(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फिर ये सीट मेरी हुई ना?

    मैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)

  • सांग सांग भोलानाथ……!!!

     

  • भारतमातेच्या वीरांगना – ३४ – मावशी केळकर

    नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम्
    त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः
    अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे
    स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि ||

    हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी आम्ही आपले जीवन समर्पण करतो.

    प्रार्थने मध्ये शक्ती असते हे आपण जाणतोच, त्याचे फळ अजूनच उच्च होते जेव्हा प्रार्थना सामूहिक केली जाते. राष्ट्र सेविका समितीची ही प्रार्थना आजही देशातील काना-कोपऱ्यातून सामूहिक पद्धतीने गायली जाते आणि प्रत्येक सेविकेच्या मनात अनन्य समर्पण भाव जागृत करते.

    कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व ह्याचा त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी अनुभवायला मिळाला त्या भारतमातेच्या वीरांगना वंदनीय लक्ष्मीबाई केळकर अर्थात साऱ्या देशाच्या मावशी केळकर.

    ०६ जुलै १९०५ साली त्यांचा जन्म नागपूर येथे दाते कुटुंबात झाला. त्यांचे वडील भास्करराव दाते पुढारलेल्या विचारांचे होते, तसेच आई यशोदाबाई सुद्धा. दोघेही टिळकांचे भक्त होते. त्यांच्या घरात केसरी चे सामूहिक वाचन चाले. त्यांच्या आई दुपारच्या वेळी आजूबाजूच्या महिलांना एकत्रित करून केसरी चे वाचन,त्यावरील लेखांवर विचार मंथन करीत. कमलताईंवर संघटनात्मक रचनेचे संस्कार अगदी लहानपणीच झाले. इंग्रजी शाळेत रुजवला जाणारा विचार आणि घरात घडणाऱ्या गोष्टी हा विरोधाभास कमलताईंना सतत खटकत होता, त्यांनी शाळेला राम राम ठोकला.

    १४ व्या वर्षी त्यांचा विवाह श्री पुरुषोत्तम केळकर ह्यांच्याशी झाला आणि त्या लक्ष्मीबाई पुरुषोत्तम केळकर झाल्या. केळकरांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून मुलं होती, त्यांची एक बहीण बाल विधवा होती, लक्ष्मीबाईंच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे एवढ्या लहान वयात त्यांनी सगळं घर आपलंसं केलं. सांसारिक बंधनात अडकल्या तरी मनातून सामाजिक विचार कधीच दूर झाले नाही. अवकाळी वैधव्य आलं आणि सगळ्यांची जवाबदारी लक्ष्मीबाईंवर आली. लक्ष्मीबाईंनी मुलांची, नणंदेची आणि शेतीची जवाबदारी घेतली आणि अतिशय उत्तमरीत्या पार पाडली. एकदा डॉ केशव हेडगेवार ह्यांचा प्रवास वर्ध्याला असतांना लक्ष्मीबाई त्यांना जाऊन भेटल्या आणि संघाबरोबर काम करण्याची आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हे शक्य नाही,पण महिला संघटन होऊ शकते, ते तुम्ही करावं.

    "स्त्री आणि पुरुष हे धर्मरूपी गरुडाचे दोन पंख आहेत. त्यामुळे स्त्रीची उन्नती व्हायलाच हवी.पंख असमान असतील तर गरुड झेप कशी घेणार?" हे स्वामी विवेकानंदांचे विचार लक्ष्मीबाईंचे प्रेरणा स्थान बनले. डॉ च्या प्रत्यक्ष सल्ल्याने आणि विवेकानंदाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी २५ ऑक्टोबर १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. महिलांनी केलेले, महिलांचे संघटन, महिलांसाठी, ज्यातून समाज बांधणी, घरा-घरातून देशप्रेम, स्वातंत्र्य चळवळीची माहिती, असे सगळे साधणार होते. राष्ट्र निर्माण हे एक दिवसात शक्य नाही, त्यासाठी प्रत्येक घरात हा विचार पोहचणे आवश्यक आहे, आणि कुठलीही गोष्ट रुजविण्याचे काम एक स्त्री अतिशय उत्तम पद्धतीने करू शकते म्हणून महिलांचे संघटन.

    "जवाबदारी आणि कर्तव्य ह्यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज, आणि राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य आनंदाने निभवावे."
    "व्यक्ती-व्यक्तीवर राजकीय व सामाजिक संस्कार करून तिला एक अनुशासित सूत्रबद्ध शक्तीचे अंग म्हणून सिद्ध करायचे आहे व अशा सर्व व्यक्तींमध्ये कर्तव्यभावना, परस्पर जिव्हाळा, व सहकार्य निर्माण करणे, तसेच स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे त्यामुळे तिच्या उन्नती आणि संघटनेतून हिंदुराष्ट्र उभे राहणार, म्हणून समिती." लक्ष्मीबाईंची समिती मागची ही भूमिका फक्त भाषणात बोलण्यापुरती नव्हती तर स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून आणि कार्यातून प्रत्यक्ष आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात त्यांनी सतत उत्तमरीत्या निभावली म्हणूनच त्या कदाचित सगळ्यांच्या 'मावशी' झाल्या.

    १९४७ ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात त्या स्वतः कराचीत गेल्या, जेव्हा हिंदूंची भर दिवसा कत्तल सुरू होती. कराची विमानतळावर 'खून से लिया है पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान' अशा घोषणा सुरू होत्या, तेव्हा केवळ आपल्या सेविकांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सगळ्या सेविकांना स्वतः जातीने भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या, त्यांना धीर दिला कारण तिथल्या एका सेविकेने त्यांना पत्र पाठवून बोलवलं होते. काराचीतील हिंदू परिवारांना भारतात परत आणण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले.

    भारत पाकिस्तान, भारत-चायना युद्ध काळातसुद्धा मावशींच्या सेविका सगळ्यांच्या मदतीला धावून येत होत्या.
    स्त्री सुलभ गुणांचा वापर राष्ट्र निर्माणासाठी करणाऱ्या, स्त्रियांच्या संघटनेतून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला घरा-घरात पोहचवणाऱ्या, स्त्री म्हणजे केवळ एक कुटुंब नाही तर राष्ट्र निर्माण करायची ताकद तिच्या ठायी आहे हे स्वतःच्या कार्यतून आदर्श ठेवणाऱ्या या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे शत शत नमन.

    || वंदे मातरम् ||

    -- सोनाली तेलंग.

    ०७/०७/२०२२.

    संदर्भ :

    १. कर्मयोगिनी वंदनीय मौसीजी

    २. दिपज्योति नमोस्तुते : सुशीला महाजन

    ३. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : डॉ अर्चना कुळकर्णी, स्मिता कुळकर्णी

    ४. http://xn--h4b.indusscrolls.com/

  • बलसागर भारत होवो

    ‘भारताला स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे मिळाले, गांधीजींमुळे नव्हे,‘ असे उथळ विधान जनसंघटनेच्या एका नेत्याकडून अपेक्षित नव्हते. सुदर्शनजी पुढे असेही म्हणतात की, ‘इंग्रज देश सोडून गेले, कारण त्यांचा सैन्यदलावरील विश्वास उडाला होता. आणि एवढा मोठा देश आपल्या ताब्यात ठेवणे त्यांना अशक्य वाटले.‘ शेवटचे विधान मात्र सत्य आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्य याच्यामुळे वा त्याच्यामुळे मिळाले, असे त्याचे सरळसोट उत्तर नाही व तसे ते नसणार, हे सांगावे लागेल असे कधी वाटले नव्हते. परंतु सुदर्शनजींनीच असे म्हटल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबी लक्षात आणून देणे भाग आहे.

  • ब्रिंदाबनी सारंग

    वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची तिरीप त्रस्त करीत असावी. अगदी डोळे मिटले तरी ग्लानी यायच्या ऐवजी लालसर पिवळे रंग फेर धरत असावेत. आणि अशा अस्वस्थ क्षणी दूरवरून, "मध्यम","पंचम" स्वरांच्या जोडीने "कोमल निषाद" कानावर येऊन, मनाची अवस्था किंचित मनोरम व्हावी. हीच किमया, ब्रिंदाबनी सारंग या रागाच्या, सुरांनी होते. रागदारी सुरांची ही किमया केवळ अलौकिक म्हणावी अशीच आहे. वातावरणात क्षणात बदल घडवून आणण्याची ताकद, सुरांच्या अवगाहनातून सहजगत्या होते आणि आपल्याला देखील, या किमयेचे नेमके विश्लेषण करणे अवघड होऊन बसते. अर्थात, यामागे मनावर झालेले पारंपारिक संस्कार देखील कारणीभूत असतात.

    वास्तविक, हा राग म्हणजे दुपारच्या काहीलीवर "उतारा" असा उल्लेख, बऱ्याच ग्रंथातून वाचायला मिळतो. "औडव/औडव" जातीचा हा राग, फार विलक्षण किमया करतो. "गंधार" आणि "धैवत" वर्जित सूर असले तरी, अवरोही स्वरांतील "कोमल निषाद" इथे भलतीच करामत करून जातो. "मध्यम" आणि "पंचम" हे या रागाचे वादी - संवादी स्वर असले तरी, या रागात काही वेळा "तीव्र निषाद" आणि "कोमल निषाद" अशा दोन्ही स्वरांचा वापर केला जातो, पण खरी ओळख होते ती, "मध्यम" आणि "कोमल निषाद" या स्वरांनी. वर उल्लेखलेली दुपारची दाहकता, जणू या दोन स्वरांच्या सहाय्याने शीतल करण्याची जादू करतात. काफी थाटातील या रागाची "मींड" ही मध्यम, पंचम आणि कोमल निषाद स्वरांतून सिद्ध होते. या रागाची आणखी एक गंमत सांगता येते. या रागाचे स्वर जर का नेमकेपणी घेतले नाही तर, हा राग नकळत "मेघ" रागात मिसळून जाऊ शकतो, इतके या दोन रागांत साम्य आहे. या रागात काहीवेळा दोन्ही निषाद घेतले जात म्हणजे कोमल आणि तीव्र निषाद घेतले जातात पण अर्थात, याला एक प्रयोग, इतपतच अर्थ घेता येईल. कोमल निषाद, हेच खरे या रागाचे स्थान!!
    उस्ताद रशीद खान, हे नाव आता शास्त्रीय संगीताच्या रसिकांना परिचित झालेले आहे. अत्यंत मुलायम आवाज, ताना घेताना देखील शक्यतो खंडित स्वरूपाच्या घ्यायच्या, ज्या योगे प्रत्येक सुराची "ओळख" रसिकांना घेता यावी. मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात शक्यतो गायन सादर करण्याची प्रवृत्ती. सरगमचा अतिशय सुंदर उपयोग करणे, इत्यादी अनेक वैशिष्ट्ये, या गायकाची सांगता येतील. गायन ऐकताना काहीवेळा उस्ताद अमीर खान साहेबांच्या गायनाचा प्रभाव जाणवतो, विशेषत: लयकारी ऐकताना, हा प्रभाव जाणवतो. "रामपूर साहसवान" घराण्याचा जरी गायक असला तरी इतर सगळ्या घराणेदार गायकीतून, चांगले उचलून, स्वत:च्या गायकीत मिसळून, स्वत:ची अशी वेगळीच गायकी प्रस्थापित केली. काहीवेळा खर्जातील सूर लावताना, पंडित भीमसेन जोशींचा देखील ठसा दिसतो. याचा अर्थ इतकाच घ्यायचा, उस्ताद रशीद खान यांनी, सगळ्या घराण्यांची वैशिष्ट्ये आपल्या गायनात सामावून घेतली आहेत.
    " ओ रे दिन आज" या बंदिशीत, विशेषत: आलापी ऐकताना, आपण वरती जी "मिंड" मांडली आहे, तिचा अनुभव घेता येतो. खरतर, मला बरेचवेळा " रागदारी गायनातील भावगीत" असे म्हणायचा मोह होतो इतके भावपूर्ण गायन असते. कुठेही स्वर लावण्याचा खटाटोप नाही की कुठे अडखळणे नाही. ज्या सहजतेने, कोमल स्वर लावले जातात त्याच सहजतेने, शुध्द स्वर आणि तीव्र स्वर घेतले जातात आणि वरच्या पट्टीत गाताना, कुठेही स्वर "ताणला" आहे, असे न होता, स्वरांचे "मुलायमपण" कायम राखले जाते. ऐकताना, काहीवेळा "कोमल गंधार" स्वराचा भास होतो पण तो प्रभाव आहे "मध्यम" स्वराचा!! या रागात "गंधार" स्वराला अजिबात स्थान नाही.
    संगीतकार हेमंत कुमार, यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्याअर्थाने स्थिरावायची संधी प्राप्त झाली, ती "नागिन" चित्रपटाच्या अभूतपूर्व लोकप्रियतेने. या चित्रपटातील सगळी गाणी अप्रतिम आहेत. याच चित्रपटात, या रागावर आधारित अतिशय सुश्राव्य असे गाणे आहे - "जादुगार सैय्या" आणि हे गाणे ब्रिंदाबनी रागाची नीटसपणे ओळख करून देते.
    जादुगार सैंय्या, छोडो मोरी बैय्यां;
    हो गयी आधी रात, अब घर जाने दो".
    मेंडोलीनच्या सुराने सुरु होणारे गाणे, झटक्यात जलद लयीत जाते. ताल, पारंपारिक केरवा आहे. यात लय जलद असली तरी इतक्या अप्रतिम हरकती आहेत की, प्रत्येक हरकत अत्यंत बारकाईने न्याहाळावी. तालाच्या प्रत्येक मात्रेगणिक हरकत आहे आणि त्यामुळे चालीला एक सुंदर निमुळते "टोक" येते. प्रणयी गाणे आहे आणि चाल तशी साधी असली असली तरी मनाची लगेच पकड घेते. अर्थात, उडत्या तालामुळे हे शक्य होते. साधी चाल असून देखील, त्यात "गायकीला" कसा वाव मिळतो, याचे हे गाणे म्हणजे नमुना आहे. या गाण्यावर तालाचा इतका प्रभाव आहे की, ताल बाजूला ठेऊन, केवळ हरकती ऐकायच्या तर त्याला फार प्रयास पडतो.
    मघाशी मी लिहिताना, एक वाक्य लिहिले आहे, या रागाचे "मेघ" रागाशी फार जवळचे नाते आहे आणि जर का स्वरांची ठेवण नेमकी ठेवली नाही तर रागांची "गल्लत" होऊ शकते. खालील गाणे, माझ्या या म्हणण्याला "दाखला" म्हणून देता येईल. "सावन आये, या ना आये" हे, "दिला दिया दर्द लिया" या चित्रपटातील गाणे, आपण ऐकुया. गाण्याचे शब्द तर स्पष्टपणे, " मेघ" रागाशी जवळीक दाखवतात पण तरीही, पहिला अंतरा जिथे संपतो तिथे सतारीचे सूर आहेत, तिथे "ब्रिंदाबनी सारंग" दिसतो. खरतर, या रागाची उत्तम ओळख या गाण्यातून आपल्याला होते.
    "सावन आये, या ना आये;
    जिया जब झुमे सावन है".
    या गाण्यात चक्क दोन ताल आहेत. १] केरवा आणि २] त्रिताल. गाण्याची सुरवात त्रितालाने होते पण पुढे त्याच लयीत केरवा ताल मिसळतो. फारच सुंदर प्रकार आहे. या गाण्यात पहिला अंतर संपत असताना, "नि सा रे म प" ही जी सरगम आहे, तिथे हा राग सिद्ध होतो. रागदारी संगीताची आवड आणि ओळख करून घेण्यासाठी हे गाणे एक अप्रतिम उदाहरण म्हणून सांगता येईल.
    मंगेश पाडगावकरांनी अनेक चिरस्मरणीय भावगीते लिहिली आहेत. प्रस्तुत गीत हे त्यातील अजरामर स्वरूपाचे गीत आहे. वास्तविक, या कवितेचा ढाचा थोडासा "कथात्म" स्वरूपाचा आहे, क्वचित गद्याकडे झुकणारा आहे परंतु तरीही संगीतकार यशवंत देवांनी चाल लावताना, चाल कुठेही रेंगाळणार नाही आणि प्रवाहित्व कायम राहील, इकडे नेमके लक्ष दिले आहे. सुगम संगीतात, चाल कुठेही रेंगाळणार नाही, याकडे बारकाईने भान ठेवावे लागते. "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" या गीतातून, समर्थपणे, हा राग दिसून येतो.
    "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी,
    अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी".
    अरुण दाते यांनी, हे इतके मोठे गाणे असून देखील, अतिशय सुंदर गायले आहे. गाण्याच्या सुरवातीला वाजलेल्या सनईमधून, "ब्रिंदाबनी सारंग" रागाची झलक मिळते. खरतर, हे गाणे म्हणजे आत्ममग्न कथासूत्र आहे. अर्थात, याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शब्दानुरूप बदलेली चाल. लय तशीच कायम ठेऊन, सुरांत किंचित बदल करून, आवश्यक तो "भाव" सुरांतून व्यक्त करायचा. हा खेळ इथे फारच बहारीने साधला आहे. त्यादृष्टीने या गाण्यात वाद्यमेळाचे फारसे प्रयोग नाहीत आणि प्रत्येक अंतऱ्यात जवळपास तशीच " धून"कायम ठेवली आहे.
    "रुदाली" चित्रपटात या रागाची नव्याने ओळख दाखवणारे एक नितांत रमणीय "झुठी मुठी मितवा" असे गाणे आहे. संगीतकार भूपेन हजारिका यांची चाल असून, लताबाईंनी हे गाणे गायले आहे.
    "झुठी मुठी मितवा आवन बोले,
    भादो बोले कभी सावन बोले;
    बादलों पे चलने को चाहू पिया,
    आओ मेरा झुलना झुलाओ पिया
    झुठी मुठी मितवा आवन बोले."
    कवी गुलजार यांची शब्दकळा देखील चित्रदर्शी आहे. चित्रपटातील प्रसंग आणि वातावरण, याचे नेमके चित्रण त्यांनी आपल्या कवितेतून केले आहे. या गाण्यात देखील आपल्याला "मेघ" रागाचा भास होण्याची शक्यता आहे आणि तसे बारकाईने ऐकले तर तसाच भास होतो पण गाण्याची काही "वळणे" ही "ब्रिंदाबनी सारंग" राग दर्शवतात.
    मराठी नाट्यगीतांत अभिमानाने स्थान मिळवणारे गीत - "साद देतो हिमशिखरे" हे गाणे या रागाची अशीच फसवी ओळख करून देतात. मराठी संगीत नाटकांत, "संगीत मत्स्यगंधा" या नाटकाचे नाव चिरस्मरणीय ठरले आहे आणि त्यामागे, पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची कामगिरी अतुलनीय आहे,. त्यांनी, नाट्यगीतांचा ढाचा(च) बदलून त्यात अधिक लालित्य आणले आणि भावगीताच्या जवळ आणून सोडले. अर्थात, असे करताना त्यांनी, रचनेत विस्ताराच्या असंख्य शक्यता निर्माण करून ठेवल्या असल्याने, गाताना "गायकी" दाखवण्याचा अवसर गायकांना नेहमी मिळतो.
    "साद देती हिमशिखरे, शुभ्र पर्वताची;
    क्रमीन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची".
    आता या गाण्याकडे कविता म्हणून वेगळ्या बाजूने बघितले तर, शब्दकळा पूर्वीच्या गाण्यांपेक्षा काहीशी निराळी आहे. मुख्य म्हणजे अर्थ आकळून घेताना फारसा प्रयास पडत नाही. हाच आशयाचा गाभा ठेऊन, अभिषेकी बुवांनी गाण्याच्या चाली बांधल्या आणि मराठी संगीत रणभूमीवर नवे मन्वंतर घडले. रामदास कामत यांनी हे गाणे गायले असून, गायनाची धाटणी देखील अतिशय सहज, सुगम अशी ठेवली आहे. गाण्यात तानबाजी, हरकती आहेत पण त्यांचा भरमार नसून, त्यात एक प्रकारचा लडिवाळपणा आहे.
    "संथ वाहते कृष्णामाई" या मराठी चित्रपटाचे शीर्षक गीत देखील याच रागाची अनोखी ओळख करून देते. संगीतकार दत्ता डावजेकर यांनी चाल बांधताना, वाद्यमेळ आणि त्यातील प्रत्येक वाद्याचा "गुणधर्म" ओळखून संगीत रचना केली आहे. माडगूळकरांची कविता तर अलौकिक आहेच पण त्याला सुरांची असामान्य जोड मिळाल्याने, या गाण्याला चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे.
    " संथ वाहते कृष्णामाई,
    तीरावरल्या सुखदु:खांची जाणीव तुजला नाही".
    आता, कवितेतील शब्द संख्या बघा म्हणजे मग संगीतकाराच्या चालीचे मर्म नेमके ओळखता येईल. एका सलग "मीटर" मध्ये शब्द नाहीत पण तरीही गाण्याची चाल(च) अशा प्रकारे बांधली आहे की त्यातील "गेयता" अचूकपणे ध्यानात येईल. गाण्याचा "ठेका" देखील किती विलक्षण आहे. गाणे अतिशय संथ लयीत आहे आणि तोच या चालीचा "स्वभाव" आहे. स्वभावानुसार तालाचे महत्व ठेवले आहे आणि गाण्याच्या पार्श्वभागी बहुतांशी बासरी आणि व्हायोलीन वाद्यांचे स्वर तरळत ठेवले आहेत. परिणाम असा घडतो, गाण्याची चाल आपल्या मनात कायमचे स्थान मिळवते.
    - अनिल गोविलकर

  • बाजार

    प्रतिमेची पुजा करिता,

  • जगाचा १०० वर्षांचा इतिहास फक्त १० मिनिटात !!! फास्ट ट्रॅकवरुन …..

    जगाचा १०० वर्षांचा इतिहास फक्त १० मिनिटात !!! फास्ट ट्रॅकवरुन …..

  • मुंबईकर..

    तुम्ही मुंबईकर आहात जर…

    १) कोणी एखादी जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही.

    २) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप.

    ३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने नाही तर, खरे कारण तुमच्या मनातले खरे कारण पावसाळा “सुरु = ट्रेकिंग सुरु= किंवा भटकंती सुरु “हे तुमचे समीकरण असते.

    ४) जगातले सर्वोत्कृष्ट स्नॅक कम स्टेपल फूड हे वडापाव आहे हे तुमचे ठाम मत असते. बेस्ट वडापाव वाला हा तुमच्या गल्लीतला (ज्याच्या कडून तुम्ही नेहेमी वडापाव घेता तो ) असतो हे तुमचे ठाम मत असते.

    ५) तुमचा वडापाव वाला जगातला उत्कृष्ट वडापाव बनवतो हे तुमचे पक्के मत असते. जर कधी चांगला वडा पाव हा मुद्दा डिस्कशन ला निघाला की तुम्ही आपल्या वडापाव वाल्याचे नाव पुढे करता आणि आपल्या मतावर ठाम असता. दुसरी गोष्ट म्हणजे वडा-पावाची तुलना कोणी मॅक डी बरोबर केली की तुमचा जळफळाट होतो.

    ६) तुम्ही कुठेही पाणीपुरी/भेळपुरी खाऊ शकता, पण पाणी प्यायची वेळ आली की बिसलेरी विकत घेता.

    ७)तुम्ही जिम मधे जाणे टाळता, कारण तुमच्या मते तुमचा दररोज जो लोकल मधे चढणे उतरणे, आणि ब्रिज चढणे उतरणे हा व्यायाम पुरेसा असतो, पण जर कोणी जातच असेल तर तो मात्र जिम पर्यंत बाईक/कार ने जातो..

    ८)लोकल मधे प्रवास करतांना जो पर्यंत कोणी तुमच्या पायावर पाय देत नाही तो पर्यंत लोकल मधे गर्दी आहे अशी तक्रार तुम्ही करत नाही.

    ९) क्रिकेट हा खेळण्याचा नाही तर बोलण्याचा /गप्पा मारण्याचा विषय आहे हे पुलं चे मत तुम्ही पुरेपूर सिद्ध करता. सचिन चे कसे चुकले? धोनी कसा वाईट कॅप्टन आहे वगैरे वगैरे विषयावर तुम्ही तास अन तास बोलू शकता.

    १०) मुंबई बाहेरच्या लोकांशी बोलतांना तुम्ही मी कुलाब्याला जातोय हे न सांगता टाऊन साईडला जातोय हे सांगता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे न समजल्याचे भाव एंजॉय करता.

    ११)तुम्हाला अगदी दादर पासून मुंबई सेंट्रल ( ३-४ स्टेशन )ला जायचे असले तरी पण तुम्ही फास्ट लोकलने प्रवास करता. त्या साठी तुम्ही आधीच्या दोन स्लो लोकल सोडून देता.

    १२)पावसाळा सुरु झाला की तुमच्या बॅग मधे छत्री विराजमान होते. अगदी निरभ्र आकाश जरी असलं तुम्ही छत्री वागवत फिरता.

    १३)भरपूर पाऊस पडल्याचे प्रुफ म्हणजे लोकल बंद पडणे. जो पर्यंत लोकल बंद पडत नाहीत तो पर्यंत तुम्ही खूप पाऊस खूप पडल्याचे मान्य करत नाही.

    १४) टुम्ही पावसाळ्यात मिलन सबवे बंद झाला का? हिंदमाता जवळ पाणी भरलं का? कुर्ल्याच्या ट्रॅक वरच्या सिग्नल प्रणाली पाण्याखाली बुडाल्या का? यावर लक्ष ठेऊन असता.

    १५) हापूस आंबा हा तुमचा विक पॉइंट असतो. तुम्ही जर मूळचे कोकणातले असाल, तर तुमच्या घरी दहा आंब्याची कलमं, २० सुपारीची आणि २० नारळ असतातच, पण तुमच्या जवळच्या नातेवाईकाने सगळे हडप केल्यामुळे तुम्हाला आंबे विकत घ्यावे लागतात हे तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगत असता.

    १६)तुम्ही बहुतेक मुंबईच्या हिंदी भाषेतच सगळ्यांशी बोलता, पण जेंव्हा एखाद्या हिंदी भाषीय माणसाबरोबर लोकल मधे भांडण होते, तेंव्हा तुम्ही आपल्या मराठीत बोलणे सुरु करता.

    १७) ८-०६, ८-३५ ९-५१ ह्या सगळ्या वेळा तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात .

    १८)तुमच्या दृष्टीने तुमच्या उत्तरेला (नॉर्थ बॉंबे ला) रहाणारे सगळे खालच्या दर्जाचे, आणि दक्षिणेला ( साऊथ बॉंबे साईडला) रहाणारे शायनिंग मारणारे असतात. सेंट्रल आणि वेस्टर्न लाइनला हे लागू होत असतं.

    १९)तुमच्या दृष्टीने १० बाय १२ ची खोली म्हणजे हॉल असतो.

    २०) स्टॉक मार्केट तुमचा विक पॉइंट असतो, तुमची इनव्हेस्टमेंट अगदी ५० हजार असेल तरी सुद्धा, तुम्ही स्टॉक च्या मुव्हमेंट्स वर नजर ठेऊन असता आणि लोकल मधे डिस्कशन सुरु झाले की हिरारीने आपली मतं मांडता.

    २१)गर्दी नसली की तुम्ही नर्व्हस होता.

    २२) पावसाळ्यात गुडघाभर घाणेरड्या पाण्यातून गर्लफ्रेंडला बाइक वर मागे बसवून ड्राइव्ह करणे ही तुमची रोमॅंटीझम ची अल्टीमेट आयडीया असते.

    २३) ड्राइव्ह करतांना दहाव्या मिनिटाला तुम्ही इतरांना शिव्या देणे सुरु करता.

    २४) तुमच्या दृष्टीने मुंबई मधे आत शिरतांना ३० रु टोल टॅक्स हा योग्यच आहे

    २५)तुमच्या घरी पेपर वाला दर रवीवारी पेपर सोबत कमीत कमी ५ तरी निरनिराळे होम डीलिव्हरीचे मेन्यु टाकुन जातो, आणि तुमच्या कडे असे सांभाळून ठेवलेले कमीत कमी २० एक तरी होम डिलिव्हरी मेन्यु कार्ड्स असतात.

    २६) तुमच्या स्पिड डायल वर एक किराणा दुकानदार नक्कीच असतो.

    २७)तुम्ही राणीची बाग, तारापोरवाला मत्सालय, किंवा म्युझियम कधीतरी लहान असतांना एकदा पाहिलेले असते. नंतर तुम्ही या ठिकाणी कधीचे गेलेले नसता.

    २८) तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्ती चांगलं वागायला लागली की तुम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल संशय वाटतो.

    २९) निरनिराळ्या भाषेतल्या शिव्या तुम्ही आधी शिकता, आणि त्या शिकल्या की त्यांचा मुबलक वापर केल्यावर आपल्याला ती भाषा येते असा तुमचा समज असतो. ( जसे गांडाभाई, बोकाचोदा वगैरे वगैरे)

    ३०) तुमच्या फ़्लॅटला एक नेहेमीचे दार आणि एक वॉच डोअर ( जाळीचे दार) नक्कीच असते. बाहेर जातांना तुम्ही मुख्य दाराला, एक लॅच लॉक, दुसरे कडी घालून लॉक आणि तिसरे लॉक जाळीच्या दाराला लावून आणि प्रत्येक कुलुपं तीनदा चेक करूनच तुम्ही बाहेर पडता.

    ३१) बार मधे गेल्यावर ५५ रुपयांच्या बिअर साठी तुम्ही २०० रुपये अगदी विना तक्रार देता , पण रिक्षावाल्याला एक रुपया पण जास्त देत नाही.

    ३२) सुटी म्हणजे ट्रेकींगला जायचा दिवस हे तुमचे स्पष्ट मत असते.

    ३३) भांडताना हिंदी भाषीय वरचढ व्हायला लागला की तुम्ही भैय्या म्हणून हिणवता, आणि मराठी मधे भांडण मुद्दाम कंटीन्यु करता.

    ३४) हिवाळ्यात जेंव्हा १२ डिग्री तापमान असते तेंव्हा तुम्ही कितना चिल्ड है म्हणून स्वेटर शोधायला लागता.

    ३५) खूप पाऊस पडला की तुम्ही सकाळी बातम्या लावून बसता, कुठे पाणी भरलंय का हे बघायला, म्हणजे ऑफिशीअली ऑफिसला दांडी मारण्याची सोय होते.

    ३६) तुमचे दररोजचे ४-५ तास ऑफिसला जाण्या – येण्यात खर्च होतात.

    ३७)डिओडोरंट हे तुमच्या साठी मस्ट असते.

    ३८) किती अंतर आहे हे तुम्ही मिनिटांमध्ये सांगता – किमी मध्ये नाही.

    ३९) टॅक्सी , ऑटॊ चे मीटर चुकीचे आहे म्हणून तुम्ही कमीत कमी आठवड्यात एकदा तरी त्यांच्याशी भांडता.

    ४०) लोकल मधे प्रवास करतांना गर्दी असेल तर तुम्ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करता, पण जेंव्हा बसण्यासाठी जागा रिकामी असते, तेंव्हा मात्र लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करता.

    ४१) सुटीच्या दिवशी मित्र मैत्रिणी सोबत बाहेर जाऊन खाणे ही तुमचा अल्टीमेट एंजॉयमेंट!

    ४२) तुम्ही संध्याकाळी ५-३२ ला लोकलच्या ब्रिज वरून जात असतांना तुम्हाला ईंडीकेटर वर एखादी फास्ट लोकल १ मिनिटात येत आहे असे दिसले तर तुम्ही धावत जाऊन ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करता. त्या लोकल नंतर दोनच मिनिटांनी दुसरी लोकल आहे हे माहिती असून सुद्धा!

    ४३) कोणाला भेटण्याची जागा म्हणजे रेल्वे स्टेशन वरच्या प्लॅटफॉर्म वरच्या इंडिकेटर खाली ही जागा असते.

    ४४) कुठे टाऊन साईडला जायचे असल्यास तुम्ही घरी कार असूनही शक्यतो लोकल ने प्रवास करता.

    ४५) स्वतःच्याच बायकोला ऑफिस सुटल्यावर बाहेर भेटायला बोलावता, आणि डेट ला घेऊन जाता :)

    ४६) पुणेकर विरुद्ध मुंबईकर हा तुमचा आवडीचा डिस्कशनचा विषय असतो.

    ४७) तुम्ही कुठेही गेलात तरी आपण होऊन कोणी न सांगता पण रांगेत उभे रहाता .

    ४८) तुम्ही कितीही गर्दी असलेल्या लोकल मधून उतरला तरीही तुमच्या बुटांचे पॉलिश खराब झालेले नसते.

    ४९) प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे तुमचं ‘आराध्य दैवत’

    ५०) गणेशोत्सवात एकदा तरी लालबागला रांगेत उभे राहाता.

    ५१) तुमच्यासाठी बांद्रा रेक्लेमेनशन, मरीन ड्राईवच्या समुद्र किनाऱ्यापुढे हवाई आणि होनुलुलु ही ‘झक’ मारतं.

    ५२) मुंबईचा पाऊस + टपरी वरची चहा + चेतानाकडी (सिगरेट) = अल्टीमेट कॉम्बिनेशन !

    ५३) दर पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी माळशेजला जाता आणि दर उन्हाळ्यात एकदा तरी अलिबागला!

    ५४) नवरात्रात दांडिया खेळताना कितीही बोटं मोडली तरि तुम्ही दरवर्षी नचुकता दांडिया खेळायला जाता

    ५५) FM radio is your best Entertainment in Traffic

    ५६) दक्षिणेकडे रहाणारे सगळे ( कर्नाटकी , तामीळ तेलगू ) हे तुमच्या मते “मद्रासी” असतात/

    ५७)रिक्षावाल्याला “ए रिक्षा” म्हणणे

    ५८)वयस्कर taxi वाल्याला “अंधेरी जायेगा?” असं एकेरी विचारणे आणि त्याने देखील वाईट वाटून न घेता सरळ “नही” असं निर्विकारपणे सांगणे हे देखील मुंबईतच.

    ५९)आपल्या गावी गेल्यावर “आमच्या बॉम्बेला ” हि तर चाकरमान्यांची हमखास सुरुवात!

    ६०)आपल्या गावी गेल्यावर सगळे लोकं कसे संथ वागताहेत, कोणाला काहीच काम नाही का? अशा कॉमेंट्स करणे.

    ६१)स्त्रियांचे स्पेशल :- लोकल मधे क्लिपा, नेलपॉलिश वगैरे विकायला येणाऱ्याचा खजीना उचकटून पहाणे , आणि घरी गेल्यावर नवऱ्यापुढे खजीना रिता केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दाखवणे.

  • देश-विदेशातील दीपावली

    दीपावली  म्हणजे पाच  सणांचा सामुहिक प्रकाश पर्व. वास्तविक प्राचीन मान्यतेनुसार या पाच उत्सवांशी वेगवेगळ्या घटना जोडल्या गेल्या आहेत.

  • आरोप…

    वर्तमान राजकीय-सामाजिक परिस्थिती ही फारच विदारक व केविलवाणी आहे, तरी ती परिस्थिती कमीत कमी शब्दात मांडण्याचा/व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.