नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

विजय आज त्याच्या कार्यालयात बसून संगणकावर काम करत होता… इतक्यात त्याचे एक मित्र बऱ्याच महिन्यांनी त्याला भेटायला आले… ते मित्रही साहित्यिक असल्यामुळे विजय आणि त्यांच्या चर्चा रंगणारच होत्या. विजयने बोलायला सुरुवात केली तोच ते म्हणाले,” माझी बायको वारली एक महिन्यापूर्वी ! ते ऐकून विजयला धक्काच बसला ! त्या मित्राचे वय असेल साधरणतः ५० वर्षे, म्हणजे त्यांची पत्नी असेल पंचेचाळीसची वगैरे, त्यामुळे त्या इतक्या कमी वयात वारल्याचे ऐकून विजयला धक्काच बसला ! विजय काही त्यांना कधी प्रत्यक्षात भेटला नव्हता त्यामुळे त्यांच्या एकूणच तब्बेतीबद्दल विजयला काही माहिती नव्हती. पण ! यापूर्वी विजयाच्या त्या मित्राच्या बोलण्यात कधी त्यांच्या तब्बेतीचा विषय निघाला नव्हता म्हणजे त्या फार पूर्वी पासून आजारी वगैरे असण्याची शक्यता कमीच होती.. त्यामुळे विजयने थोडं गंभीर होतच त्यांना प्रश्न केला,” कशा वारल्या ? काय झालं होत ?? त्यावर ते मित्रही गंभीर होत म्हणाले,
August 9, 2022
रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही. त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव.
March 29, 2023
एखाद दिवशी संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाला की मी शिवाजी पार्कच्या कट्टयावर जाऊन बसतो. तिथे माझ्याचसारखी संध्याकाळचा मोकळा वेळ घालविण्यासाठी अनेक मंडळी जमलेली असतात. कुणी कट्टयावर गप्पा छाटत बसलेले असतात, कुणी शिवाजी पार्कला राऊंड मारण्यात दंग असतात, तर कुणी शेंगदाणे, भेळ वगैरे टाईमपास खाण्याचा आस्वाद घेत असतात. हा सर्व माहौल निरखीत कट्टयावर शांत बसून राहणं हा माझा आवडीचा छंद. तासादोनतासांच्या या विरंगुळ्यात माणसांचे अनेकविध नमुने पाहायला मिळतात. पार्कवर फिरायला येणारी ही मंडळी कोण असतील, त्यांची घरची बॅकग्राऊंड काय असेल एवढंच नव्हे तर त्यांचा स्वभाव कसा असेल याचे तर्क लढवीत बसलं की वेळ सहज निघून जातो. हातापायांच्या व्याधींनी त्रस्त मंडळी व्यायामासाठी पार्कला रडतखडत फेऱ्या मारताना पाहिली की आपली तब्येत अजून बऱ्यापैकी ठाकठीक आहे याचं समाधान मिळतं आणि काहींच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव टिपले की आपल्यापुढील समस्या अगदीच किरकोळ असाव्यात याची शाश्वती मिळते. तासाभरानंतर मनाला तरतरी येते आणि आज चांगला विरंगुळा मिळाला याचं समाधान वाटतं. म्हणूनच संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाला की शिवाजी पार्कच्या कट्टयावर जाऊन बसणं मला मनापासून आवडतं.
कट्टयावर वेगवेगळ्या वयोगटांचे ग्रुप्स संध्याकाळचा आनंद लुटण्यात दंग असतात. तरुणांचे ग्रुप्स दंगामस्तीत व्यग्र असतात. कुणी बाईकवरुन जातयेत असतं, कुणी मोबाईलवरील गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरीत असतं तर कुणाचा नुसताच आरडाओरडा सुरु असतो. सळसळणाऱ्या रक्ताच्या या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. अर्थात या तरुणांमध्ये तरुणीही सहभागी झालेल्या असतात. या तरुणींचा उत्साह आणि त्यांची दंगामस्ती तरुणांपेक्षा कांकणभर अधिकच भासते. युवा पिढीचं हे उत्साहाने बागडणं पाहिल्यानंतर मनात नकळत आपल्या मनातील तरुणपणाच्या स्मृती जागृत होतात. आपण कधी आणि कुठे आपल्या मित्रांना भेटत होतो, कुठल्या विषयांवर आपले हास्यविनोद रंगत असत याची उजळणी होते. मन एका वेगळ्याच विश्वात भ्रमंती करु लागतं.
पार्कच्या कट्टयावर बसणाऱ्या वयस्क मंडळींच्या ग्रुप्सचं मला मोठं अप्रूप वाटतं. जीवनातील सर्व खेळी खेळून झाल्यानंतर निवृत्तीचं आयुष्य जगणारी ही मंडळी. या मंडळींचे बोलण्याचे विषय काय असतील, यांच्या कसल्या चर्चा झडत असतील याची मला फार दिवसांपासून उत्सुकता होती. एक दिवस मी मुद्दामहून या मंडळींच्या शेजारीच ठाण मांडून त्यांच्या गप्पा ऐकण्याचं ठरवलं. गुडघेदुखीनं आपल्याला कसं हैराण केलं आहे, सून वेळेवर कधीच चहा देत नाही, असल्या तक्रारींचे सूर आता आपल्याला ऐकायला मिळणार याची मला खात्री होती. मात्र त्यांच्या गप्पा ऐकल्यानंतर मी अक्षरशः चकीत झालो. एक जख्ख म्हातारेसे गृहस्थ चक्क परवीन बाबीने स्यूसाईड का केलं यावर हळहळ व्यक्त करीत होते! जवळ बऱ्यापैकी पैसा अडका असताना परवीन बाबीने आत्महत्या का करावी याचा संभ्रम त्या आजोबांना पडला होता आणि त्यांचा मित्रपरिवारही या चर्चेत उत्साहाने सामील झाला होता! जीवनाचा आनंद आकंठ लुटण्याची त्यांची हौस मला कौतुकास्पद वाटली. केवळ दिवसाचीच नव्हे तर आयुष्याची संध्याकाळही ही मंडळी मजेत जगत होती.
शिवाजी पार्कला राऊंड मारणारी अनेक मंडळी माझ्या आता परिचयाची झाली आहेत. म्हणजे या मंडळींची माझी प्रत्यक्ष ओळख झालेली नाही. मात्र त्यांचे चेहरे मी ओळखतो. चालण्याच्या त्यांच्या लकबी मी मनात टिपल्या आहेत. ही मंडळी दिसली की फारा दिवसानंतर मित्र भेटावा असा आनंद मला होतो. या मंडळींतल्या एका अतिउत्साही म्हाताऱ्याचा पेहराव मला मात्र खटकतो. मांडयांपासून संपूर्ण पाय उघडे टाकणारी आगदी छोटीशी चड्डी, बिनबाह्यांचा बनियन आणि मानेवर लटकणारा पिकलेल्या केसांचा बुचडा अशा विक्षिप्त पेहराव्यात हे गृहस्थ रोज संध्याकाळी शिवाजी पार्कला राऊंड मारण्यासाठी येतात. त्यांना पाहिल्याबरोबर चारचौघात जरा चांगल्या कपडयात वावरत जा असा सल्ला त्यांना द्यावा असा विचार मनात येतो. पण मी उठत नाही. जो पोषाख घालायला त्या सद्गृहस्थाला स्वतःला लाज वाटत नाही, आणि शिवाजी पार्कवर जमलेल्या अन्य कुणालाही त्यांच्या पेहरावाबद्दल काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला काय अधिकार अशी स्वतःची समजूत घालून मी शांत बसून राहतो. कधीकाळी या गृहस्थाची आपली ओळख झाली तर मात्र त्याला खडे बोल सुनवायचे असंही मी मनातल्यामनात ठरवून गप्प राहतो.
शिवाजीपार्कवर संध्याकाळी आणखी हमखास दिसते ती एका मायलेकींची जोडी. यातील लेक बहुधा कॉलेजात वगैरे जात असावी. टी शर्ट आणि जीन्स हा नव्या पिढीचा पेहराव तिने अंगावर चढवलेला असतो. तिची आई तशी साडीतच असते. मात्र गंमत अशी की त्या दोघीत ती आईच अधिक तरुण दिसते! मला राहूनराहून आश्चर्य वाटतं ते याच गोष्टीचं. संसारात विवंचनांना तर सर्वांनाच सामोरं जावं लागतं. या विवंचनांचं जाळं नकळत माणसांच्या चेहऱ्यावर आधी उमटतं. अगदी कितीही सुखवस्तु कुटुंबातील व्यक्ती असली आणि फारशा विवंचना नसल्या तरी वयानुसार चेहऱ्यावर थकवा हा जाणवतोच. मग एका वयात आलेल्या मुलीच्या त्या आईचा चेहरा स्वतःच्या मुलीपेक्षाही अधिक टवटवीत कसा राहतो? शरीर सौष्ठव जपण्याचे कोणते रहस्य त्या स्त्रीला उमगलं असावं? या मायलेकी समोरुन गेल्या की माझ्या मनात हे विचार पिंगा घालू लागतात. अर्थात इथेही मला शांतच बसून राहावं लागतं. त्या मायलेकींशी संवाद साधणं अशक्यच असतं. मायलेकी पुढे निघून गेल्या की मी अन्य मंडळींचे चेहरे निरखू लागतो.
शिवाजी पार्कच्या फेरीवाल्यांना निरखण्यातही माझा बऱ्यापैकी वेळ जातो. रुपया दोन रुपयांचे चणेशेंगदाणे विकणाऱ्या त्या भैयाच्या हाती दिवस अखेरपर्यंत किती मिळकत जमा होत असावी? या अगदीच तुटपुंज्या मिळकतीत तो आपल्या संसाराचा गाडा कसा हाकत असावा? चणेशेंगदाणे विकणाऱ्या भैयाचा हा कदाचित पार्टटाईम बिझिनेस असावा. पण त्या कुल्फीवाल्याचं काय? दिवसा राबराबून बिचारा कुल्फी तयार करत असावा आणि संध्याकाळी ती विकण्यासाठी वणवणत असावा. कसं भागतं या मंडळींचं अशा नगण्य व्यवसायांवर? प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. माझ्या विचारांचं चक्र भरकटतच राहतं.
सूर्य कलला की शिवाजी पार्कच्या शेजारी वसलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवर खाद्यप्रेमी मंडळींची जत्रा जमू लागते. शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव, बर्गर, फ्रॅन्की, बर्फाचे गोळे यावर जिभेचे चोचले पुरविण्यात आनंद मानणारी मंडळी तुटून पडतात. तासदोन तास बसून माझ्याही पायाला रग आलेली असते. मी कट्टयावरून खाली उतरतो. थोडे पाय झटकून चालू लागतो. जाताजाता एखादं आईस्क्रीम मीही विकत घेतो. आईस्क्रीमची मधुर चव जीभेवर रेंगाळते. मनात शिवाजीपार्कचा तो प्रसन्न माहौल रेंगाळतच असतो. पुन्हा कधी मोकळा वेळ मिळाला की कट्टयावर नक्की यायचं असा बेत पक्का करत मी सपासप चालू लागतो. शिवाजीपार्क मागे राहतं. मी माझ्या दैनंदीन व्यापात व्यग्र होतो.
- सुनील रेगे
July 5, 2022

“एक वेळ पोलीस होऊन पहा, मग त्याची काय अवस्था असते, त्याचा अनुभव येईल. ” मी जीव तोडून सांगत होतो, पण समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्याचा एकच हेका होता, “साहेब तुम्ही मला मुर्ख समजता का? बावळट समजता? आम्ही तुमच्याकडे तक्रार घेउन येतो आणि तुम्ही आम्हालाच ज्ञान शिकवता?
December 31, 2023
प्राचीन काळतील एका राजाच्या पदरी असलेल्या एका इमानी सेवकाची ही कथा आहेएका रुजाच्या राजवाड्यात एकसेवक होता. त्याचे वडीलही राजाच्या वडिलांच्या चाकरीत होते. मात्र सेवकाच्या वडिलांनी त्या सेवकाला बजावून ठेवले होते की, राजवाड्यात नोकरी करीत असताना अनेक प्रलोभने येतात, मात्र तू कोणत्याही मोहाला बीपडू नकोस. कोणतेही काम इमानदारीने कर, त्यातच तुझे हित आहे. त्याप्रमाणे तो सेवक आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करीत असे. रत्नाकडे रोज एक साधू यायचा व प्रसाद म्हणून त्याला एक द्यायचा, परंतु ते फळ सजा स्वतः न खाता त्या सेवकाला द्यायचा.सेवकही ते फळ राजाला दिले अहे त्यावर आपला अधिकार नाही. म्हणून स्वत: न खाता राजवाड्यातल्याच एका रिकाम्या खोलीत ठेवून द्यायचा. हा दिनक्रम बरेच दिवस चालू होता. एके दिवशी त्या साधूने राजाला असेच फळ दिले व आशीर्वाद देऊन तो निघून गेला. राजा रोजच्याप्रमाणे ते फळही त्या सेवकाला देणार तेवढ्यात तेथे एक माकडाचे पिलू आले. राजाने कुतूहल म्हणून आपल्याजवळील फळ मग त्या सेवकाला न देता त्या माकडाच्या पिलाला दिले. माकडाने लगेच ते फळ खायला सुरुवात केली. राजाही गमतीने त्याचे खाणे पहात होता. फळ अर्धवट खाक्यानंतर त्यातून एक रत्न बाहेर पडले. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याने त्या सेवकाला लगेच विचारले, की रोज तुला मी देणारे फळ तू काय करीत होतास? त्यावर त्या सेवकाने राजाला ती खोली उघडून दाखविली. ती खोली फळाने अर्धी भरली होती व त्यातील फळे सडल्यामुळे त्यातून रत्ने बाहेर आली होती. तो रत्नांचा खजिना पाहून राजा फारच आश्चर्यचकित झाला. त्या इमानी सेवकाचे त्याला कौतुक वाटले व त्याने ती सारी रत्ने त्या सेवकाला देऊ केली. मात्र त्या इमानी सेवकाने त्या रत्नावर तुमचाच अधिकार आहे, असे राजाला सांगून ती सर्व रत्ने नम्रपणे नाकारली व राजाची चाकरी करण्यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे त्याने सांगितले. त्या सेवकाचा तो इमानीपणा व राजनिष्ठा पाहून राजाही भारावून गेला होता.
February 13, 2017

June 22, 2022
रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.
February 2, 2026
गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..
February 3, 2026
आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं ….
February 4, 2026
पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले..
December 12, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti