(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जोहार मायबाप जोहार

    सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. ज्ञानोबा आला म्हटल्यावर हजारो माणसं भराभर कीर्तनाच्या जागी जमली …. चोखोबा सुद्धा न राहवून अगदी पुढे जाऊन बसला …. कीर्तन सुरू झालं … चंद्रभागेच्या पाण्यासारखा ज्ञानदेवांचा आवाज ऐकून चोख्याला रडूच फुटायचं…. तो लहान असतानाच त्याची माय गेली …. पण त्याच्या आठवणीत ती नेहेमीच असायची…

      September 10, 2018


  • अनुभवाचे बोल

    आयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक.

      July 31, 2024


  • सोहळे साजरे करुनि घ्यावे (सुमंत उवाच – ५९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    अमावस्या म्हणजे वाईट, या दिवशी काही चांगलं करू नये, बाहेर जाऊ नये या सगळ्या गोष्टी मोडून काढत गटारीला या उलट गोष्टी कश्या करता येतील याला महत्व दिलं जाऊ लागलं. श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी यथेच्छ मांसाहार, मद्य प्राशन करावे आणि दुसऱ्या दिवशी पासून कडक उपास करण्यास तयार राहावे.

      October 20, 2021


  • चारोळी – प्रेम म्हणजे..

    prem 3 poem

      February 22, 2016


  • जिंगल्स आणि बरेच काही

    गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील पहिले संस्कृत गीत गायलो. रेकॉर्डिंगच्या वेळी पं. वेलणकर यांना भेटलो. पत्रावर पत्ता लिहिताना आपण जो पिनकोड नंबर लिहितो, त्याचे जनक पं. वेलणकर आहेत, असे प्रभाकर पंडितांनी सांगितल्यावर मी अवाकूच झालो. माझ्या गाण्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या किती नामवंत व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली, याची यादी केली तर एक वेगळेच पुस्तक लिहावे लागेल. संगीताच्या आराधनेमुळे झालेल्या अगणित फायद्यांपैकी एकही फायदा गाणे शिकायला सुरवात करताना मला माहीत नव्हता.

    आर्टिग ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. उजगरे यांच्यामुळे अजून एक योग आला. त्यांनी काही जाहिरातींसाठी गाण्याची ऑफर दिली. जाहिरातींच्या मागे जे गाणे असते त्यांना 'जिंगल्स' असे म्हणतात. नामवंत गायिका कविता कृष्णमूर्तीला अनेकदा स्टुडिओत मी जिंगल्स गाताना पाहिले होते. या क्षेत्रातील ती आघाडीची गायिका होती. एक जिंगल ही जास्तीत जास्त वीस ते तीस सेकंदाची असते. पण स्टुडिओत त्याचे काम कित्येक तास चालते. कारण इतक्या कमी वेळात परिणाम साधायचा असतो. जाहिरातीचे व्यावसायिक रेकॉर्डिंग असल्यामुळे जिंगल्सचे मानधन बरेच जास्त असते. आर्टिग अॅडव्हर्टायझिंगने स्टारडस्ट इमर्जन्सी बॅटरीजूच्या जाहिरातीचे काम घेतले होते. या बॅटरीच्या वेगवेगळ्या नऊ जिंगल्स माझ्या आवाजात रेकॉर्ड झाल्या. या सर्व जाहिराती भारताबाहेर दुबई आणि इतर आखाती देशात वाजणार होत्या. त्यामुळे आपल्या टीव्ही किंवा रेडिओवर ऐकू येणार नव्हत्या. पण या जिंगल्समुळे जाहिरातीच्या क्षेत्रात माझा शिरकाव झाला. या जिंगल्सचे रेकॉर्डिंग ऐकून काही संगीतकारांनी मला काम दिले.

    यानंतर गवाणकर ट्रस्टसाठी साईबाबांची दोन भजने मी गायलो. सुरेश वाडकर, अनुपमा देशपांडे आणि त्यागराज खाडिलकर असे मान्यवर गायकही या कॅसेटमध्ये गायले होते. विशेष म्हणजे या कॅसेटचे प्रकाशन शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात झाले आणि शिर्डीत या गाण्यांचा एक कार्यक्रमही झाला. त्यामुळे शिर्डीला जाण्याचा योग आला.

    एके दिवशी सकाळी माझी काकू दीपा जोशीचा फोन आला. तिने सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. नागराज राव यांना तातडीने भेटायला सांगितले. रावसरांनी Geeta's witness या नावाचे छोटे पुस्तक लिहिले होते. संकल्पना अशी होती की, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली, तेव्हा त्याचा एकच साक्षीदार होता, तो म्हणजे अर्जुनाच्या रथावरील ध्वजाशेजारी बसलेला मारुती. भक्त मारुतीरायांना विनंती करतो की, गीता समजायला जड जाते. त्याचा अर्थ नीट उमगत नाही. तू गीतेचा एकमेव साक्षीदार आहेस. तरी ही गीता सोप्या शब्दात मला समजावून सांगा. सुप्रसिद्ध लेखक श्री. विद्याधर गोखले यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. 'गीतेचा तो साक्षी वदला'ची एकूण २६ गाणी झाली. आता या गाण्यांचे रेकॉर्डिंग करून त्याची कॅसेट करण्याचा प्रोजेक्ट होता. यासाठी माझ्याबरोबर तरुण संगीतकार कौशल इनामदार याला बोलावण्यात आले होते. रावसरांनी ही संकल्पना आम्हा दोघांना सविस्तरपणे समजावून दिली. रावसरांची हातोटीच अशी होती की, नकळत त्यांनी आम्हाला या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतले. या पुढील दीड महिन्याचा काळ रावसरांच्या सान्निध्यात आम्ही चक्क गीता शिकलो. कौशलने सर्व गाण्यांना अतिशय छान चाली लावल्या. आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहोचलो. गाण्यांचे वाद्यवृंद संचालन कमलेश भडकमकरने केले. सुरुवातीची दोन गाणी गायक अजित परब याने, तर मारुतीवाणीची चोवीस गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली. 'गीतेचा तो साक्षी वदला' या कॅसेटचा प्रकाशन समारंभ ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झाला. कॅसेटबरोबर त्यातील गाण्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमात कॅसेटमधील काही गीते आम्ही सादर केली. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि रसिकांचा भरपूर प्रतिसादही मिळाला. या आगळ्या-वेगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी केल्याबद्दल मी दीपा जोशी आणि नागराज राव या दोघांचाही कायम ऋणी राहीन. यानंतर कौशलने आणि मी अनेक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग्ज एकमेकांबरोबर केली.

    यानंतर जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे खेड-मंचर येथील अधिवेशनात माझा गझलचा कार्यक्रम झाला. इंद्रधनूतर्फे अनिल मोहिले यांनी वाद्यवृंद संचालन केलेल्या विविध संगीतकारांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी-आनंदजी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, माझे गुरू श्रीकांत ठाकरे, भूपेन हजारिका अशा अनेक मान्यवर संगीतकारांसमोर त्यांनीच स्वरबद्ध केलेली काही गाणी मी सादर केली. या कार्यक्रमात माझे गाणे ऐकून संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात मला गाण्यासाठी बोलावले. या कार्यक्रमात संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेले आगामी मराठी चित्रपटातील गाणेही मी सादर केले.

    टेलिव्हिजनवरही माझे कार्यक्रम सुरू होतेच. दूरदर्शनच्या निर्मात्या किरणताई चित्रे यांनी माझ्यावर खूपच विश्वास टाकला. विलास डफळापूरकरच्या 'शब्दांच्या पलीकडले'मध्ये मी गायलो. त्यानंतर काही महिन्यातच संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या शब्दांच्या पलिकडले या कार्यक्रमासाठी मी गीतकार सुधीर मोघे यांचे गीत गायले. या गाण्याने त्या काळात मला बरीच लोकप्रियता दिली. 'संगीतावली' या नॅशलन नेटवर्कवरील दीपावलीच्या खास कार्यक्रमासाठी लोकप्रिय गायक हरीहरन यांच्याबरोबर गाण्याची संधी मला मिळाली. गीतकार शंकर वैद्य यांचे गाणे मी गायलो. यानंतर निर्माते शरण बिराजदार यांच्या 'सूरसंगम' या कार्यक्रमात मी काही गाणी सादर केली.

    १९९८ हे वर्ष माझ्यासाठी एक नवे क्षितीज घेऊन अवतरले. बऱ्याच वेळा आपल्याला कल्पनाही न देता नशीब आपल्याला एक सुखद धक्का देते. डॉ. विजय बेडेकर हे ठाण्यातील एक प्रथितयश डॉक्टर होतेच, पण त्याचबरोबर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड या बँकेचे अध्यक्षही होते. बेडेकर परिवाराशी माझ्या वडिलांपासून आमचे घरगुती संबंध होते. या बँकेशी आमच्या कंपनीचे व्यवहार होते. त्यामुळे डॉक्टरांची भेट वरचेवर होऊ लागली. डॉक्टरांचा कामाचा झपाटा, त्यांची सामाजिक कामांबद्दलची तळमळ याचा विलक्षण प्रभाव माझ्यावर पडला. एक दिवस त्यांनी घरी बोलावले.

    “अनिरुद्ध आता बँकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तुला बँकेच्या डायरेक्टर पदासाठी निवडणूक लढवायची आहे."

    डॉक्टरांच्या शब्दांवर माझा विश्वासच बसेना. एक ग्राहक आणि भागधारक म्हणून व्यक्तिगत आणि कंपनीचे बँकेबरोबर व्यवहार करणारा मी कधी या बँकेचा डायरेक्टर होईन, असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. केवळ डॉक्टरांच्या प्रेरणेने हे नवीन आव्हान पेलायला मी तयार झालो. मला निवडणूक लढवावी लागली नाही. आमचे पॅनल बिनविरोध निवडून आले. मी ठाणे भारत सहकारी बँक लि. या सहकारी बँकेचा डायरेक्टर झालो. आमचे अध्यक्ष श्री. मा.य. गोखले, तर उपाध्यक्ष श्री.. उत्तम जोशी होते. त्यांच्याबरोबरच इतर डायरेक्टर्स श्री. माधव नातू, श्री. चंद्रशेखर परांजपे, श्री. महाजन, श्री. मिलींद गोखले, डॉ. रणदिवे, श्री. वसावडा अशी सर्वच ठाणे शहरातील नामवंत मंडळी होती. यांच्यापेक्षा सर्वार्थाने मी लहान होतो. त्यावेळी मी फक्त ३६ वर्षांचा होतो. इतक्या कमी वयात इतकी मोठी मानाची पोझिशन मला मिळाली होती. या सर्वांकडूनच त्या काळात मला भरपूर शिकायला मिळाले. बँकेच्या अनेक कार्यक्रमात गायक म्हणूनही मी सहभाग घेतला. बँकेमुळेच मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या भेटीचा योग आला. फक्त या वाढीव जबाबदारीमुळे माझे कामाचे वेळापत्रक जास्तच व्यस्त बनले.

    त्या वर्षी राजभवनावर आणखी एक कार्यक्रम मी केला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'भजन प्रभात' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया, केनिया, झांबिया आणि बांग्लादेश यांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरस्वती विद्या मंदिराच्या क्रीडासंकुलातील लोकमान्य टिळक सभागृहाचे उद्घाटन लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती कर्वे यांनी लिहिलेल्या लोकमान्यांवरील एका खास गाण्याचे गायन मी केले.

    -अनिरुद्ध जोशी

      July 20, 2022


  • बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी – एक अनुभव

    सूर्यास्ताची वाट पहात बालीच्या एक निवांत समुद्र किनार्‍यावर मी उभा होतो. सोनेरी प्रकाशात फेसाळी लाटांवर क्रीडा करणाऱ्या गोरंग स्त्री- पुरुषांना पहात समुद्री लाटांचे कधी न ऐकलेले संगीताचा आनंद घेत होतो. अचानक दिसली मला ती, मलयवासिनी, वस्त्रांच्या कोशात दडलेली जलपरीच, ती संकोचलेल्या डोळ्यांनी पहात होती फेसाळी लाटांवर कल्लोळ करणाऱ्या गोर्‍या मत्स्य ललनांना, पण डोळ्यांत दिसत होती तिच्या एक अनामिक भीती. दूर समुद्रात तिचा राजा खुणावत होता तिला समुद्रात उतरण्यासाठी, राजाची मर्जी राखण्यासाठी शेवटी ती बाहेर पडली वस्त्रांच्या कोषातूनी. सोनेरी रंगाच्या टू -पीस बिकनी मधे. घाबरलेली, बावरलेली, संकोचलेली, लाजत-लाजत हातानी डोळे झाकत धावत निघाली समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी, ती जलपरी. पाय फिसलुनी थेट पडली माझिया अंगावरती. सर्वांग भिजले. तिच्या स्पर्शाने रोमांचित झालो. तांबूस रंगाची सडपातळ भिजलेली सोनेरी प्रकाशात दिसत होती ती विश्व सुंदरी सारखी. ती चक्क भारतीय स्त्रियांसारखी लाजली व बिलगली जाऊन आपल्या राजाला. मला ही हसू आले पहिल्यांदाच बिकनी मधील सुंदरीला लाजताना पाहिले होते. किंबहुना पहिल्यांदाच तिने बिकनी घातली असेल. न जाणे का, सारखे लक्ष तिच्याचकडे जात होते.

    थोड्या वेळात तिचा संकोच दूर झाला, कोणी पहात असेल तर पाहू द्या आपल्याला काय. जगाला विसरून ती जलपरी आपल्या राजाबरोबर समुद्री लाटांवर खेळू लागली. दुरून का होईना त्यांचा आनंदात मी ही नकळत शामिल झालो होतो. दोघही किनार्‍यावर आले, ती निसंकोचपणे बिकनी घातलेले फोटो आपल्या राजाला काढू देत होती. अचानक तिचा राजा माझ्याजवळ आला व आपला कॅमेरा देत, दोघांचे फोटो काढण्याची विनंती केली. नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आनंदाने निरनिराळ्या पोजमधे त्यांचे फोटो काढू लागलो. मधेच तिच्या राजाने तिला खुणावले व आपल्या तोंडावर बोट ठेवले. ती हसू लागली. हसता-हसता एखाद्या खट्याळ मुलीप्रमाणे राजाला बेसावध पाहून त्याचे कडकडीत चुंबन घेतले. गोर्‍या ललना सुद्धा लाजतील असे. तो क्षणभर बावरला पण त्यानेही तिचे तेवढ्यात जोशात चुंबन घेतले. मीही क्षणभर बावरलो, पण आतला फोटोग्राफर जागा झाला. त्या दिव्य क्षणांचे जेवढे काढू शकलो फोटो काढले. पण त्यांच्या प्रेमाच्या ओल्याव्याची जाणीव मलाही झाली. ती परत आपल्या राजा बरोबर समुद्रांच्या लाटांवर खेळू लागली.

    संध्याकाळ झाली. सूर्य देवता समुद्रांच्या सोनेरी लाटांत विलीन झाले. अद्भुत दृश्य होते ते. मी ही परत फिरलो. ती जलपरी सुद्धा पुन्हा एकदा काळ्या-बुरख्याचा कोशात सामावली होती. मनात एक प्रश्न उद्भवला, स्वत:च्या देशात गेल्यावर तिला जलपरी सारखं आपल्या राजाबरोबर समुद्राच्या लाटांबरोबर खेळता येईल का? पुरुषप्रधान समाजात महिलांच्या कित्येक इच्छा अपूर्णच राहतात. किंबहुना जलपरी होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. कमीत-कमी तिच्या जवळ बालीची आठवण म्हणून फोटो तर राहतील.

    -- विवेक पटाईत

      December 17, 2015


  • संसार

    कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं. तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात…! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं…

      January 20, 2026


  • मस्तीखोर फुगे

    आज वर्गात गेलो तर वर्ग एकदम शांत. माझ्यासाठी हे दृश्य नवीनच होतं. इतक्यात मिहिरने गाल फुगवून रोहनकडे बोट दाखवलं. सिमरनने पण तसंच केलं. तर शिल्पाने तोंड फुगवून प्रियाकडे बोट केलं. मला समजेना हा काय प्रकार आहे? प्रिया आणि रोहनला जवळ बोलावलं. तोंड फुगवून, हाताने खुण करुन विचारलं म्हणजे काय? प्रिया व रोहनने चुपचाप खिशातून फुगे काढून टेबलावर ठेवले.... आणि सगळा वर्ग फुगा फुटल्यासारखा ठॉपकन हसला.
    टेबलावर आता वेगवेगळ्या रंगाचे पाच फुगे होते. “काय करायचं या फुग्यांचं?” असं म्हणताच मुले एकदम उसळत म्हणाली,“फुगवूया... फोडूया.... उडवूया... त्यात पाणी भरुया... जादू करुया... काहीतरी धमाल प्रयोग करुया.” एकदम सही. आज आपण फुग्यांना मस्ती करायला लावूया... ढकलाढकली करायला लावूया.... नाचवूया... डोलवूया... एका जागेवर बसवूया...काय... चालेल? मुले ओरडली, चालेल काय म्हणता? हे तर मस्त धावेल. पण हे करायचं कसं?

    आम्ही फटाफट फुगे फुगवले. त्यातल्या दोन फुग्यांना दोरे बांधले आणि ते फळ्यावर अडकविले. हं चला, आता करु दे त्यांना मस्ती. “पण कशी ?” अस मिहिरने विचारताच त्याला जवळ बोलावलं. ते टांगलेले फुगे त्याच्या डोक्यावर खसाखसा घासले. आणि मग त्या दोन टांगलेल्या फुग्यांची आपापसात भांडणं सुरू झाली. त्यांची आपापसात ढकलाढकली सुरू झाली. त्यातला एक फुगा दुसऱ्याजवळ नेला की तो लांब पळायचा. सगळा वर्ग श्वस रोखून आणि डोळे मोठे करुन ही गंमत पाहात होता.

    आता आणखी एक गंमत पाहू. या भांडणाऱ्या फुग्यांमधे एक फुगवलेला साधा फुगा ठेवला. आणि काय मजा... त्या दोन भांडखोर फुग्यांनी या फुग्याला जाम धरुन ठेवलं. हे पाहून मुलांनी इतक्या जोर-जोरात आरडाओरडा केला की ते टांगलेले फुगे पण दचकले! व तो मधला फुगा घसरला. मग हा घसरलेला फुगा फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात बांधून ठेवला.
    मिहिरच्या डोक्यात मस्ती आहे म्हणून बहुधा या फुग्यांना मस्ती सुचली असावी. असं म्हणताच प्रिया म्हणाली, मग आता माझ्या डोक्यावर घासा पाहू हा दुसरा फुगा. पाहुया काय होतं? एक नवीनच फुगा प्रियाच्या डोक्यावर घासला. तो दुसऱ्या कोपऱ्यातल्या टांगलेल्या फुग्याजवळ नेला..... पण काहीही झाले नाही! मुले विचारात पडली. हे असं का झालं? हातात फुगा घेऊन प्रिया निरीक्षण करू लागली.

    मुलांना क्लू देण्यासाठी विचारलं, दोघांच्याही डोक्यावर ज्या ठिकाणी फुगा घासला त्या ठिकाणी तुम्हाला काय फरक दिसतोय पाहा बरं. “मिहिरपेक्षा प्रियाचे केस चकचकीत आहेत.” असं मुलांनी म्हणताच प्रिया म्हणाली, मी तेल लावलंय तेल!” “हां...! तेल लावल्याने जादू झाली नाही!!” असं मुले ओरडली त्याचवेळी सिमरन धावतच फळ्याजवळ आली.

    तिने प्रियाच्या हातातला फुगा हिसकावून घेतला. स्वत:च्या स्वेटरवर खसाखसा घासला. आता ती तो फुगा दुसऱ्या फुग्याजवळ नेणार इतक्यात प्रियाने तिला मागे खेचलं. सिमरनने आधारासाठी भिंत पकडण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी तिच्या हातातला फुगा सुटला.... आणि काय हो चमत्कार... फुगा भिंतीला चिकटूनच बसला.
    वर्गातल्या सर्व शास्त्रज्ञांनी आनंदाने आरडाओरड करत टाळ्या वाजवल्या, कारण त्यांना हा एक नवीनच शोध लागला होता. मुले म्हणाली,“आता आम्ही सुध्दा घासाघिस करुन घरातल्या भिंतींवर चिकटवू की असे फुगे.”

    इतका वेळ रोहन अस्वस्थ होऊन पाहात होता. तो चटकन उठला आणि त्याने टेबलावरचा पाचवा फुगा उचलला. स्वत:च्या डोक्यावर घासला. फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात टांगलेल्या फुग्याकडे तो निघाला. फळ्याजवळ पोहोचला. आता रोहन आपल्या हातातला फुगा त्या टांगलेल्या फुग्याकडे नेणार इतक्यात सिमरन आणि प्रिया रोहनच्या दिशेने धावल्या. रोहनने टांगलेल्या फुग्याच्या दिशेने हात सरळ केला. त्याचवेळी प्रिया व सिमरनने त्याला मागे खेचलं आणि.... आणखी एक चमत्कार झाला! “इतकावेळ फळ्यावर लोळणारा फुगा एकदम हडबडून खडबडून जागा झाला. त्या फुग्याने रोहनच्या हातातल्या फुग्याकडे झेप मारली. रोहनच्या हातातला फुगा आणि हा फुगा यातले अंतर सुमारे दोन सेंटिमीटर होते.
    या अचानक झालेल्या हल्ल्याने रोहन दचकला व त्याने हात वर केला, इकडे तिकडे हलवला... आणि... तो टांगलेला दोरा अचानक ताठ झाला! रोहनच्या हातातल्या फुग्या समोर तो टांगू फुगा “ताठ दोऱ्याने व नाक वर करुन” नाचू लागला. हे दृश्य पाहून मुले टाळ्या वाजवायची पण विसरली.

    आता या मागचं रहस्य मुलांना सांगायचं ठरवलं.
    जेव्हा रबरी फुगा रेशमी, नायला दोन किंवा लोकरीच्या कपड्यावर घासला जातो तेव्हा कपड्यातील इलेक्ट्राॅन्स फुग्याच्या पृष्ठभागावर येतात आणि फुगा ऋणभारित होतो. असे दोन ऋणभारित फुगे जेव्हा एकमेकाजवळ आणले जातात तेव्हा ते एकमेकांना दूर ढकलतात. याला “अपसरण” म्हणतात. विद्युतभारित फुग्याजवळ जर साधा फुगा आणला तर तो मात्र आकर्षिला जातो. कारण दोन असमान विद्युतभार एकमेकांना आकर्षित करतात त्याला “आकर्षण” म्हणतात. भिंतीवर विद्युतभारित फुगा चिकटविला तर 'विषमभार आकर्षण' या तत्वामुळे फुगा भिंतीला चिकटतो. थोड्यावेळाने इलेक्ट्राॅन्स हवेत विरतात आणि भिंतीवरचा फुगा खाली पडतो.|

    आता आमच्या शालेतल्या मुलांनी नाच केला असेल की फुग्यांनी? आणि तुमच्या घरात फक्त तुम्हीच नाचता की टांगलेले फुगे? मला कळवाल?
    मी तुमच्या “मस्तीखोर पत्रांची” वाट पाहतोय.

    - राजीव तांबे.

      July 8, 2015


  • डोळेझाक (कथा)

    “यशोमतीबाईसाहेबांच्या– देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो – अंतिम संस्कारानंतर येताय ना?”, रिटायर्ड मेजर मालोजीराव गायकवाडानी त्यांच्या पुतण्याला विचारलं. “कशी काय होती व्यवस्था? सगळं ठीक पार पडलं ना?”

      December 12, 2022


  • आला आला पाऊस आला…

    आला आला पाऊस आला…मला भिजवून ओलेचिंब करून गेला…असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्‍यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात.

      July 11, 2014