तू असतोस
तेव्हाच फक्त जगणं असतं
एरवी फक्त सावली पांघरते जगण्याची
September 21, 2010
शांतता, सुरक्षितता, सौहार्द, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी बाबींपासून कोसो दूर असलेला देश धोकदायक असणार नाही तर काय ? पाकिस्तानात जोपर्यंत इजिप्त, ट्युनिशिया, लिबिया प्रमाणे विद्रोह होत नाही व या हुकुमशहांना कायमचे संपविले जात नाही तोपर्यंत पाकी जनतेला सुख मिळणार नाही व तेथील धोकादायक परिस्थिती संपणार नाही.
फक्त पाकिस्तानच धोकादायक नसून तेथे वारंवार येणारे सैनिकी हुकुमशहा हे सुद्धा संपूर्ण जगाला धोकादायक आहेत…..!
March 28, 2011
सूर्यदेवाचा खेळ संपल्यावर आता चंद्रदेवाने खेळ सुरु केला, चांदण्या लुकलुकायला लागल्या. ट्रेनी सिमनला म्हटलं आता चंद्रप्रकाश कसा दुधाळ दिसतोय पण तो कसल्यातरी विचारात दिसला, तरीपण तो म्हणाला दुधाळ चंद्रप्रकाश पाहिला की तिचा मधाळ चेहरा आठवतो. वाऱ्याची झुळूक आली की तिचे भुरभुरणारे केस आठवतात. जलतरंग जहाजावर येऊन आदळतात तितक्याच मंजुळ स्वरात तिच्या बांगड्या वाजल्याचे आठवतं. त्याला म्हटलं बस कर आता आठवणी, जाऊन मेसेंजर वर व्हिडिओ कॉल कर आणि बघत बस मधाळ चेहरा, फॅनवर भुरू भुरू उडणारे केस आणि बांगड्यांचे मंजुळ स्वर.
July 8, 2021
“मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वैविधता आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यातही अनेक टप्पे म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान, कौटुंबिक, तमाशा किंवा नृत्याची पार्श्वभूमी लाभलेले चित्रपट झळकत राहिले. विशेष म्हणजे अशा अॅक्शनवर आधारीत सिनेमांमध्ये काही स्त्री कलाकारांनी मध्यवर्ती भुमिका साकारल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं सुषमा शिरोमणी यांचं. चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि तेव्हाच्या अनुभवांविषयी आम्ही जाणून घेतलं, “मराठीसृष्टी.कॉम”ला त्यांनी दिलेल्या “एक्सकलुझिव्ह” मुलाखतीतून…
November 1, 2013
शोध सर्जनप्रेरणांचा' हा या वर्षी अंकाचा विषय असून त्याद्वारे दिवंगत तसेच ज्येष्ठ साहित्यिकांच्या निर्मितिप्रक्रियेचा शोध पुढची लिहिती पिढी घेत आहे. समकालात वेधक, वेचक आणि आशययुक्त लिहून आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्या काही लेखक, कवींना हा लेखन वारसा आपल्या साहित्यिक आई अथवा वडिलांच्या रूपाने घरातूनच थेटपणे लाभला. अगदी हाच धागा पकडत 'अधोरेखित'च्या या अंकात लेखिका, संपादिका मोनिका गजेंद्रगडकरांचा वडील, ज्येष्ठ कथाकार विद्याधर पुंडलिक यांच्या कथाविश्वाबद्दल, कविवर्य आरती प्रभू यांच्या सर्जनप्रेरणांचा शोध घेणारा कवयित्री हेमांगी प्रभू नेरकरांचा, मॅजेस्टिक प्रकाशनाचे संस्थापक केशवराव कोठावळे यांच्या संपादकीय चष्म्याबद्दल व पुस्तक प्रकाशनाच्या परंपरेविषयी मॅजेस्टिक प्रकाशनचे प्रकाशक अशोकराव कोठावळे यांचा, 'बलुतं'कार दया पवारांच्या कवितेतील वास्तवतेचा शोध घेणारा कवयित्री, लेखिका प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार असे विविध लेख तर आहेतच पण त्यासोबतच गझलेचं बीज मराठी साहित्यात रूजवणाऱ्या ज्येष्ठ कवी सुरेश भटांच्या गझलेबद्दल चित्तरंजन भट यांचा 'रंग त्याचा वेगळा' तसेच ज्येष्ठ कवयित्री, संपादिका प्रभा गणोरकरांच्या सर्जन प्रेरणांचा शोध घेणारा ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांचे अभ्यासपूर्ण लेखन अंकास दस्ताऐवजाचे स्वरूप प्राप्त करून देतात. आपल्या लेखनाची पन्नाशी पूर्ण होऊनही सर्जनाची विविध रूपं नाटकांतून, एकांकिकांमधून, भयकथांतून, कादंबरींतून मांडणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक रत्नाकर मतकरींच्या सर्जनाच्या अरण्याविषयी त्यांच्या कन्या - लेखिका, अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी केलेले चिंतन अंकात मोलाची भर टाकणारे आहे.
मराठी कवितेचा भक्कम पाया रचणारे ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या सर्जनशीलतेचा शोध घेणारा 'अप्रकाशित बोरकर' हा साहित्य अकादमी विजेते ज्येष्ठ कोंकणी कवी, अनुवादक माधव बोरकरांचा लेख वाचकांना बोरकरांच्या दप्तरातील आजवर कुठेच प्रकाशित न झालेल्या दूर्मिळ कविता 'अधोरेखित'च्या स्वरुपात संग्रही ठेवण्याची नामी संधी मिळवून देत आहे.
तसेच चांगदेव काळे, संपदा जोगळेकर कुलकर्णी, निर्मोही फडके, संजय बोरूडे यांच्या सर्जनाविषयीच्या कथा आणि रश्मी वारंग, भारती बिर्जे डिग्गीकर, रेखा नार्वेकर या आणि इतर लेखकांचे ललित व वैचारिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ कवी अशोक बागवे सरांच्या आगामी पुस्तकातील ललित गद्याचा अंशसुद्धा यात समाविष्ट आहे. 'वाचनाचा बॅकलॉग भरून काढतोय' ही राज ठाकरे यांची निरूता भाटवडेकरांनी घेतलेली अराजकीय मुलाखतही यावर्षीचे आकर्षण ठरते आहे.
कविता विभागात अरूण म्हात्रे, अशोक कोतवाल, प्रवीण दवणे, अजय कांडर, दिनकर मनवर, प्रशांत असनारे, अनुराधा नेरूरकर, प्रतिभा सराफ यांच्या आणि समकालातील महत्त्वपूर्ण तेरा कवींच्या किमान दोन ते नऊ सर्जनावरील कविता एकत्रित प्रसिद्ध झाल्या आहेत.
आत्ताच खरेदी करा : http://bit.ly/2PcAybZ
गीतेश गजानन शिंदे
(कार्यकारी संपादक)
मो. ९८२०२७२७४६
October 30, 2019
सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !
December 17, 2010
मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात.
June 29, 2011
नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!
तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंद्रावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंद्राचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...
तर...
...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.
नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :
'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'
तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..
'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'
-- विनोद सुर्वे
July 31, 2019
प्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्युटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरु केले.
December 29, 2021
सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..” बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे गोष्टी घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला…पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे…….
March 8, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti