(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पौराणिक हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन

    काही व्यक्तींना नाविन्यपूर्ण, जगावेगळे काहीतरी करण्याचा छंद असतो. त्याच ध्यासातून ती व्यक्ती कामास लागली तर एखादी अद्भूत कलाकृती निर्माण होऊ शकते. अशाच छंदातून नाशिक येथील दिनेश वैद्य यांनी पौराणिक हस्तलिखितांचे संगणकावर डिजिटलायझेशन करुन पौराणिक ऐतिहासिक वारसा जपण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

  • विश्वास ?

  • भारताची चलनव्यवस्था – डॉ. आंबेडकरांच्या नजरेतून

    भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे हि चांगली गोष्ट आहे.

    पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे. त्यांच्या विचारांची अमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच कोणी तरी लाटत आहेत.

    त्यांचे ते कार्य प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचावे. त्यांच्या अद्वीतीय आणि महत्वपुर्ण कार्याचा आढावा घेणारा हा विस्तृत लेख.

    1)भारताची चलन व्यवस्थेचे मार्गदर्शक.1923/1925
    2)भारतीय रिजर्व बँकेच्या स्थापणेचे मार्गदर्शक.1934
    3)भारताचे संविधान लेखक.1949
    4)भारतीय 14 वित्त आयोगाचे दिशादर्शक.1951
    - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

    वरील 4 गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत.

    आणि त्या सर्व गोष्टींचा पाया हा बाबासाहेबांचे विचार आणि लिखाण आहे.

    वरील 4 गोष्टींवरती आजपर्यंतचा भारताचा अर्थ कारभार आणि येनारा भविष्यातील अर्थ कारभार अवलंबुन आहे.

    1)
    The problem of the rupee:Its origin and its solution.1923 - Dr.Babasaheb Ambedkar

    बाबासाहेबांनी 1923 साली त्यांच्या "डाॅक्टर आॅफ सायन्स"
    ह्या पदवी साठी "लंडन स्कुल ऑफ ईकोनाॅमिक्स" ह्या विश्वविद्यालयात शिकत असताना लिहलेला प्रबंध.

    या आपल्या प्रबंधात डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांनी
    "चलन" दर दहा वर्षानी बदलने आणि ते अचानक बदलने.
    हे मुद्दे 93 वर्षापूर्वीच लिहून ठेवले आहेत.

    ज्यामुळे भ्रष्टाचार आणि ब्लैकमनी रोखता येऊ शकतो असे ईशारे त्यांनी अगोदरच दिलेले आहेत.

    2)
    Reserve Bank Of India.1934 - Dr.Babasaheb Ambedkar

    भारतीय रीजर्व बँकेची स्थापना हि ब्रिटीश काळात
    Reserve Bank Of India Act 1934 साली झाली.

    त्या पुर्वी 1926 साली
    Royal Commission on Indian Currency and Finance, also known as the Hilton–Young Commission.
    हे कमिशन भारतात रिजर्व बँकेच्या स्थापनेसाठी इग्लंड हुन भारतात आले होते.

    Reserve Bank Of India.
    ची संकलपणा,मार्गदर्शक तत्वे,कार्यपद्धती व दृष्टीकोण हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी "हिल्टन यंग कमिशन" ला 1926 साली दिलेली साक्ष ह्या वरतीच.
    पुढे रिजर्व बँक आॅफ इंडिया ची स्थापणा 1934 साली झाली.

    त्या "हिल्टन यंग कमिशन" मधील जो प्रत्येक पदाधीकारी होता त्याच्या प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचे "The problem of the rupee its origin and its solution" हेच पुस्तक होते.

    3)
    "Finance Commission of India.1951
    "भारतीय वित्त आयोग"

    "भारतीय वित्त आयोग" ची स्थापण 1951 साली झाली.

    भारतीय वित्त आयोगाचे काम हे आहे कि देशातील केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही घटकांमध्ये भारत सरकारकडे येनार्या सर्व करांच्या स्वरूपातील महसुल आणि ईतर ठिकाणांहुन येनारा महसुल हा खुप मोठ्या प्रमाणात केंद्रा कडे पैश्याच्या स्वरूपातुन जमा होतो.
    तर त्याचे प्रत्येक 5 वर्षांनी व्यवस्थापण करणे गरजेचे असते.

    Finance Commission Of India ची स्थापण ही.
    THE EVOLUTION OF PROVINCIAL FINANCE IN BRITISH INDIA.1925- Dr.Babasaheb Ambedkar

    हा बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापिठा मध्ये Phd साठी चा प्रबंध आहे.
    ह्या प्रबंधा च्या आधारेच भारतीय वित्त आयोगाची स्थापणा झाली आहे.आणि आज पर्यंत सर्व 14 वित्त आयोग हे त्याच पुस्तकाच्या आधारे करन्यात आले आहेत.

    ही माहीती तर भारतातील अर्थतज्ञांना पण अजुन ज्ञात नाही आहे तर लोकांना ती कधी समजनार हिच मोठी शोकांतीका आहे.

    बाबासाहेब हे भारतातील अर्थतज्ञांपैकी सर्वाधिक जास्त शिकलेले ते ही जगातील सर्वोच्च विद्यापीठांतुन अर्थशास्त्र ह्या विषयांत सर्वाधिक जास्त Phd केलेले एकमेव व्यक्ती आहेत.

    मला आवर्जुन सांगायचे आहे कि हे सर्व लिखान त्यांनी जवळपास शंभर वर्षांपुर्वी केलेले आहे आणि त्या जमान्यात.
    टि.व्ही,इंटरनेट,मोबाईल,काॅम्पुटर ह्या सोई सुविधा जन्मल्या नव्हत्या.
    तरी सुद्धा बाबासाहेबांनी जगातिल सर्वाधिक सुंदर आर्थशास्त्रत लिखान केले आहे.
    येनार्या 1000 वर्षा पर्यंत ह्या लिखानाला महत्व असेल..
    सरकार कितीही बदलतील पण त्या सरकारचे मार्गदर्शक हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच असतिल.

    so we called him "The Father Of Modern India"

  • गृहिणींना विश्रांतीची घंटाच नाही !

    नुकताच ८ मार्च रोजी जागतिक महिलादिन सर्व जगभर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. परंतू त्यात भारतासारख्या अनेक पुरुषप्रधान देशातील पुरुषांचा सहभाग किती होता? आणि नसल्यास सर्व स्त्री-पुरुषांनी नक्कीच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

  • माझ्या मनातलं

    बर्याच दिवसांनी लिहीतोय.अश्विनी एकबोटे.अचानक आपल्यातुन निघुन गेल्यामुळे काही सुचतच न्हवतं.सैरभैर झाल होतं मन.गेल्या १५ वर्षांचा सहवास.एक अत्यंत गुणी अभिनेत्री व चांगली माणुस.पहिल्यांदा काम केल आम्ही ते एका वॉशिंग मशिनच्या जाहीरातीत.आणि तिथेच सुर जुळले.ते शेवटापर्यंत.पुण्यात घर.लहान मुलगा.सगळ कुटुंबच पुण्यात.मुंबईच माहित नाही.पण आली.दबकत दबकत.पहिली मालीका " काना मागुन आली""डॉ.गिरीष ओकांच्या पत्नीची मुख्य भूमिका.मीच नाव सुचवल.आली व चक्क ८०० रु.पर डे वर काम सुरु केलं.मग मुंबईत रहायला घर नाही.विजयनगर सोसा.मग वनराई कॉलनीतल्या ४ जागा.सतत डोक्यावर संसार घेऊन फिरायचं.सतत पुणे मुंबई.महिन्यात्यातुन ७ ते ८ वेळा मुंबई पुणे.तेही रात्री १२ ची टु बाय टु एशियाड पकडुन जायची.तीचा मुलगा शुभंकर लहान होता.सगळा जीव तिचा त्याच्यात गुंतला होता.हिरकणी सारखी वेळ काळ कशाचीही पर्वा न करता पुण्याला पळायची.भोर ला सोनियाचा उंबराचं शुट चालायचं.पण ही कित्येक वेळेला रात्रीची ड्रायव्हींग करत पुण्याला जायची.त्यात पुण्यात चालु केलेला भरतनाट्यमचा क्लास.त्या विद्यार्थिनींमधे जीव गुंतलेला असायचा.त्यांना कधी फक्त विदयार्थीनी म्हणुन पाहीलच नाही.मुलींसारखं प्रेम करायची.नृत्या व्यतिरीक्त.माणुस घडवण्याचा प्रयत्न करायची.जे करेल ते मन लावुन सर्वस्व ओतुन.मग हळु हळु मुंबईतलं स्थान पक्क करत चालली.मग मारुती 800 घेतली.त्या आधी माझ्या स्कुटरवरुन जाताना पाऊस आला.पंक्चर झालं पडलो.असे अनेक प्रकार घडले.पण ते क्षण सुध्दा तक्रार न करता भरभरुन जगली.एक सळसळता नदिचा प्रवाह होता अश्वीनी.मी तीला सुंदर म्हटलं की "तुला दिसते रे वेड्या." असं म्हणायची.आम्ही "मांदिआळी शब्द तालांची" कार्यक्रम सुरु केला त्याचे देश विदेशात प्रयोग केले.एकटीच नाचायची पण १० मुली नाचल्याचा आभास निर्माण करायची.दिवसभरातुन किमान १० फोन करायची.सतत चौकशी करायची.जी व्यक्ती तिला भेटायची ती तिच्या प्रेमात पडायची.हुशार.अभ्यासपूर्ण भुमिका करायची.मी ते करत नाही म्हणुन चिडायची.सिनेमा नाटक पाहिल्या नंतर त्याचं विच्छेदन सुंदर करायची.मग." तु फक्त हो म्हण", एका क्षणात","त्या तिघांची गोष्ट","नांदी", " नाच ग घुमा","कितीतरी चित्रपट ,पौराणीक सीडी्ज.ईतकं अप्रतिम काम करायची सगळे कौतुक करायचे पण पुरस्कार मात्र मिळाला नाही.मग लहान मुलासारख ऊदास व्हायची.पण तिने स्वतःच ह्यातुन स्वतःला बाहेर काढलं.ते सगळं पचवल.व ती आणखीनच प्रगल्भ झाली.नााचाचे कार्यक्रम शास्त्रीय नृत्याचे करायला मिळत नाहीत म्हणुन सतत खंत व्यक्त करायची.आणि आत्ता कुठे करीयरला छान आकार यायला लागला होता.पहिल्यांदाच महेश मांजरेकरांनी मिक्टाला बोलावलं किती खुष होती.एक लोकप्रीय अभिनेत्री म्हणुन नावारुपाला यायला लागली.नुकतीच जाण्यापुर्वी ८ दिवस होंडा सीटी घेतली.खुष होती.नविन नाटक मिळालं होतं.ज्यात मी नव्हतो त्याचा आनंद होता.कारण ऊगाचच लोक समज करुन घेतात.की ही शरद शिवाय काम करत नाही.तस काहीच नव्हतं.म्हणुन मला म्हणाली! की लोकांचा गैरसमज दूर होईल. तिचा मुलगा ह्याच क्षेत्रात करीयर करायला सिध्द झालाय.त्याचं करीयर व्हावं म्हणुन जीव तळमळाचा तीचा.त्याला कारण तीन ऊशिरा सुरु केलं होतं सगळं.पण नियतीच्या मनात वेगळच असतं.स्टेजवर नाचताना भैरवी रागावरचं गाणं चालु त्यावर तीचा नाच चालु.गाण संपलं नाचही संपला.व माझी जीवश्च मैत्रीणही संपली.तिलाच कळलं नाही.मला म्हणाली की नंतर लगेचच माझा प्रयोग होता तर पहिला अंक बघुन जाईन.पण तीच्या जिवनाचाच तिसरा अंक संपला होता.तिनं एक्झीट घेतली होती.रंगभुमी मालिका चित्रपट ह्या प्रत्येक ठिकाणी तिची ऊणीव नक्कीच जाणवणार.ती गेली आणि माझ्या हातात राहील्या फक्त सुंदर आठवणी.त्या खुपच सुंदर आहेत.पण तरीही ४४ हे जाण्याचं वय नाही.खुप काही करायचं होतं.सगळच अर्धवट राहीलं.पण शेवटी परमेश्वरापुढे कोणाचच काहीच चालत नाही.आपण फक्त बाहुल्या आहोत कठपुतळ्या.

    - शरद पोंक्षे

  • समाजाच प्रबोधन करण्याची गरज…..

    वेश्याव्यवसाय नक्किच वाईट आहे. या वेश्यांकडे जाणारे आपल्या आजुबाजुचीच मुल व पुरुष असतात. मी नेहेमी जाणार्‍यांच्या बाबतीत जास्त लिहित नाही पण ही लहान मुल, नुकती मिसरुढ फ़ुटलेली मुलं जेव्हा वेश्यांकडे जाताना दिसतात. तेव्हा खुप काही तरी चुकतय अस जाणावत. ही मुल बरेच वेळा चांगल्या कुटुंबातली व चांगल्या शाळांमधली असतात.या मुलांना सेक्सबाबत व ऎडस् बाबत अर्धवट माहिती असते. विवाहापूर्वसंबंध किती घातक आहेत याची त्यांना मुळिच कल्पना नसते. खर तर या मुलांना योग्यवेळी काऊंसिलिंगची गरज असते

  • जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या

    माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची .

    इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
    पण,
    एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा...
    आज न राहवून मी थांबून त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले ,

    "बाळ तू रोज गार्ड होतोस ,तुला कधी इंजिन कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
    त्यावर तो मुलगा उत्तरला ,
    "बाबूजी मला घालावयास सदरा नाही मग माझ्या मागे कोण येणार ?"म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो..
    ".हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले..
    त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला.

    आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते .त्यात काहि ना काहि कमतरता असणारच .तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.

    त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई बापावर रागावून रुसून रडत बसता आले असते,
    पण, तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला व जीवनाच्या खेळाचाअंग बनून राहिला .

    मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचाअंग व्हायचे आहे .सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

    *Be positive and be happy*

  • दूरदर्शन

    टेलिव्हिजनचा शोध जरी १९३० च्या सुमारास लागला होता तरी भारतात टेलिव्हिजन यायला १९५९ साल उजाडावे लागले. दिल्लीत भरलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनीत एका युरोपियन कंपनीने सर्वप्रथम भारताला टेलिव्हिजन दाखवला. प्रदर्शनानंतर तो टीव्ही संच आपल्याला भेट म्हणून दिला.

  • श्रेष्ट गं तू रातरानी

  • शेअर ट्रेडिंग स्कुल

    shares-trading-school