(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कृतज्ञता

    हा जीवनातील सर्व सद्गुणातील एक मानसिक स्वास्थ्य देणारा सर्वश्रेष्ठ सद्गुण आहे.
    प्रत्येकाच्या जीवन प्रवासातील प्रत्येक क्षण हा संस्मरणीय आहे. आणि अशा जीवन प्रवासात जगतांना आपल्याला अगदी कळतय अशा शिशुशैशवास्थे पासून जन्मदात्यांचे , नातेवाइकांचे , गुरुजनांचे , शेजारीपाजाऱ्यांचे , मित्रसहकाऱ्यांचे अनमोल असे योगदान लाभलेले असते. त्यामुळे आपले जीवन अगदी सुखद समृद्ध झालेले असते ही वास्तवता कुणीही नाकारु शकत नाही.
    ज्या अज्ञात , अदृश्य , अनामिक शक्तिने आपल्याला जीव सृष्टितील सर्वश्रेष्ठ मानवी जन्म दिला आहे. आपले जीवन सावरले आहे त्याचेही आपण आभारच मानले पाहिजेत हेही तितकेच खरे.!!
    आणि या सर्वाप्रती ही आभार व्यक्त करण्याची भावनां म्हणजेच कृतज्ञता ..!!!
    आपल्याला सर्वार्थाने मदत करणाऱ्या प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तिबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजेच Thankful असणे यालाच कॄतज्ञता म्हटले आहे.
    To Express Gratitude असेही इंग्लिश मध्ये म्हणतात.
    म्हणजेच कृतज्ञतेने आभार व्यक्त करणे.
    कधी कधी आपल्यावर झालेल्या उपकारांची आपल्याला सातत्याने आठवण येत असते. त्या उपकारांच ओझं आपल्याला जाणवत असतं. अशा वेळी आपण त्याबद्दल कॄतज्ञता व्यक्त केली , त्याबाबत आपण आभार मानले तर आपल्या मनावरील ताण कमी होतो.
    तेंव्हा उपकारांच स्मरण ठेवून नम्रपणे कॄतज्ञता व्यक्त करणं हा सर्व सद्गुणातील सर्वश्रेष्ठ असा सद्गुण आहे.
    याबद्दल गुरुवर्य डॉ. न.म. जोशी यांनी एका कार्यक्रमात सांगितलेली गोष्ट मी पुढे सांगत आहे.
    एकदा ब्रह्मदेवाने स्वर्गामध्ये सर्व सदगुणांची सभा बोलावली होती. साक्षात ब्रह्मदेवाने सभेचे आयोजन केले असल्यामुळे सर्व सद्गुण अगदी आवर्जून सभेला उपस्थित राहिले. सर्व सभागृह पूर्ण भरले होते . तरी देखील ब्रह्मदेव अजुन कुणाची तरी वाट पहात होते. त्या प्रतिक्षेत सभेला उशीर होत होता. बराच उशीर झाल्यामुळे जमलेल्या सर्व सद्गुणांची आपापसात चुळबुळ सुरु झाली , एकमेकांत चर्चा सुरु झाली .
    की हे ब्रह्मदेव असे कुणासाठी साठी इतकेवेळ थांबलेत.?
    पण इतका वेळ झाल्यामुळे वक्तशीर नावाच्या एका सद्गुणाने सरळ प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनाच प्रश्न विचारला की अहो अजुन किती वेळ वाट पहायची ? सर्वच खुपच वेळ थांबले आहेत. तेंव्हा ब्रह्मदेव म्हणाले आता फक्त 5 मिनिटे थांबुया आणि आपली सभा सुरु करूयात..
    एवढयात पाच मिनिटे होण्याच्या आतच सभागृहाच्या प्रवेशदारातून अगदी लगबगीने एक अगदी शांत , साधीसुधी , कृश , सडपातळ , सावळी अशी व्यक्ती सभागृहात आली देखील. उशीर झाल्यामुळे ती व्यक्ती सभागृहातील अगदी शेवटच्या आसनावर आसनस्थ झाली. हे पहाताच व्यासपीठावरुन साक्षात ब्रह्मदेव पायउतार झाले त्या उशिरा आलेल्या व्यक्तिकडे ( सद्गुणांकड़े ) गेले आणि त्या व्यक्तीला हाताला धरून व्यासपीठाकडे घेवून आले..
    सभा संपन्न झाली देखील.
    पण उपस्थित सर्व सद्गुणांच्यामध्ये चर्चा सुरु झाली की आपल्या सर्वामध्ये हा इतका मोट्ठा सद्गुण कुठला आहे ? ज्याला खुद्द ब्रह्मदेवांनी हाताने बोटाला धरून स्वागत केले ?
    तेंव्हा उपस्थिता मधील उत्सुकता या सद्गुणाने ब्रह्मदेवांना विचारले
    की हा सर्वश्रेष्ठ सद्गुण कोण आहे ?...
    तेंव्हा ब्रह्मदेव म्हणाले.... ..
    " हा सर्वश्रेष्ठ सद्गुण म्हणजे
    कृतज्ञता आहे..!!
    ताप्तर्य :
    माणसांन सदैव सर्वांशी कृतज्ञ राहिलं पाहिजे , आपल्या जीवनात योगदान दिलेल्या सर्वांच्या बद्दल म्हणजे कुणी लहान असो कुणी मोठा असो, कुणी श्रीमंत असो , कुणी गरीब असो केवळ मानवधर्म म्हणून कॄतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
    हीच खरी मानसिक मन:शांती आहे..
    जीवनाची सात्विक कृतार्थता आहे
    इती लेखन सीमा.
    -- वि.ग.सातपुते.
    9766544908
    दिनांक:- २१ - ४ - २०२२.
    पुणे.

      May 24, 2022


  • डोळेझाक (कथा)

    “यशोमतीबाईसाहेबांच्या– देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो – अंतिम संस्कारानंतर येताय ना?”, रिटायर्ड मेजर मालोजीराव गायकवाडानी त्यांच्या पुतण्याला विचारलं. “कशी काय होती व्यवस्था? सगळं ठीक पार पडलं ना?”

      December 12, 2022


  • दारासिंग ची पिंकी

    गोष्ट, खरं तर घटना आहे १९८६ मधली. आम्ही तेंव्हा बदलापूरला रहात होतो, आणि मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील एका कार्यालयात तीन शिफ्ट मधे काम करत होतो. ही घटना घडली त्या दिवशी मला सकाळी आठ ते रात्री आठ अशी दिवस पाळी होती. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. दिवसभराच काम आटोपून आणि लॉगबुक पूर्ण करून मी फ्रेश होऊन मला सोडवायला येणाऱ्या सहकार्याची वाट पहात होतो. सोबतीला असलेल्या चार्जमनने केलेल्या चहाचे घुटके घेत चार्जमन बरोबर गप्पा मारत होतो.

      July 3, 2025


  • खासे सामोसे

    पाऊस पडून गेल्यावर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा हमखास होतेच. अलीकडे कोणत्याही राजस्थानी स्वीट मार्टमध्ये गरमागरम सामोसे विक्रीला ठेवलेले असतातच. ज्याला ‘छोटीशी भूक’ आहे, तो सामोसा खायला, नक्कीच प्राधान्य देतो. दुकानदार तो गरम सामोसा पेपरप्लेटमध्ये घेऊन अंगठ्याने दाबून तो फोडतो, त्यात साॅस, ग्रीन चटणी घालून वरती बारीक शेव भुरभुरतो व सोबत एक तळलेली मिरची देतो.

      July 15, 2021


  • रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग

    रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला. त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे. रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा

      March 20, 2019


  • मी मराठी माझीही मराठीच

    २७ फेब्रुवारीला दरवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या ‘पोस्ट’ एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं ‘मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं’ काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे. खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. तरच ही ‘अमृताहून गोड’ भाषा टिकून राहील. सकाळी उठलं की, ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती l करमुले तू गोविदः, प्रभाते करदर्शनम् ll असं एकेकाळी म्हटलं जायचं.

      February 27, 2022


  • होर्डींग आणि शुभेच्छा

    संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती.

      April 5, 2013


  • टॅक्सी !

    शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा वेगळाच दिवस होता .

      April 1, 2018


  • पोकळ तत्वज्ञान

    ऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा  शब्दिक कीस  काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये  अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली.

      October 1, 2020


  • आषाढी आठवणी

    शाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला..

      August 19, 2021