नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
म्हातारी कमरेत पार वाकली होती .
काठीच्या आधारानं , लटपटत्या पायांनी , शेजारच्या डबक्यात साठलेलं पाणी , गळणाऱ्या भांड्यातून आणत होती .
चार दिवसांपूर्वी दरडीखाली गाडले गेलेले , पाच मृतदेह , माती बाजूला करून कुणीतरी वर आणून ठेवले होते .
त्या सडत चाललेल्या प्रत्येक मृतदेहावर , म्हातारी पाणी ओतून स्वच्छ करीत होती .
म्हातारा नवरा , मुलगा , सून , नातवंडं मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यावर , त्या देहाकडे बघताना , खाचा होत चाललेल्या डोळ्यांतलं पाणी केव्हाच आटून गेलं होतं .
ऐंशी वर्षाचा तिचा सुरकुतलेला देह अधिकच आक्रसून गेला होता .
पाण्यानं ते सडलेले मृतदेह धुण्याचं तिचं काम सुरूच होतं
समोर बघ्यांची गर्दी , हातातल्या मोबाईलवर त्यादृश्याचा व्हिडीओ काढण्यात गर्क होती .
चॅनलवाले शूटिंग करीत होते. म्हातारीचा बाईट घेण्यासाठी धडपडत होते .
त्यांचे प्रश्न तयार होते .
- या बॉडी कडे बघताना आता मनात काय भावना आहेत ?
- नातवंडं कशी ओळखली ?
- घर गाडलं जात असताना , त्या प्रसंगाकडे कसं बघता तुम्ही ?
- समाजाला काय सांगाल ?
एक ना दोन , अनेक प्रश्न तयार होते , पण म्हातारी त्यांच्याकडे बघत नव्हती .
त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता .
रिकामटेकडे बघे मात्र चर्चा करीत होते .
थोड्या वेळाने म्हातारीने एक पितळी डबा हाती घेतला . त्याच डबक्यातल्या पाण्याने धुतला . आणि उघडून बघ्यांच्या गर्दीतल्या सर्वांसमोर धरला .
त्यात पाचशेच्या दहाबारा नोटा होत्या .
एक सोन्याचं मंगळसूत्र होतं . आणि चांदीचे चार वाळे होते .
" हे घ्या सोनं , चांदी आणि होते नव्हते ते पैसे . तुम्हाला या मदतीची गरज आहे ! यातून तुम्हाला नवीन मोबाईल घेता येईल , प्रसिध्दी मिळेल आणि फेसबुक की कायसं असतं ना , त्यावर टाकता येईल . हे घ्या . मला आता याचा उपयोग नाही . टिव्ही वाल्यांना पण द्या . "
म्हातारीनं सगळ्यांसमोर डबा ठेवला . पाठी वळली .
गर्दीतल्या बघ्यांच्या माना खाली झुकल्या होत्या . मोबाईल बंद झाले होते. चॅनल वाल्यांचे बूम बंद पडले होते . आणि कॅमेरा वाल्यांनी अँगल बदलला होता .
आता मात्र खाली झुकलेल्या प्रत्येकाला जाणवत होतं...
- आपले पाय मातीनं जरा जास्तच बरबटले आहेत ...!
- श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
--------
कथा नावासह शेअर करायला माझी काहीच हरकत नाही .
मात्र कथेतील आशयावर चिंतन जरूर करा .
July 21, 2023

विजयच्या घराची बेल वाजल्यावर विजयने दरवाजा उघडला तर दरवाज्यात त्याच्या इमारतीतील काही तरुण गणपतीची वर्गणी गोळा करायला आले होते. विजयने सुरुवातील १०० रुपये वर्गणी दिली पण आम्ही सर्वांकडून १५१ रुपये वर्गणी घेत आहोत म्हटल्यावर विजयने आणखी ५१ रुपये वर्गणी दिली. वर्गणी देताना विजयला मनस्ताप वगैरे होत नाही. पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असावा असे विजयला प्रामाणिकपणे वाटते.त्यामुळेच विजय कोणालाही वर्गणी देताना कमीत कमीच देतो कारण एका वर्षी आपल्याला जास्त वर्गणी द्यायला परवडत असेल तरी ती द्यायला प्रत्येक वर्षी आपल्याला परवडेलच असे नाही ना ? माणसाने धार्मिक कार्यात सहभाग नोंदवायलाच हवा !
September 4, 2022
मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडिया नगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराथी समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्स चे कारखानदार , हिरे , किंमती खडे याचे व्यापारी यांची निवासस्थाने असलेला. फेब्रुवारी १९९० मधे या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली.
February 10, 2023
ससा आणि कासव म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे ‘ससा व कासवाची शर्यत’. पण माझी गोष्ट यापेक्षा निराळीच आहे बरं का.
October 22, 2025
आमच्या बालपणी कधी आम्ही पिकनीकला गेलो नाही किंवा पर्यटनस्थळाला गेल्याचे फारसे आठवत नाही. अनेक जणांच्या तोंडून पर्यटनस्थळांची वेगवेगळी नावं मात्र ऐकली होती. मेळघाट्,लोणावळा, चिखलदरा,म्हैसमाळ ही नावं ऐकून त्याबद्दल खूप उत्सुकताही वाटायची पण, आमचे फेवरेट पर्यटन स्थळ म्हणजे गावचा हालोबाचा माळ.
July 30, 2021
पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. त्यानंतर एक वर्षभर त्यांना विराटाच्या मत्स्य देशात अज्ञातवासात राहून काढावे लागले. हाही खडतर काळ संपला व त्यांनी विराटाच्या नगरीस रामराम ठोकला. उपप्लव्य नावाच्या एका नगरामध्ये ते उघडपणे वास करू लागले. कृष्ण आणि बलराम द्वारकेहून तेथे आले. मित्रमंडळ व आप्तेष्ट आले. या सर्वांच्या उपस्थितीत अर्जुनपुत्र अभिमन्यूचे विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी मोठ्या थाटात लग्न पार पडले.
September 12, 2024
परमेश्वर या ना त्या रूपाने मदतीला धावून येतच असतो. पण खरे सांगू तो, आपल्यातल्याच कोणाला तर त्या क्षणापुरता आपले ‘देवत्व’ देत असतो. त्या क्षणी ती व्यक्ती ईश्वराची भूमिका जगते. समोरच्या माणसाची मदत करते. तुमच्याही जीवनात असे क्षण आले असतील, आणि येतीलही. आपणच, बरेचदा ‘मीच का करू?’ म्हणून ती भूमिका टाळून देतो. अशी ‘मदत श्रुंखला’ पैश्याने भरपाई करून, किंवा फक्त ‘धन्यवाद’ म्हणून, खंडित करून टाकतो.
December 13, 2020

दारावरची बेल वाजली. एक मध्यम वयाची स्त्री उभी होती. जास्त सुन्दर नाही परंतु एकदा मागे वळून बघण्याजोगी… तुम्हीच सतीश चाफेकर का ? ते ‘ मी आणि ती ‘ लिहिणारे तुम्हीच ना….
June 5, 2021

सिनेमात काम करायचं -मुंबई. नोकरी मिळत नाही- मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई परिक्षेत नापास झाला-मुंबई : मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसांना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही.
April 21, 2022
राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती.
त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी दोन एकर जमीन होती. त्यातच हे कुटुंब राबायचे. जगण्याएवढी सालचंदी व्हायची. कष्ट करून , मोलमजुरी करून पोरांचे शिक्षण चालू होते. राजूला थोडेफार समजायला लागले. सुट्टी असली की तो आई-वडिलांना कामात मदत करत असे. वडिलांसाठी रानात भाकरी घेऊन जाई. शेळ्या सोडून चालायला नेई. कधीकधी सरपण, गवर्या वेचून आणी. कळशीने घरचे पाणी भरी.जमेल तशी मदत करी.
यासाली भयंकर दुष्काळ पडला. कोणत्याच विहीर, तलावात ,हापशाला पाणी राहीले नाही. पाणी नाही म्हणून शेती पिकेना. त्यामुळे रोजगार मिळेना.ऊसतोड, वीटभट्टी कारखाना अशा ठिकाणी लोक कामाला जाऊ लागली. काही हमालीला जात होती.काही परराज्यात जात होती. राजूच्या वडिलांनी सावकाराकडून काही कर्ज घेतले.जमीन काही पिकेना. कर्ज काही फिटेना.घेतलेले कर्ज परत करावेच लागणार होते. ते परत द्यायला काही मार्ग सापडत नव्हता. तेवढ्यात गाडीवरून पडून त्यांचा हात मोडला. राजूचे वडील अधू झाले होते. काम सुटले. खाणारी तोंडे वाढली. राजूला शाळा सोडावी लागली. परिस्थिती बिकट झाली. गुरूजी घरी यायचे. ' पोराला शाळेत पाठवा. हजेरी कमी पडतीय.
परीक्षा जवळ आलीय.' असं म्हणायचे. पण नाईलाज झाला होता.पोटापाण्याचा प्रश्न होता. एका रात्री आईवडीलांचे भांडण झाले. त्याचा अर्थ राजूला काही समजला नाही . पण वडील रागाने निघुन गेले. त्यांच्या हातात कसलातरी दोर होता. राजूच्या हे लक्षात आले. त्याच्या शाळेत वर्तमानपत्राचे वाचन व्हायचे . त्यात एक बातमी हमखास असायची. 'कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या.' सर म्हणायचे " ती नका वाचू. दुसरी वाचा चांगली." राजूच्या मनात पाल चुकचुकली.
तो ताडकन उठला. अंधारात पळाला. दगडधोंडे बघितले नाही की काट्याकुट्या. बापाला गाठलच. वडीलांसमोर धाय मोकलून रडायला लागला. विनवणी करू लागला. त्यांच्या उरात माया उत्पन्न झाली. तोपर्यंत चारदोन माणसं जमा झाली. राजूच्या वडिलांनी मनातील विचार काढून टाकले. ते घरी आले. राजूला कडकडून मिठी मारली.
विठ्ठल जाधव,शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५ (दिव्यमराठी)
November 21, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti