(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कॉपीमुक्तीचे दिवास्वप्न

    दहावी-बारावीच्या परीक्षांमधील कॉपीचे वाढते प्रकार रोखणे हे मोठे आव्हान आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने काही नवे उपाय सुचवले. त्यात विद्यार्थ्यांनी कॉपीविरोधातील शपथ घेणे तसेच कॉपी करणार्‍यांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे. पण, या उपायांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यावरच कॉपीमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.

      January 14, 2011


  • धन्यवाद मोदिजी

    मोदिजींनी किती दिमाख लावुन हे काम केले नक्की वाचाच किती मोठी चालाखी आहे यात मागच्या वर्षी १५ ऑगस्ट २०१५ ला जनधन योजना आणली ज्या योजनेत करोडो गरीब लोकांनी खाते उघडले त्याचा फायदा आता त्यांनाच होणार प्रत्येकाचे बँकेत खाते असल्यामुळे जास्त गोंधळ उडणार नाही त्यामुळे मोदिंनी आधीच खाते उघडायला लावले नंतर बँकेचे खाते आधार नंबरशी जोडण्यात आले कारण आता बँकेत पैसे जमा करण्यासाठी काही पुरावा म्हणुन मोदिंनी आधारकार्ड दाखवण्यास सांगितले याचा फायदा हा की बनावट अकाउंट व बनावट पैश्याला चाप बसेल त्यानंतर 3 महिण्याआधी सर्व काळा पैसा असणार्यांना सांगितलं की जो पैसा असेल तो देवुन टाका काही करणार नाही

    परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही मग काल ८ नोव्हेंबर च्या रात्री पुर्ण तयारी झाल्यावर ५०० व १००० च्या नोटा बंद करायची घोषणा केली वेळ पण रात्री ८ वाजताच का निवडला माहीत आहे का ?

    कारण देशातील सराफा मार्केट बंद होते ८ वाजता सर्वात जास्त उलाढाल तेथेच होते बँक बंद असते त्यामुळे कुठेही गर्दी किंवा काही चालाखी करता येणार नाही
    अमेरिका च्या निवडनुकीवर प्रचंड सट्टा लागणार होता तो रात्री १ वाजता तर रात्री १२ चीच मुदत दिली त्यामुळे भारतात सट्टाच खेळला गेला नाही हे झाले फायदे आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल कि मोदिंनी आधीच का नाही सांगितलं हे सर्व आमची गैरसोय नसती झाली पण मित्रांनो यामागे खुप मोठी हुशारी आहे

    जर आधीच मुदत दिली असती तर ज्या ज्या लोकांनी घरात काळा पैसा लपवुन ठेवला असता त्या लोकांनी पटकण जमीनी , सोनं , प्लॉट , शेअर खरेदी करुन ठेवले असते म्हणुन मोदिंनी ८ वाजता सांगितलं व फक्त ४ तासाची मुदत दिली आता या चार तासांत ते काय करणार आहे का ??

    सगळेच लुटले गेले आहेत कारण इकडे इनकम टँक्स वाले पण तयारच आहेत त्यांना पकडायला आणि घरी ठेवलं तर ते पैसे रद्दी होवुन जाईल यांना आता इकडे आड व तिकडे विहीर असे झालयं

    धन्यवाद मोदिजी

    कृपया हा संदेश सर्वांना कळु द्या

    खासकरुन त्यांच्यासाठी जे म्हणतात मोदिंनी काहीच केलेलं नाही

      November 12, 2016


  • मुंबई – एक अस्वच्छ शहर आहे का ?

    जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले.

      January 21, 2016


  • तर्‍हा

      January 17, 2012


  • माझ्या चारोळ्या …

    आकाशाला भिडणारे प्रेम
    आता कानाला भिडले
    हृदयात शिरणारे प्रेम
    मोबाईल मध्ये घुसले...

    मला मोठे व्हायचे होते
    पण फक्त तिच्या नजरेत
    मोठा झालो मी जगासाठी
    पण नालायक तिच्या नजरेत..

    माझ्या चारोळ्या वाचा
    सहन करू नका
    नाही आवडल्या तरी
    छान म्हणू नका...

    वाटत नाही कोणाला
    मी प्रेमवेडा आहे...
    कारण प्रेमाने मला
    बोलताच येत नाही...

    माझी कविता रोज
    तरुण होत गेली
    माझे तारुण्य रोज
    थोडे चोरत गेली...

    .

    माझी कविता काळापलीकडे
    कधीच जात नाही
    तरी कोणतीच बंधने
    काळाची जुमानत नाही...

    माणसांच्या गर्दीत मला
    कधीच हरवायचे नव्हते
    गर्दीतला एक माणूस
    कधीच व्हायचे नव्हते...
    भूत भविष्य आणि वर्तमान
    आपल्या जागी स्थिर असते
    मी बदलत गेलो वेड्यासारखा
    ती मात्र तशीच असते...
    का घाबरते का थरथरते
    तुझे प्रेम माझ्या समोर
    माझे प्रेमच वादळ होते
    असता माझ्या तू समोर...
    करोडो चांदण्या जरी नभात
    असते एकच त्याच्या जवळी
    माझ्या सभोवताली त्या असतात
    मी असतो तुझ्या जवळी...
    फाटक्या कपड्यातून डोकावणारे
    सौंदर्य पहावे लागते
    फाटक्या हृदयातून सांडणारे
    प्रेम जमवावे लागते...
    माझी प्रेमाची व्याख्या
    फारच निराळी आहे
    राधा- कृष्णाच्या अगदी
    जवळ जाणारी आहे...
    आभाळ दाटून येते
    आकाश निरभ्र असते
    वासना दाटून येते
    प्रेम निरभ्र असते...
    मला घायाळ करण्यासाठी
    शेवटी अस्त्र वापरले...
    माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी तू
    तुझे सौंदर्य खुलवले...
    © निलेश बामणे

      December 26, 2016


  • लाईफबोट

    लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते.

      July 15, 2021


  • आय मिस यू

    ही कवीता आवडल्यास जरुर कळवा

      April 19, 2011


  • आमची आजी

    काही दिवसापूर्वी दिर्घ आजारपणामुळे आमच्या आजीचे वयाच्या जवळ-पासपंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे आमची आई तिचे मायेचेछ्त्र कायमचेच गमावून बसली. आमच्यासाठी तर ती मायेच मोकळ आभाळ्च होती.

      June 20, 2014


  • जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या

    माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची .

    इंजिन आणि डबे रोज बदलली जायची, पण, एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा...

    आज न राहवून मी थांबून त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले , "बाळ तू रोज गार्ड होतोस ,तुला कधी इंजिन कधी डबा व्हायला आवडत नाही का?"

    त्यावर तो मुलगा उत्तरला , "बाबूजी मला घालावयास सदरा नाही मग माझ्या मागे कोण येणार ?"म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो..

    "हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले.. त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला.

    आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काहि ना काहि कमतरता असणारच .तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.

    त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई बापावर रागावून रुसून रडत बसता आले असते, पण, तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला व जीवनाच्या खेळाचा अंग बनून राहिला.

    मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचा अंग व्हायचे आहे .सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

    *Be positive and be happy*

      November 3, 2016


  • चारोळ्या …………!!!

    १) मी माझ्या मनात मांडे मांडले,

    मांडले ते मांडले,

    परंतु काही न गवसले.

    २) आले आले अन्ना आले,

    रथावर मात्र अडवाणी आरूढ झाले.

    ३) उपोषणाचे हत्त्यार उपसले,

    जनता-जनार्दन रस्त्यावर उतरले,

    राजकारण्यांचे धाबे दणाणले,

    जन लोक पाल बिल संसदेत प्रगटले.

    ४) जन आंदोलनाचा एकाच नारा,

    जन लोक पाल बिलाचा चढलाय वारा,

    संसदेत जर नाही दिला त्याला थारा,

    तर राजकारण्यानो तुमचे वाजतील तीन तेरा.

    ५) काही झाले काही कळेना,

    राजकारन्यांचे चित्त कुठेच लागेना.

    ६) मुंबई मेरी जान,

    तू आहेस सा-या देशाशी शान.

    ७) आला आला राजा आला,

    २ जीचा त्याने केला घोटाळा.

    ८) कोमन वेल्थ गेमच्या नावाखाली,

    सुरेश कलमाडींनी संपत्ती केली खाली.

    ९) कॉंग्रेसच्या राज्यात मोठ मोठे झाले स्कॅम,

    फुटलेल्या ह्या डॅमना कोण घालील लगाम.

    मयुर तोंडवळकर .......

    (९८६९७०४८८२)

      September 18, 2011