(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सैनिकाच्या मुलाची दिवाळी

    दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?

      February 2, 2026


  • गंगेच्या उगमपाशी गोमुख – भाग २

    म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे.

      August 24, 2022


  • हृदयांतर

    भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर !

      May 21, 2021


  • “दैनिक प्रत्यक्ष” आमुचे!

    दैनिक प्रत्यक्ष हे वृत्तपत्र श्री अनिरुद्ध बापू यांनी सन २००५च्या दत्तजयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केले. हे दैनिक १२ पानांचे असून त्याची किंमत रु.२.५० आहे. दैनिक प्रत्यक्ष सर्व वृत्तपत्रांचे स्टोल तसेच रेल्वे स्टोलवरही उपलब्ध आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या अन्य वृत्तपत्रा प्रमाणे ही मिळते. प्रत्यक्ष दैनिकात परमपूज्य सदगुरु बापू यांनी लिहिलेले अग्रलेख व विविध विषयांवरील इतर लेखकांनी लिहिलेले लेखही वाचकांस वाचावयास मिळतील. पान चार आणि पाचवर आंतरराष्ट्रीय सदरात विविध माहिती आहे जी इतर वृत्तपत्रात अभावानेच वाचायला मिळते.

      February 11, 2012


  • भौतिक सुखाच्या पल्याड

    माणूस नेहमीच भौतिक सुखाच्या छत्रचामरांसाठी अविश्रांत धावत असतो. हे कुणीच नाकारू शकत नाही. परंतु या परिश्रमातून खरंच आत्मसुख , आत्मशांती लाभते कां? हा मूल प्रश्न अनुत्तरीत रहातो. सर्व सुखे दारात असूनही समाधानी , सुखाला वंचित असणारी माणसे आहेत. की ज्यांना मन:शांती लाभली नाही. तर दुसऱ्या बाजूला अत्यन्त सामान्य परिस्थितीत देखील स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देणारी माणसं या जगात आहे.

    हा विरोधाभास देखील आपल्याला प्रत्ययास येत असतो. पण अशी माणसं भेटणं हा ही एक भाग्ययोग समजावा.. मला भेटली हे माझे भाग्यच.!!

    लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीत देखील अगदी कळतंय अशा वयापासून जो सहवास लाभला तोच सहवास आज जीवन समृद्ध करून गेल्याचे जाणवते. आणि आज ते जणू दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक भासतात.

    त्या बालवयात त्यांचे महत्व कळले नाही. पण आज ते सारे जेंव्हा आठवते तेंव्हा मात्र भौतिक सुखाचा विचार न करता केवळ ज्यातून आपल्याला सात्विक , आत्मिक , आत्मसुख मिळेल याचाच विचार करून जे जगले कार्यरत राहिले आणि केवळ वैचारिक , प्रबोधनात्मक समाजकल्याणाची अत्यन्त कष्टप्रदी अशा कर्तव्यतप्तर्तेची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ( सर्वांची नांवे मी उद्घृत करत नाही) पण आज आपण त्यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या महदकार्याचा महाकाय वटवृक्ष जेंव्हा आपण आपल्या डोळ्यांनी पहातो आहोत तेंव्हा त्या " भौतिक सुखाच्या पल्याड असणारी आत्मशांती आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही.

    आज ज्यांच्या उत्तुंग अशा विवेकी दैवी संकल्पनेतून आपल्याला जे जे उत्तुंग दिसते आहे ती एक कल्याणकारी साधना आहे, ती एक तपश्चर्या आहे. हे निर्विवाद. अगदी कौटुंबिक स्तरावर जरी विचार केला तरी आपल्या पूर्वजांनी अगदी आजोबा , पणजोबांनी केलेल्या एखाद्या आम्रवृक्षाचे बीजारोपण आणि त्याचा आपण आपण घेत असलेला उपभोग ही त्या आपल्या पूर्वजांची साधना, तपश्चर्याच म्हणावी लागेल. ही निस्वार्थी तपश्चर्या म्हणजेच आत्मसुख ,आत्मशांती आहे.

    विज्ञानयुगात भौतिक सुखाच्या व्याख्येत संस्कारी अध्यात्मिक मनाचे आभाळ कधी रमत नाही. त्या अंतरमनाला खऱ्या आत्मिक सुखाची नितांत गरज असते.

    जगात जगताना बेगडी हास्यसुखाचा मुखवटा पांघरून जगणे म्हणजे आपल्या अंतरिक सत्य सुखापासून दुर्दैवाने वंचित रहाणे असते.

    म्हणून जगतांना भौतिक सुखाच्या पलीकडे असणारे आत्मानंदी कृतार्थी सुख महत्वाचे असते.

    आज जगाच्या दृष्टीने आपल्या भूमिकेतून आपण खूप समृद्ध जीवन जगलो आहोत असे आपल्याला वाटत असते. साऱ्या षड्रिपुंशी आपली ओळख झालेली असते. साऱ्या भौतिक सुखांच्या क्षणिक छत्रचामरात देखील आपण सुखात आहोत याची अनुभूती येते देखील.

    पण आपल्या शिशुशैशवातील , बाल्यावस्थेतील निरागसता मात्र हरविलेली असते. मग जेंव्हा अंतर्मुख होतो. तेंव्हा खरे सुख म्हणजे भौतिक वैभवी सुख ? की तो निरागस वात्सल्य प्रीतीच्या मैत्रेय नात्यांचा निर्मोही लडिवाळ सहवास ?

    हा प्रश्न मनाला भेडसावत रहातो. हे तितकेच खरे...!!!

    म्हणूनच अध्यात्म ( आत्ममुख होणे ) हा भारतीय संस्कार आहे. आणि या संस्कारातूनच मानवाला भौतिक सुखाच्या पल्याड असणाऱ्या त्या चिरंतन दैवी आत्मसुखशांतीची , निर्मल , सात्विक , सोज्वळ प्रीतभावनांची अनुभूती येते.

    इती लेखन सीमा

    -- वि.ग.सातपुते.

    9766544908

    २३ फेब्रुवारी २०२२

    पुणे .

      March 11, 2022


  • मास्क

    आॅक्सिजनचा ‘मास्क’ लावण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर हा कापडी ‘मास्क’ कायमस्वरूपी वापरत रहा.. मग कोरोनाच काय त्याचा ‘आजोबा’ही तुमच्या वाटेला जाणार नाही…

      October 29, 2021


  • एक असतो बिल्डर

    एखाद्या बिल्डर कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो? बिल्डर म्हणजे जमीन आणि पैशाच्या राशी असे आपले समीकरण असते. मात्र, या व्यवसायामागे किती मेहनत असते, किती परिश्रम आणि चिकाटी असते याची प्रचीती या पुस्तकातून येते.

      October 30, 2023


  • बंद दरवाजा

    फ्लैटमधे राहणाऱ्या शहरी उच्चमध्यम वर्गीय लोकांचे जीवन, खोटा देखावा, प्रेमाचा अभाव, खंडित परिवार व एकटेपण – प्रेमाचा वसंत फुलणार कसा???

      September 16, 2010


  • कवी अनिल यांची एक आठवण

    मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले.

      May 8, 2017


  • एक अफलातून व्यासंग 

    …. मी भारावून गेलो. दैनंदिनीच्या धावपळीत आणि कार्यबाहुल्यांत मग्न राहून, सारे लक्ष्य व्यवहारी जीवनांत गुंतून राहीलेले जाणवले. जीवनाचे सत्य, अंतिम ध्येय हे कशासाठी करावयाचे याचा विसर पडत असल्याचे त्या क्षणाला वाटले. ह्रदय भरुन आले.

      February 4, 2021