३ मार्च १९७२ हा दिवस.... बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली.

एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटातील 'देखा ना हाय रे सोचा ना हाय रे' हे गाणं.
१९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्यासाठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, महमूद, अनवर आली, नासीर हुसेन, शत्रुघ्न सिन्हा, केष्टो मुकर्जी, ललिता पवार, मनोरमा, मुकरी, सुंदर, किशोर कुमार या सारखे कलाकार होते. या सर्वानी चित्रपटात जो धुमाकुळ घातला आहे तो अप्रतिम, केष्टो यांचे नशेत गाड़ी लोटने, ललिता पवार यांचे अंगात आलेली बाई लाजबाब.
या चित्रपटातील गाणी ..."देखा ना हाये रे सोचा ना हय रे रख दी निशाने पे जान ल ल ल लला .. कदमो पे तेरे निकले मेरा दम.....है बस यही अरमान ...." किशोर कुमार यांची अप्रतिम गाणी ....एव्हरग्रीन फ्रेश .. ' किशोर कुमार व लताजी यांची दोंन गाणी ..."तुम मेरी ज़िंदगी मे कुच इस तराह से आये ..." 'दिल तेरा है मे भी तेरी हु सनम ..तेरे सर की कसम हो सनम, गीतकर राजेन्द्र कृष्ण, संगीत राहुल देव बर्मन यांची सर्व गाणी लोकप्रिय. आजही हा सिनेमा बघावा ....एकदम ताजे तवाने झाल्या सारखे वाटते.
मेहमूद यांनी, त्यांच्या अभिनय कौशल्याने शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, पंचम आणि किशोर कुमार यांनी सुपर हिट केलेला "ऑल टाइम ग्रेट" " बॉम्बे टू गोवा"
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
March 4, 2017
या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत होत आहे.
March 4, 2025
आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं.
January 13, 2023
हलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.
August 17, 2016
सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते.
October 15, 2022
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात मोठी क्रांती घडत होती ज्याच्या आगमनानं येणारी सर्व शतकं, अनेक पिढ्या “टेक्नो सॅव्ही” होणार होत्या, क्लास ए, बी, च्या प्रतिष्ठेला मानाचा तुरा प्राप्त झाला, “टाईप रायटर” च्या रुपानं कार्यालयीन कामकाजात लिखापढी वाढल्यानंतर मनुष्यबळाची मर्यादा लक्षात येऊ लागल्या व लेखन यंत्राची गरज ही भासू लागली.
September 4, 2013

स्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो.
August 10, 2025
पुण्यात मारुतीची मंदिरं शंभराहून अधिकच असतील. त्यातील काही तर पेशवेकालीनही आहेत. पुणे तसं गणपतीच्या व मारुतीच्या असंख्य मंदिरामुळे बुद्धिमान व बलशाली आहे. पेठापेठांतून तालमी दिसतात, तालीम आली की, पहेलवानांचं दैवत मारुती मंदिर हे ओघानं येतच. थोडक्यात आढावा घ्यायचाच झाला तर पहा… जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, पंचमुखी मारुती, पिंपळेश्वर मारुती, सोन्या मारुती, उंटाडे मारुती, शकुनी मारुती, भिकारदास मारुती, दास मारुती, जुळ्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, इत्यादी. अनेक ठिकाणी शनी-मारुती मंदिरंही आहेत.
June 9, 2021
प्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात.
November 27, 2013
तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा.
May 24, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti