(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आता काहीच नकोसे वाटते

    आज सारे समजुनी चुकले
    आता काहीच नकोसे वाटते
    सुखदुःख ओसंडुनी वाहिले
    आता काहीच नकोसे वाटते

    जगणे सहजी जगुनी जाहले
    भोग भोगणेही संपले वाटते
    अर्थ, जगण्याचाही कळला
    आता मात्र थांबावेसे वाटते

    आकाशाला घातली गवसणी
    मनीचे सारे सारे घडले वाटते
    ऋणानुबंध ओळखुनी चुकलो
    आज कुठे गुंतू नये असे वाटते

    क्षणाक्षणाचाही झाला निचरा
    आज काळ किती उरला वाटते
    आता कशाला हव्यास करावा
    तसे सारे जगणे मृगजळ वाटते

    निरवतेत, स्वांतसुखाय जगावे
    तोच एक परमानंद असे वाटते
    जन्म, एक भ्रमंती गतजन्मांची
    दयाघनाने मुक्त करावेसे वाटते

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १४५.

    २ - ६ - २०२२.

      June 14, 2022


  • चांदण्यातील आठवणी

    हवाच मजला तोच चंद्रमा

    तेच नभी चांदणें

    गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें ।।धृ।।

    आजीसंगे गच्चीवरती

    फुलराण्यांच्या कथा ऐकती

    बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें ।।१।।

    गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

    फुलले होते यौवन सारे

    अंगी झोंबे शितल वारे

    पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे ।।२।।

    गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

    सगे सोयरे मित्रमंडळी

    परसदारी तुळशीजवळी

    गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने ।।३।।

    गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 25, 2016


  • हळहळ

    सांग नां ! आतातरी
    नाते तुझे नी माझे....
    क्षण मी विसरु कसे
    प्रेमात हरविले माझे....

    आज मी इथे, तू इथे
    तुज शोधिते मन माझे....
    भास तुझाच अंबरात
    त्यात गुंतले श्वास माझे....

    क्षिणली, सारीच गात्रे
    व्याकुळले हृदय माझे....
    आज अधीर लोचनी तूं
    हळहळते अंतरंग माझे....

    –वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २१८

    २८/८/२०२२

      September 26, 2022


  • भारत माँ की कसम

    अब भी जोश मेरे सीनेमे है बाकी
    भले दुष्मनने गोलीया चलाई है
    दुष्मनने पीठपे गोली चलाई है
    मेरा सीना तो अबभी खाली है ।
    दुष्मनकी गोलीमे वो ताकत कहाँ
    जो मेरे सीनेके पार हो जाये
    ये तो बस अपनोेकी बेवफाई है
    जो सिनेपे नही पिठपे वार करते है ।
    ना निराश हूँ ना ऊम्मीद खोई है
    पीठपर वार करनेवालो संभालो
    आपको खत्म करनेकी कसम अब
    भारत माँ के हर सपूतोने खाई है ।
    फिरसे खिलेगा मौसम यहाँका
    और फिरसे गुंज ऊठेगी गलीयाँ
    फिरसे जगमगायेगा हिमाचल
    और खिलेंगी काश्मीरकी कलियाँ ।

    सुरेश काळे
    मो. 9860307752
    सातारा
    २८ सप्टेंबर २०१८

      October 5, 2018


  • झाड आजोबा

    आजोबांच्या आजोबांनी
    लावलं होतं झाड
    असं काही वाढलं म्हणता
    अगदी ताडमाड

      August 20, 2026


  • पुण्ण्याचा साठा

    खिशांत माझ्या पडली होती,
    सुटी नाणी काही,
    वस्तूंची ती खरेदी करण्या,
    सर्व बाजार पाही ।।१।।

    सराफ्याच्या दुकानी दिसला,
    एक हिऱ्याचा हार,
    डोळे माझे चमकूनी गेले,
    फिरती गरगर ।।२।।

    दाम विक्रीचे जाणूनी घेता,
    हताश मी झालो,
    हातातील धनाचे मोजमाप,
    करू मी न शकलो ।।३।।

    दोन वेळची पूजा करूनी,
    जप माळ जपती,
    खूप साचले पुण्य आपले,
    हे कांहीं समजती ।।४।।

    कसा मिळेल ईश्वर त्यांना,
    तपोबलाच्या अभावी,
    जन्मोजन्मीचे पुण्य साचता,
    दर्शन मिळे प्रभावी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      August 16, 2017


  • देह ईश्वरी रूप

    स्नान करूनी निर्मळ मनीं, दर्पणापुढे येऊन बसला ।

    जटा साऱ्या एकत्र बांधूनी, भस्म लाविले सर्वांगाला ।।

    ओंकाराचा शब्द कोरला, चंदन लावूनी भाळावरती ।

    रूद्राक्षाच्या माळा बांधल्या, गळा हात नि शिरावरती ।।

    वेळेचे भान विसरूनी, तन्मय झाला रूप रंगविण्या ।

    प्रभू नाम घेत मुखानें, नयन आतूर छबी टिपण्यां ।।

    पवित्र आणि मंगलमय, वाटत होते स्वरूप बघूनी ।

    सजविला होता देह त्यानें, प्रभूचेच एक रूप समजूनी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      May 19, 2020


  • अंगठी बोटातली फेकून गेला

    *गझल*

    *वृत्त :- व्योमगंगा*

    *लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा

    अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला
    साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेला

    आवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी;
    स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला

    " प्रेम माझे फार आहे ", भेटला तेव्हा म्हणाला
    मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेला

    दु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही
    स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी पाहून गेला

    हौस त्याची भागलेली ,पाहता आले न कोणा
    लग्न त्याचे मोडले ही, बातमी देवून गेला

    श्राप माझा लागला त्याला म्हणे कोणी तरी ते
    भेटला लग्नात माझ्या, तो क्षमा मागून गेला

    © जयवंत वानखडे,कोरपना

      August 13, 2018


  • आनंद’ भावना

    ध्येय असावे तुमचे नेहमीं

    आनंद मिळवण्याकडे

    'आनंद ' हाचि ईश्वर असतो

    समजून घ्याहो हे कोडे ।।१।।

    शरीर देई 'सुख ' तुम्हांला

    क्षणिक ते तर असती

    सुखाच्या पाठीशी छाया असते

    'दुःख ' तयाला संबोधती ।।२।।

    सुखाबरोबर नाते असते

    सदैव अशाच दुःखाचे

    वेगळे त्यांना कुणी न करती

    जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।।

    'आनंद ' भावना असे एकटी

    नसे तेथे दुजी भावना

    'मोक्ष' तयाला म्हणती कुणी

    आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां ।।४।।

    व्यर्थ जातील प्रयत्न तुमचे

    'आनंद' शोधता बाहेरी

    विसरुन जाता जर देहाला

    मिळेल तुम्हां ते अंतरी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 18, 2020


  • अनुभवाचे श्लोक

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

      June 19, 2012