(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • यात्रा दमणची

    दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो

      June 17, 2011


  • औद्योगिक उत्पादनात भाज्यांचे विविध उपयोग

    सर्वसाधारणत: रोजच्या भाज्या तीन गटात विभागल्या जातात १) फळभाजी २) पालेभाजी ३) शेंगाभाजी वगैरे. आपण प्रत्येकजणं रोजच्या जेवणात भाज्यांचा उपयोग करतोच ज्यामध्ये पोषक द्रव्य, जीवनसत्व, प्रथिन भरपूर प्रमाणात असतात.

      January 8, 2013


  • जाडोबाने मनावर घेतले

      November 15, 2010


  • तो असायला हवा होता म्हणून

    स्थळ : १० वी 'ब' वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई.
    काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा.
    वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२.
    प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.)
    मराठेसर पाच मिनिटे 'राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती'समोर स्वागत आणि प्रोत्साहनपर भाषण करुन हजेरी घ्यायला सुरुवात करतात.

    'प्रफुल्ल अग्निहोत्री'
    "Present Sir".....
    सुट्टी सत्कारणी लावून कमावलेल्या जबरदस्त अमेरिकन ऍक्सेंटमधे प्रफुल्ल आपली उपस्थिती नोंदवतो.
    (सहा मुलींच्या भुवया उंचावतात.)
    'हेमंत बावकर'
    "Yes Sir"
    हेमंत नेहमीच्याच तरल आवाजात गुणगुणतो.
    (मराठेसरांच्या कपाळावर क्षणभर दीड मिलीमिटर जाडीची आठी उमटून जाते.)
    नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीप्रमाणे हजेरी संथगतीने चालू रहाते.

    'प्रविण रेगे'
    "नमस्ते गुरुजी !"
    'ऑं ?'.....धीरोदात्त नायकाचा चेहरा मानधनाचा धनादेश न वटल्यासारखा गोरामोरा होतो.
    आपण चुकून तळकोकणातील
    "जिल्हापरिषद मराठी शाळा क्र.४,वेताळबांबर्डे."मधे आलो असणार अथवा दादांनी (पक्षी : शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब रेगे) आपल्या गळ्यात १० वी 'ब' च्या ऐवजी १० वी 'फ' चा वर्ग अडकविला असणार असे, आंगणेवाडीच्या जत्रेत हरविल्यासारखे भाव मराठेसरांच्या चेहऱ्यावर परावर्तित होतात.
    कथानायक प्रविणच्या चेहऱ्यावर मात्र एखाद्या अजाण बालकासारखे निष्पाप व निरागस भाव असतात.

    प्रविण मार्तंड रेगे !

    चेहऱ्यावर हेच भाव घेऊन प्रविण आमच्याबरोबर शाळेतील बारा वर्षे वावरला.
    माझे आवडते लेखक जयवंत दळवी त्यांच्या 'आल्बम' कादंबरीत लिहितात...
    "आपलं आयुष्य हे भागाकारासारखं असतं. समजा चौदाला चारने भागायचय. तर चार त्रिक बारा.बाकी उरले दोन.आता या बाकीचं काय करायचं ? अशीच काही ना काही बाकी आपल्या आयुष्यातसुद्धा उरत जाते आणि आपण पुढे चालत रहातो."
    मला वाटतं माझ्या मनातदेखील प्रविणच्या खात्यात थोडी गर्दगहिरी बाकी शिल्लक आहे.

    शिवसेनेचा पाळणा जिथे हलला त्या दादरच्या खांडके बिल्डिंगसारख्या राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया जागृत असणाऱ्या परिसरात तो लहानाचा मोठा झाला.त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या घराबाहेर "सारस्वतांचा उपाध्ये" अशी,फुटपाथवरुनही वाचता येणारी पाटी लावलेली होती.(ती बहूदा त्याच्या आजोबांच्या व्यवसायाची जाहिरात असावी.)

    जगातील प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या दरम्यान रेंगाळणारी एक अल्पसंख्य जमात असते. प्रविण त्या जमातीचा बिनीचा शिलेदार होता.रवी शास्त्री, मदनलाल व बिन्नी हे जसे भारतीय संघातील उपयुक्त खेळाडू होते त्याप्रमाणे प्रविण हा आमच्या वर्गातील उपयुक्त सदस्य होता.तो वर्गाच्या कबड्डी आणि क्रिकेट संघात तर असायचाच पण मिलिंद नेरुरकरला शनिवारच्या नाटुकलीमधे काम करायला कोणी मिळाले नाही की तो ऐनवेळी प्रविणला गळ घालायचा.मला स्मरतय,"थांब टकल्या भांग पाडते"सारख्या विनोदी नाटुकलीची नेमकी फार्सीकल नस पकडून तो बघता बघता मिलिंदसकट इतर सहकलाकारांना आरामात खाऊन टाकायचा.(अभिराम भडकमकरच्या 'हसत खेळत' नाटकात विनय येडेकरने जसे अशोक सराफ आणि कंपनीला खाल्ले होते ना,अगदी तसेच.) प्रविण म्हणजे "कमी तिथे आम्ही" या उक्तीची जणू चालतीबोलती जाहिरातच.किंबहुना कोणाच्याही मदतीला धावून जाणे हा त्याचा स्थायीभाव होता.

    पत्यांमधल्या जोकरप्रमाणे कोणाबरोबरही त्याचे गोत्र सहज जमायचे.शाळेतील त्याचा वावरही एखाद्या विदूषकासारखाच असायचा.कधी वर्गावर मुद्दामून उशीरा येऊन,शिक्षकांसकट सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा रोखलेल्या असताना,तो बदकासारख्या दुडक्या चालीने दरवाजापासून आपल्या बाकापर्यंत चालत जायचा.तर कधी केसांचा गोटासदृश्य झीरोकटच करुन यायचा.
    पण आज इतक्या वर्षांनंतर वाटतं की या विदूषकी मुखवट्याआड तो त्याच्या मनातली खदखद किंवा अस्वस्थता आमच्यापासून लपवित तर नव्हता ?

    तो लवकर घरी जायला फारसा उत्सुक नसायचा आणि शक्य तितका वेळ घराबाहेर काढायचा असा मला तेव्हाही अंधुकसा संशय होता.
    एकदा तो मला संध्याकाळी उशीरा शाळेच्या युनिफॉर्ममधेच पार्कात भेटला.त्याच्या खिशात चक्क चार आणे होते.आमच्या शर्टला तर त्याकाळी खिसाच नसायचा.मला न कटवता उलट तो मला पाणीपुरी खायला घेऊन गेला.
    त्यानंतर त्याचा भय्याशी खालीलप्रमाणे प्रेमळ संवाद झडला.
    "भय्या, पानीपुरी कैसा दिया ?"
    'आठ आणा'
    "एक प्लेटमे कितना पुरी आयेगा ?"
    'सात'
    "हम दो दोस्त सात पुरी बराबर कैसे खायेगा ?"
    प्रविणने बिनतोड गणिती सवाल केला.
    (या भय्याने नंतरच्या काळात पवई परिसरात बऱ्याच अनधिकृत चाळी बांधल्या.पण इतका अवघड प्रश्न त्याला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील कधी विचारला नसावा.)
    'ठीक है बाबा, आठ पुरी देगा !'
    "ये ठिक है,यह लो चार आना,हम दोनो को दो-दो पुरी देना !"
    प्रविण विजयी स्वरात म्हणाला आणि हे संभाषण कौतुकाने ऐकणाऱ्या पाच-सहा गिऱ्हाईकांसमोर भय्याचा नाईलाज झाला.
    भय्याला जेरीस आणणारा पहिला मराठी माणूस मी पाहिलेला आहे.

    कधीकधी त्याच्या खिशामधे उघडझाप करणारा एक चार इंची चाकू असायचा.(एकदा सुजाता नाडकर्णीने बसमधून शाळेच्या सहलीला जाताना,सामुदायिक भेळेवर पिळण्यासाठी म्हणून त्याला एक लिंबू कापायला दिले.त्याच्या त्या बोथट चाकूने पातळ सालीचे लिंबूदेखिल कापले जाईना तेव्हा,आपल्याला विश्वासाने हातभर राख्या बांधणाऱ्या वर्गभगिनींसमोर आपले नाक कापले गेले म्हणून तो कमालीचा ओशाळला होता.) हे हौस म्हणून खिशात चाकू बाळगणं वगैरे ठिक आहे पण तो स्वभावाने बिल्कुल खुनशी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हता.शाळेत त्याने कधी कोणाशी पंगा घेतल्याचे किंवा कोणाशी मारामारी अथवा दादागिरी केल्याचे मला तरी आठवत नाही. तो मूलतः मवाळपंथी असावा असं मानायला बरीच जागा आहे.

    १९९१ सालातल्या एका भल्या पहाटे,बांद्राच्या टीचर्स कॉलनीसमोरील रस्त्यावर,प्रतिस्पर्धी टोळीकडून झालेल्या गोळीबारात तो मारला गेला.त्याच्या टोळीप्रमुखावर झालेला गोळीबार मधे पडून त्याने स्वतःच्या अंगावर झेलला म्हणतात.समोरच्याला मदत करण्याचा घेतलेला वसा त्याने मृत्यूच्या दारातदेखील टाकला नाही.

    तो काही राजकारण्यांना आणि बिल्डर्सना वेठीला धरणारा हाय प्रोफाईल गँगस्टर नव्हता.त्यामुळे त्याच्या मृत्यूचाही फारसा गवगवा झाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात 'विवाहितेस जाळले' अथवा 'तरुण बुडाला' अशा सिंगल कॉलमी बातम्यांखाली त्याच्या मृत्युची बातमी छापून आली होती असे सांगतात.

    तो वाममार्गाला का,कधी व कसा लागला याचा शोध घेण्याची वेळ तर कधीच निघून गेली होती. त्याकाळी फिशपॉंड देण्याची पद्धत होती की नाही माहीत नाही पण "आदमी सडक का" हा फिशपॉंड त्याला चपखल बसला असता.

    तो आज असता तर आमच्या वर्गाच्या रियुनियन संयोजनात त्याने उत्साहाने भाग घेतला असता.आणि किमान यावेळेस तरी चांगला धारदार चाकू आणून त्याने लिंबू आणि उकडलेली अंडी कापायला आम्हाला नक्कीच मदत केली असती.

    प्रविण मार्तंड रेगे !!

    संदीप सामंत.
    ९८२०५२४५१०
    १४/०३/२०२२.

      January 17, 2025


  • मुंबई – एक अस्वच्छ शहर आहे का ?

    जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले.

      January 21, 2016


  • काहीतरी शिकण्यासारखे…

    अभिनेता दिलीप कुमार म्हणतात
    "जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती माझ्या... सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग.....

    एकदा मी विमानाने प्रवास करत होतो...
    माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता...
    माणूस खुपच Simple...कपडे त्यांनी साधे च लावलेले... Middle class वाटत होता... पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता..
    मी विमानात आहो हे लक्षात येताच इतर प्रवासी मला हात दाखवू लागले... पाहू लागले.. पण माझ्या बाजुला बसलेला Gentleman ते आपल्या कामात मग्न होते... त्यांनी माझ्याकडे लक्ष पण नाही दिलं... ते वर्तमानपत्र (Newspaper) वाचत बसलेले.. खिडकी च्या बाहेर बघत होते.... पण ते माझ्याशी बोलले पण नाही... बोलणं तर दूरच बघितलं सुद्धा नाही..
    जेव्हा चाय प्यायची वेळ आली मीच त्यांना Smile दिली...
    ते पण हसून उत्साहाने मला Hello म्हणाले..
    मग आम्ही बोलायला लागलो...
    मी सिनेमाचा विषय काढला आणि त्यांना विचारलं, "सिनेमा बघता ना?"
    ते म्हणाले, "हो, पण खुप कमी...खुप वर्ष झालीत शेवटचा सिनेमा पाहून.."
    मी म्हटलं की मी स्वतः सिनेमात काम करतो..
    "अरे वाह! काय करता तुम्ही?" त्यांनी मला विचारलं.....मी अभिनेता आहे त्यांना सांगितलं...

    ते म्हणाले “अच्छा...छानच..”

    जेव्हा आम्ही पोहोचलो... विमानाच्या बाहेर निघताच...
    मी माझा हाथ समोर करून म्हटलं.. “खरंच, खुप छान वाटलं तुमच्या बरोबर प्रवास करून,, बाय द वे, माय नेम इज दिलीपकुमार’

    त्यानी माझ्याशी हात मिऴवला आणि म्हटलं..’अरे वा....I am J. R. D. Tata!’

    *त्याक्षणी मी शिकलो की तुम्ही किती पण मोठे व्हा,,तुमच्यापेक्षा नेहमीच कोणीतरी मोठं असणार.. “माणसानी अहंकार न बाऴगता नम्र असावं... '

    iL'se It......
    * costs nothing”*

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

      November 8, 2016


  • गृहनिर्माण संस्थाना लागू नसलेले कलम

    महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० हा महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थाना लागू होतो. परंतु सहकार कायद्यातील काही कलम, गृहनिर्माण संस्थेला लागू होत नसल्याने, २०१९ च्या नवीन सुधारणेनुसार काही कलम हे पूर्णपणे गृहनिर्माण संस्थाना लागू होत नाहीत. तर कोणते आहेत ते कलम? सदस्यांच्या विनंतीवरून आजच्या लेखात, गृहनिर्माण संस्थेला लागू नसलेले अधिनियमातील कलम याबाबतची माहिती सदर लेखामधून देत आहे.

      August 18, 2021


  • आश्वासक जयजयवंती

    मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात लगेच आढळत नाही. त्यासाठी, सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. अर्थात, एकदा का या संगीताची गोडी लागली (सुरांची "आस" लागली) की मग, खऱ्याअर्थाने भारतीय संगीताचा आनंद घेता येतो.
    आपण सगळेच दिवसभर सतत, अविश्रांतपणे कामात अडकलेले असतो. सतत धावपळ, डोक्यावर "टेंशन" आणि कसेही करून आयुष्य पुढे रेटायचे किंवा अधिक सुखकर बनवायचे, ह्याच ध्यासाने पछाडलेले असतो. अगदी जेवणासारखी प्राथमिक बाब देखील, आपण "उरकून" टाकतो!! मनाला विश्रांती म्हणून द्यायला तयार नसतो आणि अशा वेळेस, रात्रीची जेवणे आटोपून, मनाला किंचित विसावा मिळावा म्हणून घराच्या एका कोपऱ्यात निवांत बसण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाच वेळी, कानावर "जयजयवंती" रागाचे सूर यावेत आणि मन हलके होऊन, पिसाप्रमाणे तरंगायला लागते. सुरांची ही जादू खरच विलक्षण म्हणायला हवी.
    दोन्ही गंधार(कोमल आणि शुद्ध) तसेच दोन्ही निषाद, यांच्या सहाय्याने सगळ्या सुरांना सामावून घेणारा हा "संपूर्ण/संपूर्ण" जातीचा राग फार विलक्षण गारुड मनावर टाकतो. या रागातील हे जे दोन "कोमल" स्वर आहेत, तेच आपल्या पाठीवर आश्वासकतेचा हात फिरवतात. हा सगळा राग अतिशय मृदू, कोमल स्वरांनीच वेढून टाकलेला आहे. तसे बघितल्यास, या रागात, रागाचे म्हणून जे सगळे "अलंकार" आहेत, त्याचा संपूर्ण आढळ होतो पण, एकूणच प्रकृती ही आश्वासकतेकडे झुकणारी, एखादा मित्राने पाठीवर हात टाकून, विश्रब्ध मैत्रीचा विश्वास दर्शविणारी!!
    मनाला विसावा देण्याच्या मन:स्थितीची ओळख आपल्याला पंडित हरिप्रसाद चौरसिया, यांच्या बासरी वादनातून अनुभवता येते.
    मृदुतेचा परिपूर्ण अनुभव देणारे हे वादन. सुरवातीपासून, नेहमीच्या धाटणीने "ठाय" लयीत सुरु झाले आहे. सुरांच्या पहिल्याच आवर्तनात, आपल्याला "कोमल" गंधाराची ओळख पटवून देते. रिषभ सुरावरून दोन्ही गंधारावर जशी लय झुकते, तिथे आपल्या जयजयवंती रागाची खूण पटते. इथे आपल्याला प्रत्येक सूर आणि त्या सुराच्या चलनाचा आनंद घेता येतो. प्रत्येक सूर कसा "अवतरतो" आणि आपले अवतरणे सिद्ध करताना, आपल्या बरोबर इतर सुरांना कसा सोबतीने घेऊन येतो, हेच ऐकण्यासारखे आहे.
    ही रचना आपल्या ऐकताना, आपल्याला सहज समजून घेता येईल. मी मुद्दामून अतिशय संथ लयीत चालणारी रचना घेतली आहे जेणेकरून, आपल्याला रागातील स्वरांचे स्थान, त्यांचे विहरणे आणि परत पुन्हा घरट्यात परतणे, आपल्याला किती समृद्ध करून जाते, हे सहज समजून घेत येईल. सगळी रचना आलापी आणि शेवटाला द्रुत लयीत गेलेली आहे परंतु जर का आलापी बारकाईने (बारकाईने ऐकणे, ही तर भारतीय संगीताची मुलभूत "अट" आहे!!) ऐकली तर पुढील द्रुत लयीतील रचना ऐकणे आणि त्याचा मन:पूत आनंद घेणे, हा विश्रब्ध आनंदाचा भाग ठरेल. आणखी एक मजा या रचनेत आहे, रचना जरी द्रुत लयीत शिरली असली तरी, केवळ द्रुत लयीत आहे म्हणून तानांचा पाउस नाही तर आलापीमध्ये स्वरांचा जो विस्तार केलेला आहे, तोच "तोंडवळा" कायम ठेऊन, फक्त त्रितालात रचना बांधलेली आहे, त्यामुळे आधीच केलेली आलापी अधिक भरीव आणि परिपूर्ण होते.
    गुलाम अली साहेबांची "दोस्त बन कर भी नही साथ निभानेवाला" ही या रागाची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देणारी गझल आहे. गझल गायकीत, ठुमरी रंगाचा अत्यंत यशस्वी वापर करून तशी गायकी रुजवणारा हा गायक.
    "दोस्त बनकर भी नहीं साथ निभानेवाला,
    वोही अंदाज है जालीम का जमाने वाला;
    क्या करे कितने मरासिम थे हमारे इस से
    वो जो एक शख्स है मुंह फेर के जाने वाला".
    गायकाचा गळा जर तयार असेल तर तो रागाची ओळख किती चटकन आणि समर्थपणे करून देतो, हे इथे ऐकण्यासारखे आहे. जयजयवंती रागातील कोमल गंधार स्वराचे महत्व आपण वर बघायला मिळते, त्याचाच अत्यंत सुंदर आविष्कार इथे ऐकायला मिळतो. सुरवातीच्या "आकारा"नंतर लगेच "नि सा रे" या स्वरावलीनंतर ग(कोमल)" किती अप्रतिम लावला आहे. रिषभ स्वरावरून गंधार स्वरावर येताना, स्वरांत जी "उतरंड" घेतली आहे आहे आणि त्या स्वराचा नाजूक स्वभाव दर्शवला आहे, तेच खरे ऐकण्यासारखे आहे. खरे तर त्यांनी संपूर्ण सप्तक घेतले आहे आणि त्यातून रागाचा आवाका दाखवला आहे आणि हे देखील किती सहज, कसलेही आडंबर न घेता दाखवले आहे. तसे बघितले तर गुलाम अलीची गायकी "अवघड" म्हणावी अशी असते. कुठलीही तान, सरळ रेषेत न घेता, वक्रोक्तीने घ्यायची असा अगदी अट्टाहास वाटावा, इतका आग्रह दिसतो परंतु इथे मात्र रागाची प्रकृती ओळखून, रचना मृदू स्वभावात गायली आहे.
    मन्नाडे हा गायकाने अशीच अफलातून चीज "देख कबीरा रोया" या चित्रपटात गायली आहे. मदन मोहन यांची रचना, जयजयवंती राग आणि मन्नाडे यांचे गायन, तेंव्हा गाणे श्रवणीय झाले नसल्यास काय नवल!!
    "बैरन हो गयी रैन,
    रैना रैना बैरन
    हो गयी रैना
    बैरन हो गयी रैना".
    ध्वनीशास्त्राच्या तंत्रानुसार मन्नाडे इतका अप्रतिम आवाज, हिंदी चित्रपट संगीतात झाला नाही, असे विधान सहज करता येईल. सगळ्या सप्तकात अत्यंत मोकळेपणी फिरणारा गळा, तानेला कुठेही अटकाव नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाण्याला योग्य तो आवाज पुरवण्याची असामान्य क्षमता, या गायकाच्या गळ्यात होती. दुदैवाने, शास्त्रीय गीते(च) गाऊ शकणारा गायक, असे "लेबल" नावावर चिकटले आणि तीच ओळख अखेरपर्यंत राहिली!!
    अर्थात प्रस्तुत गाणे, सरळ सरळ जयजयवंती रागावर आधारलेले आहे तरीही चित्रपटातील गाणे आहे, याचे भान राखून रचना बांधलेली आहे. संथ, ठाय लयीत झालेली गाण्याची सुरवात, पुढे सहजपणे द्रुत लयीत शिरते पण तरीही गाण्याची "बंदिश" होऊ न देण्याची काळजी, गायक आणि संगीतकाराने घेतलेली आहे. अगदी पहिलीच ओळ, "बैरन हो गयी रैन" गातानाच आपल्या समोर हा राग स्पष्ट उभा राहतो. पुढे गाण्यात, द्रुत लयीतील ताना आहेत, सरगम आहे पण तरीही गाणे चित्रपटातील आहे. या तानांची "जातकुळी" बघितल्यावर, या गायकाच्या श्रेष्ठत्वाची साक्ष पटू शकते.
    श्रीनिवास खळे आणि आशा भोसले यांनी तशी तुलनेने कमी गाणी गायली आहेत परंतु त्यातील प्रत्येक गाणे म्हणजे भावगीतातील वेचक दृष्टी आहे. इथे आता आपण, असेच एक सुंदर भजन या रागावर आधारित आहे. "अजि मी ब्रह्म पाहिले". हेच ते गाणे.
    "अजि मी ब्रह्म पाहिले"
    अगणित सुगरण वर्णिती ज्यासी,
    कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले."
    एकतर खळेसाहेबांच्या रचना या नेहमीच अवघड असतात - ऐकायला श्रवणीय वाटतात परंतु गायला घेतल्यावर त्यातील "अवघड" जागा दिसायला लागतात. रचना गायकी ढंग दाखवणारी आहे आणि अशी रचना गायला मिळाल्यावर, आशा भोसले यांचा गळा काय अप्रतिम खुलून येतो. इथे एक गंमत आहे. या गाण्याची सुरवात जरा बारकाईने ऐकायला घेतली आणि त्याचबरोबर , मी सांगितलेली पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची रचना ऐकायला घेतली तर लगेच, पंडितजींच्या सुरवातीच्या आलापित, या गाण्याच्या चालीचे "मूळ" सापडेल. अर्थ एकच, एकाच रागातील रचना असल्यावर त्यात अशाप्रकारे साद्धर्म्य सापडते.
    गायकी ढंगाची चाल मिळाल्यावर, ही गायिका गळ्यात किती वेगवेगळी "वळणे घेते बघा. सुरवातीची ओळ - "अजि मी ब्रह्म पाहिले" किती वेगवेगळ्या अंगाने गायली आहे आणि प्रत्येक वेळेस समेवर येताना, स्वरिक वाक्यांश किती विलोभनीय पद्धतीने आला आहे. गाण्यात पारंपारिक भजनी ठेका आहे परंतु खरी गंमत चालीच्या बांधणीत आहे. अचूक शब्दोच्चार, शब्दांना जोडून येणाऱ्या हरकती, क्वचित ताना, आणि त्यामुळे त्याच शब्दांना मिळणारा वेगळा अर्थ, या सगळ्या अलंकारांनी हे गाणे अधिक श्रवणीय झाले आहे.
    "मन मोहना बडे झुठे,
    हार के हार नहीं माने".
    चित्रपट "सीमा" - संगीतकार शंकर/जयकिशन यांच्या कारकिर्दीत अढळ स्थान मिळवणारा हा चित्रपट. गाण्याची एकुणात रचना बघितली तार "जयजयवंती" रागाचे लक्षण गीत म्हणून या गाण्याकडे बघता येईल. गाण्याची बांधणी , जणू काही "बंदिश" तयार करीत आहोत अशा धाटणीने केली आहे पण तरीही एक बाब अवश्यमेव मान्य करायलाच लागेल. चाल गायला अतिशय अवघड आहे पण चित्रपटाच्या प्रसंगाला अनुरूप आहे. लताबाईंची गायकी या गाण्यात खुलून आली आहे. गाण्यात, स्वरांच्या "उठावणी" च्या जागा अतिशय कठीण आहेत.
    "ये दिल कि लगी कम क्या होगी
    ये इश्क भला कम क्या होगा
    जब रात है ऐसी मतवाली
    फिर सुबह का आलम क्या होगा".
    "मुघल-ए-आझम" चित्रपटातील ही रचना कव्वाली सदृश आहे पण एका दृष्टीने विराणी देखील म्हणता येईल. आलिशान चित्रपटातील आलिशान रचना असे या गाण्याचे वर्णन करता येईल. रचना म्हणून तशी फार गुंतागुंतीची नाही, प्रसंगी द्रुत लयीत चालणारी रचना, या रागाशी तशी दुरूनच नाते सांगते.
    -- अनिल गोविलकर

      November 13, 2018


  • ऋजू स्वभावाचा बिहाग

    खरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग आणि भावना, याला काय आधार आहे? हे सगळे केवळ "संकेत" असेच मानायचे का? तसे मानले तर, हे "संकेत" निर्माण करण्यामागे काय उद्दिष्ट असावे? आज वर्षानुवर्षे, बहुतेक रागांचे समय, त्याला लगडलेल्या भावना, याचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो, त्या परिणामाचा कार्यकारण भाव आणि संगती कशी लावायची? की पुन्हा कोऱ्या पाटीवर नव्याने धुळाक्षरे शिकायची? या प्रश्नांची उत्तरे तशी सोपी नाहीत पण, विचार करायला नक्की लावणारी आहेत.
    मी, जेंव्हा "बिहाग" रागाला, "ऋजू" भावनेची जोड देतो तेंव्हा , माझ्या मनात पारंपारिक संकेत आणि त्याला जोडून आलेले विचार, याचेच प्राबल्य असते.आपल्याला बरेचवेळा, मी, कवी सुधार मोघ्यांच्या एका कवितेत वाचलेल्या ओळी आठवतात.
    "शब्दांना नसते सुख, शब्दांना दु:खही नसते;
    जे वाहतात ओझे, ते तुमचे माझे असते"!!
    स्वरांच्या बाबतीत असाच विचार करणे योग्य आहे का? खरेतर स्वर म्हणजे निसर्गातील ध्वनी. त्यांना आपण, शास्त्राची जोड दिली आणि त्याला अभिजात स्वरूप प्रदान केले. याचाच वेगळा अर्थ, त्या स्वरांचे नैसर्गिकत्व कायम राखणे, हाच उद्देश असू शकतो. त्यावर मानवी भावनांचे आरोपण करणे, अन्यायकारक असू शकते. असे झाले तरी देखील, स्वरांच्या सान्निध्यात वावरताना, आपल्या मनात भावनांचे तरंग उमटत असतात, अगदी अनाहूतपणे, ही देखील वस्तुस्थिती आहे.
    आरोही स्वरांत, "रिषभ" आणि "धैवत" वर्जित असल्याने, "औडव" जातीचा राग तर पुढे अवरोहात हे दोन्ही वर्जित स्वर अस्पष्टपणे लावले जातात. पूर्वीच्या संदर्भात बघायला गेलो तर, या रागात, "मध्यम" फक्त शुद्ध स्वरूपात लावला जायचा परंतु आधुनिक काळात, "तीव्र मध्यम" उपयोगात आणला जातो. अर्थात, जेंव्हा हा स्वर लावला जोतो, तेंव्हा हा राह लखलखून समोर येतो. आरोहात "ग म प नी सां" ही स्वरसंगती या रागाची ठेवण दर्शवते. बहुतेक स्वर "शुध्द" स्वरूपात लावत असल्याने, या रागाला "ऋजू" स्वरूप प्राप्त झाले. आक्रमकता, या रागाच्या स्वभावाशी फटकून वागते. वास्तविक, "गंधार" आणि "निषाद" हे "वादी - संवादी" असले तरी देखील, "मध्यम" स्वराचा प्रयोग हेच वैशिष्ट्य मानले जाते. आता आपण, शास्त्राच्या अधिक आहारी न जाता, त्याच्या "ललित" स्वरूपाकडे वळूया.
    उस्ताद रशीद खान यांनी गायलेली "मरे मन अटकाओ रे अली" ही बिहाग रागातली चीज ऐकण्यासारखी आहे . मुळात, या गायकाचा अत्यंत मृदू आवाज, त्यामुळे उपरिनिर्दिष्ट भावना, इथे अतिशय सुंदररीत्या सादर झाली आहे. स्वर उच्चारताना, त्याचा "स्वभाव" ओळखून, गायला गेला तर होणारे गायन, अधिक प्रभावी ठरते. रशीद खान, इथेच नव्हे तर एकुणातच "मंद्र सप्तक" किंवा "शुद्ध स्वरी सप्तक" गायन करतात. याचा एक परिणाम असा होतो, रसिकाला स्वराची "ओळख" करून घेता येते. ताना घेताना देखील, अति दीर्घ स्वरूपाच्या ताना टाळून, गायची पद्धत आहे, प्रसंगी तान खंडित करून, दोन भागात तान, पूर्ण करण्याचा विचार दिसतो.सुरवातीला लावलेला अति खर्ज आणि त्यातून पुढे आवाजात आलेला मोकळेपणा, यामुळे ही रचना अधिक वेधक होते. कधीकधी तर, बंदिश, भावगीताशी दुरान्वये का होईना, पण नाते सांगते की काय? असा भास निर्माण करण्याइतकी जवळीक साधली जाते. या मागे अर्थात, जे रसिक, शास्त्रापासून दूर असतात, त्यांना देखील रंजक वाटावे, हा स्पष्ट विचार दिसतो. असे करताना देखील, आपण "बंदिश" गात आहोत, याचे भान कुठेही सुटलेले दिसत नाही आणि खरेच ही तारेवरची कसरत आहे.
    "बोलिये सुरिली बोलियां
    खट्टी मिठी आंखो से रसिली बोलियां".
    "गृहप्रवेश" चित्रपटात या रागावर आधारित अतिशय सुंदर गाणे आहे. "बोलिये सुरिली बोलीया" हेच ते गाणे. संगीतकार जयदेव यांची निर्मिती आहे. या संगीतकाराच्या बहुतांशी रचना या "गायकी" ढंगाच्या असतात आणि त्यामुळे गाताना, फार जपून, विचार करून गाव्या लागतात. रचनेतच, अनेक गुंतागुंतीच्या रचना करून, गायक/गायिकेच्या गळ्याची परीक्षा बघणाऱ्या असतात. गाण्यात, सरळ, स्पष्ट असा केरवा ताल आहे पण, ताल अत्यंत "धीमा" ठेवलेला. त्यामुळे कविता आणि गायन, याचा आपल्याला सुरेख आस्वाद घेता येतो.
    गाणे जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल, गाण्यात काही ठिकाणी "बिहाग" दिसत नाही!! विशेषत: गाण्याचा पहिला अंतरा झाल्यानंतर, गाण्याची सुरवात ऐकताना, असे आढळून येते. हा संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता, याचे हे एक उत्तम उदाहरण. गाण्यात, राग सादर करणे किब=नवा त्या रागाच्या सावलीत गाणे तयार करणे, यात तशी "निर्मिती" आढळत नाही कारण, गाण्याच्या चालीचा "नकाशा" तुमच्या समोर असतो आणि त्यानुरूप गाणे तयार करायचे, इतकेच तुमच्या हाती असते परंतु, प्रत्येक रागात, अनेक छटांच्या शक्यता आढळत असतात आणि हाताशी असलेल्या कवितेनुरूप, रागातील एखादी छटा, कवितेच्या आशयाशी जुळते आणि त्या छटेनुसार, पुढे चालीचा वेगवेगळ्या लयीच्या अंगाने विस्तार करायचा, ही या संगीतकाराची खरी खासियत होती आणि तीच इथे दिसून येते.
    "तेरे सूर और मेरे गीत,
    दोनो मिलकर बनेगी प्रीत".
    "गुंज उठी शहनाई" या चित्रपटात, खऱ्या अर्थात, "बिहाग" राहाची "ओळख" देणारे गाणे आपल्याला ऐकायला मिळते. "तेरे सूर और मेरे गीत", हेच ते गाणे. मघाशी, मी या रागाचा स्वभाव "ऋजूतेशी" जोडला होता आणि या गाण्याच्या चाल्लीतून, नेमका तोच भाव दृग्गोचर होतो. संगीतकार वसंत देसायांची ही अजरामर कृती. लताबाईंच्या पहिल्याच आलापात हा राग समोर येतो. किती अप्रतिम लडिवाळ हरकत गायिकेच्या गळ्यातून निघाली आहे. या गाण्याची आणखी एक गंमत इथे मांडायची आहे. गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर जे संगीत असते, ती खास ऐकण्यासारखे आहे. बासरीचे सूर सुरवातीला खंडित स्वरूपात येतात परंतु एका विविक्षित क्षणी त्याच बासरीच्या सुराने, लयीचे संपूर्ण "वर्तुळ" पूर्ण केले जाते. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही. गाणे "दादरा" या प्रचलित तालात बांधले आहे, गाण्याचा स्वभाव उत्फुल्ल आहे परंतु गाणे कुठेही आपली संयतशील मर्यादा सोडून भिरकटत नाही,
    सगळे गाणे, एका सुंदर बंधनात बांधले आहे पण तरीही बंधनातीत आहे. लताबाईंची सुंदर गायकी आणि मुळात, गाण्यच्या चालीत असलेला "अश्रुत" गोडवा, यामुळे हे गाणे कधीही ऐकायला सुंदर वाटते.
    "कोई गाता मैं सो जाता,
    संस्कृती के विस्तृत सागर में
    सपनो की नौका के अंदर
    दुख सुख की लहेरो में उठ गिर,
    बहाता जाता".
    काही वर्षापूर्वी "आलाप" नावाचा चित्रपट आला होता. त्यात, बिहाग रागाशी नाते सांगणारे एक गाणे आढळले. "कोई गाता मै सो जाता". याची चाल ऐकतानाच अवघड आणि गायकी ढंगाची आहे, हे जाणवते. संगीतकार जयदेवने या गाण्याची "तर्ज" बांधली आहे. राग संगीताच्या असंख्य छटा कशा असतात, हे इथे बघता येईल. वरती, याच संगीतकाराने अगदी वेगळ्या धाटणीची चाल निर्माण केली आहे आणि इथे संपूर्ण वेगळी चाल!!
    या गाण्यात मात्र, "तीव्र मध्यम" लागलेला दिसतो, जो मी वरती उद्मेखून मांडला आहे तरीही, हे गाणे, बिहाग रागाचे लक्षणगीत म्हणून मानणे कठीण आहे, इतके "तीरोभाव" या गाण्यात दिसतात.
    या गाण्याची मजा म्हणजे, गाण्यात हा राग दिसत आहे, असे वाटत असताना, चाल वेगळे वळण घेते आणि ऐकणाऱ्याला आश्चर्यचकित करते. पहिल्या ओळीत राग सापडतो पण, लगेच पहिला अंतरा वेगळ्या सुरावर सुरु होतो, तिथेच चाल थोडी रेंगाळते आणि अंतरा संपत असताना, आपल्याला बिहाग परत भेटतो!! या गाण्यात अगदी दोष(च) काढायचा झाल्यास, गायक येशुदास याचे शब्दोच्चार. कित्येकवेळा, त्याच्या आवाजातील "दाक्षिणात्य" हेल बरेचवेळा कानाला खटकतात. अन्यथा हे गाणे अतिशय सुंदर आहे.
    हे गाणे म्हणजे एक सुंदर कविता आहे - हरिवंश राय बच्चन यांची. वास्तविक हा कवी कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा नव्हता पण तरीही संगीतकार जयदेव यांनी, या कवितेतून गाण्याची शक्यता ओळखली आणि त्याला सूर अर्पण केले.
    "तुज साठी शंकरा
    भिल्लीण मी झाले".
    आपल्या मराठीत देखील या रागावर आधारलेली काही गाणी ऐकायला मिळतात. "चिमुकला पाहुणा" या चित्रपटात, असेच "गायकी" ढंगाचे अप्रतिम गाणे ऐकायला मिळते. "तुज साठी शंकरा" हे, संगीतकार स्नेहल भाटकर यांनी बनवलेले गाणे ऐका. ईश्वराची आळवणी आहे पण तरीही गाण्यात जबरदस्त गायकी आहे. पहिलीच ओळ बघा, "तुज" शब्द तसा खर्जात लावलेला आहे पण क्षणात "शंकरा" शब्दावर वरच्या सुरांत केलेली आलापी ऐकताना, आपण दिपून जातो आणि ही करामत लताबाईंची. खरतर, या गायिकेच्या गळ्याला कुठे "अटकाव" आहे, हा संशोधनाचा(च) विषय आहे. लयीची कितीही अवघड वळणे असू देत, गळ्यावर अशा काही पद्धतीने तोलून घेतली जातात आणि आपल्या समोर सादर होतात, की ऐकताना अविश्वसनीय वाटावे!!
    खरेतर, बिहाग रागापासून, काही ठिकाणी फटकून, चाल वळणे घेत पुढे सरकते, इतकी की, काही ठिकाणी "मारुबिहाग" रागाची सावली आढळते. अर्थात, "मारुबिहाग" राग हा, "बिहाग" रागाच्या कुटुंबातला असल्याने, तसा फार फरक पडत नाही.
    "पास रहते हुवे भी तुझसे बहुत दूर है हम,
    किसे दर्द सुनाते है की मजबूर है हम,
    तेरे प्यार मे दिलदार जो है मेरा हाल-ए-दिलदार
    कोई देखे या ना देखे अल्ला देख रहा है".
    "मेरे महेबूब" या चित्रपटातील हे गाणे आहे. संगीतकार नौशाद यांची चाल आहे तर शकील बदायुनी यांची शब्दकळा आहे. खरेतर केवळ "बिहाग" रागाची संपूर्ण ओळख म्हणून या गाण्याची निवड करणे अवघड आहे पण चालीत रागाच्या भरपूर छटा आढळतात. अतिशय जलद लयीतील गाणे आहे, अर्थात चित्रपटातील नृत्यगीत असल्याने द्रुत लय असणे साहजिक ठरते. गाण्यात तसे फार काही असामान्य नाही तसेच गाण्यात नेहमीचा केरवा ताल वापरला आहे. असे असून देखील लताबाईंच्या वेधक गायकीने आपले लक्ष या गाण्याकडे वेधले जाते.
    "मन हो राम रंगी रंगले,
    आत्म रंगी रंगले
    मन विश्वरंगी रंगले".
    भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ही रचना. गोविंदराव टेंबे यांची शब्दकळा आहे. हे गाणे मात्र निखालस बिहाग रागाची ओळख करून देते, अगदी पहिल्या सुरापासून. पंडितजींचा जोमदार पण तरीही प्रसंगी हळवा होणारा आवाज असल्याने, गाण्याचा परिणाम आपल्या मनावर लगेच आणि दीर्घकाळ होतो. भजन गायकीला मैफिलीत मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्या शास्त्रीय संगीत गायकांचा महत्वाचा वाटा आहे त्यात पंडित भीमसेन जोशी यांचे स्थान फार वरच्या क्रमांकाने ठेवावे लागेल.
    -- अनिल गोविलकर

      November 11, 2018


  • ऑनबोर्ड सरदार

    आजपर्यंत जेवढ्या जहाजांवर काम केले त्या त्या सगळ्या जहाजांवर कमीत कमी एक तरी दाढी आणि पगडी असलेले सरदार हे अधिकारी किंवा खलाशी असायचे.

      August 26, 2021