धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
तेच जगती जगी या शक्ती ज्यांचे पाठी ।।१।।
बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे ।।२।।
नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे ।।३।।
जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी ।।४।।
प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची ।।५।।
मृत्यूच्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता ।।६।।
जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
निसर्गाचे चाले अविरत हेच खेळणे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 20, 2015
December 13, 2021
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 20, 2015
माझा जन्म.....
माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
या पृथ्वीवर ….
जन्म घेण्याशिवाय मला
दुसरा पर्यायच नव्हता....
मी… कोण? …
हे मला आता समजतं .....
बाबांच्या अेका शुक्राणूत होतं
त्यांच्या...आअीबाबांच्या ….
अनेक पूर्वजांचं आनुवंशिक तत्व...
आअीच्या बीजांडातही होतं
तिच्या.... आअीबाबांच्या
अनेक पूर्वजांचं आनुवंशिक तत्व...
तो जिंकलेला शुक्राणू...
ते मासिक पक्व बीजांड....
संयोग पावले ..आणि
माझा गर्भपिंड अस्तित्वात आला
याच गर्भपिंडानं केवळ
सदतीस आठवड्यात
अेक शरीर घडविलं.. धारण केलं
आणि नाळेविणा जगण्यासाठी
गर्भाशयाबाहेर पाठविलं.
तोच …मी ..
-- गजानन वामनाचार्य, मुंबअी
September 17, 2016
May 25, 2021
बघते नुसती हसते नुसती
फसवत फसवत फसते नुसती !
लाडिक चालणं लाडिक बोलणं
खुळ ही लावत असते नुसती !
बंदच डोळे उघडे डोळे
डोळ्यापूढे दिसते नुसती !
सुचवत काही सांगत काही
काव्यातहि असते नुसती !
असते छानच नसतानाही
विचारातच असते नुसती !
-- श्रीकांत पेटकर
February 24, 2019
करुनी दयेची बरसात
पावन करीतो दुष्टाला
तुझ्या मनाचा ठाव
उमजला नाहीं कुणाला
वाल्या होता खूनी
पापांनी भरले रांजण
परि तुझ्या दयेद्वारे
गेला तो उद्धरुन
कालीदास होता ऐष आरामी
राहात होता वेश्येघरीं
महाकवी बनवूनी त्याला
किमया तूंच करी
बहकला होता पुंडलीक
पत्नीच्या विपरीत नादानें
उभे केले तुला विटेवरी
आईबाप सेवा शक्तिनें
क्षमा करुनी पाप्यांना
पावन तूं करितो
कळले नाहीं आम्हांला
काय कसोटी लावतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 6, 2018
इथे केवळ मीच शहाणा
मलाच सारेकाही कळते
दंभ नसावा अहंपणाचा
गर्वाचे घर खाली असते.....
कोण आकाशांतुन पडतो
जन्म एक प्रसवणे असते
एकची न्याय दयाघनाचा
जन्मुनी अंती जाणे असते.....
दिल्याघेतल्याचे नाते इथले
पूर्वकर्मी ऋणमोचन असते
सत्कर्मी अनुसंधान साधावे
तीच एक मोक्षमुक्ती असते.....
वि.ग.सातपुते.( भावकवी )
(9766544908)
रचना क्र.२७३
२७/१०/ २०२२
November 2, 2022
विज्ञानाने शोधली, अणुतील प्रचंड शक्ति
प्रथमच जगाला कळली, अणूंतील उर्जा शक्ती
सुक्ष्म असूनी अणु आकार, सुप्त शक्ति अंगीं
प्रचंड उर्जा करी साकार, फोडतां अणु मध्यभागीं
विचार मनीं येई , कोठून शक्ति ही आली
निर्जीवातील अणूरेणूला, कशी उर्जा लाभली
समजोनी घ्या एक, निसर्गाची श्रेष्ठता
लहान असून देखील, प्रचंड त्याची योग्यता
जीव देहाचे पिंड, जीवंततेतील सुक्ष्मता
बाळगी ते ब्रह्मांड, हीच त्याची महानता
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
२१- १११२८३
विवीध-अंगी *** ३७
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती /
करमूले तु गोविंदम् प्रभाते करदर्शनम् //
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
July 5, 2013
गर्दी गर्दी गर्दी,
सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी.
गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली
वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 18, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti