मांडवा केवळ निसर्गरम्य अलिबागचेच नाही तर पुन्हा एकदा कोकणचे प्रवेशद्वार ठरत आहे आणि सगळ्यांना अभिमानाने सांगत आहे येवा कोकण आपलेच असा.
October 14, 2023
गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य.
October 25, 2023
प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील प्रवासात काही गोष्टीचे महत्व असते. त्यामध्ये काही जणांना लोकलचे, तर काहींना बसचे. तर काहींना रिक्षाचे, मला मात्र रेल्वे ट्रॅकचे लहानपणी आमच्या गावातील रेल्वे ट्रॅक आमच्या जीवनाचा भाग होता. आमची वसाहत या ट्रॅक मुळे दोन भागात विभागलेली होती.
July 16, 2023

ब्रिटिशकालीन मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जायची. ससून डॉकपासून थेट किंग्ज सर्कलपर्यंत या ट्रामचे जाळे पसरले होते. ऑपेरा हाऊस, चर्नीरोड, गोल देऊळ, सीपी टँक, ताडदेव, बोरिबंदर (आत्ताचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस), जे. जे. रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी अनेक भागांमध्ये या ट्रामने प्रवास करता येत असे. BEST कडून ही सेवा चालवली जात असे. जसजशी मुंबईतील वाहनांची गर्दी वाढत गेली तसतशी ही हळूहळू चालणारी ट्राम बहुतेक त्रासदायक व्हायला लागली आणि अखेर बंदच झाली.
काल फोर्टमधल्या हुतात्मा स्मारक परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याखाली गाडले गेलेले ट्रामचे रूळ पुन्हा दिसायला लागले आणि कधी काळी या ट्रामने प्रवास केल्याच्या मुंबईकरांच्या आठवणी जाग्या झाल्या. मला स्वत:ला माझ्या आजोबांबरोबर केलेला या या ट्रामचा प्रवास आठवतोय. बहुतेक दादर टीटी ते परळ असा हा प्रवास केला होता. दादर टीटी हा शब्द आपण नेहमी वापरतो. हा टीटी शब्द म्हणजे ट्राम टर्मिनस चा शॉर्टफॉर्म होता. परळलाही असेच ट्राम टर्मिनस होते आणि त्यालाही परळ टीटी म्हणत. या ट्रामचं तिकिटंही होतं काही पैसे किंवा काही आणे.
ब्रिटिशांनी जशी रेल्वे मुंबईत आणली तशीच ट्रामही त्यांचीच देणगी. १८९५ मध्ये तेव्हाचे मद्रास आणि आताचे चेन्नई येथे विजेवर चालणारी ट्राम पहिल्यांदा धावली. कोलकात्यात १९०० मध्ये, मुंबई व कानपूरला १९०७ मध्ये आणि दिल्लीत १९०८ मध्ये ट्राम सुरु झाली.
मुंबईतल्या ट्रामची योजना ब्रिटिशांनी १८६४ मध्ये आखली. ते कंत्राट त्यांनी स्टर्नस व किटरेज यांना दिले. आणि ९ मे १८७४ ला परळ ते कुलाबा अशी पहिली ट्राम ओढली गेली. होय... ओढली गेली कारण तीच्या इंजिनाच्या जागी होते सहा किंवा आठ घोडे. विजेवरची ट्राम यायला आणखी ३३ वर्षे गेली.
मुंबईतली ट्राम जेव्हा बंद झाली तेव्हा शेवटच्या ट्रामच्या शेवटच्या फेरीला लोकांनी केवळ निरोप द्यायला तुफान गर्दी केली आणि ते ट्राम बरोबर ट्राम डेपो पर्यंत गेले. वाहनावरचे एवढे प्रेम बघून त्या चालकाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले.
आता मजा बघा.. जोपर्यंत फोर्ट परिसरात सापडलेले ट्रामचे हे रुळ रस्त्याच्या खाली गाडले गेले होते तोपर्यंत कोणालाच त्यांची आठवण नव्हती. मात्र आता ते सापडल्यावर BEST ने ते आपल्या मालकीचे आहेत असे सांगत हे चारही रूळ व्यवस्थित उखडून ते आणिक आगार येथील बेस्टच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. खरेतर हे रुळ म्हणजे केवळ BEST च्या आठवणींचा ठेवा नसून मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखूणा आहेत.
आणि तसेही आपल्याकडे रस्त्यांची कामे करताना पूर्वीप्रमाणे रस्ता खणून नव्याने बांधला जात नाहीच. असलेल्या रस्त्यावरच दगड आणि डांबराचे नवे नवे थर दिले जातात. प्रशासनाने इतक्या वर्षात रस्ते शास्त्रशुद्धपणे बांधले असते तर हे रुळ तब्बल ५० वर्षे गाडून राहिलेच नसते.
मुंबईच्या अनेक रस्त्यांखाली ब्रिटिशकालीन मुंबईतील अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या आहेत. इतिहासाच्या या खुणा कोणाच्याही खिजगणतीत नसून नुसत्याच रस्त्याच्या अथवा रेल्वे स्थानकाच्या बाजूला पडून आहेत. या सर्वच गोष्टींच्या माध्यमातून मुंबईतील ऐतिहासिक ठेवा सांभाळून ठेवण्याची गरज मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार करत आहेत.
-- निनाद प्रधान
February 24, 2016
नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.
May 11, 2024
गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची, अर्थात विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ! “पोस्ट ऑफिस उघडं आहे ” ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-०२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा मराठीत लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
April 6, 2023
हाजी अलीच्या दर्ग्याचं स्थान मोठ रमणीय आहे त्यामुळे इथे सहज म्हणून फिरायला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते.
November 21, 2016
मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..
November 12, 2016
दादर’ नामजन्माचा शोध घेतला असता बऱ्याच ठिकाणी ‘दादर’ हे नांव जिना किंवा शिडी यावरून आलं असा उल्लेख सापडला..
March 9, 2016
चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत. मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी !
December 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti