(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सन्मान निरलस नाट्यसेवेचा

    अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे रंगभूमीच्या निरलस सेवेचा सन्मान आहे. बालपणीच नाट्यवेडाने झपाटलेल्या जाधव यांनी अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावली. नाट्य चळवळीची परंपरा असणार्‍या अकोल्यात ही चळवळ अधिक रूजवण्यात आणि त्याद्वारे नाट्य व्यवसायाला बळकटी प्राप्त करुन देण्यात जाधवांचे योगदान मोलाचे आहे.

      December 2, 2010


  • तंबी दुराईंशी एक (लंबी) मुलाखत

    तंबी दुराई यांचं ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर आता रविवारच्या सुट्टीचा अविभाज्य भाग बनलंय. या सदरातल्या विनोदाच्या आविष्करणातली विविधता आणि सातत्य हे वाचकांना अचंबित करणारं आहे. मराठी साहित्यातला विनोद संपलाय अशी हाकाटी करणाऱ्यांना हे सदर ही छानशी चपराकच आहे. विनोदी साहित्याचा आढावा घेणार्‍यांना दखल घ्यायला लावीलच अशी तंबी यांची ही कामगिरी आहे.

      January 3, 2012


  • मी कोण?

    कवीता…

      January 3, 2011


  • भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले?

    भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळाले तेच भारताचे तुकडे होऊन. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य न देता, भारतातील संस्थानांना स्वातंत्र्य दिले. भारताचे दोन भाग पाडले. भारत आणि पाकिस्थान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. सरदार वल्लभभाई पटेलांनी साम, दाम, दंड यांचा यथायोग्य वापर करुन भारत एकसंध राष्र्ट केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच

      April 21, 2011


  • गिनी पिग

    जीवनावर भाष्य करणारी कविता

      September 15, 2013


  • आनो ही! (तो दिवस!)

    ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली! हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं.. कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल..

      June 7, 2021


  • भविष्यातील उर्जास्त्रोत: अणूउर्जा

    अणूउर्जेच्या प्रश्नावरून भारत-चीन-अमेरिका आणि इतर राष्ट्रे महत्वाची भुमिका वटवू शकतात. अणूउर्जेकडे खनिजतेलाला पर्यायी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वापरला जाणारा उर्जास्त्रोत या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

      November 8, 2010


  • माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

    इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.

      June 28, 2012


  • भारतमातेच्या वीरांगना – ३३ – लीला नाग रॉय

    आपल्या शिक्षणासाठी करावा लागलेला झगडा बघून त्यांना त्यांच्या कामासाठी क्षेत्र निवडणे सोपं झालं. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचे ठरवले आणि स्वतःला झोकून देऊन समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले. नुसतेच पुस्तकी शिक्षण नाही तर शारिरिक शिक्षणावरही त्यांनी भर दिला. मुलींनी स्वतःच्या रक्षणार्थ इतरांवर अवलंबून राहणे त्यांना मान्य नव्हते. १९२१ सालच्या बंगाल मधील भीषण पुराच्या काळात, ढाका महिला मंडळ स्थापन करून, त्याच्या मार्फत नेताजींना भरपूर पैसा गोळा करून दिला.

      July 24, 2022


  • नवीन व्रत

    एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण.

    तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट आणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.

    ती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.

    तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत ! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही.

    स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.

    यथासमय देवाच्या देव्हार्‍यात डोकवावे, मन मोकळे करावे.

    एका ग्रुपने what's app ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे.

    रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये. सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ.

    तुम्हीही व्रत हे धरावे,कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ what's app ला पुजावे.

    जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हासही पावो. व्रत सर्व बंधुभगिनींनी करावे. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....मन लाऊन वाचणाऱ्याला एक लाभ,फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ.!!

      June 7, 2017