आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा……
October 26, 2014
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे ।
मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।।
खेळांना त्या समजून घ्या- १--- या मित्रांनो सारे या,
हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा ।
स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
एकाच दमात भिडू मारू या -२--- या मित्रांनो सारे या,
खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई ।
उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे ।।
मिळता खो भिडूला पकडू या- ३--- या मित्रांनो सारे या,
लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा ।
राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती ।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – ४--- या मित्रांनो सारे या,
आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात ।
सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती ।।
चपळाईने घरात शिरू या – ५--- या मित्रांनो सारे या,
एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित? ।
उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे ।।
आखल्या रेषेतच खेळू या- ६--- या मित्रांनो सारे या,
एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या ।
निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो ।।
शीण अभ्यासाचा घालवू या – ७ --- मित्रांनो सारे या,
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 26, 2016
मैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)
December 13, 2023
October 21, 2010
नविन वर्षाच्या Startup ला करूया एक Resolution
Mute झालेल्या संवादांचं पुन्हा जोडूया Connection
आयुष्याच्या Wall वरचं हेच खरं Relation
-- सौ.अलका वढावकर
January 2, 2016
काल एक वेगळा अनुभव आला होता. दुपारी अचानक मोबाईल वाजला. फोन मी कधीच उचलत नाही ऐकू येत नाही म्हणून. त्यामुळे घरचे. नातेवाईक मला फोन करत नाहीत. हो पण कधी कधी काय होते की हे त्यांचा फोन इथेच ठेवून बाहेर बैठकीत वगैरे जातात आणि अशा वेळी काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मुलांचा फोन येतो.
January 23, 2023
सूर्यदेवाचा खेळ संपल्यावर आता चंद्रदेवाने खेळ सुरु केला, चांदण्या लुकलुकायला लागल्या. ट्रेनी सिमनला म्हटलं आता चंद्रप्रकाश कसा दुधाळ दिसतोय पण तो कसल्यातरी विचारात दिसला, तरीपण तो म्हणाला दुधाळ चंद्रप्रकाश पाहिला की तिचा मधाळ चेहरा आठवतो. वाऱ्याची झुळूक आली की तिचे भुरभुरणारे केस आठवतात. जलतरंग जहाजावर येऊन आदळतात तितक्याच मंजुळ स्वरात तिच्या बांगड्या वाजल्याचे आठवतं. त्याला म्हटलं बस कर आता आठवणी, जाऊन मेसेंजर वर व्हिडिओ कॉल कर आणि बघत बस मधाळ चेहरा, फॅनवर भुरू भुरू उडणारे केस आणि बांगड्यांचे मंजुळ स्वर.
July 8, 2021
तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी आता उत्तमोत्तम व्यासपीठ मिळत आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल व्यासपीठाचा विचार करता फेसबुक, युटयूबसारखे सामाजिक माध्यमं आपल्यासमोर येतात. तरुणाई या सोशल मीडियाचा व्यासपीठ म्हणून कसा वापर करते यावर थोडीशी नजर टाकू या.
गेल्या अनेक वर्षात मनोरंजनाची साधने बदलत गेली आहेत. चित्रपट, मालिका, नाटके आदी साच्यातून बाहेर येऊन आता वेब सिरीज प्रचलित झाली. यू टयूबच्या उदयानंतर वेब सिरीजने मनोरंजन क्षेत्रात उडी मारलेली पाहायला मिळते. विविध विषय ज्यामध्ये कोणत्याही सेन्सॉरचा आक्षेप नसतो, भाषाशैलीला मर्यादा नसतात, असे कोणतेही अटी नसलेले वेब सिरीज सध्या प्रचंड हिट होतायत. हे वेब सिरीज पाहण्यामध्ये तरुणाई अधिक पुढाकार घेताना दिसते. संध्याकाळी ६ ते १०.३० पर्यंत महिलांनी मालिका विश्वात आपलं अढळ स्थान केलं आहे; त्यामुळे या फावल्या वेळात आपण काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच तरुणांना वेब सिरीजचं उत्तर मिळालं आहे.
१९९५ साली दि स्पॉट ही पहिली वेब सिरीज प्रसिद्ध झाली. मात्र वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद २०१४ पासून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मंडळींनाही यू टयूब हे उत्तम माध्यम वाटत असल्याने तेही वेब सिरीजला महत्त्व देताना देसतात. मात्र आजकाल या यू टयूब चॅनेलचा किंवा या वेब सिरीजचा तरुणाई जरा हटके पद्धतीने विचार करताना दिसते.
कवितेचे गाणं होताना ही वेब सिरीज तुम्हाला माहीत असेलच. सलील कुलकर्णी दर रविवारी यू टयूबवर त्यांचा हा वेबिसोड अपलोड करतात. त्यात त्यांच्या प्रत्येक कवितेविषयी आत्मितयेने बोलताना दिसतात. त्याचप्रमाणे आपल्या तरुण वर्गातही कविता लिहिणारे कमी नाहीत.
पूर्वी कवितांचा संच तयार करून त्याचं पुस्तक रूपात प्रकाशन केलं जायचं. नाहीतर आपली एखादी कविता कोणत्याही प्रकाशनात किंवा अगदी दिवाळी अंकातही छापून यावी अशी माफक अपेक्षा काही नवकवींची असायची. मात्र आपल्या कवितांना प्रसिद्धी मिळण्यासाठी या नवकवींना आयता प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे तो म्हणजे यू टयूबच्या माध्यमातून.
एखादी स्वरचित कविता व्हीडिओ रूपात सादर करून ती यू टयूबवर टाकायची आणि त्या यू टयूबची लिंक सर्वत्र पसरवायची. हा ट्रेंड आता बराच रुळला आहे. यू टयूबवर अशा कविताकारांचे अनेक व्हीडिओ सहज आपल्याला पाहायला मिळतील. फेब्रुवारी महिन्यात साज-या करण्यात येणा-या व्हॅलेंटाईननिमित्ताने अनेक नवकवींनी या संधीचं सोनं केलं. स्वरचित प्रेम कविता व्हीडिओ रूपात सादर करून त्या यू टयूबवर अपलोड केल्या. त्याचप्रमाणे महिला दिनादिवशीही महिलांसाठी त्यांचं गौरव करणारे त्यांना सन्मानित करणा-या कविता यू टयूबवर पाहायला मिळाल्या.
सतत कवितेच्या धुंदीत असणारा कवी मल्हार (मनोज गुंड) म्हणतो की, कविता करणं हे माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कलेला प्रसिद्धी मिळावी, असं प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो. यू टयूबच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं सोपं जातं. या यू टयूबमुळे आमच्या कवितांना प्रचंड लाईक्सही मिळतात.
पूजा भंडागे नावाची तरुण कवियीत्रीही फेसबुकवर चारोळ्या पोस्ट करत असते. तिची सावळबाधा ही कविता यू टयूबवर फार प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे तिने अनेक कविता यू टयूबच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. मनोज किंवा पूजा याप्रमाणेच अनेकांच्या कविता आपल्याला यू टयूबच्या माध्यमातून वाचायला, ऐकायला मिळतील. महिला दिनानिमित्त शिल्पा देशपांडे आणि राधिका फराटे यांची कविताही प्रचंड गाजली.
पूर्वी कवितांची मैफल भरवली जायची. आजही कविताप्रेमी ऑनलाईन एकत्र येतात आणि मैफल रंगवतात. फेसबुक लाईव्ह चॅटमध्येही ही कविता मैफल भरवलेली पाहायला मिळते. तरुणांनी त्यांच्या कलेसाठी सोशल मीडियाचा केलेला हा वापर स्तुत्यच आहे. त्यामुळे त्यांच्या कलेला भरभरून दाद द्यायला तुम्हीही कधीतरी त्यांच्या यू टयूब चॅनलला भेट द्या.
-- स्नेहा कोलते
April 9, 2017
हिंदू धर्माला विनाकाराण विरोध करण्यापेक्षा हिंदू धर्म म्हणजे नक्की काय हे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
March 12, 2013
नवेगाव बांध गोंदिया पासून ५५ किमी. अंतरावर, नागपूर गोंदिया हे अंतर १७० किमी. ही जागा भारतातील पक्षी व स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर आहे. नवेगाव बांध म्हणजे ७५ फूट लांब मातीचा बंधारा ज्यामुळे मोठा जलाशय सात डोंगरांच्या कुशीत पसरलेला आहे,चोहोबाजुनी घनदाट झाडी.
April 22, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti