चित्रपट निर्मितीत अपयशी ठरूनही नलिनी चोणकर यांनी आपली अभिनयाची कारकिर्द सुरूच ठेवली, म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा….’ हे नलिनी चोणकर यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही प्रेक्षकांना भुरळ घालते.
प्रेम – आज किती तकलादू झालय हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न
अभिनेता दिलीप कुमार म्हणतात
"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती माझ्या... सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग.....
एकदा मी विमानाने प्रवास करत होतो...
माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता...
माणूस खुपच Simple...कपडे त्यांनी साधे च लावलेले... Middle class वाटत होता... पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता..
मी विमानात आहो हे लक्षात येताच इतर प्रवासी मला हात दाखवू लागले... पाहू लागले.. पण माझ्या बाजुला बसलेला Gentleman ते आपल्या कामात मग्न होते... त्यांनी माझ्याकडे लक्ष पण नाही दिलं... ते वर्तमानपत्र (Newspaper) वाचत बसलेले.. खिडकी च्या बाहेर बघत होते.... पण ते माझ्याशी बोलले पण नाही... बोलणं तर दूरच बघितलं सुद्धा नाही..
जेव्हा चाय प्यायची वेळ आली मीच त्यांना Smile दिली...
ते पण हसून उत्साहाने मला Hello म्हणाले..
मग आम्ही बोलायला लागलो...
मी सिनेमाचा विषय काढला आणि त्यांना विचारलं, "सिनेमा बघता ना?"
ते म्हणाले, "हो, पण खुप कमी...खुप वर्ष झालीत शेवटचा सिनेमा पाहून.."
मी म्हटलं की मी स्वतः सिनेमात काम करतो..
"अरे वाह! काय करता तुम्ही?" त्यांनी मला विचारलं.....मी अभिनेता आहे त्यांना सांगितलं...
ते म्हणाले “अच्छा...छानच..”
जेव्हा आम्ही पोहोचलो... विमानाच्या बाहेर निघताच...
मी माझा हाथ समोर करून म्हटलं.. “खरंच, खुप छान वाटलं तुमच्या बरोबर प्रवास करून,, बाय द वे, माय नेम इज दिलीपकुमार’
त्यानी माझ्याशी हात मिऴवला आणि म्हटलं..’अरे वा....I am J. R. D. Tata!’
*त्याक्षणी मी शिकलो की तुम्ही किती पण मोठे व्हा,,तुमच्यापेक्षा नेहमीच कोणीतरी मोठं असणार.. “माणसानी अहंकार न बाऴगता नम्र असावं... '
iL'se It......
* costs nothing”*
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
त्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा.
टि सी ला आलेला पाहून पुणेकर जोशी काका उभे राहिले आणि आपलं तिकीट शोधू लागले .
पहिले शर्ट ची खिसे तपासली, मग पँट ची खिसे तपासली, मग बनियन चा पण खिसा तपासला ...
मग एका मुंबईकर ने विचारले,"काय शोधताय?"
जोशी काका,"तिकीट ...!"
मुंबईकर हसून,"मग तुमच्या तोंडात काय आहे ?"
जोशी काका,"अरेच्चा, हो की ...!"
ते अर्धवट भिजलेलं तिकीट कसंबसं तपासून टि सी गेला ...!
मग काय मुंबईकरांनी पुणेकर जोशी काकाच्या विसरभोळे पणाची टिंगल उडवली ...!
शेवटी जोशी काका त्यांना मुर्खात काढत म्हणाले,"ते तिकीट कालचं होतं . मी मुद्दामून तोंडात धरुन त्यावरची तारीख उडवली .
तुम्हा मुंबईकरांना नाही कळायचं ...!"
मुंबईकर शाॅक्स ...!
पुणेकर राॅक्स ...!
१९६८ साली प्रदर्शित झालेल्या एकटी या चित्रपटातील हे गीत. गदिमांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत स्वरबद्ध केलं सुमन कल्याणपूरकर यांनी. या गीताचे संगीतकार होते सुधीर फडके..
1. रविवारची गाफील सकाळ:-
ते सगळं अशाच एका आळसटलेल्या रविवारी सूरू झालं... सोनाली स्वयंपाकाच्या तयारीत, संगणकावर ह्रूदयनाथ मंगेशकरांची गाणी आणि मी मस्त चहा पीत, पेपर वाचत बसलो होतो. चिन्मयी आली आणि म्हणाली " बाबा school मध्ये Elocution Competition अाहे, मराठा history च्या topic वर speach तयार करायचीय. मला help कर ना"
मी " हूं...help? आईला विचार.. आई छान सांगेल"
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आतून एक खरमरीत आणि निर्वाणीचा ईशारा आला " तो पेपर बाजूला ठेव आणि ती काय सांगत्येय ते नीट ऐक"
मग मी योग्य तो निर्णय घेतला...म्हणजे पेपर बाजूला ठेवला.
"काय यार एवढ्या लहान मुलांना लिहून देणार? CBSC वाले पण YZ आहेत. एकदा पंजाब history, एकदा गुजराथ history....... आणि ते पण पोरांनीच करायचं कधी project तर कधी हे असलं Elocution.... कोणाच्या बापानी शिकवल्येय अशी history"
हो.... यात जरा त्रागा जास्त झाला पण मघाशी मी पेपर बाजूला ठेवला ही काही माझी माघार न्हवती हेही मला कूठेतरी दाखवून देणं गरजेचं होतं.
सोनाली शांतपणे " हो ना? मग तू शिकव ना तीला एखादी गोष्ट तूला हवी तशी....पीलू आपलं आहे आपणच त्याला घडवायचं... " (दरम्याने संगणकावर वेडात मराठे वीर दौडले सात गाणं सूरू होतं) "आता हे गाणं बघ.. सांग याची एक गोष्ट तीला समजेल तशी..ती सांगेल शाळेत. शिवचरित्राची पारायणं केली आहेस म्हणतोस तर बघूयाच तू कशी शिकवतोस ही history तीला"
आपल्याला असं clean bold करण्याची हूकमी कसब बायकोच काय ती जाणे. पण गोष्ट मात्र खरी होती, मलाही पटली होती. आता मात्र वेडात दौडलेल्या सात मराठ्यांची गोष्ट चिन्मयीला शिकवायचीच असं ठरवून टाकलं.
2. फिरंगी भाषेच्या वेढ्यात:
सुरूवात लगेचच केली. आधी चिन्मयीला घोड्याच्या टापांच्या ठेक्यावर मंगेशकरांनी बसवलेलं गाणं परत ऐकवलं. तीलाही आवडलं. मग सुरूवात तीला गोष्ट समजावून सांगायची...
" ही ना सात खूप शूर मराठा सरदारांची आहे, ते रागाच्या भरात चाळीस हजार शत्रू सैन्यावर चालून गेले."
चिन्मयी " बाबा चाळीस हजार म्हणजे? "
मी "Fourty thousand"
आता मात्र चिन्मयी अवाक्...
" but why baba? How can they be so stupid? मरणार नाहीत का ते?"
नकळत काटा टोचावा तसा तीचा "Stupid" शब्द मला टचकन् टोचला. कुसूमाग्रजांनीही त्यांना "वेडात" दौडले असंच म्हटलं होतं. पण ते "वेड" आणि या "Stupidity" यातला फरक मला खूप कासावीस करत होता. तीला चाळीस हजार म्हणजे forty thousand सांगणं मी समजून घेऊ शकत होतो पण तीच्या सात मराठ्यांचा आवेश न समजण्यानं मी इतका अस्वस्थ का होतो? कुठली तरी मनोमन जपलेली मौल्यवान् वस्तू हरवल्यावर वाटतं तसं वाटायला लागलं. इंग्रजी माध्यमात शिकणार्या माझ्या पिलापर्यंत काही गोष्टी माझ्या मराठीतून पोचणारच न्हवत्या. "इतक्या उपरी बदफैली केलीया मारले जाल" या शब्दातली जरब तीला कधीच जाणवणार न्हवती.
"आधी लगीन कोंडान्याचं" या शब्दातला रांगडा निर्धार तीला कळणार न्हवता. "लाख जावोत पण लाखांचा पोशिंदा राहो" म्हटल्यावर तीला दोन हातात दांडपट्टा घेतलेला बाजीप्रभू दिसणार न्हवता. निव्वळ इतिहास रंजनापलिकडे जाऊन या गोष्टी आम्हाला काही मूल्य शिकवून गेल्या. आणी त्या मूल्यांसाठी म्रुत्यूच्या दाढेत प्राण वैरून बसणारी ही माणसं हा आमचा वारसा होता. आज मात्र हा अनुवंशिक ठेवा मी पुढे देऊ शकत नाहीये असं वाटलं. रहाणीमान फक्त भाषेच्या विळख्यात न्हवतं, तर वेढा होता त्या भाषेबरोबर आलेल्या पाश्चात्य संस्कारांचा..........
3. फिरंगी भाषेतला "एल्गार":
मग विचार केला की जे आपल्याला कळलं आणी भावलं ते चिन्मयीला कळेल असं म्हणजे इंग्रजीतच का सांगू नये?
थोडं वाचन सूरू केलं. इंग्रजांच्या इतिहासातही अशा एका बेदरकार साहसाची नोंद आहे. क्रेमियाच्या युद्धात असेच सहाशे इंग्रज सैनीक शत्रू सैन्याच्या महासागरावर चालून गेले होते. लाँर्ड टेनीसन नावाच्या कुण्या गोर्यानं त्यांची शौर्यगाथा " March of light brigade" नावाच्या कवितेत व्यक्त केली आहे. ( wiki वर अवश्य वाचा). तो म्हणतो " Into the valley of death rode the six hundred". हे वेडात दौडलेल्या सात मराठ्यांसारखच होतं. फरक इतकाच की ते सहाशे होते आणी आमचे फक्त सातच होते. मग तर या सातांची गोष्ट इंग्रजीत सांगायलाच हवी. शिवाय भारतातील बर्याच बिगर मराठी लोकांना ही गोष्ट माहीतच नाहीये.
लाँर्ड टेनीसनच्या भाषेचा प्रभाव होताच. आता कुसूमाग्रजांची मनोमन माफी मागून लिहायला बसलो. पहाता पहाता Seven maratha warriors इंग्रजीत अवतरले......
With the blazing swords those
rose out of their sheathers
Oh they were so fearless
Seven maratha warriors
They saw their commander bit sombre
But his eyes were red with anger
They saddled the horses
with javelines that were longer
With the whirls of dust
they disappeared into frontiers
Oh they were so fearless
Seven maratha warriors
Leaving behind their
dumbfounded army
Vengeance to concur
same treacherous enemy
They took on the battle
in enemy yard so galantly
Like seven fireballs
Blew away enemy barriers
Oh they were so fearless
Seven maratha warriors
Their bravery leaves the
Trail till the horizon
The wind is humming
Songs of the martyrdom
A tribute to them for
for selfless heroism
We salute them,
Those braveheart warriors
Oh they were so fearless
Seven maratha warriors
4. समर्पण
चिन्मयीला आता Seven maratha warriors जरा चांगले समजले आणि आवडले आहेत. तीच्या elocution मध्ये तीनं त्यांची शौर्यगाथा इंग्रजी कवितेसह न अडखळता सांगीतली. त्यामुळे आम्ही तीघं जरा खूष आहोत.
पण या अंतरिक्षात आमच्या सारखे कूणी आई बाप अडखळले, तडफडले किंवा कासावीस झाले असतील तर त्यांच्या पर्यंत हा अनुभव पोचावा अशा ईच्छेपोटी हा "Forward" प्रपंच करीत आहे...........इदं न मम असं म्हणून......
जय महाराष्ट्र
SEVEN MARATHA WARRIORS
वेडात मराठे अर्थात्- Seven Maratha Warriors
-- WhatsApp वरुन आलेला मेसेज मला आवडला म्हणून शेअर केला.
-- सुशांत
हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्पाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग करुन वीजेच्या भारनियमनावर मात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे.
खरच कधी कधी जरा अतीच होत....
प्रेमविरांच हो.....
आता बघा ना....
प्रेमात पडताना..... प्रेमावर असे काही काव्यरचना करतात की......
जगातील सर्वंचजणांनी फक्त प्रेमाचेच गोडवे गायला पाहीजेत .... अस सांगतात...
प्रेमात पडल्यावर ......
हे जग फक्त "प्रेमावरच" चालत अथवा चाललच पाहीजे..... असा घट्ट गैरसमज होतोच..... शिवाय तिच्यावर शब्दसंग्रहाचे अनेक गणिते करत गिते तयारही करतात....
समजा जर प्रेमभंग झाला तर....
यांचे प्रेमविरहाचे
काव्य....
चारोळ्या....
गित.......
सल्ले.....
ऊदास आशावाद......
झक्-मारत वाचावे लागते.....
मित्रांनौ .....
नका रे ....... अस करु...... बाकी तुम्ही सुज्ञ असालच..
-- विवेक जोशी
बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती शुभ्र पाषाणाची संगमरवरी असून पुरुषभर उंचीची बसलेली आहे. मूर्ती शुभ्र संगमरवरी पाषाणाची आहे. कानाजवळ मदस्रावाचे चिन्ह म्हणून काळ्या रेघा दिसतात.
Copyright © 2025 | Marathisrushti