अशा सावकारांचा जाच आपल्याला होत असल्यास जरूर कळवावे. यासाठी सरकारकडे सामुहिकरित्या पाठपुरावा केल्यास नककीच यश मिळेल.
February 24, 2011
खरं तर नावातंच खुप काही आहे. अखंड़ जिवनभर जो आपल्याला साथ देईल किंवा देवु शकतो अशी व्यक्ती म्हणजे जिवनसाथी.
February 5, 2011
इंटरनेटच्या माध्यमातून आज मराठीतून काहितरी लिहीतांना खूप आनंद होतो आहे. आज सहजचं आपण डोळसपणे पाहिलं तर आपल्या एक लक्षात येइल की कुठेतरी आपण आपलं माणूसपण हरवतोय. समाजातून हळूहळू नितिमुल्य सुध्दा हरवतायत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊ पहातोय. याचाचं सुशिक्षीत मनाला खूप त्रास होतोय. पण आपल्याच षंढपणामूळे आपण काहिच करु शकत नाही याची जाणिव मनाला खूप अस्वस्थ करतेय. आणि मग कधीतरी लिहिलेली कविता तुमच्यापर्यंत पोहचवावीशी वाटतेय….
January 10, 2011
मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.
June 10, 2012
सावरकर... त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा !
दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता.
इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलिया मधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले "तुम्ही श्री *** ना ?"
त्या अधिकाऱ्याने सांगितले "हो". "पण मी आपणास ओळखले नाही!"
त्या प्राचार्याने सांगितले "तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये ".
क्षणार्धात ओळख पटली.
प्राचार्यांनी विचारले "ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहीले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्याच्यात दीडशे गुणांचा फरक होता आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते . बरोबर ?"
ते अधिकारी उत्तरले "हो."
"कारण माहीत आहे?", प्राचार्यांनी विचारले.
"नाही" ते अधिकारी उत्तरले.
"जाणून घ्यायचंय ?" प्राचार्य.
"हो", अधिकारी.
"सांगतो...", प्राचार्य.
त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे!
ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते "रत्नागिरी" ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .
त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता.
सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.
"आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला". ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षार्थी असल्याने मला सर्व माहीत आहे.
सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.
मित्रांनो, आपला शत्रू आपली खरी परीक्षा करतो असे म्हटले जाते ते उगाच नाही.
जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.
हा प्राचार्य होता रँग्लर रघुनाथराव परांजपे आणि हा विद्यार्थी होता श्री वेलणकर! संस्कृत भाषेचे तज्ञ! आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते श्रीराम भिकाजी वेलणकर!!
October 21, 2016
१९३७ साली व्हेनिस इथे आयोजित करण्यात आलेल्या ”व्हेनिस फिल्म फेस्टीवल” ला भारताकडून या चित्रपटाची निवड झाली आणि जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ”संत तुकाराम” या सिनेमाचा गौरव झाला.
April 2, 2013

एस.टी.चं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचं अनोखं नातं आहे. तसंच एस.टी. स्टॅन्डलाही अनेकांच्या जीवनात महत्वाचं स्थान आहे.
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्याचं हे स्टॅन्ङ….राज्यात जर बसस्थानकांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली तर परीक्षकांना पहिला नंबर काढताना फार विचार करावा लागणार नाही….
छायाचित्र - सतिश लळीत
April 22, 2016
September 28, 2018
हा लेख परमपूज्य सदगुरू श्री समर्थ हंबीर बाबा यांच्या जीवन कलेची साधना या ग्रंथातून घेतलेले आहे. ख -या देवाची प्राप्ती करण्यासाठी किंवा होण्यासाठी केवळ मूर्तीपूजा किंवा व्यक्ती पूजा श्रेष्ठ नसून तो केवळ एक न संपणारा मार्ग आहे. ध्येय धरून निराकाराला किंवा निर्गुणाला आकारात किंवा सगुणात कसे आणता येईल ? एक निराकार त्या निराकाराला जणू शकतो. त्यासाठी स्वतः ला जो पर्यंत निराकारा ची आत्मा नु भूती येत नाही तो पर्यंत ह्या मार्गाचे अनुकरण म्हणजे दिशाहीन होय.
July 11, 2012
ही माहिती संग्रहित करून देण्या मागचा उद्देश हा कि नुकतीच आलेली बातमी कि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे स्थगिती दिली.
May 11, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti