(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • करोना (कथा)

    उद्याच्या वृत्तपत्रात हेडलाईन आणि आता रात्रीच्या न्यूज चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज असणार होती, पालकमंत्री इसाक साहेबांच्या पुढाकाराने आणि सर्व आमदार, खासदारांच्या सहकार्याने कोविड १९ ची हि लाट लौकरच आटोक्यात येणार.

      February 4, 2026


  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ४

    बिपीन व त्याचे जेष्ठ सहकारी यांच्यातील तणावपूर्ण वातावरण तापतच चालले होते. बॅंकेक्डून कर्ज व्यवस्थित मिळत होते, पण कामाच्या ऑर्द्र्स कमी झाल्या होत्या. याच्या तीरसट भांडखोर स्वभावामुळे शेवटच्या क्षणाला काम हातातून जात होते.

      December 25, 2021


  • चंद्रावर हल्ला

    कोणे एके काळी पृथ्वीवर डोंगरांच्या घळ्यांमध्ये तारा राजाचे राज्य होते. सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि चहुबाजूंनी पसरलेलं घनदाट जंगल यामुळे इथे अंधाराचेच राज्य असायचे. राजाने आपल्या प्रजेला किमान गरजेपुरता का होईना प्रकाश देण्यासाठी म्हणून खास योजना आखली होती.

      November 15, 2025


  • अजब न्याय नियतीचा – भाग २५

    पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..”

      October 13, 2019


  • गोष्टी सांगेन युक्तांच्या चार

    पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. त्यानंतर एक वर्षभर त्यांना विराटाच्या मत्स्य देशात अज्ञातवासात राहून काढावे लागले. हाही खडतर काळ संपला व त्यांनी विराटाच्या नगरीस रामराम ठोकला. उपप्लव्य नावाच्या एका नगरामध्ये ते उघडपणे वास करू लागले. कृष्ण आणि बलराम द्वारकेहून तेथे आले. मित्रमंडळ व आप्तेष्ट आले. या सर्वांच्या उपस्थितीत अर्जुनपुत्र अभिमन्यूचे विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी मोठ्या थाटात लग्न पार पडले.

      September 12, 2024


  • दोन बहिणी

    तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच.
    एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या.
    सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या.
    मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि ते काय करतात?” हेच दिवसभर पाहात बसायचं... टाइमपास करत.
    कुणी येवो न येवो, याचं लक्ष सतत रस्त्याकडे!
    कधी कधी यांच्या डोक्यावर कावळे,चिमण्या किंवा कबुतरं येऊन बसत. पण त्यांना याची पर्वाच नाही. त्या ढीम्मच!
    काहीवेळा चिमण्या जाता-जाता त्यांच्या डोक्यावर दोन गरम-गरम मऊ-मऊ ठिफ टाकून जात. पण त्या दोघी बहिणी त्या चिमण्यांशी कधीही भांडल्या नाहीत. किंवा डोकं हलवून त्यांना उडवलं पण नाही. त्यांचे आपले परिसर निरीक्षण सुरूच!
    संध्याकाळ झाली. अंधारुन आलं की, त्या दोघी जणी आपापल्या खोल्यात स्वत:ला बंद करुन घेत.
    सकाळ झाली की पुन्हा या दोघींचा बाहेर डोकावून टाइमपास सुरू.
    पण अचानक एके दवशी.. .. एक बहिण बोलेच ना. एकदम खीन्न! उदास!
    दुसऱ्या बहिणीला तिची काळजी वाटू लागली. तिला कळेना हिला झालं काय?

    इतक्यात ती पहिली म्हणाली,“ताई, उद्यापासून मी बाहेर डोकावणार नाही.
    तुला पाहणार नाही.
    तुझ्याशी एक शब्द ही बोलणार नाही.
    आपण आता पुन्हा कधी-कधी भेटणार नाही ग.
    आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस!! ”
    हे बोलताना तिला खूप भरुन आलं.
    तिच्या काचा थंड पडल्या.

    काळजीने धुरकट झाल्या.

    हे पहिलीचं बोलणं सताड उघड्या तोंडाने दुसरी ऐकत होती.
    भीतीने तिच्या काचा तापल्या.
    कसबंसं स्वत:ला सावरत दुसरीने स्वत:ची कडी घट्ट केली.
    उघड्या तोंडातून भरपूर हवा आत घेतली.
    आणि.. ..धीर करुन तिने विचारलं,“मला नीट सांग, उद्या नक्की काय होणार आहे?”

    “उद्या माझा मेकओव्हर आहे!
    यू नो, पूर्वीची ती दिवाणखाना ही कनसेप्ट आता गेली. आता त्याचं लिाव्हिंग रुम मधे रुपांतर झालं! एव्हरीथींग इज नाऊ अल्ट्रा मॉडर्न!!..”
    “काय ग, ही कुठली भाषा? काल पर्यंत तर तू ठीक होतीस! आणि हे मेक ओव्हर म्हणजे काय?”
    “गेले आठ दिवस मी रोज हीच भाषा ऐकतेय.
    अगं मेकओव्हर म्हणजे, सोप्या सुटसुटीत गोष्टी मोडून टाकून विचित्र अवजड गोष्टी आणायच्या!
    आता त्या फोल्डींगच्या खूर्च्या किती छान आहेत! ती छोटी मुलं त्यावर उभं राहून आपल्यातून डोकावतात आणि आई बाबांना टाटा करतात तेव्हा किती बरं वाटतं ना? आता त्या मोडून त्याच्या बदली म्हणे “बीन बॅग्ज” आणणार आहेत!
    ट्यूब लाइटशी गप्पा मारताना संध्याकाळ कशी निघून जायची ते कळायचं पण नाही.
    पण आता म्हणे भिंतीत फिट्ट बसणाऱ्या काचेमागे दिवे लावणार आहेत.”

    “अगं ताई, हे तर भयानकच बाई!! या दिव्यांची तोंडच अशी भितींत लिंपून टाकली तर घरात बोलायचं कुणी कुणाशी? आपले पंखेराव तरी आहेत ना?”
    “नाही ग. माझ्या तोंडात एसी लावणार आहेत म्हणे. त्यातच असतो पंखा!”
    “म्हणजे आता आयुष्यभर तू तोंडात एसी धरुन बसणार? कमाल आहे!! आमच्या तोंडात वाटेल त्या गोष्टी कोंबणारे हे कोण शहाणे?”
    “रागावू नकोस ताई. उद्यापासून माझी लाइफस्टाइलच चेंज होणार आहे.”
    “अगं मला नीट समजेल असं सांग गं..”

    “उद्यापासून उघडणं, बाहेर डोकावणं, बिजागऱ्यांनी किरकिरणं हे सारं बंद!
    आता फक्त गरगरत एका रेषेत सरकणं.
    उद्यापासून मी स्लायडिंग होणारे ना!”

    “व्वा! आणखी काय-काय होणारे?”
    “तुला माहितंच आहे की.. या पांढऱ्या स्वच्छं काचांमुळे आपल्याला दुपारी त्या उन्हाचा किती त्रास होतो! पण उद्या मला रंगीत काचा लावणार आहेत. मस्त डार्क चॉकलेटी काचा!
    आता उद्यापासून सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळं! नो दुपार!!
    एकदम कू।़।़ल!! ”

    “मला सांग हे सगळं तुला आवडतंय?
    अगं त्या चॉकलेटी काचांमुळे रंगांधळी होशील तू!
    आणि त्या एसीमुळे घरातली माणसं जरी थंड झाली तरी तुझं डोकं नेहमीच तापलेलं असेल!
    काळजी घे स्वत:ची..”
    “ताई तू म्हणतेस ते खरंय!
    मला बाहेरुन कुणीही कसंही बदलवलं तरी मी आतून तशीच राहीन! सकाळी सकाळी स्वत:तून बाहेर डोकावणारी! आणि संध्याकाळी अंतर्मूख होणारी!!”

    हे ऐकल्यार ताई स्वच्छं काचेने हसली आणि म्हणाली,“उघडा,मिटा किंवा सरका पण स्वत:तून बाहेर डोकवा, हे ज्यांना जमलं त्यांनाच खरं जग दिसलं” ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील की?”

    हे ऐकताच पहिली समाधानाने हसली.
    यातूनच दुसरी काय ते समजली!

    -राजीव तांबे.

      July 2, 2015


  • मला समजलेले कर्मफळ

    प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो. व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सतत घडणारी क्रिया व त्याप्रमाणे त्याचे होणारे परिणाम. जीवन म्हणजेच एक हलचाल. हलचाल म्हणजेच कर्म. कर्म म्हणजेच सुख दुःखाचे चक्र. जीवनभर चालणारे. हे टाळता येत नसले तरी ते सहज आणि सुकर करता येवू शकते. निसर्ग हा त्याच्या ठरलेल्या नियमानुसार चालत असतो. त्यात कधीही बदल केला जात नाही. व्यक्ती आणि त्याचे कर्म ह्याच्याशी निसर्गाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. व्यक्ती आपल्या प्रत्येक हालचालीसाठी, म्हणजे कर्म करण्यासाठी स्वतंत्र असतो. ज्यामुळे ज्याचे कर्म त्याचे त्यालाच फळ. सुख वा दुःख ह्या भावनीक समस्या त्यानेच केलेल्या कर्माचे परिणाम असतात. व्यक्तीमध्ये कांही नैसर्गिक उपजत गुणधर्म असतात. अहंकार ( Ego) आणि वासना ( Desire ) . ह्यामुळेच निसर्गाने तुम्हास दिलेल्या जीवनाबद्दल आपूलकी (अस्था) (Attachment ) वाटते. जीवन जगण्या विषयी प्रेम वाटते. कर्माचे होणारे नैसर्गिक परिणाम ही व्यक्तीची चिंताजनक समस्या नसते. परिणाम कसे होईल हा त्यात खरा भाग असतो. व्यक्तीची समस्या असते ती त्याच्या अपेक्षित कर्मफळामुळे. कोणत्याही गोष्टीचे परिणाम कसे होतील, ह्यापेक्षा ते कसे व्हावे ह्या त्याच्या मनांत दडून बसलेल्या विचारामुळे. विद्यार्थी अभ्यास करताना पास होण्याची अपेक्षा करतो. प्रथम येण्याची इच्छा बाळगतो. हे केंव्हाही चांगले व प्रेरणादायी. परंतु हे सारे त्याच्या योग्य प्रयत्न्यावर अवलंबून असते. याची त्याला जाणीव असावी. म्हणजे यश वा अपयश ह्याचे तो विश्लेषन करु शकेल. वासना (Desire) ह्या सुख दुःख निर्माण करीत नसतात. त्या फक्त जीवनचक्र चालविण्यास देहाला मदत करतात. Desire creates attachments for the life. परंतु जीवन कसे असावे, कसे चालावे, कर्माचा कोणता परिणाम व्हावा, ह्या विचारांमध्ये व्यक्ती गुंतला जातो, त्याचवेळी त्याला सुख दुःखाशी सामना करावा लागतो. दुःखाचे कारण इच्छीत अपेक्षाभंग. निसर्गचक्र व निसर्ग नियम ह्यावरच जगातील घडामोडी घडत असतात. त्यामध्ये परिस्थिती, सभोवताल, व व्यक्ती ह्या सर्वांचेच समीकरण लक्षांत घेतले जाऊन घटनेचा सांघीक परिणाम होतो. परंतु व्यक्ती त्या घटनेमध्ये केवळ स्वतःला गुंतवून स्वतःच्या विचारानुसार त्या गोष्टीचा परीणाम कसा व्हावा ही अपेक्षा करतो. हेच कदाचित् निराशेचे कारण बनू शकते. कोणत्याही गोष्टीचा परीणाम प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे केंव्हाही होऊ शकणार नाही. हे सत्य आहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी योग्य आणि खुप प्रयत्न करणे गरजेचे असते. यश संपादन करण्याचा तो मार्ग आहे. त्याचमुळे तुमच्या विचारांच्या झेपेला मर्यादा असतात.

    सभोवताल, काळ, वेळ, परिस्थिती इत्यादी अनेक पैलू प्रत्येक घटनामध्ये गुंतलेल्या असतात.त्या घटनेच्या गुंत्यामधले अनेक दोर त्या घटनेला बांधलेले असतात. ही व्यक्तीच्या अकलनाबाहेरची गोष्ट असते. निसर्गच त्यांच्या पद्धतीने तो गुंता सोडवू शकतो. व्यक्ती स्वतःच्या विचाराने त्या गुंत्याचा एखादा दोर खेचून निरनिराळ्या गाठी मात्र निर्माण करेल. म्हणूनच म्हटले जाते की घटनेची उकल निसर्गालाच करुं द्या. त्याने दिलेल्या निर्णयास अर्थात परिणामास मान्यता द्या. कर्माच्या फळाची अपेक्षा न करता फक्त योग्य प्रयत्न व्यक्तीने करावे. हाच जीवनाचा महान संदेश असेल. ईश्वरानी प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन उपजत चेतना शक्ती दिलेल्या असतात.

    १ ज्ञान शक्ती. (Power of Knowledge)

    २ इच्छा शक्ती. (Power of Desire)

    ३ क्रिया शक्ती.(Power of Action)

    ह्या सर्व उर्जा शक्ती आहेत. कोणतेही काम करण्यासाठी ह्या उत्तेजनात्मक गोष्टी असतात. ह्याच मुलभूत गोष्टीमुळे व्यक्ती कोणतेही कर्म करण्यास उद्युक्त होतो. एक महत्वाचे म्हणजे काम करण्यासाठी चेतना मिळणे ही बाब निराळी.ती निसर्ग देतो. परंतु कोणते काम करावे त्याची दिशा व योजना आखण्याचे कार्य मात्र निसर्ग केव्हांच करीत नसतो. माणसाला दिलेल्या मेंदू–बुद्धी–मन ह्या इंद्रियामार्फत ते होत असते. कार्य करणे ही चेतना वेगळी, कोणते कार्य करणे हा भाग सर्वस्वी निराळा असतो. ते व्यक्तीच्या संस्कारीत विचारावर अवलंबून असते. याचा अर्थ कर्म प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने, आवडी निवडी नुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार करीत असतो. त्याला निसर्ग फक्त शक्ती देतो. त्यामुळे कर्माचे स्वरुप व त्याचा परिणाम ह्याला फक्त व्यक्तीच जबाबदार असते. कर्मफळ हे त्यालाच भोगावे अथवा उपभोगावे लागते.

    येथेच एक गैरसमज निर्माण होत असतो. प्रत्येक कर्मामध्ये व्यक्ती स्वतःला

    " कर्म करता ( The Roll of DOER ) " याच्या भुमिकेत समजतो. हे अर्धसत्य आहे. कारण विचार, योजना, दिशा, कल्पकता, इत्यादी त्याच्या असतात. तो उर्जा शक्तीला (निसर्गाला ) दुय्यम स्थान देतो. किंवा दुर्लक्ष करतो. स्वताःकडे संपूर्ण घेतलेल्या कर्त्याच्या भूमिकेमुळे जेव्हां इच्छीत कर्मफळ न मिळाल्यास त्याला दुःखी व्हावे लागते. जर हाच कर्मफळाचा भाग प्रत्येक कर्म करताना ही "ईश्वरी ईच्छा वा योजना " समजून अंगीकारल्या, तर त्याचे तेच दुःख शिथील होईल. कर्माचा जो परिणाम होणार असतो, तो तर होणारच. परंतु " मी हे केले " हा अहंकार मीपणा कमी होण्यास मदत होईल समाधानी वृत्ती निर्माण होईल. ते कर्मफळ स्विकारण्याची मनाची तयारी असेल. असे म्हणतात की प्रत्येक काम ईश्वराला साक्षी ठेऊन, त्याची आठवण करीत करावे. आणि शेवटी ते कृष्णार्पण वा ईश्वरार्पण करावे. त्यांतच समाधान व शांतता लाभते.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      December 17, 2014


  • डासांचं बेट (कथा)

    हातात धरलेला पेपर सुटून खाली पडला. हाताला कुणीतरी जबरदस्त चावा घेतला होता. इतक्या स्वच्छ, नवीन विमानतळावर काय चावणार ? उजेडात काही दिसलं नाही. पण आजूबाजूचे प्रवासी चुळबुळ करताना दिसत होते. त्यता प्रखर प्रकाशात इतस्तत: फिरणार इवले इवले डास दिसत नव्हते. पण चावत होते.

      May 5, 2022


  • ओळख नर्मदेची – भाग सात

    अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.
    नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात.

      October 11, 2020


  • राजमुकुटाची चोरी

    खारच्या सोळाव्या रोडवरील “निवांत” ह्या बंगल्यात नेहमीप्रमाणेच शांतता होती. तो बंगला खाजगी डिटेक्टीव्ह यशवंत धुरंधर ह्यांचा होता. बंगल्यात ते, त्यांचा भाचा व मदतनीस चंद्रकांत नवलकर, त्यांच्या घराची व्यवस्था पहाणाऱ्या आत्या नसलेल्या पण आत्याबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वयस्क बाई, सदू नांवाचा एक अर्धवेळ काम करणारा पण तिथेच रहाणारा व शिकणारा गडी, रहात.
    निवांत जरी निवांत असला तरी निवांतकडे एक एसयुव्ही वेगाने येत होती आणि त्यांत बसलेले दिवाण अस्वस्थ होते.

      February 2, 2026