प्राणायाम करण्यापूर्वी शरीर एकदा ताजेतवाने करून घेण्यासाठी चाललेले शरीर संचालन करताना … शरीराचे सर्व अवयव सांध्यातून हलवताना ..माझ्या सांध्यामध्ये थोड्या वेदना होत असल्याचे जाणवले ..तसेच सर्व स्नायू आखडून गेल्याने त्यांची हालचाल करताना त्यावर ताण येत होता ..
February 12, 2020
लेखांक सातवा
वास्तुशास्त्र पेंटिंग या विषयांतर्गत लेखात आपण पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग आणि कोणत्या दिशेला तोंड करून भिंतीला लावावे याबद्दल माहिती घेऊया.
मी बऱ्याचदा सांगत असतो की, तज्ञाशिवाय किंवा सल्ल्याशिवाय रंग विषयांवरील माहिती स्वतःच्या मनाने न घ्यावी अमलात आणावी. कारण रंगांचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे ॲलोपॅथीच्या औषधां सारखे लगेच जरी दिसले नसले किंवा दिसत नसले तरीही आयुर्वेदाप्रमाणे परंतु मन-इच्छा-भाव-भावना-षड्रिपू- ज्ञानेन्द्रिय आणि विचार यांवरच अपेक्षित, सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवून आणतात.
वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये असेच घटक आणि रंग यांना आकारबद्ध केलेलं असतं की, ज्यांनी त्या पेंटिंगचे मागणी केलीय अन्ज्या वास्तूमध्ये ते लावायचे आहे त्याची जागा इत्यादी सर्व जाणून घेऊन, जन्म नक्षत्राचा अभ्यास करून फक्त चांगले परिणाम देणारे रंगच आणि आकारच विशिष्ठ रचनांमध्ये, नक्षत्र स्वामी चा, नक्षत्राचा जप करून ती कलाकृती साकारली जाते.
या नक्षत्राचा आराध्यवृक्ष राजा आम्रवृक्ष म्हणजे आंबा आहे. भारतातील सर्वच वातावरणात हा वृक्ष आढळतो, का? तरी या वृक्षाला सर्व वातावरणाशी मिळतंजुळतं घेता येतं. किती महत्वाची बाब आहे. आता वाचकांना आश्चर्य वाटू शकेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना देखील कुठल्याही वातावरणात, भारतामध्ये जिथे-जिथे आंबा उगवतो त्या सर्व भूभागावरील नैसर्गिक वातावरणात शारीरिक, प्रकृती मिळतेजुळते घेणारी असते. इतरांच्या तुलनेने या लोकांना बाह्य प्रांतात, भौगोलिक प्रदेशात फारच कमी किंबहुना नाहीच त्रास होत.
म्हणून यांच्यासाठी खास बनवल्या जाणाऱ्या वास्तुशास्त्र पेंटिंगमध्ये, आंबा या वृक्षाचा पंचांगे, कुंभ किंवा मीन यांच्यापैकी चित्रकार, शीतरंग आणि त्यांच्यासोबत थोडासा तपकिरी, पांढरा, किंचित काळा अशा रंगांच्या योजना आणि वरील घटकांचे आकार यांची त्या व्यक्तीला पारखून एक सुयोग्य मांडणी करून वास्तुशास्त्र पेंटिंग बनविले जाते. यातील नक्षत्राचा आणि नक्षत्र स्वामींचा जप तेवढ्या पटीत करून ओम अजैकपादाय नमःही जपाक्षरे देखील त्या पेंटिंगचा चित्रविषय म्हणून आकारबद्ध केली जातात.
व्यक्ती, वास्तुस्थल या तीन बाबींचा विचार, तोही सकारात्मक, यशाची फळे देणारा असा विचार रंग चित्रकार आणि जपाक्षरेयांच्या रंग साजातून सजविला जातो. तोच त्या वास्तूचा जणू आत्माच बनतो. वास्तुशास्त्र पेंटिंगचा रूपाने. मग नकारात्मक ऊर्जा त्या वास्तूतून काढता पाय घेते. तिची जी जागा रिकामी होत जाते ति या पेंटिंग मधील सकारात्मक रंग किरणांचा लहरींमुळे, सकारात्मक उर्जेला खेचून त्या रिकाम्या जागी स्थिर करते. हे सगळे अगदी नकळत परंतु सहजपणे घडत जाते. आणि व्यक्ती अन तिचे कुटुंब आनंदात डुंबायला लागते.
शुभं भवतु
प्रा. गजानन शेपाळ
December 24, 2018
सध्या तेलंगाणा विभागात अशांतता सर्व थरांत दिसून येते. मी नुकताच या भागास भेट दिली आणि मला तिथला खदखदणारा असंतोष सर्वत्र जाणवला. मी मुळचा त्याच विभागातला असल्यामुळे तो अधिक प्रकर्षाने जाणवत होता आणि म्हणून मी विचार केला कि ह्या धगधगी मागे कोणता विचार आहे ते जाणून घ्यावे.
July 31, 2013
वकील जातचं लय चतूर
प्रसंग - काल सकाळी...
स्थळ - सांगली स्टेशन...
फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच.
कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी...
एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली...
"तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!"
वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन काढला...
त्यावर लिहीलं...
"मी मुकबधीर आहे...मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या.."
बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं...
त्या वकीलांनी ते वाचलं...
कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..
"हं...
बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,
माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून "
बाई पळाली ना सैराट !!!!
वकिलांचा नाद करायचा नाय !
June 9, 2017
अनागर आणि नागर समाजाच्या पारंपरिक अविष्कारांना ‘लोकसाहित्य` असे संबोधता येईल. ध्वनी आणि शब्दांच्या सामर्थ्यासह हे लोकाविष्कार व्यक्त होतात. या लोकाविष्कारांमध्ये लोकश्रध्दा, लोकभ्रम, चालीरीती, रूढी, नृत्य, नाटयदी प्रयोगात्म आविष्कार यांचा अंतर्भाव आपण करू शकतो. लोकांच्या संदर्भातील विज्ञान म्हणजे लोकसाहित्य नव्हे तर लोकसाहित्य म्हणजे पारंपरिक लोकविज्ञान आणि लोकगीते, लोककथा आदी होय.
January 22, 2011
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.
गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, 'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... 'पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
November 9, 2016
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
August 15, 2010
मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो.
July 8, 2024
उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही.
July 10, 2024
संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची.
October 19, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti