Login Here Join Now

ललित लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संस्कार, विचार आणि विवेक

    सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला.

      October 23, 2023


  • दिवाळी अंक आणि मी – प्रवास बारा वर्षांचा

    दिवाळी अंकासाठी मी गेली 12 वर्षे सतत लिखाण करतोय पण मोजकच. 2002 सालच्या माझं कोकण दिवाळी अंकात माझी ‘माऊली’ ही तिसरी कथा प्रकाशित झाली. त्यापुर्वी नवाकाळ मध्ये माझ्या दोन कथा प्रकाशित झाल्या होत्या. माझ कोकण दिवाळी अंकासाठी आई या विषयावर साहित्य मागविण्यात आले होते त्यामुळे आईला केंद्रस्थानी ठेवून मी ही प्रेम कथा लिह्ली होती.

      December 20, 2013


  • आणि माझं सायकलीचं वेड

    काही वर्षांपूर्वी स्कूटर, मोटर सायकली यांची रस्त्यावर भरमार होण्याआधी,सायकल ही एक चैन असायची..मैत्रिणींना सायकल चालवताना पाहून आपल्याला कधी चालवता येईल याचे ध्यास लागत. सर्वात आधी मी सोलापूरला असताना मुलींना सायकल चालवताना पाहिलं होतं , माझी मैत्रीण पुष्पा राठी आणि तिची मोठी बहिण सुशीला यांची दिवसांची वाटणी झालेली होती.. तीन तीन दिवसांची..तेव्हां मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत होते.

      December 11, 2023


  • नातं_असंही??

    आधारवड

    रविवारची सकाळ, अनिकेत मस्त लोळत बेड वर आडवा झालेला, आज जरासा अळसावलेला! तस सॉफ्टवेअर मध्ये जॉब करणारे सगळेच शनिवार रविवार अशेच मुर्दाडासारखे पडून असतात! त्यात नुकतंच त्याच्या टीमच रिलीज झालेलं.काल रात्री तेच सेलिब्रेशन करून तो लेट नाईट आलेला! तो साखरझोपेतच होता तेच त्याची लाडाची लेक मुग्धा आली धावत आणि बसली अंगावर, घोडा घोडा चालू झाला! तसा अनिकेत पण आळस झटकून मस्त लहान होऊन मुग्धा सबोत धिंगाणा घालू लागला! अनिकेत ची बायको सई ही हे पाहून सुखावली! विचार करू लागली :'एवढ्यात अनिकेत किती बदलला ना,नेहमी चिडचिड करणारा अनु आता खूप हसतमुख झालाय! '
    अनिकेत उठला ;आवरून हॉल मध्ये आला,चहाची वाट पाहत मोबाईल खेळत बसला, स्कूल ग्रुपवर पिंकी ने एक सॉंग सेंड केलेलं! ते प्ले केलं अन मस्त मूड झाला त्याचा!
    'पिंकी त्याची स्कूलमेट! पाचवी ते बारावी दोघे एकाच वर्गात! सरस्वती विद्या मंदिर!
    पिंकी छोटीशी, नाजूकशी, थोडे कुरळे केस,नेहमी एक वेणी घालणारी, स्वच्छ इस्त्री केलेला युनिफॉर्म, गोरी, सरळ नाक,काळेभोर बोलके डोळे असलेली! पण बरीचशी शांत, सहसा हसत नसे,पण हसली की एक दात मोत्याप्रमाणे चमकून दिसे,गम्मत वाटे तिला पाहताना! अभ्यासात व्यवस्थित,अक्षर अगदीच छान, त्यात चित्रकला आवडता विषय! कधी कुठलं फंक्शन असेल तर पंजाबी ड्रेस असे,तोही दोन्ही साईडने पिनअप केलेली ओढणी असलेला. नेहमी तिचे वडील स्कुटर वरून सोडवायला येत आणि न्यायला ही! मैत्रिणीनंमध्ये रमे थोडी पण मुलांमध्ये फार मिक्स होत नसे, वडील मिलिटरी रिटायर्ड होते आणि आता बँक मध्ये नोकरीला होते, घरात फार शिस्तीच वातावरण असेल असा अंदाज. तिचा 11विचा एक किस्सा आठवतो, नवीनच सायन्स साईड, त्याच जरा टेन्शन, त्यात बायोच लेक्चर,खडूस सर, त्यांनी प्रॅक्टिकल मध्ये हार्ट ची डायग्राम सांगितली काढायला,ती हिने इतकी हुबेहूब काढली की सर म्हणे तू कॉपी केली,ती मान्य करायला तयारच होईना,सर पण ऐकेना, त्यांनी पुस्तकातील ती डायग्राम तिने काढली त्यावर ठेवून दाखवली,तर अगदी हुबेहूब, पण ती ऐकेना, ती बोलली थांबा परत काढून दाखवते, आणि 10च मिनिटात तिने परत हुबेहूब काढून दाखवली आणि सरांचं तोंड बंद केलं!
    बारावीत असताना अचानक तिच्या वडिलांचं हार्ट ऍटॅक ने निधन झालं, आम्ही बरेच बॅचमेट तिच्या घरी जाऊन आलो. बारावी झाली तशी परत कित्येक वर्षे तिची भेट नाही! कधी आठवणही नाही. दहा बारा बर्षांने सगळ्यांच होत तसं आमच्या बॅच च्या मुलांमध्येही री युनियन चे वारे वाहू लागले!
    मग कोण कोण कुणाच्या टच मध्ये आहे,कुणाकडून कुणाचे कॉन्टॅक्ट मिळतील याचे तपशील तयार झाले, आमची 63 जणांची बॅच. सगळे सापडले, कोण पुण्यातच तर कोण फॉरेन ला! व्हाट्सअप्प ग्रुप झाला,गप्पा रंगल्या,जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जुने क्रश भेटले ?!भेटण्याची ओढ वाढली, मग दिवस ठरला,सगळ्यांनी येण्याचं प्रॉमिस केलं! आणि सगळे सकाळी रिसॉर्ट वर वेळे आधी हजर झाले!
    वन बाय वन ओळख परेड चालू झाली आणि पिंकी उभी राहिली! सगळे आवक होऊन तिच्या कडे पाहू लागले,तिला ऐकू लागले ,मनोमन विचार करू लागले हीच का ती शांत पिंकी??? आज तर नुसतं उसळतं खळखळतं व्यक्तिमत्त्व बनली होती! इतका बदल?? मस्त हेअरस्टाईल, वन पीस मध्ये आलेली पिंकी!!! आज ती डॉ मिसेस अदिती यादव म्हणून मिरवत होती! हसत होती ,खिदळत होती,गप्पा गोष्टी करत होती! पुण्यातच होती, अगदी अनिकेत च्या घरा जवळच तीच आयुर्वेदिक क्लिनिक होतं, तिचे पती डॉ केशव यादव , प्रख्यात अस्थिरोगतज्ञ! त्यांचं स्वतःच हॉस्पिटल! पिंकी ला एक मुलगा!
    जेवणं झाली आणि अनिकेत निवांत ड्रिंक घेत बसला होता, पिंकी त्याकडे आली, हातात रेड वाइन चा ग्लास!
    जुजबी बोलणं झालं त्यांमध्ये!
    पण अनिकेत तिच्याकडे पाहतच राहिला! किती मस्त वाटलं त्याला तिच्याशी बोलून!
    मनोमन विचार करू लागला : 'अबोल कळी आज किती सुगंध देऊन गेली! '
    सगळे तशे सुखावले खूप वर्षांनी भेटत होते ना.
    अनिकेत! उंचा पुरा, जिम ने कमावलेलं पिळदार शरीर, सावळा पण आकर्षक चेहरा! बोलणं मधुर पण मोजकं!
    अनिकेत ला आधी पासून कंम्पुटर इंजिनिअरिंग करायचं होतं! आणि त्याने ते केलं ही! 2 वर्ष फॉरेन ला जॉब करून आला, आईच्या इच्छेनुसार मामाच्या मुलीशी लग्न ही झालं! पण दोघांच्या विचारात फार तफावत, ती खेड्यात वाढलेली हा शहरात, तिने कधी गाव सोडलं नव्हतं तर हा विदेश फिरून आलेला, तिला जॉब नव्हता, थोडी संकुचित विचारसरणी होती, हायफाय कल्चरशी ती रुळलेली नव्हती! त्यातून सई ला थोडी इनसेक्युरी येऊ लागली! अनिकेत चे बाबा रिटायर झाले आणि मग गावाकडे मस्त फार्महाऊस बांधून तिकडे शेतात रमले! अनिकेत आणि सई दोघे पुण्यात,मग मुग्धा झाली, त्याचा जीव की प्राण ती! सई अनिकेत चे खूप खटके उडत, तेही अगदी क्षुल्लक कारणांनी पण मुग्धा मुळे तो खुश असे! सईच वागणं त्याला खूप खटके, त्याचा मोबाईल चोरून चेक करणे, मित्रांकडे त्याची चौकशी करणे, विनाकारण ऑफिसमध्ये जाऊन पाहणे की तो आहे का? याने त्याला फार मनस्ताप होई! पण आपलेच दात अन आपलेच ओठ! काय करणार! आहे तो दिवस कामात व्यस्त जाई, घरी आल की कटकट होई, मुग्धा काय तो त्याला विरंगुळा!
    सई च्या किटी पार्ट्या, भिशी, मैत्रिणींसोबत औटिंग! आणि नवऱ्यावर संशय! अस वर्षानुवर्षे चालू होतं!
    एका संध्याकाळी अनिकेत सहज चक्कर मारावी म्हणून पायीच निघाला अन पिंकीच्या क्लिनिक समोरून जाताना वाटलं चला ही असेल तर भेटावं!
    आत गेलो तर खूपच मस्त अस तीच क्लिनिक होत! अगदी अद्ययावत आणि टापटीप आणि नीटनेटकं,अगदी प्रसन्न वातावरण, धुपाचा सुगंध! तिने काढलेले सुंदर पैंटिंग्ज तिथे वॉल वर लावले होते! छानसं देवघर ज्यात वडिलांचा फोटो!
    रिसेशपशनिस्ट ला सांगितलं तर मॅडम आत काही वाचत बसल्या होत्या! पिंक कलर चा छानसा टॉप,त्यावर डॉक्टरच ऍप्रन , चेहऱ्याला खुलून दिसेल असा चष्मा, एक केसांची बट मस्त गालावर रुळलेली, मंद स्वरात गाणं ऐकू येत होतं, ती मस्त एकाग्र होऊन पुस्तक वाचत होती! मी आहे कळलं तर सरळ बाहेर येऊन मस्त हसत स्वागत केलं अन केबिन मध्ये जाऊन बसलो!
    अनिकेत (थोडा संकोचून ): पिंकी एक विचारू?
    पिंकी: हेच ना तुझ्यात इतका बदल कसा?
    अनिकेत: हो तेच ते!
    पिंकी: अरे अळी किती दिवस कोशात राहणार ! त्याच फुलपाखरू होणारच की कधी न कधी! केशव चा परिसस्पर्श झाला अन या सुरवंटाच फुलपाखरू झालं! तू तर मला लहानपणापासून पाहत आलाय,लाजरी बुजरी,धाकात अन शिस्तीत वाढलेली पोर मी. अभ्यास भला आणि आपलं घर भलं. अचानक पप्पा गेले अन सगळं कोलमडल, नेमकी आपली बारावी होती,पपांच स्वप्न होत डॉक्टर व्हावं, पण त्यांच्या जाण्याचा धक्का पचवू शकलो नाही आम्ही, मानसिक दृष्ट्या तर खचलोच पण आर्थिक दृष्ट्या ही कोलमडलो, आपले आपले म्हणणारे अनोळखी वाटू लागले, आईची ओढाताण होऊ लागली, नवऱ्याचं दुःख बाजूला सारून ती संसाराचा गाडा ओढायला सज्ज झाली, दादा आणि माझं शिक्षण बाकी होतं, पापांची पेन्शन आणि तिला जमेल ते काम करून ती आमचं सगळं हवं नको पाहू लागली, तिच्या मनाची घालमेल मला पाहवत नव्हती, या सगळ्यात थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं,MBBS ला नंबर लागेना,पेमेंट सीट वर मिळत होत पण पैसे नव्हते! मग BAMS ला गेले! आणि मला खूप छान वाटलं,संस्कृत मला आवडत होत, मन लावून शिकले, छान मार्क मिळाले! कुठेतरी थोडा आर्थिक तणाव आणि नातेवाईक,पै पाहुणे,मित्र परिवार यांकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीमुळे आम्ही सगळेच थोडे अलिप्त राहू लागलो. घर भलं अन अभ्यास!
    मग इंटर्नशिप ला लोकमंगल हॉस्पिटलला जॉईन झाले.आणि तिथे हे महाशय भेटले डॉ केशव यादव! दिसायला साधा सुधा, गव्हाळ वर्ण, सडसडीत, चष्मा असलेला , MS ORtho करत होता. नुसता गप्पा,मस्ती,चेष्टा, मस्करी, पेशंट असो,त्यांचे नातेवाईक असोत, नर्स असो वा वॉर्ड बॉय, अगदी सिनिअर डॉक्टर असोत,कुणालाच सोडत नसे! सगळ्यांची खेचत असे; अन विशेष म्हणजे सगळे त्याला खेचू देत असत.
    मला आय सी यु मध्ये नाईट ड्युटी होती. आणि नेमकी याची पण! माझा अन याचा अगदीच परिचय नव्हता .पहाटे पहाटे थोडं निवांत झाले अन टेबल वर डोकं ठेवलं ,डोळा कधी लागला ते कळलं नाही, अचानक हाताला चटका बसला म्हणून दचकून उठले तर समोर हा उभा. हातात दोन कॉफी चे कप. अरे माझ्या हाताला चक्क चटका दिला याने कॉफ़ी चा! आणि वर म्हणे: "मॅडम कॉफ़ी घ्या आणि जाग्या व्हा, तुमच्या डुलकीने इथे पेशंट ला कायमची डुलकी लागेल! " आणि हसला मोठ्याने. म्हटलं हा कसला आगाऊपणा! असला झापला ना, म्हटलं:' असाल सिनिअर, तुमच्या मर्यादेत रहा! मी माझं काम चोख केलं आहे! करते आहे!करत राहणार आहे! तुमच्या फुकट सल्याची गरज नाही!'
    खांदे उडवून हसला आणि म्हणे: 'राहिलं बुआ!'
    तशीच उठले आणि मेट्रन कडे गेले तक्रार करायला! त्या बोलल्या की "बस, शांत हो, नवीन नवीन सगळ्यांचा त्या बद्दल असा गैरसमज होतोच होतो. पण केशव चांगला मुलगा आहे. तू गैरसमज करून घेऊ नकोस. खूप काही सोसलंय त्याने. तरी हसतो अन सगळ्यांना हसवतो. तरी मी सांगेल त्याला तुझ्याशी जास्त इंटररियाकट न व्हायला!"
    मीपण थोडी शांत झाले. त्याला नंतर अनेक दिवस त्याला असच निरखत असे,पण अंतर ठेऊनच.चेष्टा मस्करी करे तो पण त्यात थिल्लरपणा नसे, एका विशिष्ट दर्जाचे अगदी दाद द्यावी अशे विनोद असत. कामात म्हणशील तर प्रमाणापेक्षा जास्त काटेकोर,शिकायला उत्तचुक, मदतीला तत्पर , नेहमी एनर्जी ने भरून;भरून नाही ओसंडून वाहत असलेला!
    अनिकेत:' म्हणजे तू असतेस तशीच!'
    पिंकी:' हो आत्ता असते तशी पण आधी कुठे अशी होते! कामात मी परफेक्ट असे, शंकांचं नाही,पण चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले!
    त्याने माझं नाव ठेवलं होतं : लेडी जमदग्नी!
    बोल आता आहे की नाही परफेक्ट नाव.
    मला कळलं तेव्हा राग कमी अन हसू जास्त आलं. कॅन्टीन मध्ये बसला तरी त्या भोबती आपोआप 4 मानस जमत, खातो कमी आणि गप्पाच जास्त. किस्सेच किस्से! खरे किती खोटे किती माहीत नाही!
    एकदा मी कॅन्टीन मध्ये बसलेले ,जेवण उरकून ड्युटीला पळायची घाई नव्हती. सहज शेजारी लक्ष गेलं तर हा माणूस आज एकटाच बसला होता टेबल वर डोकं टेकवून. म्हटलं परतफेड तो बनती है! कॉफ़ी चे 2 कप घेतले आणि दिला त्याला चटका! टनकन उडाला?. पाहते तर मलाच धक्का बसला. त्याचे डोळे रडून लाल झालेले होते. मलाच अपराध्यासारखं झालं! सॉरी सॉरी म्हणू लागले!
    तर बाबा म्हणतोय: सॉरी का? आना मॅडम ती कॉफ़ी इकडं;लेडी जमदग्नी ची कॉफ़ी मिळायला पण पुण्य लागतं.अन खळखळून हसला!
    काय रसायन असेल हे काही कळायला मार्गच नाही.
    विचारलं 'काय झालं? का रडत होतात!'
    म्हणाला: 'काही नाही रे ! आज रिझल्ट आला! MS पूर्ण झालं! बाप खुश असेल म्हणून डोळे मिटून बोलत होतो त्यांसोबत, कधी पाणी आलं त्यातून कळलं नाही! साला हे डोळे पण आपले नसतात,नकळत धोका देतात.'
    माझं कंफ्युजन लक्षात आलं त्याच्या मग बोलला: 'अरे वडील नाहीत मला, 12 वर्ष झाली जाऊन, एकसिडेंट झालेला त्यांचा, वेळीच योग्य उपचार मिळाले नाहीत,आर्थिक परिस्थिती बेताची, योग्य सल्ला देणारं कुणी सुशिक्षित आजूबाजूला नाही, कमावलं ते सगळं त्यांना नीट करण्यात गेलं पण ते काही वाचू शकले नाही! तेव्हाच ठरवलं होईल तर डॉक्टरच. जिद्दीला कारण लागतच! मला मिळालं:माझा बाप नाही वाचवू शकलो! पण कुणाचा बाप मरू द्यायचा नाही!
    आज तेच त्यांना सांगत होतो! आज पास झालो आता अधिकृत बाप बचाव मोहिम चालू! "आणि मनमोकळा हसला.
    का कुणास ठाऊक ते हसणं काळीज चिरून गेलं.
    मेट्रन बोलली ते सगळं आज कळलं.
    त्याबद्दल आदर वाढला!
    आता मी अंतर कमी करायचं ठरवलं. गप्पा टप्पा होऊ लागल्या. जाणवलं की हा उथळ नाही तर अथांग आहे! दोघे तशे समदुःखी. वडिलांचं छत्र नाही, आर्थिक परिस्थिती बेताची. माझी जरा बरी पण हा तर कमवा आणि शिका मधून आलेला! बाग काम,गाड्या धुणे, अगदी श्रीमंतांची कुत्री सांभाळणे ,पडेल ते काम करून त्यात मजा घेऊन, हसत खेळत सगळं पुढे नेणारा! स्वतः तर हसत होता पण आजूबाजूचं जग आनंदी ठेवत होता!
    'कसं जमत रे तुला ';विचारलं की म्हणे: "माझा टेन्शन मधला चेहरा आईने पाहिला की तिचा बांध फुटत असे! तिला सावरताना खोटं हसायला शिकलो,मग कळलं खरं हसलो तर क्या बात है! अन खरंच ;आहे त्यात खरं हसता यायला लागलं! म्हटलं आपण तर सेल्फीश झालो; आपल्याला जमलं मग इतरांना नको का हसवायला. मग छंद जडला! हसवायचा!
    आता सांग इथे पेशंट येतात ते आजारपणाच टेन्शन घेऊन,नातेवाईक येतात ते आपलं पेशंट नीट होईल,पैसे पुरतील का या टेन्शन मध्ये, हॉस्पिटल स्टाफ रिस्की ड्युटी करून करून टेन्शन मध्ये, आपले सिनिअर हा हॉस्पिटल चा डोलारा सांभाळण्याच्या टेन्शनमध्ये, आणि आपला अन टेन्शनचा छत्तीस चा आकडा. मी असेल तर तिथे त्याला चान्स नाही, मग सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी चेष्टा मस्करी चालूच असते!
    प्रत्येक पेशंटमध्ये मी माझाच बाप शोधतो,तो बराच व्हायला हवा या हट्टाने पेटून उठतो,प्रसंगी 24 तास काम करावं लागलं तरी पर्वा नाही,मग मला थकवा ही जाणवत नाही.........
    असच काहीसं नेहमी सांगत असतो.....
    कळतं नकळत मीपण कधी हसायला लागले कळलं नाही!
    त्याला कुठून कळलं मी छान चित्र काढते माहीत नाही! आला अन म्हणे:लेडी जमदग्नी मला एक पोट्रेट हवंय तुझ्याकडून! माझ्या वडिलांचं चित्र! तो वर्णन करत राहिला अन मी काढत राहिले! आणि ते चित्र पाहून तो वेड्यासारखा अख्या हॉस्पिटलमध्ये पळत सुटला,जो दिसेल त्याला तो ते दाखवी अन म्हणे जमदग्नीच्या हातात जादू आहे राव: बाप जिवंत केला तिने कागदावर! पळून पळून दमला आणि माझ्या समोर येऊन बसला! हात हातात घेतले आणि म्हणे:" ये हात मुझे देदे ठाकूर!"?‍♂️
    कशाला???
    तर बोलतो मला ऑपरेशन सोडून कोणती कला येत नाही आणि तुला हे येऊन तू काही करत नाही! म्हटलं दाखवावं जगाला या हाताची जादू!
    खूप कौतुक वाटलं मला त्या दिवशी जेव्हा ते चित्र पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं!
    मग मीपण वेड्यासारखी खूप चित्र काढत राहिले,अगदी विसरून गेलेला माझा छंद अन सूर पुन्हा गवसला मला!
    खूप वर्ष लागली मला हे कळायला की त्याने ते मुद्दाम घडवून आणल होत माझ्यातला कलावंत बाहेर काढण्यासाठी!
    माझी पण इंटर्नशिप संपत आली. पुढे काय करावं या द्विधा मनस्थितीत होती. मी त्याला विचारलं "काय करू रे आयलोपॅथी की आयुर्वेद"?? बोलला "खरं सांगू : आयुर्वेद!
    महान आहे ते! जतन करावं असं! अमूल्य!"
    मलाही तेच वाटत होतं! ठरलं!
    मग मी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये शिक्षण चालू केलं! भेट होत असे आमची वरचेवर. तो ही जॉब करत होता. घरी लग्नाचे वारे वाहू लागले! आईने विचारलं 'कुणी आहे का तुझ्या आयुष्यात! 'म्हटलं 'नाही असं कुणी पण हा असेल तर मला आवडेल.' त्याला मी आवडेल का? तर मला वाटलं नाही आवडणार! पण म्हटलं विचारून पाहावं! आईचा विरोध असण्याचं कारण नव्हत! त्याला कॉल केला,भेटलो,बोललो,मी विचारलं! तो मनसोक्त हसला! म्हणे: "माझी तक्रार करायला मेट्रन कडे जाणारी ते मला लग्न करतोस का विचारणारी! प्रवास फारच वेगवान झाला??."
    आईशी बोलून सांगतो बोलला आणि झालं आमचं लग्न!
    त्याने मला जगणं शिकवलं! रोज शिकवतो! प्रचंड आशावाद काय असतो हे मी रोज डोळ्याने पाहते, त्या इतकी नाही पण दहा टक्के जरी त्यासारखं जमलं तरी खूप झालं मानते! तो त्याच हॉस्पिटल मी माझं क्लिनिक . 1 मुलगा आहे, मला त्याला वेळ देता यावा म्हणून मी 4 तास असते इथे,मग माझा रिसर्च, संसार आणि छंद! मज्जा चालू असते! "
    अनिकेत लहान मूल होऊन हे ऐकत होता! केशवने पिंकीला कसे पैलू पाडले हे अनुभवत होता! अर्थात पिंकी हिराच होती म्हणून तो पैलू पाडू शकला!
    त्याला आता त्याची सई आठवली! भानावर आला!
    पिंकी ने बरोबर ताडल . "दाल मे कुछ काला है!"
    पण तिने काही विचारलं नाही! ती वाट पाहत होती अनिकेत होऊन काही सांगतोय का.ओपन होतोय का.
    पिंकी: तुझा संसार काय म्हणतोय! सगळे कशे आहेत.
    मग अनिकेत ने आपली राम कहाणी सांगितली.
    त्यावर ती हसून इतकंच म्हणाली: त्यात काय एवढं विशेष. शंभरातल्या नव्वद बायका अश्याच असतात रे. त्यांचं जग आपल्या संसारपूरत मर्यादित असतं. आता तू हाऊसवाईफ निवडलीस तेव्हा हे तुझ्या लक्षात यायला हवं होतं! ती शंका का घेते याचा बारीक विचार जर तू सुरवातीलाच केला असतास ना तर इतकी वर्षे वाया गेली नसती तुमची. तीच जग म्हणजे काय? तर तू अन आता मुग्धा. आधी तर फक्त तूच. मग तिला जर वाटलं की याने फक्त माझं असावं,माझ्या जवळ असावं,माझ्याच जवळ व्यक्त व्हावं. तर तीच काय चुकलं? कारण ती फक्त तुझी,गप्पा मारायला ही फक्त तू. कारण इथे ना तिचे आईवडील ना मित्र मैत्रिणी. त्यात ती खेड्यातून आलेली. तिथे फार स्वातंत्र्य नाही,तुझं सो कॉल्ड मेट्रोपोलिटंट कल्चर तिच्या आवाक्याबाहेरच! तिला ते आत्मसाद होईना अन तुला ते कळेना! तिची नक्कीच यात घुसमट झाली असणार,न्यूनगंड आला असणार! त्यातून शंकेने जन्म घेतला असणार! मग तो भस्मासुर मोठा झाला असणार,त्यात तू तिला सावरण्याऐवजी तिच्यावर चिडचिड करत बसलास! त्याने त्या भस्मासुरला अजून खतपाणी मिळालं असणार; आता बसलाय मग तो मानगुटीवर!
    "मी सांगते ते करशील? "
    अनिकेत ने मोहिनी व्हावी तशी मान डोलावली.
    पिंकी: तू तिला बदलण्याचा प्रयत्न करत बसू नकोस! तूच थोडे सोपे बदल करून घे! ती आहे तशी छानच असेल ना. मामाची मुलगी म्हणजे लहानपनापासून माहीतच असेल की . तू चिडचिड बंद कर. मजेत रहा. घरी वेळ दे. तिला समजून घे,कामात थोडीशी मदत करत जा. ऑफिस मधून 2,3 वेळा तिला कॉल करत जा.घरी ऑफिसच्या गप्पा मारत जा. तिला थोडं मनमोकळ बोलतं कर. नक्की तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघ!"
    अनिकेतलाही पटलं की आपण सईला समजून घेण्यात कमी पडलो .
    हळू हळू तो बदलू लागला, पिंकी सोबत गप्पा वाढू लागल्या!ती त्याची आयडॉल बनली होती. कोणतीही अडचण ती सहज सोपी करून सोडवत असे! ती आधारवड वाटू लागली! पिंकी सोबत आहे म्हणजे नो टेन्शन.
    अनिकेत तिच्या कडे थोडा आकर्षित होऊ लागला!
    एकदा कॉफी ला भेटले असता तो पिंकी ला म्हणाला: मला ना एक गिल्ट आहे!
    पिंकी: मी तुला आवडायला लागले याचं??
    अनिकेत ताडकन उडाला.
    कारण पिंकी ने त्याचं मन अचूक ओळखलं.पण ती अगदी शांतपणे हे कसं काय बोलू शकली याच त्याला आश्चर्य.
    पिंकी ने ते आश्चर्य पण ओळखलं!
    पिंकी: त्यात काय विशेष आहे रे. मी आहेच की अवडण्यासारखी.तुला काय कुणालाही आवडू शकते.
    तुला गिल्ट आहे यातच तुझे संस्कार दिसले.मी आवडणं,माझा सहवास आवडणं आणि मला भोगण्याची इच्छा निर्माण होणं या भिन्न गोष्टी झाल्या. तुझ्या मनात हे नाही हे मी खात्रीने सांगू शकते. तितकं जानवण्या इतका सेन्स आहे मला. तस जाणवलं असत तर हे फुलपाखरू कधीच कोशात गेलं असतं.
    प्राजक्ताचा सडा केशवच्या दारात पडला तरी त्याच्या सुवासाने अनेक अनिकेत मोहरू शकतात हे सत्य ना प्राजक्त ने नाकारल ना केशव ने!!!!
    अनिकेत पुन्हा सुन्न........
    परिस्थितीतुन केशव घडला....
    केशवने पिंकी घडवली......
    पिंकी ने अनिकेत......
    अनिकेत ने सई........
    सिलसिला आज भी जारी है........
    कोश भेदून सुरवंट फुलपाखरू होऊ पाहतंय.......

    { दीर्घ काल्पनिक कथा लिहिनीण्याचा एक छोटा प्रयन्त! अभिप्राय नक्की कळवावा ही विनंती}

    --विशाल झावरे पाटील

      November 11, 2022


  • संवेदनशीलतेतही ‘प्रवीण’

    प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो.

      August 18, 2022


  • एका फुलाची गोष्ट

    आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.

    स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले. गुणाचा माझा पोर म्हणत आईने प्रेमाने हात त्याचा पाठीवर फिरविला आणि नमो-नमो म्हणत ते गुलाबाचे फुल देवाच्या चरणी अर्पित केले. दुसऱ्या दिवशी पहाटे निर्माल्य झालेले फुल तिने रस्त्यावर फेकून दिले. अनेक वर्ष रस्त्यावर झाडू लावल्या मुळे अस्थमासम आजाराने ग्रस्त झाडूवाला खोकलत-खोकलत झाडू लावत होता. त्याने कचऱ्या सोबत गुलाबाच्या फुलाला ही उचलून कचरा गाडीत टाकले. स्वामीजी थांबले आणि प्रश्नार्थक नजरेने मजकडे बघितले. मी म्हणालो, स्वामीजी माझ्या सारख्या अल्प ज्ञानी जीवाला, काहीच उमगले नाही.

    स्वामीजी ने स्मित केले आणि म्हणाले ‘नादान है, बच्चा’ आणि डोळे मिटून पुन: समाधिस्थ झाले.

    -- विवेक पटाईत

      April 20, 2014


  • अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी…

    अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी.. असा फतवा बिहारमधील एका गावपंचायतीने काढला होता पण त्या विरोधात कोणीही तक्रार केल्याची माहीती नाही याचा अर्थ हा निर्णय गावकर्‍यांच्या संमतीनेच घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे शहरात राहणार्‍यां आपल्याला जेंव्हा या फतव्या बद्दल कळ्ते तेंव्हा आपण आपला देश अजूनही किती बुरसटलेल्या विचारसरणीचा आहे असा विचार अगदी सहज करून जातो. आपल्या देशातील गांव आणि शहर यांच्या विचासरणीत आजही कमालीच अंतर आहे हे सत्य नाकारता येणार नाही. आपल्या शहरातील सूख- साधने गावात पोहचली पण शहरातील अधूनिक विचारसरणी अजूनही गावात पोह्चलेली नाही. जी काही पोहचली ती चित्रपटांच्या माध्यमातून अतीरंजीत. भारतातील गावांत आजही पुरूषप्रधान संस्कृतीच गुण्यागोविंदाने नांदतेय हे सत्य आहे त्याचाच एक भाग म्ह्णून या फतव्याकडे पाह्ता येईल.

    मुंबईसारख्या शहरात लहानाचे मोठे झालेल्या, अधूनिक विचारसरणीचा बाळकडू प्यायलेल्या उच्चशिक्षीत पुरूषाच्या मनातही स्त्रियांच्या मोबाईल वापरावरच बंदी घालायला हवी हा विचार कित्येकदा डोकावून गेलेला असतो हे सत्य आहे. आता त्याचा मोकळेपणाने कोणी स्विकार करणार नाही हा भाग वेगळा. असो मुंबईसारख्या शहरात मोबाईल फोन हे काही एकमेव संपर्काचे साधन नाही आणि असल तरी त्याच्या वापरावर बंदी घालण पुरूषांनाच परवडणार नाही आणि शहारातील स्त्रिया हा अन्याय सहनच करून घेणार नाही. त्यामुळे शहारातील पुरूष असा विचार फक्‍त स्वप्नात अथवा मनातच करू शकतात. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट फतव्यात फक्‍त अविवहित मुलींच्याच मोबाईल वापरावर बंदी का घालण्यात आली त्या मोबाइलफोनचा दुरूपयोग करतात म्ह्णूनच ना ? पण आजच्या काळात सर्वच विवाहित स्त्रियां त्याचा सदुपयोग करतात याची खात्री त्यांना कोणी पटवून दिली ? मुंबईसारख्या शहरात मुलीच्या हातात दहा-वीस हजाराचे मोबाईल असतानाही त्या सार्वजनिक फोन बुथच्या बाहेर गर्दी करून आजही का उभ्या असतात ? हे कोडं आजही कित्येकांना उलगडत नाही.

    समाजात अनैतिकता वाढू लागलेय त्याला मोबाईल फोनला जबाबदार धरून आपली जबाबदारी टाळ्ण्याचाच हा प्रकार आहे. त्यापेक्षा समाजाने मुलींवर चांगले संस्कार केल्यास, त्याच्यासोबत सर्वच विषयांवर मनमोकळ्या चर्चा केल्यास, त्यांना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी दिल्यास आणि त्यांच्या मनात उत्सूकतेतून निर्माण होणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू दिल्यास हे असे फतवे काढण्याची आवश्यकताच भासणार नाही. विनोदाने सांगायच तर अविवाहीत मुली मोबाईल फोन वरून फोन कोणाला करणार अविवाहित मुलांनाच ना मग त्यांच्याही मोबाईल फोन वापरावर बंदी का घातली नाही. हा जो काही प्रकार घडलेला आहे तो पुरूषप्रधान विचारसरणीतून आणि पुरषी अहंकारातूनच घडलेला आहे. याच समर्थन होऊच शकत नाही...

    -- निलेश बामणे

      December 27, 2013


  • लग्नाचे निमंत्रणही ऑनलाइन

    लग्न ठरलंय, तारीख ठरली, वेळ ठरली, स्थान ठरलंय ना… मग बस्स. हाच माहितीवजा एसएमएस तयार करा अन् धाडा आपल्या गणगोताला, मित्रांना. एवढेच नाही. व्हॉट्स अॅपवरही मस्त वधू-वरांचे छायाचित्र घ्या आणि त्यांखाली हाच मजकूर लिहा अन् करा की तुमच्या ग्रुपला सेण्ड.

      January 23, 2024


  • डोॅक्टर क्षीरसागर… एक देवमाणूस

    खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अजुनही आरोग्याच्या म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत.सन १९८९ साली डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहीली.व सन १९८० साली दवाखाना सुरू झाला.परंतू १९८१ पासुन आजतागायत ठराविक नर्स व आरोग्य सेवक सोडले तर दवाखान्याचा कोणत्याही पेशंटला उपयोग झाला नाही.आला पेशंट डाँक्टर नाहीत,...आला पेशंट गोळ्या औषधे नाहीत,...आला पेशंट येथे उपचार होणार नाहीत.पेशंट पुढे हालवा...आला पेशंट स्टाफ कमी आहे..अशी अनेक प्रकारची उत्तरे तयारच असतात.या बाबत कोणताही पुढारी आवाज उठवताना दिसत नाहीत.,जर कुणी आवाज उठवलाच तर त्याची मुस्कटदाबी करून गप्प बसवले जाते,.तर असो,...

    या भागात एकच डाँक्टर होऊन गेले ते म्हणजे डाँ,क्षिरसागर..नव्हे भागाच्या दृष्टीने देवमाणुसच...

    डाँ.क्षिरसागर हे साधारण १९८५-८६ च्या आसपास आले.त्यांनी टोकावडे येथे एका झोपडीवजा सफरात आपला दवाखाना थाटला..कुडाचे सफार त्या सफरात पेशंटला झोपण्यासाठी एक लाकडाची खाट.शेजारी लाकडाची छोटी रँक शेजारीच एक मोडका टेबल त्यावर औषधांच्या बाटल्या विवीध गोळ्यांची पाकिटे डाँक्टरांना बसण्यासाठी मोडकी खुर्ची व समोर दहा-पाच पेशंट असत.आर्ध्या झोपडीत एक मोठा पडदा लावलेला व त्या पडद्याच्या आत डाँक्टरांचा संसार बायको व दोन मुले.एक मुलगा व एक मतीमंद मुलगी..

    डाँक्टरांच्या अशा या दवाखान्याला ना अमुक दवाखाना..असे नाव ना तमुक डाँक्टरांची डिग्री..ना अमुक ढमुक आजारावर अमुक तमुक इलाज करणार अशी जाहीरात...त्यामुळे डाँक्टरांची डिग्री कोणती हे ते गेल्यानंतरही कुणाला कळले नाही..नव्हे कुणालाही या डिग्रीचे घेणेदेणे नव्हते...या भागासाठी डाँ.क्षिरसागर हे डाँक्टर नसुन देवच होते..

    डाँक्टर जेव्हा आले तेव्हा त्यांची फी होती.रूपये पाच.यामध्ये इंजेक्शन व गोळ्या धरून पाच रूपये फी..त्यामध्ये काही पेशंटकडे पाच रूपये सुद्धा नसत..अशा पेशंट कडुन जे काही रुपाया दोन रूपये असत तेवढेच पैसे घेत.व उरलेले पुढच्या वेळेला द्या.असे पेशंटला सांगत.परंतू डाँक्टरांनी उधारीचा कधीही लेखी हिशोब ठेवला नाही.

    डाँक्टर एकाच ठिकाणी म्हणजे दवाखान्यात रोज नसत..तर स्वतः औषधांची बँग खांद्यावर टाकुन भोरगीरी,भिवेगाव,वरचे भोमाळे.खालचे भोमाळे,पाभे,मंदोशी,शिरगाव,कारकुडी अशा गावांतील पेशंटला तपासण्यासाठी पायी- पायी जात असत.व गोळ्या व औषधे देऊन आपली सेवा पुरवत असत..

    डाँक्टर एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या किंवा नोकरी करत असलेल्या माणसाविषयी अभिमानाने हा तो अमुक तमुक ना तो माझा पेशंट आहे बरंका? असे म्हणायचे..आणि ते खरेही असायचे.

    डाँक्टरांचा डावा हात पोलीओ मुळे अपंग होता.त्यामुळे डाँक्टरांना लोक खुळा डाँक्टर असे म्हणत..आणि त्याचे डाँक्टरांनाही काहीच वाटत नसे.

    पुर्वी मे महिन्याच्या शेवटी व जुनच्या सुरूवातीला लोकांना दिवसाआड थंडी व ताप यायचा...थंडी ही साधारण दुपार नंतर येत असे..एकदा थंडी आली की कितीही ताटम माणुस असला की त्याचा विळा व्हायचा..एकावर एक अशा सात आठ गोधड्या अंंगावर घालुनही तो किंवा ती मोठमोठ्याने हुss हुss हुss असा आवाज काढायचे.थंडी साधारण अर्धा तास टिकायची त्यानंतर प्रचंड ताप यायचा ताप गेल्यावर अंगातुन घामाचा पुर वाहायचा..घराघरात सर्रास असे पेशंट असायचे.त्यामध्ये मी ही एक होतो.अशा वेळी देवासारखे धाऊन यायचे ते म्हणजे डाँक्टर क्षिरसागर (खुळे डांक्टर) कुणाच्या तरी घरात घोंगडीवर डाँक्टर आपली गोळ्या, औषधांची बँग व स्टेथोस्कोप घेऊन बसलेले असायचे..आणि त्यांच्या पुढे दहा वीस पेशंट बसलेले असायचे.ना रांग ना गोंधळ...डाँ.प्रत्येक पेशंटला इंजेक्शन व गोळ्या देत..जास्त ताप असलेल्या पेशंटला इंजेक्शन देत नसत.गोळ्या देत व ताप उतरल्यावर त्यांच्या दवाखान्यात पाठवुन द्या असे सांगत.डाँक्टरांनी कधीही कोणाला औषध व गोळ्या लिहून दिल्या नाहीत,स्वतः कडचीच औषधे देत..शिवाय फी पण माफक सुरूवातीला पाच रुपये जशीजशी महागाई वाढत गेली तशी फीही वाढली.पाच नंतर सात नंतर दहा नंतर पंधरा त्यांनंतर वीस,पंचवीस व शेवटी तीस रूपये इतकीच वाढ,बस्स.

    एकदा आम्ही सार्वजनिक गणपती बसवला होता.डाँक्टर आमच्या गावातील पेशंट तपासुन त्यांच्या घरी टोकावड्याला चालले होते..आमच्या घराशेजारूनच पायवाट होती.आम्ही कार्यकर्ते आमच्या आंगणात बसलो होतो.आणि अचानक डाँक्टर दिसले..एकजण म्हणाला डाँक्टरांकडे देणगी मागायची का? परंतू एकहीजण काहीच बोलेना.मग .मीच बोललो डाँक्टर गणपती बसवलाय काहीतरी देणगी द्या.तात्काळ डाँक्टरांनी खिशात हात घातला व दहा पाच रूपये व काही चिल्लर मोजून एकावन्न रूपये हातावर टेकवले...आणि निघून गेले..आम्ही आवाक्क..! कारण गणपतीच ५०/-रूपयांचा होता.अनेक गावांच्या यात्रांना ते देणगी देत असत.

    एकदा मी आजारी होतो.पायी पायी सहकारी मित्रासह डाँक्टरांकडे गेलो.पैसे फक्त पाचच रूपये..तपासुन झाले गोळ्या औषधे दिली..तेवढ्यात एस.टी भोरगीरीला जाताना दिसली.वेळ साधारण ११.०० ची.रणरणते उन मी आजारी,.डाँक्टर म्हणाले आता जाताना एस,टी ने जा.परंतू आम्ही पायीच जातो असे आम्ही म्हणालो.डाँक्टरांच्या काय ते लक्षात आले पाच रूपये फी परत माझ्याकडे दिली व तुम्ही सर्वजण एसटीने शिरगाव पर्यंत जा असा सल्ला दिला.

    असे हे डाँक्टर .

    त्यावेळेस प्रामुख्याने सर्दी ताप,थंडीताप,जुलाब उलट्या,पोटदुखी,डोकेदुखी,किंवा खरूज,नायटा,इसाब,गजकर्ण,केसतुटी,गालफुगी इत्यादी त्वचारोग तर उवा,लिखा,कपड्यमधील पांढऱ्या उवा इत्यादी आजार होत असत.डाँक्टरांचा हातगुण असा की इंजेक्शन कधी मारले हेच मुळी कळायचे नाही.काही पेशंट तर इंजेक्शन मध्ये अजुन दवा भरा अशीही सुचना करत.परंतू डाँक्टर आपल्या मताशी ठाम असत.डाँक्टरांना बरेच बाया पुरूष अरे तुरे मधे बोलत.परंतू डाँक्टरांनी या बाबत कधीही तक्रार केली नाही.

    एखादा पेशंट जरा जास्तच सिरियस असेल तर डाँक्टर किरकोळ दवा औषधे देऊन शहरातील मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत.परंतू अमुकच दवाखान्यात पेशंटला न्या व माझे नाव सांगा.तुमची फी डाँक्टर कमी करतील अशी कधीही चिठ्ठी किंवा सल्ला दिला नाही.व त्या डाँक्टरांकडून कमिशन उकळले नाही.

    खेडेगावात राहून मुलांचे शिक्षण होणार नाही हे जाणुन ते देहूरोडला स्थायीक झाले..तरीही ते तेथून टोकावड्याला येऊन तीन चार दिवस एकटे राहुन समाजाची सेवा करत..

    गेल्याच वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.ही बातमी कळताच त्यांचा १९८५ पासुन सन २०१९ पर्यंतचा जीवनपट डोळ्यापुढुन सर्रकन पुढे गेला आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

    लेखक - श्री.रामदास तळपे.मंदोशी ता.खेडं,जि.पुणे.

      April 19, 2024


  • तीन पिढ्या

    पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. पहिल्या पिढीला दुसर्या पिढीकडून अपेक्षा होत्या आणि दुसर्या पिढीला तिसर्या पिढीकडून अपेक्षा आहेत. पण पहिल्या पिढीला तिसर्या पिढीकडून काहीच अपेक्षा नसतात त्यामुळे पहिली पिढी तिसर्या पिढीला घडविण्याच्या दुसर्या पिढीच्या कार्यात मदत कमी आणि अडचणीच अधिक निर्माण करते. या सगळ्यात दुसर्या पिढीचीच गळ्चेपी होते.

      December 30, 2013