(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “विंदां”चा लाल पाऊस

    अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.

      April 25, 2017


  • माकड,माणूस आणि संवेदनशीलता!

    नुकतीच एक अस्वस्थ करणारी बातमी मी वाचली. प्रसंग असा घडला. मोठ्या शहरातील एका कचराकुंडीजवळ एक वृद्ध माणूस निपचित पडला होता. काही लोकांनी त्याची विचारपूस करीत त्याला मदतीची तयारी दाखवली.परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाने लोकांच्या दयेस स्पष्ट नकार दिला.

      January 16, 2025


  • प्रतिमा

    रामायणकथेवर आधारीत भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भास यांच्या सर्वोत्कृष्ट नाटकांपैकी प्रतिमा हे एक नाटक . यात रामाच्या वनवासात जाण्यापासून ते रावणाचा वध आणि रामाचा राज्याभिषेक या घटनांना भास यांनी स्थान दिले आहे राजा दशरथाच्या मृत्यूनंतर भरत आपल्या आजीच्या घरुन परततांना अयोध्येजवळच्या रस्त्यावर असलेल्या देवकुळात पूर्वजांच्या मूर्ती पाहतो. तेथे दशरथाची मूर्ती पाहून भरताला त्यांच्या मृत्यूचा अंदाज येतो. प्रतिमा दर्शनाचा घटनेमुळे याला प्रतिमा नाटक असे नाव देण्यात आले.

      June 14, 2026


  • आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग

    भली मोठी वैचारिक पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने अर्जुनाने जेंव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक आणि व्हाटस्अप बाबत तीन सत्ये अर्जुनास समजावली...

    1)ज्यांना तुझे विचार आवडतात, ते न वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील..

    2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी खाजगीत प्रशंसा नक्की करतील..

    3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!!

    हे पार्था ! तू लिहीत रहा! पाठवत रहा! फॉरवर्ड करीत रहा!

      October 18, 2016


  • चित्रपटांमधील “अढळ” स्मृतिचिन्हे !

    चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग-

      May 6, 2021


  • आलेपाक

    साखर आणि आल्याच्या रसापासून केलेले ही वडी बहुगुणी औषधी आहे. पाचक व पित्तनाशक आहे. सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे. इतकं स्वस्त औषध उपलब्ध असताना आपण सर्रास महागडी आकर्षक पॅकींगमधली सीरप खरेदी करतो.

      February 12, 2022


  • सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…

    पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याबद्दल एक विशेष आठवण सांगितली!!

    जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबाना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबाना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!"( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !! जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बझेट कमी. पण भट साहेब जैसे थे !! ७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला " बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू "

    बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल ". बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरला आणि ट्याक्षि बोलाविली. टॅक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण. बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
    तुझेच मी गीत गात आहे
    अजूनही वाटते मला की
    अजूनही चांद रात् आहे!!

    सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेक फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे". भट साहेब तसेच निघून गेले. पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.

    कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा". ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते...

    कळे न मी पाहते कुणाला
    कळे न हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे
    कुणीतरी आरश्यात आहे

    पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील?

    परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो".

    रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते . इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घल. त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह , शांता वाह " असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.

    कळे न मी पाहते कुणाला
    कळे न हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे
    तुझे हसू आरश्यात आहे

    एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला .

    हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.

    अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ……….

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!
    https://youtu.be/QyXOuEF8wVw

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 17, 2017


  • जुन्यातील चांदोबा पुस्तक

    ... मी लहान होतो तेव्हा चांदोबा या पुस्तकाचा अगदी जवळचा वाचक होतो. त्यावेळी वर्तमानपत्रांची संख्या फार कमी होती ठराविक मासिके ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये वाचाव्यास मिळत होते. वाचनालये शहराच्या ठिकाणी होती शिवाय करमणुकीची साधने सुद्धा अतिशय कमी होती. गावामध्ये काही लोकांच्या घरात हरकुलस कंपनीची सायकल असायचे ठराविक लोकांच्या घरात रेडिओ असायचा. ज्याच्या घरामध्ये रेडिओ आहे त्याला गावामध्ये श्रीमंत माणूस आहे असे लोक समजायचे. साधने कमी होती परंतु माणसाच्या मनामध्ये एकमेकांविषयी अतिशय प्रेम होते. बाहेर गावचा माणूस एखाद्या वेळी पाहुणा म्हणून आला तर त्याचे जंगी स्वागत व्हायचे. बाहेरचा पाहुणा आल्यामुळे जिव्हाळा प्रेम व घर भरल्यासारखे प्रत्येकाच्या मनाला वाटत असे. त्यावेळी ची माणसे व आत्ताची माणसे यामध्ये भरपूर फरक झालेला दिसून येतो. सध्या तर शेतीच्या वाटपावरून भाऊ भावाचा वैरी झाला आहे अशी ही नवीन पिढी पोलीस स्टेशनमध्ये अजूनही सळ्या मोजत आहेत. केस करणारा व केस घेणारा ही दोन्ही माणसे मेली तरी शेतीचा निकाल लागला नाही. अशी कितीतरी उदाहरणे मी डोळ्यांनी पाहिली आहेत....।

    ... सध्या तर काही माणसांची बुद्धी मतिमंद झाली आहे आपला कोण दुसऱ्याचा कोण हे ओळखणे कठीण झाले आहे. जुन्या रूढी पद्धती दिवसां दिवस कमी होत चालल्या आहेत एकमेकांवर प्रेम करणारी माणसं निघून गेली परंतु चांगली शिकवणार याची संख्या हल्ली फारच कमी झाली आहे असे एकंदरीत जाणवते. दुसऱ्याचे वाईट कसे होईल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे असा हा कलियुगातील करमत स्वभावाचा माणूस. दिसून येत आहे याचीच मनाला खंत वाटते आमच्या वेळी मानसी तर प्रेमळ होतीच परंतु एकमेकांविषयी आदर फार मोठा होता. हे चांदोबाची पुस्तक बरेच काही सांगून जाते भले मी म्हणतो यातील कथा काल्पनिक असतील. परंतु याच कल्पनेतून भयंकर मोठे ज्ञान होते म्हणून असे पुस्तक त्यावेळी राहून राहून मी वाचत असे. कल्पकता विषय असल्याशिवाय माझा येत नाही गंभीर कथा किंवा कादंबरी जास्त कोण वाचत नाही. त्याच्यासाठी कल्पनेची काही वेळा झालर ही लावावी लागते या पुस्तकातील रंगीबेरंगी बोलकी चित्रे मनाला बरंच काही सांगून जातात. आणि चित्रावरूनच एखादी कथा जन्म घेते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.....।

    .... पूर्वी ग्रामीण भागामध्ये वाचण्यासारखे तसे काहीच नव्हते परंतु हा चांदोबा हातात आला म्हणजे. मला फार आनंद व्हायचा हा चांदोबा शिरटेकर दादांच्या घरी महिन्याला पोस्टाने येत होता. चांदोबाची पार्सल कधी येते मी वाट पाहत आहे दादांच्या घरी शक्यतो चांदोबा कोणी वाचत नसे. पण मी मात्र आवडीने वाचतो म्हणून दादांनी मला एकदा सांगितले होते आम्हाला आमच्या कामामुळे चांदोबा वाचायला वेळ नाही. तुला वाचनाची आवड आहे तूच वाचत जा म्हणून मी आवडीने चांदोबा वाचत असे. त्या पुस्तकातील विशेष मला वेताळ राजाची गोष्ट आवडत असे ही गोष्ट वाचताना मला भीती वाटून अंगावर काटे सुद्धा येत होते. प्रत्येक वेळी विक्रमानादित्याला मेलेला माणूस नवीन गोष्ट सांगत होता गोष्ट जुनीच होती पण मनाला भावून जात होती. प्रत्येक वेळी विक्रमादित्य राजा मेलेले प्रेत स्वतःच्या खांद्यावर घेऊन पुढे पुढे जात असे. आणि ते प्रेत राजाला गोष्ट सांगत असे हा जो सीन आहे तो स्मशानभूमीतला आहे असे वाचताना जाणवते. झाडाच्या खाली मयत झालेले प्रेत व झाडाच्या फांदीवर बसलेली भुते हे पाहिले की भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. वेताळाची गोष्ट वाचताना भीती तर वाटतेच परंतु पुढे काय याची उत्सुकता मनाला राहिल्याशिवाय राहत नाही हेच खरे......।

    ..... या पृथ्वीवर खरच भूत आहे का याचा अंदाज बांधणे कठीण आहे काही लोक म्हणतात भूत आहे तर काही लोक म्हणतात भूत दिसत नाही मग आहे कसे म्हणायचे. हा एक वादाचा प्रश्न आहे हे दिसते ते वास्तव आहे गुरु भक्ती करणाऱ्या माणसांना भूत दिसते असा काही माणसांचा समज आहे. प्रत्येक महिन्याला चांदोबा वेगवेगळी गोष्ट घेऊन पोस्टातून येत होता. पुस्तकाच्या वरील रंगीत सुंदर चित्र व आतील रंगीत चित्रे यामुळे चांदोबा हे पुस्तक अतिशय उठावदार असे दिसत होते. मृत आत्म्यात घुसलेला वेताळ जणू प्रत्येक माणसांची प्रत्येक वेळी एक गोष्ट सांगत होता. या गोष्टीतून पुष्कळ विचार घेण्यासारखे होते माणसाच्या जीवनातील सार कळत होते माणसाने कसे वागावे व कसे बोलावे याचा सुद्धा बोध या कथेतून होत होता. कथा काल्पनिक असली तरी वाचकाला एक दिशा देणारी अशी होती म्हणून पूर्वीचे चांदोबा हे पुस्तक मला फार आवडत असे. आता ही पुस्तके बंद झाली आहेत मार्केटमध्ये नवीन नवीन पुस्तके येत आहेत परंतु जुन्या पुस्तकासारखी सर नवीन पुस्तके करीत नाहीत एवढे मात्र निश्चित....।

    .... जग हे बारा भानगडी चाहे आणि या जगातील माणसे सुद्धा त्याच पद्धतीची आहेत. दुसऱ्याचे अगोदर चांगले व्हावे नंतर माझे चांगले व्हावे ही पूर्वी लोक म्हणत असे. पण आता सध्या असे कोणीही म्हणत नाही आपलीच घोडे पुढे कसेदामटायचे या विचारात ही मंडळी असते. अशी ही मंडळी वागते त्याला आपण माणूस म्हणायचं का हा प्रश्न नेहमी मनाला पडतो. माणसाचा स्वार्थ नक्की कुठे व कशात आहे हा विचार हल्लीचा माणूस करत असतो. रात्री उगवणारा चांद सर्वांना शितल प्रकाश देतो आणि या शितल प्रकाशामध्ये एक प्रकारचा आनंद तर रडत असतो. झाडावरची सळसळणारी पाणे चंद्राच्या शीतल प्रकाशात एक प्रकारचा आनंद घेतात शांत वातावरणामध्ये. झाडावरच्या पक्षाची चालू असलेली धडपड आणि निशब्द वातावरण खोलवर मनात रुजल्याशिवाय राहत नाही एवढे मात्र निश्चित. चंद्र हा प्रेमळ आहे अंधाऱ्या रात्री प्रत्येकाला शितल प्रकाश देतो आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण वातावरण आनंदी करून सोडतो. याच्याशिवाय दुसरा आनंद कोणता मोठा असू शकतो प्रत्येक माणसाने आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे चालले पाहिजे. प्रत्येकाला प्रेम दिले पाहिजे प्रत्येकाशी गोड बोलले पाहिजे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे असे मला वाटते....।
    ........ पूर्णविराम.....।

    --दत्तात्रय मानुगडे,
    ग्रामीण कथा लेखक.

      September 19, 2022


  • शाळा हेच आमचे समाज माध्यम..

    तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!!

      May 12, 2021


  • कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – २

    विद्यार्थी धावताहेत आय आय टी च्या स्वप्नामागे ! त्यासाठी पालक आर्थिक ताण (पोटाला चिमटा वगैरे) आणि तरुण शारीरिक/मानसिक खच्चीकरणाच्या मागे धावताहेत. मुलांना बरं वाटत नाही आणि ते क्लासला येत नाही हे कळल्यावर “कोटा फॅक्टरीचा ” शिक्षक म्हणतो – ” आजारी पडण्याची चैन तुम्हाला परवडणार नाही. “

      October 7, 2021