नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते.
April 5, 2018
कुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं. काही आडनावं भारदस्त असतात तर काही लाजिरवाणी असतात.
April 29, 2022
अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो.
July 23, 2022
नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे.
February 15, 2024
त्याचा दोनदा फोन येऊन गेला. मी जास्त एन्टरटेन त्याला केले नव्हते. पण तो डोक्यावरच बसला. ठरल्या वेळेला आलेला माणूस 65-68 वर्षाचा असेल. खूप थकलेला दिसत होता. मला म्हणाला सर माझी सही बघता का ?
July 11, 2021

हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली.
March 15, 2025
प्रेमाच्या दिनी
गुलाब भेट दिली.
प्रेमाची ‘राजधानी’
हृदयी धडधडली.??????
February 18, 2012
गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.
September 16, 2022
हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते.
October 15, 2020
टळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग केला. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसात मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळं होतं.
August 9, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti