बाई बाई मनमोराचा

१९६० साली प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. संगीत दिले आनंदघन यांनी. तर स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..



बाई बाई मनमोराचा



१९६० साली प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. संगीत दिले आनंदघन यांनी. तर स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे.

बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला

चिमनी मैना, चिमना रावा

चिमन्या अंगणी, चिमना चांदवा

चिमनी जोडी, चिमनी गोडी

चोच लाविते, चिमन्या चा-याला

चिमनं, चिमनं, घरटं बांदलं, चिमन्या मैनेला

शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा

भोळा भोळा जीव माजा जडला त्याच्या पायाला

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगुनि जीव रंगला

गोजिरवानी, मंजुळ गानी, वाजविते बासरी डाळिंब ओठाला

येडं, येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला


Author