(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • रामायण ऑनबोर्ड

    त्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा.

  • मतदार राजा जागा हो……..

    सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित …

  • नेपाळी मित्राचा सहवास

    त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही भाऊ परदेशात काम करतात.

    बालपणी आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. गावाकडून माझा डबा यायचा. मनसोक्त जेवायचे. तलावात पोहायला जायचे असा दिनक्रम. आंतरराष्ट्रीय, अनभिज्ञ, विषयावर तो बोलायचा. उत्सुकतेने आम्ही ऐकायचो. आम्ही घडत होतो. तो आम्हास घडवत होता.

    कलाटणी देणारा हा मित्र होता. भीमबहादूर लालबहादूर बम असे त्याचे नाव. त्याची मातृभाषा मराठी नसतानाही या विषयात त्याला सर्वात जास्त गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले.

    तीसेक वर्षांपूर्वीच्या त्याच्या सहवासातील अनेक आठवणी ताज्या आहेत. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास असायचा. कष्ट घेऊन, परिस्थितीशी झगडणे, यश संपादन करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मला मिळाले. शिकण्यासारखे त्याच्याजवळ भरपूर होते. त्यांचे वडील आजमितीस हयात नाहीत. माणसं आठवणी ठेवून जातात कुठे? हा निरुत्तर करणारा प्रश्न. आता त्यांची भेट नाही; पण माणूस सहवासात घडतो, तो सहवास आम्हाला लाभला.

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, बीड

  • फुगा फुटायची वेळ

    अरविंद केजरीवाल यांची स्थिती बैलाएवढा होण्यासाठी फुगणार्‍या बेडकाप्रमाणे झाली आहे. भ्रमाचा हा फुगा फुटण्याची वेळ आता आलेली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला झाले, तशी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी चालवला असला तरी त्यांचे ते आंदोलन दिशाहीन भरकटताना दिसू लागले आहे.

    श्री. परेश प्रभू
    संपादक, नवप्रभा

  • “इंटरनॅशनल फिल्म” मधील मराठी नक्षत्र

    सध्याच्या काळात “डॉक्युमेंट्री” खुपच लोकप्रिय ठरताहेत, कारण म्हणजे ऑफबीट विषयांची केलेली मांडणी! त्यामुळे आशय अगदी प्रभावीरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचून त्यातून होणारे प्रबोधन सुध्दा महत्त्वाचा भाग ठरतोय.याच विभागामध्ये काहीसे वेगळे म्हणजेच समलिंगी संबंधांवर किंवा LGBT या विषयांवर आधारीत नक्षत्र बागवे या तरुणाने वेधक अश्या प्रकारचे “शॉर्ट फिल्म्स” तसंच डॉक्युमेंट्री बनवून प्रेक्षकांसोबतच समीक्षकांकडून देखील दाद मिळवलीय, त्याची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकीत फिल्ममेकर कडून घेतली जात आहे.

  • माझी पहिली वारी

    जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात श्री. करंदिकरांनी मला वारीला येण्यासंबंधी विचारले. मी अजून पर्यंत वारीला गेलेलो नसल्याने मला तर जाण्याची इच्छा होती. करंदिकरांना तसे कळवताच ते त्या तयारीस लागले. त्यांनी आपल्या पुण्यातील मित्राशी संपर्क साधला व पुणे सासवड या प्रवासाची तयारी केली. सासवडला राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून हॉटेल बुकिंग संबंधी कळवले, व मला तसे कळवले. माझ्या परिचयातील सौ. भोसेकर यांचे कोणी नातेवाईक तेथे राहात असल्याचे माझ्या ऐकिवात होते म्हणून मी त्यांना आमच्या सासवडला जाण्याच्या कार्यक्रमाविषयी बोललो. त्यांनी सासवडला त्यांच्याच घरी राहाण्याचा आग्रह केला व तसे श्री. करंदिकरांनाही कळविण्याबद्दल त्यांनी मला सांगितले. त्यांच्या घरचा पत्ता व तेथे राहण्यासाठी संपर्क म्हणून त्यांच्या भावाचा फोन नंबरही कळवला.

  • राग मारवा

    मारवा राग हा मारवा थाटातून तयार झाला असून हा मारवा थाटाचा आश्रयराग आहे. पंचम स्वर वर्ज असल्याने हा षाडव जातीचा समजतात. याचे रिषभ कोमल, मध्यम तीव्र आणि गंधार, निषाद, हे स्वर शुद्ध आहेत. आरोहाला सुरुवात मंद्र निषादापासून करतात. यात वादी संवादी रिषभ धैवत आहे. वादी संवादी एकमेकांचे मध्यम पंचम असतात, ह्या नियमाला हा राग अपवाद आहे. याचा गानसमय दिवसाचा शेवटचा प्रहर मानतात. याचे चलन म्हणजे रागविस्तार-तिन्ही सप्तकात होत असले तरी याची प्रकृती फारशी गंभीर नाही. कुणी कुणी आरोहात निषाद वक्र करतात. जलदीने ताना घेतेवेळी तो तसा येत नसला तरी सावकाश स्वरविस्तार करताना मध्य सप्तकातील निषादावरून जोरकसपणे धैवत घेण्यातच या रागाचे वैशिष्टय आहे. रि हा स्वर वादी असल्याने त्याला बरेच महत्व देतात. म्हणजे याच रागासारखा असलेल्या पूरिया रागाहून हा सहजच निराळा दिसतो. मावळत्या दिनकरा हे मा.भा.रा.तांबे यांचे गाणे राग मारवातील आहे. या गाण्यात मारवा बरोबर इतर ही जवळचे राग आहेत. तसेच स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तु मला हे मा.शंकर वैद्य यांचे गाणे हे ही मारवा रागातील आहे. या राग बाबत अधिक माहिती समूहातील तज्ञ व्यक्तींनी द्यावी.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कुठला राग केंव्हा ऐकायचा ??

    कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत

  • न मिटणारे मातीपण

    शेतकर्‍यांना शेतीपासून बेदखल करणारे, त्यांच्या जगण्याचा साकल्याने विचार न करणारे धोरण देशाचे मुळ हादरवू शकते. ‘सेझ’सारख्या प्रकल्पांसाठी जमिनी सक्तीने संकलीत केली जाणे, नैसर्गिक संसाधन विधेयक कायद्याची पायमल्ली करणे आणि शेतीबाह्य व्यवसायांकडे वळण्याचा आग्रह यामुळे नवे संकट उभे राहत आहे.

  • टिप्पणी – ५ : विठ्ठल-मंदिर २४ तास उघडें

    बातमी : विठ्ठल-रखुमाईचें दर्शन आतां २४ तास
    संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. ७ जुलै २०१६

    • हिंदू देव-देवतांची एक गंमत आहे. माणसांप्रमाणेंच मंदिरातली मूर्ती दुपारीं वामकुक्षी करते, आणि रात्रीं शयन करते. (भक्तांनी दर्शनासाठी वाट पाहिती तरी चालेल !) मग, पहाटे काकड-आरती करून देवाला ज़ागवतात! काय गंमत आहे पहा : दैवत्वाचे गुण माणसाला लागण्याऐवजी, माणसाचे गुणच मंदिरातील देवाला लागले ! !

    • देव, भक्त, मंदिर आणि पुजारी या व्यवस्थेवर विदारक टीका करणारी कविता कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे ; शीर्षक आहे ‘गाभारा’ . गाभार्‍यातील देव भक्ताला भेटण्यासाठी मंदिराबाहेर पडतो ; व म्हणून पुजारी ठरवतात की आतां तो परत आला तरी त्याला आंत घ्यायचें नाहीं, जयपूरहून नवी मूर्ती ऑर्डर करायची ; अखेर, ‘गाभारा सलामत तर मूर्ती पचास’ ! . जिज्ञासूंनी ती कविता मुळातूनच वाचावी.

    ( कुसुमाग्रजांशी स्वत:ची तुलना मला कदापि अभिप्रेत नाहीं. केवळ या विषयावरील एक अन्य ‘टिप्पणी’ म्हणून, मी माझ्या, ‘देव आतां पावणार नाहीं’ या गझलमधील एक शेर देत आहे -

    व्यर्थ आक्रंदूं नका, हा बंद दरवाजा पहा
    झोपलाहे देव अजुनी , जागणार नाहीं ! )

    • या सगळ्या पार्श्वभूमीवर , ही ताजी बातमी नक्कीच welcome news आहे की, आतां पांडुरंगाचें मंदिर दर आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळी,कांहीं दिवस कां होईना, पण, २४ तास उघडें राहील. पंढरपुरला दूरवरून वारी करून येणार्‍या भक्तांच्या सोयीसाठी असा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल, प्रांताधिकारी, विठ्ठल-मंदिर समिती आणि बडवे यांचे अभिनंदन करावें तेवढें थोडेंच. कारण, मुख्यत्वें , मंदिर उघडें ठेवण्याची बाब, ही धार्मिक नसून, ती सामाजिक प्रश्नाशी निगडित आहे, ‘ह्यूमेऽन अप्रोच’शी संबंधित आहे.

    • हरिजनांना ( दलितांना ) मदिर-प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी पंढरपुरला केलें आमरण उपोषण ही घटना साधारणपणें २०व्या शतकाच्या मध्यावरली. म्हणजे, त्यानंतर फार काळ लोटलेला नाहीं. त्या बॅकग्राउंडवर, आतां मंदिर २४ तास खुलें ठेवण्याचा निर्णय , हा अधिकच उठून दिसतो.

    • विठ्ठल हें एक लोकदैवत आहे. ( त्यासंबंधीचें रा. चि. ढेरे यांचें संशोधन पहावें). ज्ञानदेव-नामदेव आणि जातीजातींमधील इतर संतांनी, कृतीतून, विठ्ठलाचें लोकदैवतपण दाखवून दिलें. शतकानुशतकें चालत आलेली वारीही हेंच दाखवते.

    • अशा या लोकदैवताला ‘बंधनांत’ न ठेवता, भक्तांना मोकळेपणानें तिन्हीत्रिकाळ त्याला भेटायची संधी प्राप्त झाली, ही फारच आनंदाची बातमी आहे. अभिनंदन, अभिनंदन .

    -----

    टीप :

     सध्या मी ‘पंढरीचा राणा’ याअंतर्गत कांहीं काव्य वेबवर पोस्ट करतो आहे. योगायोग असा की, ‘उघडें मंदिर आहे’ हे काव्य मी अगदी पोस्ट करणारच होतो, तेवढ्यात वरील बातमी वाचली. तें काव्य आतां पोस्ट केलें आहे. या काव्यामागील अध्याहृत पार्श्वभूमी म्हणजे, साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी उघडें व्हावें म्हणून, वर उल्लेखलेलें, उपोषण. (काव्यात तसा उल्लेख नाहीं). पण, हें काव्य, ‘२४ तास मंदिर उघडें राहण्याला’ही लागूं होतें, हा एक मजेदार योगायोग .

     आतां, प्रस्तुत बातमीनंतर मी लिहिलेलें, ‘विठ्ठलमंदिर राहिल उघडें’ हें काव्यही मी वेबसाईटवर पोस्ट केलें आहे.

     वर उल्लेख केलेली ‘देच आतां पावणार नाहीं’ ही गझलही वेबवर पोस्ट होईलच.

     हें सारें आपण माझ्या वेबसाईटवर, तसेंच मराठी सृष्टीच्या वेबसाईटवरही वाचूं शकाल.

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com