(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • झुळझुळणारा छायानट

    झुळझुळणारा छायानट

    "ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
    आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
    कोणती पुण्ये अशी येती फळाला
    जोंधळ्याला चांदणे लखडून जावे"
    ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग "छायानट" रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, "षाडव/संपूर्ण" अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात "निषाद" स्वराला स्थान नाही. "पंचम/रिषभ" हे या रागाचे वादी/संवादी स्वर असून, "षडज" आणि "मध्यम" स्वरांना या रागात भावदर्शनासाठी महत्वाचे स्थान आहे. "जोंधळ्याला चांदणे लखडून जावे" अशी असामान्य ओळ वाचताना, नजरेसमोर रात्रीच्या शांत समयी, शेतातील डुलणारी जोंधळ्याची रोपे येतात आणि या रागाच्या समयाला भाविक स्वरूप देतात.
    खालील रचना, ही छायानट रागातील अप्रतिम बंदिश आहे. पंडित ओंकारनाथ ठाकुरांच्या असामान्य गायकीने नटलेला, छायानट. पंडितजींच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये यथार्थपणे दाखवणारी, ही रचना आहे. सुरवातीची मंद्र सप्तकातील घुमारेदार गायकी आणि त्या आलापीतून, पुढे विस्तारीत होणारी ही रचना म्हणजे या रागाचा "अर्क" आहे.
    ओंकारनाथ ठाकुरांच्या आवाजाची काही वैशिष्ट्ये बघायला गेल्यास, आवाजाचा केलेला आवाहक उपयोग. तसे बघितले तर ग्वाल्हेर घराण्यातील गायकांच्या आवाजात एक प्रकारे एकाच स्वन डोकावत राहतो. मग, स्वरमर्यादा, गायनप्रकार, विस्तारासाठी कुठलाही राग निवडलेला असो. कारणे अनेक देता येतील पण आवाजात स्वनभेद फार क्वचित अनुभवायला मिळतो. ओंकारनाथ ठाकूर इथे स्वत:चे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवून देतात. मग, तो कधीतरी हळुवार, आर्त असेल किंवा काहीवेळा विलक्षण बोचरा वाटणारा पण प्रचंड ताकदवान आवाज जोरदार तानांनी भारून टाकतो. आपण नेमके काय करीत आहोत, याची यथार्थ जाणीव गायनातून आढळते. आपल्या मांडणीत विविधता यावी म्हणून त्यांनी किराणा सारख्या वेगळ्या घराण्याच्या गायकीचा अवलंब आपल्या गायनात केल्याचे आढळते. तसेच शब्दांच्या उच्चारांवर अधिक भर दिसतो. वास्तविक, रागदारी गायनात, शब्दोच्चाराला फारसे महत्व दिले जात नाही, ओंकारनाथ अपवाद. गायनातील कारागिरी, हा भाग फार महत्वाचा आहे. सुरवातीला, गायनात, क्षमता तसेच कौशल्य, याचा आढळ दिसतो पण पुढे त्याला मात्र दुर्दैवाने, त्याला प्रदर्शनाचे स्वरूप आले. विशेषत: द्रुत लयीत, गुंतागुंतीच्या ताना घेणे तसेच तार ते खालचे स्वर व उलट अशी झेप घेणे, अवाक करणारे होते. गायनात, "नाट्यात्म" आणणे आणि रसिकांना भारून टाकणे, हा विशेष खास म्हणावा लागेल.
    हिंदी चित्रपट गीतांत, शास्त्रीय नृत्य आणि त्यावर आधारित गीते, याना अपरिमित लोकप्रियता मिळाली आहे. एकात नृत्यावर आधारित गाणे म्हणजे रचना बहुतांशी द्रुत लयीत आणि अधिक आवाहक असल्याने, रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम, ही गाणी यथास्थित पार पाडतात. वास्तविक, शास्त्रीय नृत्यावर आधारित अशी गाणी असतात, त्यामुळे नृत्यातील जरी संपूर्ण शास्त्र जरी मांडता येत नसले तरी नृत्याबद्दल रुची निर्माण होण्यास नि:संशय मदत होते, हे निश्चित. "तलाश" चित्रपटातील "तेरे नैना तलाश कर जिसे" हे गाणे या पठडीतले आहे. या गाण्यात, "छायानट" राग जरी अस्पष्ट दिसत असला तरी जेंव्हा रचना त्या रागातील स्वरांवर "ठेहराव" घेते, ती जागा विलक्षणरीत्या झगमगून उठते. मन्नाडे यांचे गायन, अतिशय वेधक आहे. सतारीच्या द्रुत लयीतील गत आहेत आणि त्या लयीशी, गायन अप्रतिमरीत्या जुळून आलेले आहे.
    "खोयी खोयी आंख हैं झुकी पलक है;
    जहां जहां देखेगा तू, वही झलक है खोयी, खोयी;
    तेरे नैना तलाश कर जिसे वो है तुझी में कही दिवाने".
    मन्नाडे यांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचा पल्ला चांगला, अतिशय विस्तृत आहे. याचा परिणाम असा होतो, गाण्यात सर्वत्र, खुलेपणा आणि ताकद राखणे, त्यांना जमू शकत होते. त्यांचा आवाज हलका (सुगम संगीताला अतिशय पूरक) असल्याने, सर्व प्रकारच्या ताना, सहजतेने घेता येतात. भारतीय शास्त्रीय गायनात स्वच्छ "आ"करणे गायन करण्यावर भर असतो आणि हे देखील मन्नाडे, सहज करू शकतात. (खरे सांगायचे तर अनेकदा व्यावसायिक शास्त्रीय गायकांना देखील हे जमत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक) आकाराने शक्य होणारा विशेष गुण म्हणजे सहकंपन वा गुंजन हा परिणामत: त्यांच्या गायनात ओतप्रोत भरला आहे. दुसरा भाग असा, प्रत्येक रचनेनुरूप जी एक भावस्थिती ढोबळमानाने निश्चित झालेली असते, ती दाखवणारा आवाजाचा लगाव, ते देऊ शकतात. वास्तविक चित्रपट गीतास, सांगीत कल्पनांची बढत करायची नसून, एक संबंधित मूड निर्माण करून, बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणून, सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार या बाबी अत्यावश्यक ठरतात आणि हे करताना, आवाजातून, चित्रपटीय व्यक्तिमत्व मिळावे लागते. मुख्य बाब, म्हणजे हे सगळे करताना, त्यांचा आवाज कुठेही नाटकी होत नाही भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करते, हे वैशिष्ट्य, त्यांनी सतत कायम राखले.
    आता आपण, लताबाईंच्या सुरवातीच्या काळातील एक अतिशय सुश्राव्य गाणे ऐकुया. गाण्याची चाल खरोखरच अतिशय गोड, ओघवती आहे. प्रसंगी रचना द्रुत लयीत जाते परंतु शब्दकळेच्या आस्वादाला कुठेही बाधा पोहोचत नाही. गाण्याच्या सुरवातीपासून, रागाची ओळख होते, म्हणजे बघा,"चंदा रे जा रे" ही ओळ गाताना, स्वरांच्या हेलाकाव्यातून, आपल्याला छायानट भेटतो आणि पुढे, अंतरा आणि मधले संगीत ऐकताना, याच रागाचे सूर ऐकायला मिळतात पण तरीही, हे गाणे म्हणजे या रागाचे लक्षणगीत नव्हे!! या गाण्यात, बहुतेक हिंदी गाण्यात सहजपणे वावरणारा केरवा ताल आहे. प्रेमाची कबुली देणारे गाणे आहे पण, तेंव्हाच्या संस्कृती नुसार गाण्याची हाताळणी अतिशय संयत रीतीने झाली आहे. आता, गाण्यात कुठे छायानट बाजूला पडतो? हे बघायला गेल्यास, गाण्याचा पहिल्या अंतरा सुरु होताना, स्वरांची जी "उठावण" आहे, ती बारकाईने ऐकायला हवी. तिथे, रचनेने, हलक्या हाताने, रागाला बाजूला सारले आहे. अर्थात, ही कारागिरी, संगीतकार म्हणून नि:संशय, खेमचंद प्रकाश यांची.
    "चंदा रे जा रे जारे, पिया का संदेसा मोरा कहियो जा;
    मोरा तुम बिन जियरा लागे रे पिया, मोहे इक पल चैन ना आये".
    एकूण कारकीर्द ध्यानात घेत, या संगीतकाराला, "पियानो","सेक्साफोन" ,"क्लेरीनेट " इत्यादी पाश्चात्य वाद्यांची आवड लक्षात येते. एक तांत्रिक विशेष इथे मांडणे जरुरीचे ठरते. तसे बघितले तर ही तिन्ही वाद्ये एका वेधक सीमारेषेवर उभी आहेत. एक तर अखंड व सलग ध्वनी पुरवायचा किंवा सुटेसुटे, तुटक पण ठोस ध्वनी पुरवायचे, या दोन टोकांच्या दरम्यानची जागा या वाद्यांनी व्यापली आहे. "सतार","जलतरंग" इत्यादी वाद्ये वापरली नाहीत, असे नाही (वरील गाणे या संदर्भात ऐकावे) पण त्यांची वाद्ययोजना आधी उल्लेखलेल्या अभारतीय वाद्यांनी निर्माण केलेल्या ध्वनीप्रतिमांशी अंतरंग नाते जोडून आहे. आणखी एक बाब बघता येते. खेमचंद प्रकाश, यांना नाट्यात्म क्षण उभा करण्यासाठी ताल व ठेका आणि वाद्ये न वापरण्याचे तंत्र मनपसंत आहे, असे ठामपणे म्हणावे लागते. अशा वेळेस, गाता आवाज जेंव्हा सुरावट रेखायला लागतो, तेंव्हा ही वाद्ये, त्या सुरावटीला पाठींबा देतात, पण ध्यानात येईल इतक्या नरमाईने. गाणारा आवाज तार स्वरांत जाईल किंवा खालच्या पट्टीवर पोहोचेल पण, त्याचे परिणामकारक कार्य अतिशय नियंत्रित गतीने होत राहील. वरील गाण्याचाच आधार घ्यायचा झाल्यास, सुरवातीचे शब्द किंवा "मुखडा" कानावर पडेपर्यंत सुरावट खालच्या स्वरांवर रुंजी घालत असते आणि जेंव्हा ठाशीव किंवा वरच्या स्वरावर झेप घेणारा मुखडा येतो, तेंव्हा गीताचा रोख(च) बदलतो. आणि हे सगळे करताना, गाण्याची लय देखील, मंद्र सप्तकात वावरत असते.
    "पापा कहते है" या चित्रपटात, संगीतकार राजेश-रोशन या जोडीने असेच सुंदर गाणे दिले आहे - मुझ से नाराज हो तो हो जाओ. सोनू निगम यांनी हे गाणे गायले आहे. सत्कृत्दर्शनी ऐकायला घेतले तर, काही वर्षापूर्वी "जहांआरा" म्हणून आलेल्या चित्रपटात याच चालीच्या धर्तीवर - "बाद ए मुद्दत तो ये घडी आई" या गाण्यावर आधारित या गाण्याची चाल वाटते आणि याचे कारण, दोन्ही गाणी ही "छायानट" रागावर आधारित आहेत!!
    "मुझ से नाराज हो तो हो जाओ,
    खुद से लेकिन खफा खफा ना रहो."
    अर्थात जरी गाण्यांच्या चालीत साद्धर्म्य दिसत असले तरी गाणे म्हणून ही चाल अतिशय श्रवणीय आहे. चाल काहीशी संवादात्मक असल्याने बहुतेक सगळी रचना सलग, एक statement केल्यासारखी विस्तारत जाते. या गाण्यातील प्रत्येक "वळणावर" आपल्याला छायानट राग भेटतो आणि याचा परिणाम, या रागाची केवळ ओळखच नव्हे तर सगळे सौंदर्य आपल्या नजरेत सामावले जाते. अर्थात, सुगम संगीताचे हे एक खास वैशिष्ट्य मानायलाच हवे.
    असेच एक अप्रतिम गोडवा लाभलेले गाणे,"जहांआरा" या चित्रपटात, संगीतकार मदन मोहन यांनी दिलेले आहे. "बाद ए मुद्दत तो ये घडी आई" हे गाणे म्हणजे युगुलगीत कसे गावे, याचे सुंदर उदाहरण आहे. प्रणयी थाटाचे गीत आहे पण हळुवार, संयत चालीने त्या गीताचा गोडवा अधिक वाढला आहे. खरेतर कविता म्हणून देखील ही रचना आगळा आनंद देते आणि याचे श्रेय निश्चितपणे, राजेंद्र कृष्ण यांच्याकडे जाते. शायरीत काही उर्दू शब्द आहेत पण त्याचे प्रमाण तसे अल्प असल्याने, ज्यांना उर्दू समजत नाही, त्यांच्या वाचनात देखील किंचितही विक्षेप येत नाही.
    "बाद ए मुद्दत तो ये घडी आई,
    आप आये तो जिंदगी आई;
    इश्क मर मरके कामयाब हुआ
    आज एक जर्रा आफताब हुआ".
    गाण्यात कुठेही अनावश्यक वाद्यमेळ नसल्याने, गाणे ऐकताना देखील आपण काव्यास्वाद घेऊ शकतो. रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायन केलेले आहे. लताबाईंच्या सार्वभौमत्वाला जर त्याच शैलीत कुणी आव्हान देऊ शकले असते तर ते केवळ सुमन कल्याणपूर, या गायिकेने!! आवाजाची जात बरीचशी मिळती जुळती असल्याने आणि आवाज निमुळता होत, शेवटी आवाजाला लोचदार टोक येत असल्याने, लताबाईंची गायकी आत्मसात करणे, या गायिकेला जराही अवघड गेले नाही (असे म्हणतात, हीच त्यांच्या गायनाबाबत मर्यादा ठरली!!) दाट बासुंदीत हळूहळू केशर विरघळत जावे त्याप्रमाणे ही चाल आपल्या मनात उतरत जाते. चाल तशी सहजपणे मनाची पकड घेणारी नाही पण जरा बारकाईने वेध घेतला तर गाण्याची सगळी सौंदर्यस्थळे जाणवतात आणि हे गाणे परिचयाचे होऊन बसते. राग छायानट तसा इथे काही ठिकाणी स्पष्टपणे आढळतो पण हा संगीतकार, नेहमीच रागाच्या सावलीत "तर्ज"बांधून पुढे रागाला बाजूला सारतो आणि चालीला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करतो. या गाण्याच्या बाबतीत तीच शैली वापरली आहे आणि त्या दृष्टीने, गाणे फारच बहारीचे होते.
    - अनिल गोविलकर

  • किती इंधन फुकट घालवायचं ?

    या टोलधाडीसाठी देशाचं किती नुकसान करायचं त्याला काही limit आहे की नाही? प्रत्येक टोल नाक्यासमोर ही मोठी लाईन. सगळी वाहने पहिल्या गियरमध्ये चालतायत आणि लिटरवारी पेट्रोल-डिझेल फुकट घालवतायत.

    कुठेतरी थाबायलाच पाहिजे हे सगळं... निवडणूका लढताना टोलमुक्य महाराष्ट्राची आश्वासनं दिलीत ती गेली कुठे?

  • मराठी चित्रपट दिशा आणि मार्ग

    2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता…..

  • प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल व्यंकटेश कामत

    देशात विठ्ठल कामत यांनी पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल सुरु केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या बिझनेसची वाढ फ्रॅन्चायझी पद्धतीने केली. आज देशातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहेत. एवढेच नव्हे तर देश-विदेशातील ४५० हून अधिक ठिकाणी या हॉटेल्सच्या बिझनेस विस्तारला आहे.

  • माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

    इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.

  • संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा

    सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रामुख्याने वार्षिक सर्वसाधारण, विशेष सर्वसाधारण आणि अधिमंडळ यांची मासिक सभा. सर्वसाधारणपणे नावातून आपण अंदाज घेऊ शकतो को, वार्षिक (वर्षातून एकदा), अधिमंडळ सभा मासिक (महिन्यातून एकदा) परंतु विशेष सर्वसाधारण सभा कधी, कोण, कशाप्रकारे आणि कशासाठी बोलावण्यात येते? याबाबतची माहिती सदर लेखातून आपणास मिळणार आहे.

  • अधिकारी असावा तर असा!

    अधिकारी असावा तर असा! 'या' जिल्ह्यात ना ऑक्सिजन ,ना बेड चा तुटवडा,
    हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं.
    ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं
    नंदूरबारः संपूर्ण देशाला सध्या करोना संसर्गानं ग्रासलं आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राज्यातून होत आहेत. मात्र, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा, बेडची कमतरता या समस्यांनाही आरोग्य प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील नंदूरबार या जिल्ह्यात मात्र पूर्णपणे वेगळी परिस्थीती आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नियोजनामुळं जिल्ह्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आहे.
    आदिवासी बहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यात मागील वर्षी अपुऱ्या यंत्रणेसह करोनाचा लढा दिला. मागील वर्षी फक्त २० बेड असलेल्या नंदूरबारमध्ये आता रुग्णालयात १ हजार २८९ बेड, कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ११७ बेड आणि ग्रामीण रुग्णालयात ५ हजार ६२० बेड उपलब्ध आहेत. करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम आरोग्ययंत्रणा उभी केली आहे. इतकंच नव्हे तर, महाविद्यालये, हॉटेल, सोसायटी आणि मंदिरांमध्येही बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, ७ हजारांहून अधिक आयसोलेशन बेड आणि १,३०० आयसीयू बेड्स उभे केले आहेत.
    ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं. राज्यभरात नंदूरबार मॉडेल राबवण्याची गरज आहे.
    २०१३च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि मुंबईतील केईएम रुग्णालयातून एमबीबीएसची पदवी मिळवणारे डॉ. भारुड यांनी करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेत डिसेंबरपासून त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास सुरुवात केली. नंदूरबारमध्ये मागील वर्षी सरासरी १५- २० आरटीपीसीआर टेस्टची क्षमता होती. आता जवळपास करोना चाचण्यांची क्षमता थेट १०० पटीने वाढून १५०० पर्यंत गेली आहे. हे सगळं डॉ. भारुड यांच्या प्रयत्नानं शक्य झालं आहे.
    डॉ. भारुड यांनी जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या निधीतून ३ ऑक्सिजन प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३ हजार प्रतिमिनिट ऑक्सिजन तयार होते. ऑक्सिजन बनवण्यासाठी लिक्विड टँक बसवण्याचेही काम हाती घेण्यात आलं आहे. तसंच, कोविड रुग्णांसाठी मागील ३ महिन्यात २७
    रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत.
    डॉ. राजेंद्र भारुड यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला आहे. त्याच्या जन्माच्याआधीच त्यांच्या वडिलांचे निधन झालं आहे. त्यांच्या आईनंच त्यांचं पालनपोषण केलं आहे. डॉ. राजेंद्र हे मुंबईत शिक्षणासाठी आल्यानंतर जीएस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्ष असतानाच त्यांनी यूपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाले.
    डॉ. भारुड साहेबांचा आदर्श लाचखाऊ शासकीय अधिकार्यांनी घ्यावा.गरीब जनतेला लुबाडन्यातच धन्यता मानणार्या कलीयुगाच्या प्रतिनिधीनो जागे व्हा.
    संतोष द पाटील
  • हळदीचे गाणे (कोळी बाजाचे)

  • दारु

    विषय जरी दारु असला
    तरी कविता सुंदर आहे।
    न घेणाऱ्याला देखील हसवेल
    ____

    पिऊन थोडी चढणार असेल
    तरच पिण्याला अर्थ आहे
    एवढी ढोसून चढणार नसेल
    तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

    मी तसा श्रध्दावान
    श्रावण नेहमी पाळतो
    श्रावणात फक्त दारू पितो
    नॉनव्हेज मात्र टाळतो

    ज्याची जागा त्याला द्यावी
    भलती चूक करू नये
    पिताना फक्त पीत रहावं
    चकण्यानं पोट भरू नये

    वेळच्या वेळी आपण ओळखावी
    आपली आपली आणिबाणी
    लाज सगळी सोडुन देऊन
    ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

    पिऊन तर्र झाल्यानंतर
    काय खातोय ते कळत नाही
    खाल्ल्यानंतर बिलामधली
    टोटल कधी जुळत नाही

    आपला ग्लास आपण सांभाळावा
    दुसर्‍याला घेऊ देऊ नये
    दुसर्‍याचा ग्लास उचलण्याची
    वेळ आपल्यावर येऊ नये

    अशीही वेळ असते जेंव्हा
    कोणीच आपला नसतो
    म्हणून आपण प्यायला जातो
    तर नेमका ड्राय डे असतो

    आपला पेग आपण भरावा
    दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
    आपला ग्लास, आपली बाटली
    दुसर्‍याच्या हातात देऊ नये

    असं उगीच लोकांना वाटतं
    की दुःख दारूत बुडून जातं
    दुःख असतं हलकं हलकं
    अल्कोहोलसोबत उडून जातं!

    एकदा प्यायला बसल्यानंतर
    तुझं-माझं करू नये
    तुझी काय, माझी काय
    नशा कधी सरू नये

    तुला जायचंच असेल तर निघून जा ,
    जाण्यासाठी भांडू नकोस
    प्यायची नसेल तर पिऊ नको ,पण दारू अशी सांडू नकोस

    स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
    बर्फ नको, सोडा नको
    उंच आभाळी उडण्यासाठी
    पंख हवे... घोडा नको!

    फॉरीन लिकर कितीही प्यावी
    काही केल्या चढत नाही
    देशी आपली थोडीशीच प्यावी
    दोन दोन दिवस उतरत नाही

    पिणं असतं आगळा उत्सव
    त्याचा उरूस होऊ नये
    प्यायला नंतर आपला कधी
    वकार युनूस होऊ नये

    घरी बसून दारू प्यायचे
    खूप सारे फायदे असतात
    हॉटेलमधे, बिल भरायचे
    काटेकोर कायदे असतात

    आम्ही कधीच दारूमधे
    दुःख आमचं बुडवत नाही
    दारू नेहमी शुध्दच ठेवतो
    भेसळ आम्हाला आवडत नाही
    B
    हवा तसा मी चालतो आहे
    कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
    माझ्या मित्रा, माझ्या इतकी

  • जपून ठेवा खरेदीची कागदपत्रे

    शिक्षण असो वा नोकरी-व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी सतत कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. काही कागदपत्रे तर आयुष्यात सतत उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा कागदपत्रांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची ठरते. पण, याकडे गांभीर्याने लक्ष न देणार्‍यांचीच संख्या अधिक आहे. मग योग्य कागदपत्रां अभावी नुकसान सहन करावे लागल्यास पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काही उरत नाही.