गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.
२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू
खणानारळाची,
ञिकोणाचे क्षेञफळ =
१/२xपायाxउंची.
४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
१९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.....
हे घनाचे पृष्ठफळ
५) तीन पानांचा बेल त्याला
येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची..... हे
इष्टिकाचीतीचे घनफळ.
६) जुन्या हजार पाचशेच्या
बंद झाल्या नोटा,
खरेदी वजा विक्री
बरोबर होईल तोटा
७) मी आणि माझे विद्यार्थी
दररोज खातो काजू ...
चौरसाची परिमिती =
4 × बाजु.
८) खोप्यात खोपा
सुगरणीचा खोपा
विक्री वजा खरेदी
बरोबर होईल नफा
९) दहा किलो म्हणजे
एक मण...!!
घनाचे घनफळ
बाजूचा घन....!!
१०) जीवाला जीव देतो तोच खरा मित्र
गणित सोडवायला माहिती हवीत सुत्र
११) सम आणि व्यस्त हे
चलनाचे प्रकार
पहिल्यात असते गुणोत्तर
तर दुसर्यात गुणाकार
१२) "गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
एक हजार लीटर....!!!!
१३) रविवार नंतर सोमवार
येतो,
रविवार नंतर सोमवार
येतो.....
प्रत्येक ऋण संख्येचा
वर्ग ...
नेहमीच धन होतो.
१४)महादेवाला आवडते
बेलाचे पान...
कोणत्याही ञिकोणात
एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा
लहान....!!
१५) दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे
घ्यायला,
सुवासिनी झाल्या गोळा..!!!
-- WhatsApp वरुन आलेला मेसेज
July 1, 2017
पण काही प्रश्न असे किरकोळ असतात की त्यांच्या असण्या नसण्यानं आपल्यात काहीही फरक पडत नाही. हे छोटे छोटे प्रश्न आपल्याला नेहेमीच सतावत असतात.. कोणते आहेत ते प्रश्न ?
July 17, 2021
गुगल आपल्याला असंख्य माहिती पुरवतो. परंतु अचूक माहिती हवी असल्यास वाचनाची सवय असायलाच हवी आणि कायद्यात एकदा वाचले म्हणजे सर्व समजले असे नाही. तर अपडेट राहणे हे आवश्यक असते. काल एका संस्थेत मला संस्थेच्या पदाधिकार्यांनी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे माहित करण्यासाठी बोलावले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, दोन व्यक्तीनी मिळून जर सदनिका विकत घेतली असेल तरी दुसरे नाव करारात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी सहयोगी सदस्यचा फॉर्म संस्थेत सादर करावाच लागेल. तुम्हीसुद्धा वरील समितीच्या पदाधीकार्याबरोबर सहमत आहात का? तुम्हाला कधी काय बदल झाले याची माहिती सदर लेखात खास आपल्यासाठी दिली आहे.
August 15, 2021
गुंतवणुकीवर अधिकाधिक परतावा मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळतो, परंतु त्यात धोकेही असतात. म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि काही तरुण मंडळीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशाच काही सुरक्षित गुंतवणूक प्रकारांचा मागोवा.
October 12, 2010
या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम..
August 25, 2019
बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.
November 23, 2012
सूर्यदेवाचा खेळ संपल्यावर आता चंद्रदेवाने खेळ सुरु केला, चांदण्या लुकलुकायला लागल्या. ट्रेनी सिमनला म्हटलं आता चंद्रप्रकाश कसा दुधाळ दिसतोय पण तो कसल्यातरी विचारात दिसला, तरीपण तो म्हणाला दुधाळ चंद्रप्रकाश पाहिला की तिचा मधाळ चेहरा आठवतो. वाऱ्याची झुळूक आली की तिचे भुरभुरणारे केस आठवतात. जलतरंग जहाजावर येऊन आदळतात तितक्याच मंजुळ स्वरात तिच्या बांगड्या वाजल्याचे आठवतं. त्याला म्हटलं बस कर आता आठवणी, जाऊन मेसेंजर वर व्हिडिओ कॉल कर आणि बघत बस मधाळ चेहरा, फॅनवर भुरू भुरू उडणारे केस आणि बांगड्यांचे मंजुळ स्वर.
July 8, 2021
अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.
July 16, 2011
जीवनाच्या रगाड्यातून
May 25, 2013
स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करण्याच्या आपल्या अट्टाहासामुळेच आपले प्रचंड नुकसान झालेय हे लक्षात घेतले तरच तिसरी पायरी आचरणात आणण्याची मानसिक तयारी होते असे सांगत सरांनी तिसऱ्या पायरीचे यशस्वीपणे आचरण करण्यासाठी ‘ फक्त आजचा दिवस ‘ हे तत्वज्ञान खूप मदत करू शकते हे सांगितले
May 10, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti