मुळातच अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असल्याने, अभ्यासात सुद्धा निखील गुणवंत आहे. तरीही परस्पर विरोधी क्षेत्रात काम करणं नेहमी आव्हानात्मकव आनंदी वाटतं.
September 28, 2013
आनंद लिमये
या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे.
आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं.... जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची
आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची.
हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी
आनंद लिमये
April 17, 2015
सातार्यातील या गणेशाची मूर्ती आकाराने १० ते १२ फूट उंच असल्याकारणाने त्याला ढोल्या गणपती म्हणतात.
September 18, 2012
१९५२ साली प्रदर्शित झालेल्या लाखाची गोष्ट या चित्रपटातील हे गाणे. हे गीत लिहिले ग.दि.माडगुळकर यांनी. पहाडी (नादवेध) या रागातील हे गाणे असून गाण्याला संगीत दिले सुधीर फडके यांनी तर गाण्याच्या गायिका आहेत मालती पांडे. चला तर मग ऐकूया, हे गाणे..
September 24, 2013
सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता .
May 25, 2020
October 28, 2016
जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या भारतीय कलावंतांना ओळखले जाते, जगभरातील रसिकांवर ज्यांच्या कलाविष्काराची मोहिनी आहे त्यामध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र, थोर कलावंत हाही अखेरीस माणूसच असतो, त्याच्या हातूनही अक्षम्य प्रमाद घडू शकतात, याची प्रचिती या पुस्तकातून येते.
पंडितजींचे थोरले पुत्र राघवेंद्र यांच्या मराठी पुस्तकाचा हा नेटका अनुवाद आहे. पंडितजींनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे आपल्या आईची कशी फसवणूक, आबाळ झाली, दुसऱ्या संसारात रमलेल्या पंडितजींनी दोन पत्नींमध्ये, मुलांमध्ये कसा पक्षपात केला याचे प्रसंगानुरूप दाखले राघवेंद्र यांनी दिले आहेत.
राघवेंद्र यांची आई सुनंदा व पंडितजी ही आते-मामे भावंडं. सुनंदासारख्या गृहकृत्यदक्ष व प्रेमळ पत्नीमुळे भीमूची संगीतसाधना बहरली, त्याला स्थैर्य लाभले, अशी मोहोर पंडितजींच्या वडिलांनीच उमटवली होती. जोशींच्या घरी सोवळेओवळे कटाक्षाने पाळले जात असल्याने पंडितजींच्या पत्नीला विहीरीवरून ओलेत्याने पाणी भरावे लागत असे. घरात शिष्यांचा वावर असल्याने पंडितजींना हे खटकले. त्यांनी वडिलांना सांगितले की, माझी पत्नी हे सर्व करणार नाही, तुम्ही दुसरी व्यवस्था करा...
स्वतंत्र, बंडखोर विचारांचे पंडितजी नामोहरम झाले ते दुसऱ्या लग्नामुळे. एका नाटकाच्या निमित्ताने आयुष्यात आलेल्या वत्सला मुधोळकर यांच्यासह त्यांनी दुसरा संसार थाटला, तोही पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन. विशेष म्हणजे, मी केवळ त्यांच्याकडे गाणे शिकायला आले आहे. माझ्या मनात दुसरा हेतू नाही, असे या बाईंनी सुनंदाबाईंच्या पाया पडून सांगितले होते. कालांतराने पंडितजींची दोन्ही कुटुंबे पुण्यात स्थायिक झाली. तरीही, दुसरे कुटुंब ऐश्वर्यात व पहिले कुटुंब जुनाट वाड्यातील एका खोलीत अशी तफावत होती. पहिल्या पत्नीवर व मुलांवर आपण फार मोठा अन्याय केला आहे, याचा गंड मनात असल्याने पंडितजी पहिल्या कुटुंबाला जमेल तशी मदत, हौसमौज करत असत.
राघवेंद्र यांनी एकलव्यी बाण्याने वडिलांचं गाणं आत्मसात केलं. पंडितजींना ते ठाऊकही होतं. परंतु बाईंची खप्पामर्जी स्वीकारून आपल्याला गाणं शिकवण्याचं धाडस ते करू शकले नाहीत. दुसऱ्या संसारात पंडितजींना खरं प्रेम लाभलं नाही. मानसिक अस्थैर्यामुळे त्यांचं व्यसन वाढलं. अचानक गायब होण्याचे प्रकार सुरू झाले. ते कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनी घरीच मदिरापान केल्यास हरकत नसावी, असे राघवेंद्र यांनी वत्सलाबाईंना सुचवून पाहिले. परंतु, कला वगैरे काही नाही, हा केवळ धंदा आहे, असे धक्कादायक उत्तर त्यांच्याकडून मिळाले. प्रत्येक मैफलीनंतर मिळणारे मानधनाचे पाकिट ही मंडळी काढून घेत असत. एवढंच नाही, तर सत्तरीनंतरही पंडितजींना मैफली कराव्या लागल्या, ते कुटुंबीयांच्या हव्यासापायीच. मी गायलो नाही तर ही मंडळी मला डॉबरमॅनसारखं बांधून ठेवतील, अशी व्यथा पंडितजींनीच सहकाऱ्यांजवळ बोलून दाखवली होती.
अर्थात, या धक्कादायक चित्रणाव्यतिरिक्त पंडितजींचं लखलखतं व्यक्तिमत्त्वही या पुस्तकातून समोर येतं. लहानपणी सायकलच्या हँडलला जिवंत विंचवांची माळ लावून फिरणारा तसेच अंथरुणात जिवंत साप पडल्यानंतरही न डगमगणारा भीमू, ऐन तारुण्यात हाताने लोखंडी कांब वाकवणारा, उपद्रवी हुप्याचा पाठलाग करून त्याला चोप देणारा बलदंड भीमण्णा, ताटभर लाडू फस्त करणारा खवय्या, सुनंदाबाईंना ‘अलबेला’तील नृत्य हुबेहूब करून दाखवणारा, पं. बिरजू महाराजांसह भान हरपून कथ्थक नृत्य करणारा उपजत नर्तक, कुठेही न शिकता कारची दुरुस्ती करणारा, मैफलींसाठी हजारो किमी.चे ड्रायव्हिंग स्वत: करणारा स्वरभास्कर आणि ऐन सत्तरीतही खड्ड्यात अडकलेले कारचे चाक ताकद लावून बाहेर काढणारा अवलिया... ही पंडितजींची रूपे थक्क करतात.
हा अवलिया मोहाच्या एका क्षणी परतीचे दोर कापून बसला. ‘कसा मला टाकूनी गेला राम’ हा आपणच गायलेला अभंग कदाचित अखेरपर्यंत त्यांचा पाठलाग करत असेल, असं वाटून जातं.
- अनिरुद्ध भातखंडे
भीमसेन जोशीः माय फादर, लेः राघवेंद्र जोशी, अनुवादः शिरीष चिंधडे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पानेः २१९, किंमतः ५५० रु.
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
November 9, 2016
पावसाळा नुकता संपलेला. चार महिने अधूनमधून ढगाआड जाणारा चंद्रमा अश्विनातल्या पौर्णिमेला पूर्ण तेजानं उजळून आलेला. या पौर्णिमेचं स्वतःचं खास स्थान आहे. ही ‘कोजागिरी पौर्णिमा’ । रसिकांना कवींना, लक्ष्मीच्या पूजकांना आणि वैद्यांनाही महत्त्वाची वाटते.
December 25, 2023
कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू... ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो.
पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे.
ब्रिटीशकालीन असलेले हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.
पुरातत्व दालनात आपल्याला वाकाटककालीन शिल्पे, शिलालेख पाहायला मिळतात. याठिकाणी असलेले मांढळ येथे सापडलेले महासदाशिवाचे शिल्प उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर मोहोंजदडो येथील उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तु, शिल्प तसेच कौण्डीण्यपूर येथे सापडलेली अश्मयुगीन हत्यारे आपणास पाहावयास मिळतात. भेडाघाट येथे सापडलेली यक्ष व यक्षिणीची शिल्पे, कला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.
शस्त्र दालनात मोगल, इंग्रज, मराठा, राजपूत यांची निवडक शस्त्रे, आदिवासींची शस्त्रे तसेच चिलखत, टोप, धातूच्या साखळीच्या सहाय्याने बनवलेला अंगरखा आहे तर, कला व उद्योग विभागात हस्तीदंत, लाकूड, चांदी, संगमवरी यापासून तयार केलेल्या कोरीव वस्तु प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून जातात.
येथील प्राणिशास्त्र विभाग प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करणारा आहे. टॅक्सीडर्मी केलेले (भुसा भरलेले प्राणी) मगर, जंगली पशु,किटक,मासे,मगर असे नानाविध प्रकारचे प्राणी इथे आपल्याला भेटतात. पक्षी दालनात असलेला कावळा हा येथील आकर्षण आहे. प्रेक्षकांची पावले हमखास या पांढऱ्या कावळ्याजवळ थबकतात.
या दालनांसोबत तुम्ही चित्रकला दालनाला नक्की भेट द्या. विदेशातील नामवंत चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली दुर्मिळ चित्रे इथे आहेत. जलरंग, तैलरंग अशा माध्यमातील वस्तुचित्रे, निसर्गचित्रे,व्यक्तीचित्रे नजरेचे पारणे फेडतात. धुरंधर, एस.एम.हळदणकर, एम.आर.आचरेकर, हेब्बर आदी प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या दालनात आहेत. याठिकाणी हळदणकरांचे ‘निरांजनी’ हे गाजलेले चित्र आहे. हे चित्र पाहताना चित्रकाराने साकारलेल्या रंगछटा आणि टिपलेला बारकावा यांचा अनुभव थक्क करणारा आहे. भव्य परीसरात वसलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. अभिरक्षक (क्युरेटर) म्हणून श्री.गठाणे या वस्तुसंग्रहालयाचे काम पाहत असून चित्रकार श्री.मंडपे यांचे त्यांना सहाय्य लाभत आहे. प्रेक्षकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत संग्रहालय खुले असते.
अनेकविध दुर्मिळ वस्तूंचा नजराणा असलेल्या या वस्तुसंग्रहालयास एक वेळ अवश्य भेट द्या.
-- काशीबाई थोरात (संदर्भ - महान्यूज)
April 6, 2016
चारोळ्या …………!!!
(भाग २)
September 18, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti