झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही,
विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी ...१
विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला
ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२
चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा,
शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३
एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती
एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती...४
चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं
मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटीं...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
December 13, 2016
November 12, 2021
February 25, 2014
पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने
पित्याचे लक्ष वेधण्या, हनवटी खेची हातानें....१,
प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे
अजाणपणा दाखवोनी, दुर्लक्ष करी मुलाकडे...२,
शब्दांची गुंफन करूनी, कवितेचा संग्रह केला
तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,
जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते
अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,
पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले
रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 16, 2016
नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,
अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,
वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 5, 2017
कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे,
दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।।
धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा,
कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।।
नाही कुणा ध्येय निश्चित असे एक,
परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।।
जीवन कशासाठीं कळले नाही कुणां
जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।।
तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले
मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९७- १७०१८४
September 25, 2018
मी निराश झालो आहे ।।
खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून
पराभवाच्या अपमानातून
शल्य मनातले मनातच ठेवून
त्यातून वाट शोधत आहे ॥
मी निराश झालो आहे ॥ १ ॥
आत्मविश्वास तो गडबडे
ताबा अन् मनावरचा उडे
येथेच अडकून घोडे पडे
दुःख चावरे त्याचे मला आहे ॥
मी निराश झालो आहे ॥ २ ॥
प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या
धुक्याचे पटल मध्येच नि हे वारे झोंबरे
मन माझे थरथरणारे
ही काजळी पुसू पाहे ॥
मी निराश झालो आहे ॥ ३ ॥
-- यतीन सामंत
October 16, 2022
मातृभू तुझ्या करता,
सर्वस्वाचे देतो दान,
रक्षणासाठी केवळ तुझ्या,
सज्ज माझे पंचप्राण,---!!!
कितीतरी बघ आजवर,
झाले तुझसाठी अर्पित,
बिमोड करून शत्रूचा,
निनाद तुझा गर्जत,---!!!
भारत माते तुझी माती,
आम्हा प्रिय प्राणाहून,---
"पाईक" आहोत तुझे आम्ही,
त्रिवार वंदन तुजसी करुन---!!!
वाचवू आम्ही तुला,
करुन जिवाची कुरवंडी,
तीच खरी तुझी सेवा,
बांधल्या आम्ही खुणगाठी,---!!!
हिम्मत जर कोणी,
करेल माईचा लाल,
वचने तुला आमुची,
दाखवू त्याला माती,---!!!
ध्येय श्रेयस प्रेयस सगळे,
कडेकोट तुझीच निगराणी
निर्भय निडर निर्धास्त असावे,
हीच तुला एक विनवणी,---!!!
किती आले किती गेले,
तुझा घास बळकावण्यां,
परास्त होऊन परत फिरले,
मायदेशी तोंड लपवण्या,---!!
आपली धर्मसंस्कृती कधीही,
आम्ही सोडली नाही,
तुझेच संस्कार मनी,
काढावा किंतु सर्वांनी,---!!!
चांगल्याची चांगले आम्ही,
वाईटांशी बनू कर्दनकाळ,
जगानेही ध्यानी ठेवावे,
देशसेवक इथले हर बाळ,--!!!
माता वाट्याला कुणाच्या,
कधीच गेली नाही,
जो येईल तिच्या मार्गी,
त्याची कधीच खैर नाही,---!!!
हिमगौरी कर्वे.©
February 4, 2019
विसरलास तू मानव पुत्रा,
नीतिमूल्ये सगळी,
काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली....।। धृ ।।
स्वप्नामध्ये दिले वचन,
पाळीले ते राज्य घालवून,
हरिश्चद्रांची कथा आजही
करीते मान ताठ आपुली....१,
विसरला तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
राजा साठी देई प्राण,
दुजासाठी होते जीवन,
‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी
शिवरायाची शान राखली....२,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
काळ असो तो पुरातन,
वा आधुनिक शिवकालीन,
पूर्वज सारे महान असता,
आज पुण्याई अशी का आटली?....३,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
विश्वासाचे नाते गेले,
स्वार्थीपणाचे बीज अंकुरले,
लुटतो मानव एकमेका,
हीच चित्रे आज उमटली.....४,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी
November 13, 2019
अस्तित्वाचा क्षणभंगुर भरोसा
October 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti