नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या दोघांमध्ये नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला प्रतिसाद देत असतो.
July 28, 2022
विनोदी लेखाबरोबरच सामाजिक वर्तनाची खिल्ली उडवणारे लेख आहेत.
काल्पनिक देवी-देवतांच्या उपासनेत आज बहुजन समाज परता अडकलेला आहे आणि पुजारीवर्ग हा देवाच्या नावावर बहुजनांकडून जमा केलेल्या धनावर जगत आहे. देशात नवनवीन मंदिर बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनी या कार्यास योगदान देत आहे. मंदिर बांधण्यासाठी मजूर म्हणून बहुजन फुकटात सेवा देतो. राजकरणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून आलेला पैसा मंदिरासाठी दात देतात. तर भट-भटजी स्वत:ची तुमडी भरण्यासाठी ही सोपी संधी उपलब्ध करुन घेतात.
चंद्रसेन टिळेकरांची लेखणी समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चौफेर फिरली आहे. असे हे विडंबनाचे शस्त्र धारदार लेखणीने चालवून समाजाला विचार करण्यास उद्युक्त करणारी शस्त्रक्रिया टिळेकरांनी आपल्या लेखांमध्ये केली आहे.
नुस्तं हसू नका !
लेखक : प्रा. चंद्रसेन टिळेकर
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १४०/- रुपये
पाने : १२०
October 18, 2016
चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक.
June 12, 2014
आपण सारे एकच आहोत; एकाच निसर्गाचे, परमेश्वराचे घटक आहोत, हे सारे ऐकले, वाचलेले गळून पडते. मी, माझे ... हे शब्द प्रभावी होतात. दुःख, वेदना, संकटे ही किमान आतातरी माझी नाहीत, ही भावना प्रबळ होते. वृत्तपत्रांतील छायाचित्रेही नकोशी वाटू लागतात ... मग नकोच वृत्तपत्र वाचणे, नकोच दूरचित्रवाणी पाहणे हा विचार प्रभावी होतो. ते सारे माझ्यासाठी नाहीच, असे म्हणून माणूस अन्य विषय शोधू लागतो. विषयांतर महत्त्वाचे ठरते. वास्तव न स्वीकारता, न पाहताच त्यापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू होतो. आपण आपल्या विश्वात रमायला लागतो. कोणी मानवतेची आठवण दिलीच किंवा आवाहन केलेच, तर आपल्या कर्तव्यपूर्तीचा एक तुकडा तोडून त्यापासून मुक्त होऊ पाहतो. निसर्गत मी जसा आहे, त्याचा अनैसर्गिक प्रवास त्याला कारणीभूत आहे का? कोठून सुरू होतो हा प्रवास? काय कारणीभूत असावे या प्रवासाला? नैसर्गिक आणि अनैसर्गिक या निव्वळ मनाच्या तर कल्पना नव्हेत? की ती ही मायाच? प्रश्नांची मालिका हवी तेवढी लांबविता येईल. आपणच आपल्यात डोकावून पाहिलं तर? मला वाटतं, स्वतशी होणारा प्रामाणिक संवाद जेथे थांबतो, तेथेच अनैसर्गिकतेचा प्रवास सुरू होत असावा अन्यथा जे वास्तव आहे त्यापासून दूर जाण्याचा, ते नाकारण्याचा प्रयत्न हेच नैसर्गिक आहे, असे वाटू लागलेच नसते. आपण आपल्याला तरी आहे तसे स्वीकारतो का? की, स्वतची फसवणूक करण्यातच आपल्याला आनंद लाभतो? दुःख नाकारणे किंवा त्या दुःखापासून दूर जाणे, ते आठवणीच्या एखाद्या बंदिस्त कप्प्यात बंद करणे, हा आनंद आहे का? तसे असेल तर मग हा आनंद शाश्वत का नाही? कदाचित, स्वतला स्वतपासून सातत्याने दूर नेणे, हे तर दुःखाचे खरे कारण नसेल? स्वत आहोत तसे स्वतला स्वीकारले, वास्तव आहे तसे स्वीकारले तर दुःख कोठे असेल? दुःखाचे अस्तित्वच नसेल तर आनंदाशिवाय काय असेल? मग आपल्या दुःखाचे मूळ नैसर्गिकतेमध्ये आहे की अनैसर्गिकतेमध्ये? आज मला होणार्या यातना किंवा घडलेल्या विदारकतेच्या वेदना जाणवतात, हे नैसर्गिक असायला हवेच; पण त्यापासून दूर जाण्यातच मला नैसर्गिकता वाटते. स्वतला संवेदनहीन करण्यातच आपण जीवनसंघर्षाशी सक्षम आहोत, असे वाटायला लागते. खरे तर संघर्षापेक्षाही वास्तव स्वीकारण्यात, त्याला सामोरे जाण्यात खरे धैर्य आहे. तुमच्या माझ्यात जर एकाच परमेश्वराचा वास असेल, तुम्ही अन् मी जर या सर्वशक्तिमान निसर्गाचाच एक घटक असू; तर त्यापासून कसे पळता येईल? त्याला किती टाळता येईल? माणसामाणसातील नैसर्गिकतेला, नैसर्गिक मानवतेला या दुर्दैवी घटनेमध्येही धुमारे फुटलेले दिसतात. मानवी हातांच्या रूपाने दुःखावर फुंकर घालणारे ते हात दिसू शकतात, अनुभवता येतात. अशा अनुभवासाठी परमेश्वर तुम्हाला सज्ज करो, ही प्रार्थना.
-- किशोर कुलकर्णी
March 24, 2006
व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र...’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली
June 29, 2022
त्यावेळी मी केवळ ५ वर्षांचा होतो. माझी आई थकलेल्या हातांनी मला जेवण भरवत होती “हा घास काऊचा, हा घास चिऊचा, हा घास….”… आणि अचानक वादळ यावं असं कुणीतरी आलं नि मला गर्रकन भिरकावून दिलं. क्षणभर कळलंच नाही काय झालं? मी रडत होतो हुंदके देत होतो. डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. मला काहीच कळत नव्हतं, काही कळण्यासारखं ते वय नव्हतं. चार-पाच जण माझ्या आईला काहीतरी करत होते. मी मात्र काहीच करु शकलो नाही. केवळ आई आई म्हणून विव्हळत होतो. कळायला लागलं तेव्हा कळलं की माझ्या आईवर धर्मांधांनी बलात्कार केला होता. आईईईई आईईईई (मोठ्याने रडतो)…
August 3, 2013
पुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ढोलीत येणा-या जाणा-यांचा राबता असायचा; जॉइंट फँमिली असावी कदाचित किंवा समाज कल्याणासाठी पोपट दांपत्यानी हिरव्या मिरच्यांचा मोठ्ठा साठा करुन ठेवला असेल येणार्या जाणार्यांसाठी आणि तेही नसेल तर मात्र पोपटीण दिसायला सुंदर असणार हे नक्की.
August 23, 2019

पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला.
February 27, 2022
राकेशने ‘त्या’ कामा साठी दहा डिसेम्बर हि तारीख ठरवून टाकली.तेव्हा कोठे त्याला थोडे हलके वाटले. हवी असलेली पूर्व तयारी,(म्हणजे प्लॅनिंग ) झाली होती. आता फक्त अम्मलबजावणी!
February 20, 2019
‘व्यवस्थापन’ या विषयावर १९७०च्या दशकानंतर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. मोठमोठ्या औद्योगिक समूहाबरोबरच, मध्यम व लघु उद्योगांनीही सातत्याने नावीन्यपूर्ण, उपाययोजना, कल्पना यांचा समावेश असलेली व्यवस्थापनाची विशिष्ट प्रणाली आपलीशी केली आहे.
April 22, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti