नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता.
December 25, 2024
एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही, रोग नाही, राई नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आषाढचा महिना आला. झिम झिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गाई गुरांना चारा झाला. दूध दुभत्याची चंगळ झाली. शेतातली कामे संपली. मुली माहेरी आल्या.
August 29, 2024
डॉ. कर्णिक, साठीच्या आसपास वय असलेले, नावाजलेले गायनीक होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच गर्भवती महिलांची गर्दी असायची. आजचा दिवसहि त्याला अपवाद नव्हता. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शेवटचा पेशंट तपासला कि, मॅटर्निटी वॉर्डातून राऊंड आणि मग ते या कामाच्या रगाड्यातून मोकळे होणार होते.
December 5, 2020
पंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली – दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या आणि त्याकाळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. पण ती शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असे तो टाळण्यासाठी नाईलाजाने त्याने या नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. विजयला वर्गात शांत आणि शिस्तीत राहण्याची जणू सवयच जडलेली होती. पण तो कितीही शांत दिसत असला तरी स्वभावता शांत अजिबातच नव्हता. या नवीन शाळेत बहूतेक मुल खोडकर होती. त्यामुळे त्या मुलांच्या तुलनेत विजय किंचित वेगळाच होता.
December 24, 2015
प्रेमकथा
June 3, 2017
समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला.
December 20, 2023
” कुठे आहेस आत्ता ? ”
” Whatsapp चा असा दुरुपयोग नाही करायचा . ”
” दुरुपयोग कसला ? तू सेशन घ्यायला पुण्याला गेला आहेस आणि पाऊस खूप आहे म्हणून काळजीने विचारले . ”
” काळजीने की प्रेमाने ? ”
” प्रेम आहे म्हणून काळजी आहे , महाराज ” .
” वेडाबाई , मी इतका सतत फिरत असतो की आता खरंच अशी काही काळजी करावी असं काही उरलंय का ? आणि अशी इतकी माझी काळजी करायला लागलीस तर कसं व्हायचं ? ” .
February 5, 2026

स्त्री कोणत्या घरांत जन्मली आहे ह्यापेक्षा तिचं सौंदर्य, तिची कोमलता, तिचा कमनीय बांधा, तिची मोहकता, तिचा स्वाभाविक डौलदारपणा, तिचे उत्स्फूर्त विलोभनीय वागणे आणि तिचं चातुर्य ह्या गोष्टी स्त्रीचं योग्यता ठरवतात आणि एखाद्या झोपडीतील मुलीलाही एखाद्या राजकुमारीच्याच पातळीवर आणून ठेवतात.
March 30, 2022

मुंबईतील गर्दी हीच सुरक्षिततेचा विश्वास देते. पूर्वी मुंबईचा पोलीस हे नागरिकाना सुरक्षेच प्रतीक वाटायच. पण आता काय झालंय कुणास ठाऊक, पण मुंबईच्या पोलिसांचा ताल बदललाय.
July 10, 2022
फार पूर्वी रशियात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या वेळी रशियावर निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता. आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याने ठिकठिकाणी सैनिक तैनात केले होते. अशाच एका अतिशय दुर्गम भागातील एका छावणीत एक सैनिक पहारा देत बसला होता. परंतु तो केवळ नावालाच पहारा द्यायला बसला होता. असे म्हणावे लागेल कारण त्याचे अजिबात लक्ष नव्हते. त्याच्या डोक्याला एक फार मोठी चिंता भेडसावत होती. त्या सैनिकाला एक आई व चार बहिणी होत्या. आपल्या बहिणी सुखात राहाव्यात म्हणून कर्ज काढून त्याने त्यांची लग्रे लावून दिली होती. आता हे एवढे मोठे कर्जकसे फेडायचे याचीच त्याला चिंता लागून राहिली होती. शिवाय आपल्या मूळ गावापासून तो बराच लांब होता. त्यामुळे कर्जदार आपल्या आईला सतावतील याही भीतीने तो खूपच अस्वस्थ होता. आपल्याला कोणाकोणाचेकिती किती कर्ज आहे याची त्याने यादीच तयार केली. ती यादी त्याने पुन्हा एकदा वाचूनपाहिली व त्याखाली ' आता हे कर्ज कोण आणि कधी फेडणार ?' असे त्याने लिहून ठेवले. थोड्या वेळाने पहारा देत असतानाच त्याला गाढ झोप लागली. नेमक्या त्याच वेळेला निकोलस राजा सीमावर्ती प्रदेशात आला होता. तो त्या मार्गावरून जात असताना त्याला आपल्या या सैनिकाची छावणी दिसली म्हणून तो तेथे आला. त्याने पाहिले आपला एक सैनिक गाढ झोपी गेला आहे व शेजारी एक कागद पडला. उत्सुकता म्हणून त्याने तो कागद पाहिला. सैनिकाने लिहिलेली ती कर्जाची यादी व त्याच्या खाली 'हे कर्ज कोण आणि कधी फेडणार' हे त्याने वाचले व त्याच्याखाली 'निकोलस' असे लिहून व आपली स्वाक्षरी करून तो .आला तसाच निघून गेला. थोड्या वेळाने त्या सैनिकाला जाग आली. जवळच पडलेला कागद उचलून त्याने आपल्या कर्जाची यादी पुन्हा वाचायला सुरुवात केली व खाली जेव्हा 'निकोलस' चे नाव व स्वाक्षरी त्याने पाहिली, त्या वेळी त्याचा विश्वासच बसला नाही. काही दिवसांनी त्याला कर्ज फेडीसाठी सरकारी खजिन्यातून रक्कम मिळाली व तो कर्जमुक्त झाला. एका कर्तव्यदक्ष राजामुळे त्याच्या मनातील मोठी चिंता दूर झाली होती.
February 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti