(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आमचा कट्टा

  • मॉर्निंग वॉक

    उठा उठा, एक जानेवारी जवळ आली, नवीन resolution करण्याची वेळ झाली! म्हणजे मी तरी निदान एक तारखेला नवीन resolution करते. शास्त्र असतय ते! आणि ते दोन तारखेला मोडते. पण नवीन resolution करण्यात पण एक गंमत असते. आता त्यातही एवढे जास्त प्रकार आहेत की “मोडायचच आहे तर चला, जरा कठीण resolution करू “

  • लाघवी गौड सारंग

    एकाच कुटुंबातील असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा "घ्यायचा" म्हणजेच त्या स्वराची "जागा" कशी मांडायची, त्यामुळे तेच स्वर आणि तो राग भिन्न होत जातो आणि रागांमधील व्यामिश्रता अधिक खोलवर डोकावते. "गौडसारंग" रागाच्या बाबतीत हे साम्य बघताना, इतर अनेक रागांच्या आठवणी मनात येतात.
    "कोवळ्या अंधारी दर्याच्या किनारी
    बसते तशीच, एकटी एकटी.
    एकटी कशी - तुझ्या विचारांत;
    तुझ्या विचारात रंगता रंगता
    येते मनाला अशी काहीशी ओढाळ मस्ती".
    कवियत्री इंदिरा संतांच्या या ओळी, गौड सारंग रागाच्या काही छटा दर्शवतात. तसे बघितले तर शब्द आणि सूर, हे नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येतात परंतु कधीही एकजीव होत नाहीत तरीही काहीवेळा "अंतरीचा" भाव दाखवण्यासाठी दोन्ही माध्यमांची गरज भासते खरी.
    खरतर हेच साम्य, रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. एखादा राग सादर करणे म्हणजे केवळ सुरांची बेरीज-वजाबाकी असा गणिती कारभार नसून, त्या स्वराचा (जे स्वर सामायिक असतात ) नेमका "स्वभाव" जाणून घेऊन, त्याचे सादरीकरण गरजेचे असते. स्वराला "पैलू" असतात, ही इथे लक्षात येते.
    या रागात दोन्ही मध्यम लागतात (तीव्र आणि शुध्द) आणि बाकीचे स्वर शुध्द आहेत. अर्थात,हा राग ऐकताना, "बिहाग","छायानट" या रागांच्या आठवणी मनात तरळतात पण तरीही हा राग, आपले "वेगळेपण" सिद्ध करीत असतो. "सा" "रे" "ग" "म" या स्वरांच्या साहचर्याने स्वत:ची ओळख निर्माण करता येते.
    भारतीय संगीतात, बांसुरी वाद्याचा नेमका उगम कधी झाला, याबाबत संदेह बराच आहे. परंपरागत संकेतानुसार, कृष्णाकडे या वाद्याचा मान जातो. आधुनिक भारतीय संगीतात, या वाद्याची प्रतिष्ठापना खऱ्याअर्थी कुणी केली असेल तर, ती पंडित पन्नालाल घोष यांनी. वाद्याचा स्वभाव ओळखून, त्यात सुरांचा असामान्य मुलायमपणा पंडितजींनी ज्या प्रकारे ओळखला आणि त्याचे सादरीकरण केले, त्याला आजही तोड नाही. राग सादर करताना, त्याचे शुद्धत्व राखून, लयकारी आणि ताना इतक्या सुंदरपणे सादर केली आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध व्हावा.
    अत्यंत ठाय लयीत सुरवात करायची, हळूहळू स्वरांचा "भरणा" करीत, रागाची बढत करायची, असा त्यांच्या वादनाचा सर्वसाधारण असा ढाचा ओळखता येतो. याचा दृश्य परिणाम असा होतो, रसिकाला प्रत्येक स्वराचा आनंद घेता येतो. वास्तविक, या वाद्याचा थोडा विचार केला तर हे वाद्य सतारीप्रमाणे "पूर्णत्व" मिळणारे वाद्य नाही पण तरीही पन्नालाल घोष यांनी, या वाद्यावर प्रभुत्व मिळवताना, वाद्याचा नेमका गुणधर्म ओळखून, ठाय आणि मध्य लयीत वादनाची गत राखली.
    या रागाचे वादन ऐकताना, आपल्याला याच गुणांचा आढळ येतो. अतिशय ठाय लयीत वादन करताना, प्रत्येक स्वर नेमका लावणे, स्वरांची बढत करीत असताना, कपड्यावर कशिदाकाम करावे त्याप्रमाणे स्वरांची रेखीव आकृती निर्माण करायची आणि लयकारी सादर करायची, याकडे वादनाचा कल दिसतो आणि तो कल, वाद्याचा गुणधर्म ओळखून सौंदर्यनिर्मिती करतो. वाजवताना, शक्यतो दीर्घ ताना न घेता, छोट्या स्वरावलींतून लय प्रगट करायचा आग्रह दिसतो. त्यामुळे, ऐकताना देखील रागाचे सौंदर्य सहजपणे न्याहाळता येतो. रचना द्रुत लयीत वाजवताना देखील, शक्यतो सुरांचा अवकाश हा अधिकाधिक मंद्र सप्तकात राखायचा, हा विचार स्पष्ट दिसतो.
    लताबाईंनी, त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत असंख्य भजने गायली आहेत तरीही या रचनेची अवीट गोडी काही निराळीच आहे. विशेषत: हिंदी चित्रपट संगीतात तर या रचनेचे स्थान अतुलनीय असे आहे. अत्यंत सशक्त शब्दकळा, त्यालाच जोडून निर्माण केलेली अप्रतिम संगीत रचना आणि त्याचे अतिशय परिणामकारक सादरीकरण, ही या रचनेची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. खरतर, या रचनेत, फक्त "गौड सारंग" राग नसून, काही ठिकाणी "भूप" रागाची संगती लागते तरीही गौड सारंग रागाची दाट छाया, या गाण्यावर निश्चित आहे. आणखी विशेष सांगायचा म्हणजे, गाण्याचे बांधणी "दीपचंदी" या काहीशा अनवट तालात बांधली आहे. या तालावर आधारित फारशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. एकतर हा ताल लयीला फार अवघड आहे. चौदा मात्रांचा ताल असून, "टाळी" च्या मात्रा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने, वाजवताना,फार कौशल्य लागते.
    "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम;
    सबको सन्मति दे भगवान".
    या गाण्यात, सुरवातीपासून जरा बारकाईने ऐकले तर तालाच्या मात्रांचा हिशेब मिळतो. संगीतकार जयदेव यांची या गाण्यात बांधलेली लय तर केवळ अपूर्व आहे. गाणे फार वर-खाली चालत आहे म्हणजे मध्येच वरच्या सुरांत जाते तर क्षणात खालच्या सुरांत जाते. चाल अतिशय श्रवणीय आहे तसेच कविता म्हणून देखील, हे गाणे असामान्य आहे. साहीरचे शब्द प्रत्ययकारी आहेत आणि त्या शब्दांचा आशय, चालीतून नेमका दृग्गोचर होईल, याची काळजी घेऊन, गाणे बांधले आहे. लताबाईंनी गाताना देखील, याच वैशिष्ट्याचा विकास होईल, या भूमिकेतून गायले आहे.
    उर्दू साहित्यात, गझल साहित्याचे स्थान फार वरच्या स्तरावर आहे. बरेचवेळा, "गझल" हे कवितेचे वृत्त आहे, असे न मानता, "गझल" हा गायकीचा एक प्रकार आहे, असे मानले जाते. एका दृष्टीने हा विचार योग्य आहे पण, तरीही, गझल, ही एक कविता आहे, हे मान्यच करावे लागेल. अर्थात, गझल आणि गझल गायकी, हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. ज्या हिशेबात ठुमरी गायनाचे मोजमाप केले जाते त्याच प्रमाणे गझल गायनाचे देखील मापदंड आहेत आणि त्यात जगजीत सिंग यांचे नाव अग्रभागी आहे. अत्यंत मुलायम आवाज, शक्यतो गायन करताना, शब्दांना कुठेही "जखम" करायची नाही, हा विचार ठामपणे दिसतो!! कालांतराने त्यांची गायकी थोडीशी "एकांतिक" झाली तरी देखील, गझल गायनात त्यांनी आपले नाव प्रस्थापित केले, यात शंकाच नाही. "दैर ओ हरम मे बसने वालो" ही रचना,केरवा तालात गायली आहे.
    "दैर-ओ-हरम मे बसने वालो,
    मैखानो में फुट ना डालो".
    रचनेच्या सुरवातीलाच सरगमचा उपयोग केला आहे आणि पुढे देखील बऱ्याच ठिकाणी सरगम ऐकायला मिळते. ऐकताना रचना जरा द्रुत लयीत आहे, असे वाटते पण केवळ तालाच्या आघातामुळे, लय थोडी द्रुत वाटते. गायन ऐकताना, जगजीत सिंग यांच्या सगळ्या गायकीची वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. एखाद्या शब्दावर "खटका" घेताना देखील, त्या शब्दाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष दिलेले सहज समजून घेता येते. गौड सारंग रागाची ओळख करून घेण्यासाठी, ही रचना दर्शविता येईल.
    आता आपण, मराठीतील असेच एक "समृध्द" भावगीत ऐकुया. "काल पाहिले मी स्वप्न गडे" हेच ते गाणे. आशा भोसले यांनी आपल्या असामान्य गायकीने हे गाणे फारच अवीट गोडीचे करून ठेवले आहे. योगेश्वर अभ्यंकर, या काहीशा अप्रसिद्ध कवीने लिहिलेले हे गाणे, आपल्याला गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार श्रीनिवास खळे, यांनी ही चाल बांधली आहे. हा संगीतकार म्हणजे मराठी भावगीतातील अद्भुत रसायन होते. यांच्या बहुतेक चाली अतिशय संथ, तरीही गळ्याची परीक्षा घेणाऱ्या असतात. "गायकी" ढंगाकडे चाल बांधण्याची विशेष प्रवृत्ती दिसते. गमतीचा भाग असा असतो, गाणे ऐकताना, गाणे सुश्राव्य वाटत असते परंतु तेच गाणे गायला घेतले म्हणजे त्यातील "खाचखळगे" दिसायला लागतात आणि गाण्याची चाल भलतीच अवघड वाटायला लागते!!
    "काल पाहिले मी स्वप्न गडे,
    नयनी मोहरली ग आशा,
    बाळ चिमुकले खुदकन हसले,
    रंग सावळा तो कृष्ण गडे".
    सुरवातीच्या आलापीमध्येच आपल्याला गौड सारंग दिसतो. हा आलाप ऐकायला सहज, सोपा वाटतो पण गाताना घेतले तर आपल्याला समजेल की, आलापीत किती "अवघडले" पण आहे. तसेच प्रत्येक ओळ संपविताना, जे "खटके" घेतले आहेत त्याचबरोबर पहिला अंतरा सुरु करताना, एकदम वरच्या सुरांत रचनेला सुरवात करून, चालीतील "काठीण्य" दर्शवून द्यायचे, हा सगळाच भाग अतिशय विलोभनीय आहे.
    "छोटी छोटी बांते" या चित्रपटात "कुछ और जमाना कहेता है" हे गाणे गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार अनिल बिस्वास यांची स्वररचना असून, मीना कपूर यांनी गायले आहे. वास्तविक चाल अतिशय सहज गुणगुणता येईल अशी आहे पण तरीही स्वररचना नित ऐकली तर त्यात अनेक "कंगोरे" आढळतात.
    "कुछ और जमाना कहेता है,
    कुछ और है जिद मेरे दिल कि,
    मै बात जमाने कि मानू,
    या बात सूनू अपने दिल कि".
    गाण्याच्या चालीला बंगाली लोकसंगीताचा गंध आहे आणि त्यामुळे चाल खूपच श्रवणीय झाली आहे. अनिल बिस्वास यांची कुठलीही चाल ऐकायला घेतली म्हणजे त्यात काही ठराविक गुणांचा आढळ हमखास आढळतो. त्यात गाण्यातील "मेलडी" चा उल्लेख रास्त आहे. गाण्याची चाल कुठेही 'तुटक" वाटत नाही. एखादी सरळ, सलग रेषा ओढावी तशी स्वररचना चालत असते.
    हिंदी चित्रपटातील बहुदा पहिली "रागमाला" ही "हमदर्द" चित्रपटात, संगीतकार अनिल बिस्वास यांनी सादर केली. "रितू आये रितू जाये सखी री" या रचनेत, चार रागांचा समावेश आहे आणि त्यातील रचनेचा मुखडा हा "गौड सारंग" रागावर आधारित आहे.
    "रितू आये रितू जाये सखी री,
    मन के मित ना आये,
    जेठ महिना जिया घबराये,
    पल पल सुरज आग लगाये".
    अर्थात, रचना तयार करताना, आपण चित्रपटातील गाण्याची रचना तयार करीत आहोत, याचे नेमके भान दिसून येते. प्रत्येक रागातील नेमकी सौंदर्यस्थळे हुडकून, त्यातील भावनेचा भाग शोधून, त्या स्वरावलींचा गाण्याची चाल बांधताना, अतिशय समर्पक उपयोग केलेला आढळतो आणि जरी प्रत्येक कडवे वेगवेगळ्या रागात बांधले असले तरी समेवर येताना, कुठेही विसंगती निर्माण होणार नाही, याची वाजवी काळजी घेतली आहे. संगीतकार म्हणून अनिलदा यांचे हे नि:संशय प्रशंसनीय कार्य म्हणावेच लागेल आणि चित्रपटात रागमाला कशी सादर करायची याचा आदिनमुना सादर केला.
    - अनिल गोविलकर

  • तीर्थरूप दादा-आईना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! …….

    एकेकाळी भारताच्या टपाल खात्याचे अभिन्न अंग असलेल्या पोस्टकार्डचे स्थान भारतीय कुटुंबात अनन्य साधारण होते. जिव्हाळ्याचे होते. ……

  • संतसाहित्य समीक्षेतील धाडस

    प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी `संत एकनाथांचे अभंग, स्वरूप समीक्षा हा ग्रंथ लिहून मराठी संतसाहित्याच्या समीक्षेतील एक रिकामी जागा भरून काढण्याचे श्रेय अभ्यासाने प्राप्त केले आहे. रिकामी जागा भरली असे म्हणण्याचे कारण असे आहे, की अनेक अभ्यासकांनी नाथांच्या विविध साहित्यांवर साक्षेपी लिखाण केले आहे.

  • धर्मांतर

    प्रत्येक धर्म आणि धर्माची शिकवण पवित्र असते. धर्म हा व्यक्तिगत असतो. त्यामागे त्या व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास असतो. समधर्मीय व्यक्तींना एकत्रित आणण्याचा तो एक धागा असतो. धर्म मानणे, धर्माचे संस्कार मानणे, ती शिकवण व्यवहारात पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही एक खोलवर जपलेली श्रद्धा आहे.

  • स्पंदन भ्रमंती तर्फे २ दिवसीय अलिबाग सफर

    ट्रेक्स तसंच अॅडव्हेंचर टुर्स मध्ये अग्रेसर नाव असलेल्या “स्पंदन भ्रमंती” तर्फे दिनांक १९ व २० एप्रिल २०१४ या दिवशी अलिबाग व लगतच्या प्रसिध्द पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी खास टुर आयोजित केली आहे.

  • करावं तसं भरावं…….

  • वैभवशाली, शांत, निरव…दरबारी

    "इश्क मुझ को नहीं वहशत ही सही
    मेरी वहशत तेरी शोहरत ही सही
    हम भी दुश्मन तो नहीं हैं अपने
    गैर को तुझ से मोहब्बत ही सही"
    मिर्झा गालिब यांच्या एका सुप्रसिद्ध गझलेतील या ओळी म्हटले तर दरबारी रागाची तोंडओळख दाखवतात अन्यथा एका प्रेमी मनाची हैराणी अवस्था दर्शवतात. दरबारी राग हा असाच आहे, एकाच वेळी मानवी भावनांच्या अनंत छटा दर्शवून रसिकांना चकित टाकणारा. खरतर हे वैशिष्ट्य बहुतेक सगळ्या रागदारीबद्दल मांडता येईल.
    लखलखती झुंबरं, लालगर्द गालिचा, आजूबाजूला खाशा स्वाऱ्या, प्रशस्त दालनाच्या एका टोकाला; पण मध्यभागी रत्नजडीत सिंहासन. सर्वत्र गंभीर वातावरण. तरीही, अत्तराच्या फवाऱ्यानं सुगंधित झाल्याने वातावरणात काहीसा हलकेपणा. दालनाच्या बरोबर मध्यभागी खास बिछायत अंथरलेली आणि त्यावर वाद्यं मांडून ठेवलेली आणि सगळेजण राजगायक येण्याची आतुरतेने आहेत. अशा अत्यंत आलिशान दरबारात राजगायकाचे आगमन होते आणि त्याच्या सोबत, कोमल धैवत आणि कोमल निषाद स्वरांची चाहूल लागते.
    दरबारी राग ऐकताना, मनासमोर असंच वैभवशाली चित्र उभं राहतं. संगीतसम्राट तानसेननं अकबर बादशहाच्या विनंतीवरून आणि त्याच्या दरबाराच्या मांडणीतून हा राग तयार केला, असं इतिहासात वाचायला मिळतं. अर्थात, याला तसा शास्त्राधार काही नाही. मात्र, हा राग अतिशय वैभवशाली आहे. यात सगळे स्वर लागत असल्यामुळे या रागात स्वरविस्ताराला भरपूर वाव असतो. म्हणून हा खऱ्याअर्थी ‘संपूर्ण’ राग आहे. यात ‘गंधार’ स्वर इतका ‘कोमल’ लागतो की, कधीकधी आधीच्या ‘रिषभ’ या स्वराशी नातं जाणवून देतो. अर्थात, असा प्रकार ‘अवरोही’ स्वरांत दिसतो, म्हणजे त्याचं ‘मध्यम’ स्वराशी नातं जोडलेलं असतं. या रागाची प्रकृती गंभीर. त्यामुळे तो गाणाऱ्या गायकाची परीक्षाच असते. म्हणून कदाचित बहुतेक गायकांच्या हा राग पचनी पडत नसावा. याची आलापी तर फारच कठीण. मंद्र सप्तकातून सुरुवात होते, ‘गंधार’ स्वर आंदोलित पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे गायकाचा रियाज किती ‘कसदार’ आहे, याचा पडताळा घेता येतो. या रागाची स्वरसंहती बघितल्यास, "सा सा रे रे सा नि सा","म ग म रे सा","नि ध नि ध नि नि सा". या स्वरसंहितीवरून आपल्याला या रागातील प्रमुख स्वरांची ओळख करून घेत येते.
    सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं. वातावरणात एकांत इतका की, साध्या काजव्याचं कुजबुजणंही अंधारावर ओरखडा उमटवून जाईल. वाराही झुळकीच्या स्वरूपात स्वत:चं अस्तित्व दाखवतोय. त्यामुळे वातावरण थंडगार, स्निग्ध झालेलं. चंद्राचा प्रकाश आपलं नाममात्र अस्तित्व दाखवतोय. अशा वेळी दूरवरून पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे हलके आलाप कानावर येतात.
    सुरांची अनुभूती, या शब्दाची प्रचिती यावी तर अशी! फक्त आलापी! त्याला तालवाद्याचा धक्काही सहन होणं अवघड. अत्यंत नाजूक; पण लपेटदार स्वरांची वळणं... हे सर्व आपल्याला फक्त ‘दरबारी’ रागाचीच आठवण करून देतं. याचा प्रत्येक स्वर इतका शांत, गंभीर असतो की, तिथं स्वत:चा श्वास आणि त्याचा आवाजही नको वाटावा! स्वरांचं ते ‘आत्मगत’ वळण, आपल्याला संमोहित करतं. इथं स्वरांची ‘जात’ कळून येते. याचं तंतोतंत प्रात्यक्षिक या वादनातून समजून घेता येईल. यात, ‘आंदोलित’ गंधार स्वर आणि त्याचं संपूर्ण सप्तकातील अस्तित्व, याची खुमारी जाणता येते. त्याचसोबत स्वरभाषा म्हणजे काहीतरी न कळण्यासारखा विषय आहे, ही समजूत खोडून काढण्यासही मदत होते.
    सुगम संगीतात या रागावर आधारित भरपूर गाणी आहेत. शांत, नीरव अंधाराचं नेमकं प्रत्यंतर ‘मीलन’(१९५८) चित्रपटातील ‘हाये जिया रोये’ या गाण्यात येते.
    वास्तविक हे गाणं तसं प्रसिद्ध नाही; पण या गाण्यातील, लताताईंची गायकी अपूर्व आहे. यात दरबारी रागाची केवळ ‘छाया’ आहे. बहुधा, संगीतकार हंसराज बहेल यांना या रागातील एखादी ‘फ्रेज’ ऐकून, त्यातून या असामान्य गाण्याची चाल सुचली असणार. अर्थात, हा केवळ तर्क आहे. लताताईंच्या सगळ्या सप्तकात सहजगत्या विहार करण्याच्या असामान्य कुवतीचा या गाण्यात पुरेपूर वापर करण्यात आला आहे. या गाण्यातील विरहाची भावना इतकी टोकाची आहे की, आपण ऐकताना थक्क होतो. सुरुवातीच्या ‘हमिंग’मधून या रागाची थोडी कल्पना येते आणि पार्श्वभागी वाजत असलेल्या बासरीनं त्याचं स्वरूप स्पष्ट होतं. चालीचा ‘मुखडा’ बांधताना या रागाचे काही सूर घ्यायचे; पण पुढे चाल आणि राग स्वतंत्रपणे आपापला मार्ग शोधीत जातात. इथे हेच झालं आहे. सुरुवातीला ‘रिषभ’ आणि ‘पंचम’ या दोन स्वरांच्या आधारे इतर स्वर जोडून घेतले, त्याला ‘कोमल’, ‘गंधार’ स्वराची विलक्षण जोड दिली आणि त्यातून चाल झाली.
    संगीतकाराची बुद्धिमत्ता अशा वेळी दिसून येते. पुढे या गाण्याची चाल रागापासून दूर जाते, म्हणजे नक्की काय होतं? त्यासाठी ‘तुमने तो देखा होगा, ई चांद तारो’ ही ओळ ऐकावी. ‘तुमने’मधील ‘तु’ शब्दावर किंचित वजन देऊन तो शब्द उच्चारला आहे... आणि क्षणात लताताईंचा आवाज वरच्या स्वरांत जातो, अगदी टिपेला पोहोचतो, तो ‘तारो’ या शब्दापर्यंत. स्वर सतत ‘चढता’ आहे. हे ‘वळण’ साध्या गळ्याला पेलणारं नाही. या चालीच्या स्वरांत कुठेही नेमका ‘दरबारी’ दिसत नाही. म्हणजे बघा, सुरुवात या रागावर; पण पुढे चाल त्याच स्वरांच्या साक्षीनं; पण वेगळी वाट चोखाळते. सुगम संगीतात प्रयोग करायला तसा वाव कमी असतो, पण तरीही अशा ठिकाणी संगीतकाराला वाव मिळतो.
    दुसरं गाणं जरा वेगळ्या धाटणीचं आहे. एकतर त्यात दरबारी ‘शोधायला’ लागतो आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, दरबारी म्हणजे गंभीर, असं जे चित्र निर्माण होतं, ती ओळख आपल्याला पूर्णत: पुसून टाकावी लागते. अर्थात, असा प्रकार अनेक रागांच्या बाबतीत घडला आहे. जुन्या ‘आझाद’ चित्रपटातील ‘कितना हंसी है मौसम, कितना हंसी सफर है’ हे गाणं अतिशय बारकाईनं ऐकलं, तर एक-दोन ठिकाणी दरबारी रागातील स्वरांची झलक ऐकायला मिळते.
    अर्थात, राग डोळ्यासमोर ठेवून गाण्याची चाल बनवली, तर लगेच त्याचा अदमास घेता येतो. इथं चाल आधी तयार झाली आणि मग त्या गाण्याच्या सुरावटींचं दरबारी रागाशी कुठेतरी नातं जुळलं. अत्यंत हलकीफुलकी आणि त्या गाण्यातील शब्दांच्या भावार्थाशी नेमकी जुळणारी चाल आहे. रागाच्या प्रकृतीशी फटकून वागणारी ही चाल दरबारी रागावर आहे, हे मानायलाच मन तयार होत नाही. ही किमया अर्थात, संगीतकार सी. रामचंद्र यांची. ‘मिलती नही मंझील राही हो जो अकेला’ या ओळीत या रागाशी नातं सांगणारे सूर सापडतात; पण तरीही स्वरांची ‘ठेवण’ भिन्न आहे. म्हणजे या कडव्याची सुरावट दरबारीच्या सुरांशी मिळतीजुळती आहे; पण जेव्हा गाणं पुन्हा मूळ ध्रुवपदाकडे वळतं, तेव्हा हीच चाल आपला नवीन मार्ग सोडून, मूळ मार्गावर येते. हेही संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचंच कौशल्य!
    दरबारी रागाचं खरं वैभव दाखवून देणारं आणखी एक गाणं म्हणजे, ‘तू प्यार का सागर है’. यात दरबारी रागाच्या श्रीमंतीचं पुरेपूर दर्शन घडतं.
    रागाची गंभीर वृत्ती, शांत स्वभाव आणि स्वरांचं मंद्र सप्तकातील चलन. आंदोलित ‘कोमल गंधार’, तसंच ‘रिषभ’ आणि ‘पंचम’, या दोन प्रमुख स्वरांचं नातं. गाण्याचा सुरुवातीचा जो वाद्यमेळ आहे, ऑर्गन आणि व्हायोलिन, त्यांच्यातून जी सुरावट निर्माण होते, ती दरबारी रागाची खूण. अगदी नेमके सूर या वाद्यमेळातून निघतात. तोच गंभीर भाव, तेच शांत सूर आणि गायक मन्ना डे यांचं अतिशय परिणामकारक गायन. परिणामी हे गाणं अजरामर झालं.संगीतकार शंकर/जयकिशन या जोडगोळीने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. गाण्याच्या सुरवातीला, "ऑर्गन" सारख्या अति गंभीर वाद्यातून आपल्याला या रागाची खूण पटते. पुढील रचनेवर, याच रागाची सावली तरळत असते आणि रागच जो मूळचा गंभीर भाव आहे, त्याचीच प्रचीती ऐकताना मिळते.
    भारतीय चित्रपट संगीत किती विविधतेनं नटलेलं आहे, याचा आणखी एक पुरावा. ‘अगर मुझसे मुहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो’ हे गाणे.
    हे असंच आणखी एक सुंदर गाणं. यात लताताईंच्या सर्वव्यापी गायकीचा पुरेपूर वापर केला आहे. चालीला अतिशय अवघड; पण तितकंच सुश्राव्य. मदन मोहन यांच्या शैलीतील एक प्रातिनिधिक गीत, असं याचं वर्णन करता येईल. गाण्याच्या सुरुवातीला जो व्हायोलिनवरील सुरांचा तुकडा आहे, त्यातून या रागाची ओळख होते. गमतीचा भाग म्हणजे, पुढे ही ओळख पुसट होत जाते. इतकी की, या गाण्याची चाल हे एक स्वतंत्र प्रकरण होतं! हे फार अवघड चालीचं गाणं केवळ लताबाईंच्याच गळ्याला साजेसे असे हे गाणे आहे. वास्तविक या संगीतकाराच्या रचना ऐकल्या तर आपल्याला लगेच जाणीव होते, याची संगीतकाराची प्रकृती ही मुळात "गीतधर्मी" आहे, त्यामुळे गाण्याची चाल किती अवघड असली तरी गाणे ऐकताना, अतिशय सुश्राव्य वाटते आणि हीच तर या संगीतकाराची खासियत आहे.
    "दैय्या रे दैय्या लाज मोहे लागे" हे गाणे वास्तविक रंगमंचावरील "नृत्य गीत" आहे आणि नृत्य गीत जसे असायला हवे, त्याच प्रकृतीने बांधलेले आहे. संगीतकार नौशाद यांची रचना आहे आणि आशा भोसले यांनी गायलेले आहे. गाण्यातील खटके तसेच धारदार हरकती, ही खास सौदर्यस्थळे आहेत. आशा भोसले यांच्या आवाजातील ही नजाकत नेमकी ध्यानात घेऊन, नौशाद यांनी गाण्याची चाल बांधली आहे. आता रंगमंचावरील नृत्य असल्याने, गाणे जलद गतीत आहे. वैजयंतीमाला या अभिनेत्रीच्या नृत्यकौशल्याचा अतिशय सुरेख उपयोग करून घेताना, गाण्याची रंगत वाढलेली आहे. गाणे जिथे संपते, तिथे एक छोटीशी सतारीची गत आहे, ही गत म्हणजे दरबारी रागाची स्पष्ट खूण.
    काही वर्षांपूर्वी "साजन" नावाचा हिंदी चित्रपट आला होता आणि त्यातील बहुतेक सगळीच गाणी खुप गाजली होती. त्या चित्रपटात, "देखा है पहेली बार, साजन की आंखो में प्यार" हे गाणे देखील खूप गाजले होते. या गाण्यातील काही सांगीतिक वाक्यांश दरबारी रागाशी नाते सांगतात. संगीतकार नदीम/श्रवण या जोडीने या गाण्याची तर्ज बांधली आहे. चाल अतिशय सोपी आहे, अलका याज्ञिक आणि बाल सुब्रमणियम यांनी गायलेले युगुलगीत आहे. सुंदर प्रणयी भावनेचे गीत आहे आणि गाण्यातील ठेका, आपल्याला डोलायला लावतो.
    दरबारी रागाची अशीच खासियत आहे. नावाप्रमाणे रागाचे सून आपल्याला रागाची "शान-ओ-शौकत" दर्शवित असतात आणि हेच ऐट, स्वरांचे ऐश्वर्य, स्वरांची अथांग गंभीरता आपल्या मनावरून कधीच पुसून टाकता येत नाही. कुठल्याही स्वरावलींचे हेच तर मूळ उद्दिष्ट असते किंवा असावे.
    -- अनिल गोविलकर

  • चहा महात्म्य

    सकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो.