(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रविवार सकाळ!!‏

    प्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ!! आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम!! इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे जगत असतात, किमानपक्षी सिनेमा तरी नक्कीच!! वर्षातील, ५२ शनिवार म्हणजे ५२ पार्ट्या, हेच इथल्या आयुष्याचे महत्वाचे सार आहे. शुक्रवार दुपार झाली की मुलगा, मुलीला घेऊन( बव्हंशी उलटे देखील!! म्हणजे मुलगी,मुलाला घेऊन!!) कुठे रात्र काढायची, याचे Plans ठरवायला लागतो.इथे, रात्रीचे जेवण साधारणपणे ७ पर्यंत घेतले जाते. नंतर मग सगळी रात्र ताब्यात घेण्यासाठी!! यातून कुठलाच समाज सुटलेला नाही. गोरे, काळे, भारतीय, सगळेच हा अलिखित नियम पाळत असतात.आठवड्याची सगळी धडपड ही शनिवार रात्रीसाठी असते!!
    सुरवातीला मला हे जमवून घेणे अवघड गेले. संध्याकाळी सात वाजता, जेवण!! मुंबईकराला त्याचे अप्रूप वाटणारच.मला तर अजूनही वाटते. अर्थात, जिथे दुपारचा “लंच” म्हणजे एखादे Sandwich, तिथे मग रात्रीचे(!!) जेवण इतक्या लवकर क्रमप्राप्तच!!
    इथल्या पार्ट्या देखील “परिटघडीच्या” असतात. मोजके बोलणे(हा ब्रिटीश खाक्या!!), त्यातून ओठातल्या ओठात पुटपुटल्यासारखे शब्दोच्चार, (गरजूंनी परदेशी जाताना, अशा बोलण्याचा सराव किंवा निदानपक्षी ऐकण्याचा सराव जरुरीचा आहे!! अनाहूत सल्ला!!) अशी सुरवात असते. जरावेळाने, संगीत (अर्थात बहुतकरून पाश्चात्य अर्थात पार्टीत गोरे किंवा काळे असेल तर!! भारतीय असतील तर “चटणी” नामक भयाण संगीताविष्कार सहन करावा लागतो!!) लागले की, हळूहळू लोकांना “कंठ” फुटायला लागतो. म्हणजे कुणी “गात” नाही पण लयीच्या अंगाने बोलणे सुरु होते. सगळा कारभार बहुतांशी उभ्यानेच!! कारण, इथे पार्टी म्हणजे, बव्हंशी Barbecue असतो. एका मोठ्या लोखंडी भांड्यात ( पातेलीपेक्षा घेर आणि आकार मोठे आणि मुख्यत: चौकोनी!!) त्यात, कोळसे घालायचे आणि पेटवायचे.
    धगधगीत निखारे व्हायला लागले की त्यावर जाळी (लोखंडाची) ठेवायची आणि त्यावर मग, चिकन,मटण,सोया, पोर्क किंवा बीफ देखील, यांचे तुकडे (थोडा मसाला लावून ठेवलेले), याला sausages, chops असे म्हणतात. भाजून करपले की काढून हातातील प्लेटमध्ये वाढून घ्यायचे. बहुतेक पार्ट्यांमध्ये हाच “मेनू” असतो. फरक, मसाल्यामध्ये!! अर्थात, हातात, ग्लास हवाच!! त्यात, कधी बियर, कधी व्हिस्की असे पेय असते. एका हातात ग्लास आणि दुसऱ्या हातात प्लेट, अशी कसरत करावीच लागते!! त्याबरोबर मग गप्पा मारायच्या, असाच बहुतेक पार्ट्यांच्या बाबतीत “सोहळा” असतो. इथे तसा औपचारिकपणा भरपूर. शक्यतो चेहऱ्याची घडी न मोडता, आपला वावर ठेवायचा आणि तत्सम पार्टी “जोक्स” एन्जॉय करायचे!!
    हे जोक्स इतके भयानक असतात की, का हसायचे? हा मला नेहमीच प्रश्न पडतो!! समजा गोऱ्या लोकांच्यात पार्टी असेल तर, तिथे त्यामानाने मोकळेपणा (क्वचित नको तेव्हढा देखील!!) आढळतो. संगीतावर, जसे जोडपे असेल त्याप्रमाणे जोड्या तयार होतात आणि लगेच पाय थिरकायला लागतात. इथे, लग्नाची/बिनलग्नाची असला “बुरसटलेला” प्रश्नच उद्भवत नाही!! नृत्य करणे, हे महत्वाचे!! आपल्याला बघताना असे वाटते की पाश्चात्य नृत्य एकसाची आणि सोपे आते पण प्रत्यक्षात असा प्रकार नसतो. Ball Dance, Salsa, Rap या सगळ्या संपूर्ण वेगळ्या नृत्यशैली आहेत. प्रत्येकाची पायाची, आणि तदनुशंगाने शरीराची हालचाल भिन्न आहे. खरे तर संगीतात देखील भिन्नता आहे. आपण बारकाईने ऐकत/बघत नाही. अनिलने देखील बरेचवेळा सहभाग घेतला आहे.
    पहिल्यांदा अपरिचित/संकोची वाटते परंतु इथे तशी औपचारिकतेची बंधने नंतर गळून पडतात. परंतु गोऱ्या, काळ्या किंवा भारतीय समाजातील पार्टीची पद्धत ही बव्हंशी अशीच. प्रत्येक शनिवार याच धर्तीवर घालवली जाते. अनिल काही प्रत्येक शनिवारी असा जात नव्हता. त्याने देखील, नंतर स्वत:चे “ग्रुप्स” तयार केले. टिपिकल महाराष्ट्रीयन लोकांच्या पार्ट्या होतात. तिथे बरेचवेळा मानसिक कुतरओढ दिसते. बहुतेक सगळे, मध्यमवर्गीय संस्कृतीमधील परंतु काहीजण,इथले युरोपियन वातावरण बघून, थोडे बावचळलेले!! त्यामुळे, या संस्कृतीत वावरताना, मनाची कुतरओढ होताना दिसते. एकदम, आपली संस्कृती टाकून देता येत नाही आणि इथल्या संस्कृतीत लगेच सामावून घेणे अवघड जाते. खरेतर संस्कृती टाकायची गरज काय, हा माझा प्रश्न!!
    शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळ, इथे “सोहळा” म्हणून साजरा करायची पद्धत आहे. गोऱ्या संस्कृतीने दिलेली, या देशाला देणगी!! जवळपास शतकाहून अधिक वर्षे गुलामीचे दास्य लादलेले, त्यामुळे, गोरे सोडले तर सगळ्यांचीच मानसिक स्थिती दोलायमान!! अजूनही त्या खुणा दिसतात. गोरा दिसला की दबकून बोलायचे/वागायचे, अशीच इथली मानसिक ठेवण आहे. अर्थात, असे जर असेल तर गोरे लोक, गुर्मीत राहणारच!! त्याचा प्रत्यय, आज २० वर्षे झली तरी येतो. त्यामुळे, इथल्या गोऱ्यांच्या पार्ट्या, घरे, गाड्या, राहणीमान सगळेच इतरांपेक्षा “उच्च”!!
    अजूनही, पूर्वीच्या गोऱ्या लोकांच्या वस्त्या बघितल्या तरी कल्पना येते. नुसत्या वस्त्याच नव्हे तर त्या वस्तीतील हॉटेल्स, क्लब्स, मॉल्स सगळे वेगळ्या ठेवणीचे!! इथे, सहज मनात आले म्हणून भेटायला जाणे, हि अजिबात पद्धत नाही. अगदी, आपल्या आई/वडिलांना भेटायचे झाले तरी, फोनवरून भेटायची वेळ ठरवायची, शक्यतो, शनिवार दुपार किंवा रविवार दुपार!! संध्याकाळ, सोहळ्यासाठी रिकामी ठेवायची असते!! तुम्ही, कुणाच्याही घरी, “सहज या बाजूला आलो, तेंव्हा भेटूया” असे जाता येत नाही.
    केवळ नजरेने “नापसंती” व्यक्त होते किंवा समजा गोरा असेल तर तोंडावर “नापसंती” ऐकण्याची तयारी ठेवावी!! एकांतवास या गोष्टीला, इथे अपरिमित महत्व दिले जाते, तरुणाईला!! इथे प्रत्येक वयोगटाचे समूह असतात. वयाची २१ वर्षे झाली की तो वेगळ्या गटात!! लग्न झाले की वेगळा गट!! तिशी, चाळीशीचे वेगळे गट!! इथली समाजव्यवस्थाच किडलेली आहे!! लग्न म्हणजे निरुपाय, असेच बहुतेकांचे मत आहे!! हे सगळे भारतीय संस्कृतीत राहिलेल्याला पचविणे अवघड असते.
    शनिवारच्या पार्ट्यांत ह्या सगळ्या दृष्टिकोनाचा अनुभव येतो. ह्याशिवाय इथे वेगळे आनंदनिधान नाही!! फार तर, मॉल्समध्ये जाऊन खरेदी करणे( हे मात्र प्रचंड!!), तिथेच सिनेमाला जाणे किंवा तिथेच असलेल्या अप्रतिम पब संस्कृतीचा अथवा तरुण असलात तर वेगवेगळ्या क्लब्जचा आस्वाद घेणे!! आपल्याला ह्यामागील उद्देश नेमकेपणाने कळत नाही. पण इथला समाज ह्याच संस्कृतीत सुखनैव बुडालेला आहे. आता, हि संस्कृती बरोबर की चूक, हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांना नाही!! इथे एकत्र जमलो की निदान जे संगीत चालू आहे, त्याचा मनापासून “आस्वाद” घ्यायचा असे नसून, त्यात “दिखाऊ” वृत्ती अधिक!! साहित्यावर बोलायचे ठरले (असे फार क्वचित घडते, मला असा अनुभव फक्त २ वेळा आला आहे!!) ठरले तर आवड इतकी वेगळी असते की त्यावर काय बोलायचे, हाच मला प्रश्न!! संगीत हे संगीत म्हणून ऐकण्यापेक्षा त्यातील ठेक्यालाच अधिक महत्व!!
    याचा कळस, भारतीय वंशातील लोकांना भेटल्यावर होतो. अशाच प्रकारे, अनिलची वर्षे गेली, जात राहिली. असे शेकडो शनिवार आले आणि रेनकोटवरून पाणी ओघळावे त्यप्रमाणे ओघळून गेले!! रविवार सकाळ, यातूनच उगवते. आदल्या रात्री अशाच पार्टीला गेल्याने, अंगात प्रचंड आळस भरलेला, त्यामुळे तसाच बेडवर पसरलेला!! बेडवरून खाली उतरावे, असेच वाटत नाही सकाळचे एव्हाना ९(च) वाजलेले असतात.आदल्या रात्रे थोडा पाऊस शिंपडल्याने बाहेर “गारठा” म्हणावा अशी थंडी पसरलेली!! त्यामुळे, अनिल आपले हात पसरतो आणि बाजूलाच असलेल्या सीडी प्लेयरचे बटण दाबतो!! सिस्टीममधून रागदारीचे सूर ऐकायला येतात आणि त्या सुरांच्या गुंगीत परत झोपेच्या अधीन होतो!!
    - अनिल गोविलकर

      October 3, 2018


  • अपेक्षांच्या ओझ्याखाली

    एखाद्या मुलीची प्रेमप्रकरणे, लग्नापूर्वी त्यातील एखाद्याशी आलेले तिचे शारीरिक संबंध आणि एकूणच तिचा प्रेमाकडे खेळ म्ह्णून पाहण्याचा स्वभाव तिच्या होणार्या् नवर्या पासून त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी जाणिव पूर्वक लपविणे हा गुन्हा नाही का ? असल्यास त्यासाठी कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे की नाही ? या भानगडीत न पडता आपण या गोष्टीकडे जरा डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला हवा ! पूर्वी बर्या चदा मुलच प्रेमाच्या बाबतीत मुलींची फसवणूक करायचे पण आता त्यात मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. मांजर कशी उंदराला खेळवते तशा काही मुली मुलांना खेळ्वतात, त्यांच मानसिक खच्चीकरण करून त्यांना व्यसनाधिन बनवितात हे सत्य आहे पचायला किती ही जड असल तरी.

      December 26, 2013


  • त्रिशुंड गणपती

    त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर

    पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी,माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे.

      January 14, 2013


  • फालतू टोल नाके बंद केले आणि आमदारांनी फटाके वाजवले…..

    लेखकः अनंत कुलकर्णी, ठाणे

    आघाडी सरकारचे वाभाडे युतीने काढले आणि युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राच्या जनतेला टोलमुक्तीचे आश्वासन युतीने दिले होतेच. त्याला अनुसरुनच युतीने निर्णय घेतला आणि फालतू टोल नाके बंद केले.

    जे टोलनाके जनतेला त्रासदायक वाटत होते ते तसेच राहिले. मुंबईत प्रवेश करताना अजूनही टोल भरायला लागतोच. ठाण्याहून दररोज मुंबईत जाणार्‍यांचे रोजचे ७० रुपये आणि अर्धा तास बरबाद होतोच. परट्रोल - डिझेल जळते ते वेगळेच.

    पण सगळ्यात धक्कादायक आणि संतापजनक बाब ही आहे की हे टुकार टोलनाके बंद झाले तरीही त्या आनंदाप्रित्यर्थ आमच्या आमदारांनी फटाके वाजवले..... सेलेब्रेशन केलच....

    सरकारी गाड्यांमधून फुकट फिरणार्‍यांना जनतेची दुःख काय कळणार? कॉंग्रेंस असो की राष्ट्रवादी, भाजप असो की शिवसेना.. सगळे एकाच माळेचे मणी....

      July 8, 2015


  • लग्न आणि विघ्न गूढ

    आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.

      June 19, 2013


  • उत्तर प्रदेश मधील श्री ढुण्ढिराज गणपती

    उत्तर प्रदेश मधील ढुण्ढिराज गणपती काशी वाराणसीतील श्री काशिविश्वेश्वर मंदिराच्या परिसरात या गणेशाची मूर्ती आहे. ढुण्ढिराज गणेश क्षेत्र सर्वश्रेष्ठ म्हणून गणले जाते.

      August 6, 2013


  • काही नात्यांना कधी…

    स्वामी निश्चलानंदांची एक रचना

      July 19, 2011


  • एका लग्नपत्रिकेतील विनोद..

      August 4, 2016


  • बेळगाव आणी गोयकार

    गोव्यासाठी बेळगाव फारच जवळच महत्वाचे शहर आहे. आपल्या हारातील मुख्य घटक दुध, भाजीपाला, फळे, अंडी हे गोव्याला बेळगावकरच पुरवितात.

      November 2, 2024


  • सफारी इन माबुला भाग – १

    मी जात्याच भित्री असल्याने दक्षिण आफ्रिकेला जायचे टाळत होते. पण पूर्वी एका स्नेह्याकडून ऐकलेले आफ्रिकन सफारीचे वर्णन मोहही पाडत होते. भलं मोठं शिवार, उंच उंच गवत, मुक्त जंगली प्राणी आणि आपण मात्र उघड्या मोकळ्या जीपमध्ये ही कल्पना जरी रम्य असली तरी मला फारशी आकर्षक वाटत नव्हती. ह्यांना मात्र मनापासून तेथे जायचे होते, म्हणून आम्ही जोहान्सबर्ग व केपटाऊन हा भाग "बिग फाईव" बघण्यासाठी निवडला.

    जोहान्सबर्ग जरी आमच्या सहलीतले पहिले ठिकाण होते तरी तेथे न रहाता जवळच्याच 'सनसिटी'मध्ये रहाणे सगळे पसंत करतात. त्याप्रमाणे शहरात फिरून आम्हीही तेथेच गेलो. सनसिटीचे वर्णन मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स स्पर्धेमुळे ऐकले होते. क्वचित टीव्हीवर पाहिलेही होते. पण प्रत्यक्षात 'हॉटेल निसर्ग सान्निध्यात होते' एवढे सोडल्यास विशेष वेगळे काही वाटलेनाही. हॉटेल्स छान होती. 'बिग ५' चं आस्तित्व तिथल्या सजावटीत ठायीठायी दिसत होतं. छोटे छोटे खरे व कृत्रिम धबधबे, जंगलातली पायवाट, (कृत्रिम) लाटा उसळणारी तळी, कारंजी यांची शोभा हत्ती, सिंहाच्या पुतळ्यांनी अधिकच वाढवली होती.

    ठराविक वेळी हत्तींच्या पाठीमागून धूर सोडला जायचा, हत्तींचे चीत्कार, सिंहाच्या डरकाळ्या व माकडांचे ओरडणे ऐकू यायचे. मजा वाटली. सनसिटी मध्ये कॅसिनो असणे आवश्यकच. किंबहुना कुणी कॅसिनोमध्ये खेळायला व बिग फाईव पहायला तर कुणी वीकएंड साजरा करायला तिथे येतात. त्यामुळे आम्हालाही खेळण्याची नाही तरी तिथली गंमत पहाण्याची उत्सुकता होतीच. जुगाराच्या अड्यामध्ये जायला मन धजावत नव्हतं. त्याचवेळी आतला एकंदर कोलाहल हसण्याचे आवाज बाहेर थांबूही देत नव्हते. कॅसिनोच्या जवळ गेलो तर बाहेरच दरवाजापाशी (खोट्या) नाण्यांची रास एका सोनेरी घड्यातून खाली जमिनीवर ओतली जाते आहे असे दृश्य होते आणि त्यावर प्रकाशाचा झोत असा काही कोन साधून पडत होता की ती रास खरीच वाटावी. आपली लक्ष्मीची मूर्तीच काय ती कमी होती. दिव्यांची रोषणाई, आजुबाजूची बाग, आत बाहेर करणाऱ्या लोकांची लगबग, आणि एकंदर वातावरणातील उत्साह आम्हालाही खेचून आत घेऊन गेला. इथे आमचे पासपोर्ट आम्ही उतरलेल्या हॉटेलच्या ताब्यात असल्याने मलेशियासारखी तपासणी होत नव्हती. फक्त दारावर आमचा खोली क्रमांक विचारला. आत पाऊल टाकताच सिगारेट, सेंट व दारूचा एकच संमिश्र वास नाकात घुसला. विविध रंगसंगतीचे कपडे ल्यालेली विविध देशातली माणसे भान हरपून खेळण्यात मग्न होती.

    प्रशस्त जागेत भरपूर खेळण्याची यंत्रे असलेले वातानुकूलित कॅसिनो, रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशझोतांनी नुसते झगमगत होते. प्रत्येक यंत्रात माणसे आपापली खोटी नाणी-खोटे शिक्के सारून, खटके ओढून आपापले नशीब आजमावून बघत होती. त्या यंत्रातून कधी नाणी पडलीच तर वेड्यासारखी ओरडत होती, नाचत होती, एकमेकांना मिठ्या मारत होती... अगदी जल्लोषाचे वातावरण होते सगळीकडे. कुठे खटके दाबायची यंत्रे होती तर कुठे भली मोठी चक्रे एका छोट्या गोळ्याला गरागरा फिरवत होती, कुठे पत्त्यांचे सराईत हातातून वाटप चाललेले होते. पत्ते वाटणाऱ्या हातांची सफाई अवर्णनीय होती. आकर्षक गणवेशातील कर्मचारी, त्यांचे पत्ते हाताळताना होणारी हातांची सराईत हालचाल, रंगवलेली नखे आणि सुबक हात अगदी नजर खिळवून ठेवत होते. सगळीकडे लक्ष्मीचा खळखळाट ऐकू येत होता. आपल्याला जरी हे सगळे बघायचा कंटाळा आला तरी खेळणारे मात्र अगदी तल्लीनतेने खेळत होते. खाणेपिणे, सिगरेट, वारुणीचे घुटके-सगळे तिथेच, त्या यंत्र देवासमोर बसूनच. आमच्यासारख्या बघ्यालाही आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही शिक्के फुकट देण्याचे प्रलोभन कॅसिनोचे कर्मचारी सतत दाखवत होते. आपण ते घेऊन जर एखाद्या खेळाकडे म्हणजे आपल्याला खेळायला सोप्या अशा खटक्याच्या खेळाकडे गेलो आणि थोड्या वेळातच कंटाळून निघालो तर त्या यंत्राकडे इतर मंडळी अगदी धावत सुटायची. प्रथम असे का ते कळलेच नाही. मग समजले की, आपल्यासारख्या बिगिनरचे नशीब त्या लोकांना लाभते म्हणे! सगळे वातावरण जरी खूप आकर्षक असले तरी सिगारेटचा व दारूचा वास आम्हाला फारवेळ तिथे थांबू देईना. मोकळ्या हवेत आल्यावर बरे वाटले.

    कॅसिनोची सजावट आतून होती तशीच बाहेरूनही खूप कलात्मक होती. प्रत्येक कॅसिनोबाहेर छान बाग होती. शोभेची झाडे, फुलझाडे यांची रंगसंगती अगदी नजर खिळवून ठेवत होती. दिव्यांच्या खांबावर वेलींचे झोपाळे करून त्यावर विविध पक्षी बसवले होते. छान संगीत होते. झाडांवर माकडे उड्या मारत होती. कोणी खाऊ दिला तर पटकन उतरून परत जात होती.निसर्गाच्या प्रसन्न सान्निध्यात प्रवासी खाद्य-पेयांचा आस्वाद घेत होते. सगळेपहाता पहाता दोन दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही. आपल्या जगतसुंदऱ्या जिथे उतरल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो, राहिलो याचा आनंद होताच पण आता पुढचे वेध लागले होते ते सोन्याच्या खाणीचे आणि माबुला लॉजचे. त्यासाठी परत मुक्काम जोहान्सबर्ग!

    आलो त्या दिवशी जो'बर्गचा काही भाग पाहिला होता. उरलेला सन सिटीहून माबुलाकडे जाताना. वाटेमध्ये सोन्याची खाण! अपेक्षेप्रमाणे ती गावापासून दूर होती, पण निर्जन भागात नव्हती. एक दोन मस्त रेस्टॉरंट्स, शेजारीच मुलांसाठी करमणूक केंद्र, रोलर कोस्टर, रिझॉर्टस यांनी ही 'गोल्ड रीफ सिटी' गजबजली होती. अर्थातच सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे गोल्ड माईन. सोन्याचे आकर्षण आम्हा भारतीयांइतकेच परदेशीयांनाही वाटते, त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्यामध्ये न रमता मंडळी सोन्याच्या खाणीकडे वळली.

    खाणीत प्रवेश करण्याचा रस्ता सुव्हेनीयर शॉपमधून होता. गोल्डरीफ चा ट्रेडमार्क असणाऱ्या तबकड्या, टी शर्टस, की चेन्स अशा अगणित वस्तू विक्रीसाठी मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातील १-२ गोष्टी खरेदी करून वळलो. एका भल्यामोठ्या लोखंडी कमानीने आमचे स्वागत केले. सोन्याच्या खाणीचे प्रवेशद्वार लोखंडाचे आहे याची गंमत वाटली. मी तर अशाप्रकारची खाण प्रथमच पहात होते. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचे मला कुतूहल वाटत होते. माईन बघायची असेल तर फक्त गाईडेड टूरच घेता येते. स्थानिक गाईडने आत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते सांगितल्यावर गंमत-जंमत करणारी मंडळी जरा गंभीर झाली. अन् जेव्हा आम्ही हेलमेट घालून व हातात टॉर्च घेऊन पिंजरावजा लिफ्टमध्ये शिरलो तेव्हा लिफ्टची एकंदर अवस्था बघून हे गांभीर्य अधिकच वाढले. आपण जमिनीखाली २२० ते २५० मीटर जाणार आहोत हे कळल्यावर तर बोलतीच बंद झाली. थोडेसे खाली जातोय तोच लिफ्टच्या बाहेरच्या बाजूने प्रथम पाणी ठिबकण्याचा व नंतर भिंतीवरून पाणी ओघळण्याचा आवाज यायला लागला. क्वचित तुषारही अंगावर उडले, कानात दडे बसले, अंधार वाढायला लागला. मिणमिणत्या उजेडात लिफ्ट जास्तच जुनाट वाटत होती. तिचा वाढत जाणारा आवाज अंगावर काटा आणत होता. कधी बाहेर पडतोय असे झाले होते. तोच मोठा आवाज करून लहानसा गचका देत लिपट थांबली. 'चला, सुटलो!' म्हणत लिफ्ट मधून बाहेर पडलो ते काळोखी भुयारात! भुयार पाहिल्यावर तर अगोदरची लिफ्टच बरी वाटायला लागली. भुयार मिणमिणत्या उजेडाचे, जेमतेम ७-८फूट उंची असलेले व एकावेळी २-३ माणसे जाऊ शकतील असे होते.

    पायाखालची जमीन टणक व खूपच खडबडीत असल्याचे बुटांच्या तळव्यातूनही पायाला जाणवत होते. त्या खडबडीत भुयारातून आम्ही जमिनीखाली २५० मीटरवर चालत होतो ही कल्पनाही फारशी आकर्षक नव्हती. तसेही उष्णता आणि ताज्या हवेच्या अभावामुळे आपल्याला इथे २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू देत नाहीतच. जरी हवेचा दाब व प्रवाह नियंत्रित केले असले तरी आर्द्रतेमुळे फार वेळ थांबणे त्रासदायकच होते. या परिस्थितीत राहून सोने काय किंवा कोळसा काय खणून काढणाऱ्यांना माझे शतश: प्रणाम!

    या भुयारात ठिकठिकाणी वेगवेगळी हत्यारे, डायनामाईट्स, विजेचे जनरेटर सेट्स, खाणीतून निघणारे दगड वाहून नेण्यासाठी जिने, रस्ते, गाड्या ठेवलेले होते. काही ठिकाणी पुतळे तर काही प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी कामगारही होते. कधी मिणमिणत्या उजेडात तर कधी टॉर्चच्या प्रकाशात आम्ही हे सारे पहात होतो. डोळे सरावले अन् आपण जमिनीखाली आहोत हेच विसरायला झाले. सगळेजण बघण्यात एवढे रमलो की गाईडने "आता परत फिरूया" म्हटल्यावर "एवढ्यातच?" अशीच सगळ्यांची प्रतिक्रिया झाली. पण शेवटी लिफ्टपाशी जेव्हा "ही खाण मुळात १०००मीटर खोल होती, पण आता ३०० मीटरच्या खाली पाणी भरलेले असल्याने बंद आहे" असे कळले तेव्हा उगीचच पायाखालची जमीन हलते आहे असा भास होऊन कधी वर उघड्यावर जातो असे झाले. परत त्या लिफ्टचा प्रवास सुरू झाला. लिफ्ट वर येताना जास्तच आवाज करते व तिच्या वेगाने भिंतीवरून ओघळणारे पाणी जास्त जोरात आम्हाला भिजवते आहे हेही अनुभवायला मिळाले.

    वर येऊन मोकळा श्वास घेतल्यावर खूप बरे वाटले. शुद्ध हवेची महती अशा वेळी प्रकर्षाने जाणवते. खाणीतून मिळणारं सोनं, दगड, वाळू, व इतर धातूंपासून वेगळं करून शुद्ध करतात. वितळवून त्यापासून ठोकळे तसेच चिपा बनवण्यापर्यंत काय काय प्रक्रिया केल्या जातात याचे प्रात्यक्षिक शेजारच्याच खोलीत चालू होते. १० किलो सोन्याची ढेप खास हात लावण्यासाठी ठेवली होती. सर्वजण त्याला कुरवाळत होते हे पाहून माझाही धीर चेपला व मग मीही हात पावन करून घेतले. १-२ ग्रॅम पासून फारतर १० ग्रॅम पर्यंत सोने हातात घेणारे माझे हातच त्यादिवशी सोन्याचे झाले.

    सोने पाहून झाल्यावर आमच्या गाड्या मुख्य मुक्कामाकडे निघाल्या. गेम सफारीबद्दलची माझी कल्पना म्हणजे जंगल, त्यातले प्राणी आणि त्यांना बघण्यासाठी तुफान वेगाने धावणारी जीप. म्हणून या मुक्कामासाठी मी नाखूष होते. जो'बर्गपासून सुमारे अडीच तासाचा प्रवास. वाटेत कुठे वस्ती तर कुठे डोंगर, मोकळी जागा. वाटेत दूरवर काही खाणीही दिसू लागल्या. त्या खाणीतून बाहेर टाकलेल्या मातीचे, दगडांचे ढीग उन्हात चमकत होते. पण जंगलाचे अन वन्य प्राण्यांचे नाव नव्हते. शेवटच्या अर्ध्या तासात चित्र एकदम बदलले. रस्त्याच्या कडेने झाडे दिसायला लागली, लांब दिसणारे डोंगर जवळ आले, वळणे घेत आम्ही माबुला 'लॉज मुक्कामी' पोहोचलो.

    आमची गाडी तिथे पोहोचताच आदिवासी वेषातल्या एका माणसाने जोरजोरात ढोल वाजवायला सुरुवात केली. प्रवेशालाच कमान व मागे मोकळे अंगण होते. आम्हाला 'सुस्वागतम्' म्हणायला आदिवासी वेषातील कर्मचारी हजर होते. ओले टॉवेल व सरबताचे ग्लास हातात देऊन कमरेत वाकून त्यांनी सर्वांचे स्वागत केले. त्या गरम व चिकचिक्या हवेत ओले टॉवेल व कोमट पण टेस्टी सरबत खूपच छान वाटले. आत्तापर्यंतच्या प्रवासाचा थकवा कुठेच्या कुठे पळून गेला. रिसेप्शन हॉलमध्ये सर्व आधुनिक सोयी असल्या तरी सजावट मात्र जंगलातल्या वातावरणाला साजेशी होती. समोरच छोटसं तळं त्यावर सुबक पूल, मागे सर्वत्र झाडे व निवासी खोल्यांचे पुंजके.

    वॉटरबर्ग डोंगराच्या परिसरात लिम्पोपो प्रॉविन्समध्ये १२००० हेक्टर आवारात हे लॉज आहे. अनेक छोट्याछोट्या झोपड्या व ३-४ कॉन्फरन्स हॉल असणारे हे लॉज निसर्गाशी पूर्ण एकरूप झालेले आहे. बऱ्याचशा खोल्या एकमजली, क्वचित एखादी इमारत दुमजली. खोल्या गटागटांत विभागलेल्या पण एकमेकांपासून दूरदूर आहेत. मधेमधे पायवाट, मोठी मोठी झाडे व गुडघ्याइतके गवत होते. झाडांवर दिवसा वेगवेगळे पक्षी तर रात्री वटवाघळे दिसली. दिवसभर वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळे राग आळवत असलेल्या पक्ष्यांना रात्री रातकिड्यांनी छान 'किर्रर्र' संगीताची साथ दिली होती.

    आमची खोली रिसेप्शन हॉलपासून दूर, सगळ्यात शेवटच्या एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर एका टोकाला होती. आम्ही दोघे सोडल्यास इतर कोणीच त्या इमारतीत वस्तीला नव्हते. हे लक्षात आल्यावर व आजुबाजूचे उंच उंच गवत पाहून मला तर पळून जावेसे वाटत होते. पण जाणार कुठे? शेवटी जीव मुठीत धरून २ दिवस काढणे भाग होते. खोलीत आधुनिक सोयी तशा मर्यादितच होत्या. दारासमोरच्या भिंतीवरला भला मोठा पडदा 'मागे काहीतरी आहे' हे दर्शवत होता. भला मोठा प्रशस्त व्हरांडा पडद्याआड लपून आमची वाट पहात होता. व्हरांड्याला कठडा वगैरे नव्हताच, फक्त गवतात शिरणाऱ्या ३-४ पायऱ्या होत्या. अंधार पडेपर्यंत मजा वाटली, पण नंतर मात्र बिग५ पैकी कोण येईल सोबतीला याची भीती वाटू लागली. जेवणाची वेळ झाल्याची बातमी हवेत दरवळणाऱ्या मसाल्यांच्या वासाने व रिकाम्या पोटाने करून दिली तसा आम्ही आमचा मोर्चा जेवणघराकडे वळवला.

    -– अनामिका बोरकर

      November 23, 2022