माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी राज्य शासनाच्या महान्यूज या पोटर्लला दिलेली मुलाखत खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।
विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे स्वभाव, सारखेच असती ।
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत मनें, कोठे नसे फरक ।
अनेक बनली, जनक तिचा एक....४,
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मॅडम , तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
मॅडम , तुमचंही एक घर असेल नवरा असेल , सासू असेल , सासरा असेल , दीर असेल घरात सारखी पीरपीर असेल जाऊ बाई जोरात असतील नणंद बाई तोऱ्यात असतील तुम्हाला छोटी छोटी मुलं असतील तुमच्या बागेत फुलं असतील सर्वांसाठी तुम्ही अहोरात्र झिजता
आणि तरीही , मॅडम तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता.
तुमच्याही घरात भांड्याला भांडे लागत असणारच कुणी आपुलकीने तर कुणी द्वेषाने वागणारच कुणी रुसणार , कुणी फुगणार कुणी रागवणार , कुणी जागवणार कुणी भरवणार , कुणी जीरवणार मन मारून तुम्ही सगळ्यांचच मन राखता आणि तरीही , मॅडम तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता सासऱ्याची एकादशी सासूचा प्रदोष नवरा म्हणतो मटण कर त्याचा काय दोष दीर म्हणतो गरम वाढा नणंद म्हणते उष्टी काढा आजेसासूची गोळीची वेळ मुलं म्हणती आमच्याशी खेळ नवऱ्याचाही असतो थाट नखरे त्याचे सतराशे साठ आल्या गेल्याचही तुम्ही किती बेवार बघता
आणि तरीही , मॅडम तुम्ही किती छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
तुम्हालाही मन आहे कोण जाणतं ? तुम्हालाही भावना आहे कोण जाणतं ? तुम्हीही माणूस आहात कोण मानतं ? त्यांना तुमचं काम हवं कमावून आणलेलं दाम हवं तुमची माया हवी तुमची अख्खी काया हवी विनातक्रार तुम्ही सारं कसं काय सोसता ?
पण जाऊद्या , मॅडम तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता.
-- विक्रम पाटील
जगातली १० अशी ठिकाणे जिथे तुम्हाला सहजपणे प्रवेश नाही. इथली सिक्युरिटी व्यवस्था अचाट आहे.
जगातील एकूण उत्पादनाच्या सहा ते सात पट जास्त मागणी असलेली आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे पांढरी मुसळी होय. पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव – Chlorophytum borivillanum , कुळ- Liliaceae , मराठी नाव- पांढरी मुसळी,सफेदा हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली संस्कृत नाव- मुसला असे आहेत.
पांढऱ्या मुसळी मध्ये कार्बोहायड्रेडस , प्रोटीन, स्यापोजेनीन, स्यापोनीन, तसेच अनेक खनिज आढळतात.शारीरिक दुर्बलता तसेच ताकतीसाठी, पौष्टिक व बलवर्धक, स्तनदा मातांचे दुध वाढविण्यासाठी, प्रसवोत्तर होणारे स्त्रीरोगांवर उपयोगी, मधुमेह, वंधत्व कमी करण्यासाठी, शुक्रजंतू वाढीसाठी अशा अनेक आजारांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात होतो.
मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते सतिश राजवाडे यांनी. रोमॅण्टिक कॉमेडी असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी या दोन तगड्या कलाकारांमुळे हा चित्रपट खुप गाजला. चला तर मग बघुया, २०१० साली प्रदर्शित झालेला चित्रपट, मुंबई पुणे मुंबई..
उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही.
गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे.
अनिल नाचणे, मुंबई
राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय...
राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा... हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!!
त्या राष्ट्रवादीवाल्यांनी बारामतीचा टोल रद्द करुन घेतला... फडणवीसांनी नागपूरचा टोल रद्द करुन घेतला... आमचा मुंबईकरांचा वाली कोण ?
राजसाहेब... लवकर काहीतरी करा......
Anil Nachane - anc@gmail.com
मा.कृष्णराव फुलंब्रीकर यांना अनेक सन्मान लाभले त्यामध्ये त्यांना ‘ संगीत कलानिधि ‘ ही पदवी , भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप , बालगंधर्व सुवर्ण पदक , विष्णुदास भावे सुवर्ण पदक तर जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व देऊन त्यांचा गौरव केला.
Copyright © 2025 | Marathisrushti