आई

आई……………………





जळली स्वप्नफुलेही

अक्रोशीत नेत्र वितळले

मज पदोपदी वाटेवर

श्वासाने निर्दय छळले

घडली पुढ्यात पापे

रक्त न कधी उसळले

मिसळले कशामध्ये ते ..

कुणीकडे ते वळले …?

या शब्दांना मी माझ्या

जगतावर उगा उधळले

कधी उष्टावल्यावरी मी

कवितेने मला विसळले

ती नाहीम्हणूनी माझे

प्रारब्धच अवघे मळले

मी फिरता माझ्यामधुनी

अस्तित्त्व तिचे आढळले

— गजानन मुळे

Author