गारेगार बर्फाचा गोळा

उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो गारेगार बर्फाचा गोळा. त्याशिवाय उन्हाळा अपूर्णच वाटतो. काल रस्त्यावर बर्फाचा गोळा विकणारा आला होता. शेजारीन म्हटली, ” घ्यायचा का बर्फाचा गोळा ” ? क्षणभर मनात उत्तर आलं होतं लगेचच ” हो ” म्हणून !! पण मनाला आवर घालत म्हटलं , ” नको !! आता ते येतील इतक्यात. आणि त्यांना नाही आवडत रस्त्यावरचे गोळे किंवा कुल्फी घेतलेली !! ” शेजारीन म्हटली ते यायच्या आत घ्या पटकन खाऊन.



उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो गारेगार बर्फाचा गोळा. त्याशिवाय उन्हाळा अपूर्णच वाटतो. काल रस्त्यावर बर्फाचा गोळा विकणारा आला होता. शेजारीन म्हटली, ” घ्यायचा का बर्फाचा गोळा ” ? क्षणभर मनात उत्तर आलं होतं लगेचच ” हो ” म्हणून !! पण मनाला आवर घालत म्हटलं , ” नको !! आता ते येतील इतक्यात. आणि त्यांना नाही आवडत रस्त्यावरचे गोळे किंवा कुल्फी घेतलेली !! ” शेजारीन म्हटली ते यायच्या आत घ्या पटकन खाऊन. त्यांना काय कळणार आहे तुम्ही गोळा खाल्लेला ? पण मीच नको म्हटलं. कारण मागे एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेले होते . तेव्हा रस्त्याच्या पलीकडे एक वस्ती होती आणि तिथे एका घरासमोर कुल्फीची गाडी होती. तिथलं वातावरण आणि तो रस्त्यावर ठेवलेला बर्फ पाहिला. आणि मनांत आलं दृष्टी आड सृष्टी म्हणतात ते काही उगीचच नाही. तेव्हापासून खूप आवडणारा नेहमीच खावासा वाटणारा बर्फाचा गोळा खाण्याची इच्छाच मेली.
नंतर शांतपणे विचार केला तेव्हा मनात आलं , लहानपण किती छान असतं ना ? ना कसली चिंता ना कसली फिकीर. ना कसली काळजी . तेव्हा आपण काहीच विचार करत नाही कि , ” काय खावं ? काय नाही खावं ? मनात आलं की बिंदास मस्तपैकी बर्फाचा गोळा घ्यायचा आणि खायचा . पण लहानपणी आमची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. त्यामुळे कधीतरीच पैसे मिळायचे गोळा खायला . तेव्हा गोळा खूप खावासा वाटायचा पण पैसे नसायचे. आता पैसे आहेत पण गोळा खायची इच्छा नाही . असं वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं आणि सर्व विसरून जावं. आणि मस्तपैकी ग्लास मध्ये बर्फाचा गोळा घेऊन खावा. मला बर्फाचा गोळा खाताना तो वितळल्यावर त्यातलं जे पाणी असतं ते प्यायला खूप आवडायचं . किंवा मग शोषून ते पाणी सगळं प्यायचं आणि उरलेला बर्फ टाकून द्यायचा . ?? असा मी लहानपणी गोळा खायचे आणि बरेच जण असाच खात असतील. हो ना ??
खरंच जीवनात देखिल आपण बर्फाच्या गोळ्या प्रमाणे चांगलं ते घेऊन वाईट टाकून दिलं तर किती बरं होईल ना ? म्हणजे मग लहान मुलांप्रमाणे आपणही सुखाने आनंदी जीवन जगू शकू …. !! खरंय ना ??
मंदाकिनी रासकर …. !!

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →