूमीवर खूप प्रेम करणारे आणि तितकेच नवनवे प्रयोग रंगभूमीवर करून त्यात यश मिळवणारे , प्राचीन काळाचा अभ्यासक असूनही सदोदित नवीन गोष्टींचा शोध घेण्याकडे कल असलेले नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते श्री. गिरीश परदेशी यांची मुलाखत.

      December 3, 2020


  • असं घडलं पाकिस्ताननामा ! – अरविंद गोखले

    असं घडलं पाकिस्ताननामा ! – अरविंद गोखले

    भारतीय पत्रकाराच्या चष्म्यातून पाकिस्तानचा प्रवास हा आजच्या भागाचा विषय. हे पत्रकार कोण ? तर टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे माजी संपादक , लोकमत या वृत्तपत्राचे माजी संपादक आणि लोकसत्ताचे माजी सहाय्यक संपादक अरविंद गोखले. सुरुवातीला क्रिकेट मॅचच्या निमित्ताने होणाऱ्या पाकिस्तान भ्रमंतीचं अनुभवकथन त्यांनी केलं आहे त्यांच्या ‘पाकिस्ताननामा’ या पुस्तकात. बेनझीर भुट्टो यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे पहिले मराठी पत्रकार म्हणजे अरविंद गोखले.

      December 15, 2025


  • शिक्षण की कौशल्य? महत्वाचं काय?

    शिक्षण की कौशल्य? महत्वाचं काय?

    शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील धडे नव्हे; शिक्षण म्हणजे आयुष्य घडवण्याची, विचारांना दिशा देण्याची आणि माणूस घडवण्याची अखंड प्रक्रिया. अशा या शिक्षणविश्वात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आणि आपल्या असामान्य योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले आदरणीय श्री. सुरेंद्र दिघे सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. शालेय अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता, नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवले. त्यांच्या शिक्षणाकडे पाहण्याच्या व्यापक दृष्टीकोनामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध झाले आहे.

      July 21, 2026


  • शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमंत अभ्यंकर – भाग १

    शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमंत अभ्यंकर – भाग १

    येणार्‍या काळात शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. याची झलक आपण सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या विस्ताराच्या निमित्ताने बघतोच आहोत. मात्र सगळेच शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता प्रयोगशाळेत प्रयोग कसे करणार वगैरेसारखे अनेक प्रश्न पुढे येतील.

    अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी.

      June 17, 2020


  • अभिनेते पद्मश्री मनोज जोशी  आणि चारु जोशी – भाग ३

    अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि चारु जोशी – भाग ३

    मराठी, गुजराती आणि हिंदी रंगभूमीवर व चित्रपटांमध्ये आपली नाममुद्रा उमटवणारे, चतुरस्त्र अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि त्यांच्या पत्नी चारू जोशी यांच्याशी दिलखुलास गप्पा!

    या गप्पा रंगवत आहेत धनश्री प्रधान-दामले

      July 5, 2020


  • आयुर्वेद, काल आज आणि उद्या

    आयुर्वेद, काल आज आणि उद्या

    आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो.

      October 9, 2025


  • शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमंत अभ्यंकर – भाग २

    विस्ताराच्या निमित्ताने बघतोच आहोत. मात्र सगळेच शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता प्रयोगशाळेत प्रयोग कसे करणार वगैरेसारखे अनेक प्रश्न पुढे येतील.

    अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी.

      June 20, 2020


  • सर्जनशील कलावंत खासदार डॉ. अमोल कोल्हे – भाग ३

    सर्जनशील कलावंत खासदार डॉ. अमोल कोल्हे – भाग ३

    प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांनी रंगवलेल्या गप्पा…

      July 10, 2020


  • द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?

    द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?

    महाभारतातील द्रौपदीला अनेकजण केवळ पाच पांडवांची पत्नी म्हणून ओळखतात. पण ती यज्ञातून प्रकट झालेली *यज्ञसेनी’, राजा द्रुपदाची कन्या, विदुषी, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी स्त्री होती. तिचे मूळ नाव ‘कृष्णा’ होते, आणि तिच्या विचारांनी व निर्णयक्षमतेने महाभारताच्या इतिहासाला निर्णायक वळण दिले.

    लेखक अशोक समेळ यांनी आपल्या ‘द्रौपदी’ या कादंबरीत द्वापरयुगातील द्रौपदीला कलियुगातील असंख्य द्रौपदींच्या वास्तवाशी जोडत तिच्या संघर्षाचा, सामर्थ्याचा आणि स्त्रीत्वाच्या नव्या अर्थाचा वेध घेतला आहे.

      July 11, 2026


  • प्रवासादरम्यान होणाऱ्या आजारांसाठी सोपे उपाय

    प्रवासादरम्यान होणाऱ्या आजारांसाठी सोपे उपाय

    प्रवास करताना आपण वेळी अवेळी ट्रॅव्हल करतो, बाहेरचे तिखट तेलकट खातो, नीट झोप होत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. पोट बिघडणे, घसा दुखणे, डोके दुखणे, जुलाब होणे, त्वचा रुक्ष होणे ह्या अशा व्याधी आपल्याला प्रवासादरम्यान सतावतात. आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐका डॉ आमोद साने ह्यांच्याकडून ह्या व्याधींवरती रामबाण उपाय.

      April 18, 2026