मिडीया मॉडेलिंग….एकीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या,
एकीकडे मॉडेलची आत्महत्या आहे.
वात्रटिका
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन
घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?
या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.
रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!
- रवी उवाच
विकास,
'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.
(१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.
(२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.
(३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.
(४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.
(५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.
-- रवी अभ्यंकर
माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कऱ्हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.
……………मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले.
कवी “बी” यांच्या चाफा बोलेना…चाफा चालेना… या कवितेचा मानसी पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेला रसास्वाद
मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे मुंबईला प्रगत बनविण्यासाठी. फारच कमी जणांना माहिती असेल की मुंबई मराठी माणसाने विकत घेतली आहे. होय, हे खरे आहे. संयुक्त महाराष्ट्र जन्माला येण्यासाठी गुजरातला महाराष्ट्राने कोट्यवधी रुपये दिले आहेत. .
येथे हवी शिवबांची कठोरता,
येथे हवी सुभाष चंद्रांची निस्सीमता,
येथे हवी सावरकरांची दैदीपत्यमानता,
येथे हवी भगतसिंघांची चपलता,
तरच आपला निभाव लागणार हाय,
तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!
बोरकरान्च्या निवडक कविता
लहानपाणापासून मयुरला विविधांगी नकला करून त्यातून इतरांचं मनोरंजन करण्याची आवड होती, त्याच सोबत अभिनय क्षमता आणि ” फोटोजिनिक फेस ” यामुळे टी.व्ही.च्या जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठीचे दरवाजे खुले झाले.” एक गुणवान कलाकार व मॉडेल ” , ” कुशल संघटक ” , आणि ” उत्तम व्यावसायिक “म्हणून नाव सर्वश्रुत होतयं त्याच्या कला कारकिर्दी विषयी आणि श्री शककर्ते प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती या मुलाखतीतून “
आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे !
पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये गेल्या नाहीत.
मी तर तेव्हां डेक्कन जिमखान्यावरील डे जि भावेस्कूलमध्ये [आत्ताचे सौ विमलाबाई गरवारे प्रशाला] शिकत होतो. त्यावेळी पुण्याला शांत पुणे, पेन्शनरांचे पुणे, सायकलींचे पुणे, अश्या विविध चांगल्या विशेषणांनी संबोधले जायचे. पर्वती, पद्मावती, विठ्ठलवाडी, कोथरूड, ही ठिकाणे पुणे शहरापासून खूप दूर मानली जायची. सुट्टीच्या दिवशी, आलेल्या पाहुण्यांना पेशवे पार्क, तळ्यातला गणपती (आत्ताची सारसबाग) दाखवायला न्यायचे म्हणजे, आपण किती लांब आलो, असे वाटायचे. पौषाच्या महिन्यात पद्मावती येथे आवळीभोजनाला जायचो. कार्तिकी एकादशीला विठ्ठलवाडीला शाळेची सहल जायची. तेव्हा ह्या ठिकाणी बसची सोय नव्हती.
आप्पा बळवंत चौक ते डेक्कन जिमखाना बसचं तिकीट फक्त पाच पैसे होतं, आम्हां शाळकरी मुलांचा महिन्याचा तेव्हां बस पास काढला जायचा फक्त दीड रुपयात ! पुण्यात एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये रिक्षा आली, तथापि रस्त्यावर मोठी वर्दळ होती ती सायकलींची, हं, प्रवाशांकरिता वाहन म्हणजे घोड्याचा टांगा ! शनिवार पेठेतून, शिवाजीनगर एसटी बस स्टँडला जाण्यासाठी टांगेवाल्याला फक्त चार-सहा आणे द्यावे लागायचे, अर्थात तेव्हां ते सुद्धा जास्त वाटायचे.
संध्याकाळी शनिवारवाड्यापुढील पटांगणात नामवंतांची व्याख्याने ऐकायला मिळायची. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, ह्यांची ऐकलीली श्राव्य अशी व्याख्याने आजही आमच्या कानामनात घुमत आहेत. गणेशोस्तव साजरे व्हायचे, मेळे भरायचे, त्यामध्ये पं भीमसेनजी जोशी, गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना भोळे, सरस्वती काळे, बी सायन्ना पार्टी, ह्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे. गणपतीमध्ये मंडळांतर्फे रस्त्यावर चित्रपट पाहायला मिळायचे.
उन्हाळ्यामध्ये कुठल्याही रसवंतीगृहात जा, पाच पैशात अर्धा ग्लास, तर दहा पैशात फुल ग्लास रस निवांतपणे पिउन आनद लुटत होतो. फक्त चार आण्यात म्हणजेच पंचवीस पैशात आईसप्रोट - कुल्फी मिळायची. शनिवारवाड्यावर चार आण्यात मस्त भेळ मिळायची !
मंडई मध्ये गेल्यावर एक-दोन रुपये देऊन पाच-सहा पिशव्या भरून भाजी आणली जायची. गोडेतेलाचा भाव दहा आणे शेर झाला म्हणल कि, अरे बापरे, असे वाटायचं ! दिवाळीमध्ये फक्त दहा रुपयात, दहा पिशव्याभरुन फटाके आणले जायचे. घरातील सर्व भावंडांमध्ये ते वाटूनसुद्धा, थोडे बाजूला ठेवले जायचे, ते तुळशीच्या लग्नाला शिल्लक ठेवले जायचे.
अगदी मनापासून, प्रांजळपणे सांगू कां ? तेव्हां आमच्या पिढीने अनुभवली ती मनाची श्रीमंती, आता दिसतीय ती पैशाची !
-- उपेंद्र चिंचोरे
Copyright © 2025 | Marathisrushti