शब्द हे तुम्हाला अज्ञात प्रदेशात नेणारे पूल बांधत असतात ” असे हिटलर त्याच्या भाषणांत नेहमी म्हणत असे. माझा एक वर्गमित्र ( ज्यांना वर्गमैत्रिणी नसतात त्यांना नाइलाजाने वर्गमित्र असतात. ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर मेहुण्या नसतात त्यांना श्रावण न पाळणारे दोन भरभक्कम मेहुणे असतात त्याचप्रमाणे.)
November 26, 2024
आयुष्याच्या प्रवासात बर्याच घटना घडत असतात.कधी त्या आनंददायक असतात,कधी क्लेशदायक कधी मजेशीर,कधी खट्याळ,कधी खट्टया-मिठ्या तर कधी… विलक्षण…आणि अविश्वणीय…असाच एक अनुभव आपल्याशी शेअर करतोय…
October 23, 2023
आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता.
December 14, 2022
उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता.
April 3, 2023
मी नोकरीनिमित्त अमरावतीला असतो. सुट्टी मिळाली की मन आपोआप गावाकडे ओढ घेतं. गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला विसावा देणारी जागा असते. असाच एक दिवस सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी मी ट्रेन पकडली. स्टेशनवर पोहोचलो तर नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. ट्रेन आली आणि डब्यात चढण्यासाठी अक्षरशः धावपळ सुरू झाली. कसाबसा गर्दीतून वाट काढत मी ट्रेनमध्ये घुसलो. आत शिरलो खरा; पण आता पुढचा प्रश्न होता बसायला जागा कुठे मिळणार?
September 18, 2026
कुठेतरी दूर रणरणत्या उन्हाची दुपार असते, ओठ शुष्क करणारे वारे वाहताहेत, मनाला भेदणारा एकाकीपणा आहे… कुठुनतरी सुर कानावर येताहेत… ‘मेरा जीवन कोरा कागज, कोरा ही रह गया…’ किशोरदाचा स्वर हृदयाला भिडणारा. मनातलं कागदावर आणणारे हे जादुई शब्द, पुन्हा मनात घर करून राहतात… राहिले आहेत. अनेक वर्षांपासुन…
आदीम अवस्थेत असणाऱ्या माणसाला लिहिण्याची समज आली तशी तो पानांवर लिहू लागला. भिंतीवर लिहू लागला. आधुनिक माणुस कागदावर लिहू लागला. आजचा माणुस स्क्रिनवर लिहू लागलाय. हे बदल होत गेले आहेत, होत राहणार आहेत. कागदावर जे उमटलं त्याने कागद शहाणा झाला. पांढरा कागद काळा झाला. कागदावर काय नसतं. कागदावर सारंच काही सामावलेलं असतं, नाही का? कागदावर शब्द जन्म घेतात, अन कागदावरच विश्वाची निर्मिती होते. कागदावर नाव लावलं म्हणजे जमिनीचा तुकडा आपला होतो. कागदावर नकाशे उतरतात, योजना तयार होतात, कागदार मेमो येतो, कागदावर ऑर्डर येते, कागदावर बदलीही येते, कागदावर वॉरंट येते, पूर्वी कागदावर तारही यायची अन अनेकांना धडकी भरायची. आता कागदावर दाखला येतो, डिग्री येते, राहिलंच तर सर्टिफिकेटही येते. पूर्वी पत्र यायची घरोघरी, त्यात गोष्टी असायच्या सुख-दु:खाच्या, विचारपुस असायची आपुलकीने आणखी काही काही असायचे. प्रेम पत्रही असायचं कागदावरच... राजकुमारनं पत्र लिहिलेलं, पण मनात भिती.. तरी तो भीत भीत म्हणतोच… ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर, के तुम नाराज ना होना’ प्रेमाची ही तरल भावना उमटली ती देखील कागदावरच. इथे कागद बनला दोन मनांना जोडणारा दुवा.
जसे शब्द अवतरत जातात तसा रंग कागदाला चढत जातो. त्याचा रुबाब बदलत जातो. कागदावर लिहिले असेल ना जिवंतपणाचे दोन शब्द तर तो हयातीचा दाखला बनतो, शब्द जर प्रेमाचे असतील तर कागद गुलाबी होतो, शब्द जर विनंतीचे असतील तर कागद लाचार होतो, शब्द जर आदेश देणारे असतील तर कागद साहेब होतो, शब्द जर प्रमाणीकरणाचे असतील तर कागद डिग्री होतो आणि कागदावर जर ‘मै धारक को… अदा करने का वचन देता हू’ असेल तर तो सत्ताधीश होतो, त्याला वजन प्राप्त होतं. हे वजन इतकं भारी असतं की भल्या भल्यांना ते भारी पडू शकतं. एक आगळं सामर्थ्य या कागदात अवतरतं.
कागदावर काय नाही अवतरतं याचा विचारही आपण करू शकत नाही. कागदावर भाषण अवतरतं, आश्वासन अवतरत. निवडणूकीची घोषणा अवतरते. इतक्या साऱ्या रंगात न्हाऊनही कागदाचा स्वत:चा रंग मात्र कोराच राहतो. तो रंगतो आपल्या शब्दांत, आश्वासनात त्याचे अंतरंग मात्र कोरेच राहते…. कोरा कागज सारखे… कदाचीत तोही म्हणत असेल का मनातल्या मनात… ‘मेरा जीवन कोरा कागज… कोरा ही रह गया…..!’
दिनेश दीक्षित जळगाव (९४०४९५५२४५)
May 9, 2019
डिसेंबर महिन्यात शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जसे जमेल तसे हा दिवस साजरा केला जातो. खर तर जमेल तसे नाही तर जमवूनच आणतात. कुणी सिनेमा. कुणी नाटक. कुणी सहलीला. कुणी कुठे कुणी कुठे रमतात. तर काही ठिकाणी सोसायटीचे सगळेच घरातील एकत्र येऊन नाच गाणी खेळ गप्पा आणि नंतर जेवण किंवा अल्पोपाहार.
May 15, 2023
‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे.
March 3, 2025
जुलै १९१० लंडनहून मोरिया नावाचे जहाज भारताकडे रवाना झाले त्यात भारताचे क्रांतीवीर कैदेत होते त्यांच्या भोवती कडेकोट पहारा होता. लंडन आणि मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या भोवती जहाजावर डोळयात तेल घालुन पहारा देत होते. त्यांच्या डोळयात धूळ फेकुन समुद्रामध्ये उडी मारून पोहत कुठल्यातरी विदेशी समुद्र किना-यावर पोहचण्याची योजना त्या क्रांतीवीराच्या मनामध्ये येत होती.
May 29, 2023
असं काय माहित ऐन टाईमला मला टाय बांधता येणार नाही अन् तसं माहित असतं तर तो मी बस्त्यात घेतलाच नसता. मी सुटा बुटातले कपडे नेसून बराच वेळ झाला तयार होतो पण ती गळ्यातली लांब दोरी कधी आयुष्यात बांधण्याचा प्रसंग आलाच नव्हता म्हणून बराच सावळा गोंधळ उडाला!
January 21, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti