भारताने नुकतेच १०४ सॅटेलाईट एकाच लॉंचरमधून अवकाशात सोडले. जगभरातून त्याचे कौतुक झाले.. एकाच वेळी १०४ !!! जबरदस्त !!!
पण जगाला काय माहित की आमच्याकडे कोणत्याही वस्तू वाहून नेण्याची क्षमता म्हणजेच भारवाहन क्षमता (Carrying Capacity) वर्षानुवर्षे फार मोठी आहे....
March 12, 2017
हे कोठून येतात, त्यांच्यार ही वेळ कोणामुळे आली, त्यांची तस्करी कोण करते, असे सारे प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत असून समाज शिक्षणाअभावी केवळ स्वार्थापायी लहान मुलांची तस्करी करणार्या या लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.
December 20, 2010
….सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले ” मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली ती प्रार्थना अल्कोहोलिक्स एनाॅनिमसच्या प्रार्थनेवरून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मराठीत रुपांतरीत केली आहे..तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत “
January 19, 2020
” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना
November 13, 2012
मला नोकरी लागलीय हे समजल्यावर आई वडिलांना आणि भावाला देखील खूप आनंद झाला होता , आता सगळे सुरळीत होईल अशी आशा पल्लवीत झाली सर्वांची , मी देखील दोन दिवस सर्व मित्रांमध्ये आणि घरात , रुबाबात वावरत होतो , मी त्या वेळी बी .कॉम शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती , अर्थात परीक्षेत मी पास होणार नाही हे मला चांगलेच माहित होते आणि म्हणूनही कदाचित म्हणूनच मी नोकरीबाबत विचार केला असावा , असे आता वाटते आहे .दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या ८ दिवसांच्या प्रशिक्षणाची सर्व तयारी करून मी तयार होतो , कपडे , इतर आवश्यक चीजवस्तू आणि मुख्य म्हणजे माझा सुमारे दोन दिवसांचा ब्राऊन शुगर चा साठा सोबत होताच ...
आतापर्यंत दोन तीन वेळा टर्की सहन करण्याचा योग आल्याने त्या बाबत थोडीशी भीती कमी झाली होती व जवळ असलेली ब्राऊन शुगर संपल्यावर आपण बाहेरगावी असू त्या वेळी टर्की झाली तरी सहन करू व हे व्यसन कायमचे सुटून जाईल असेही माझ्या मनात होते ( व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनाबद्दल आतून अपराधीपणाची भावना असतेच व व्यसन सुटावे असे त्यालाही वाटत असते पण , सगळे काही आपोआप घडेल असे त्याला वाटत राहते किवा त्या बाबतीत त्याला अति आत्मविश्वास असतो की मी ठरवले की मला व्यसन सोडता येईल आणि म्हणूनच तो उपचारांना नकार देत राहतो ) .
अकोल्याजवळ मलकापूर येथे आमची उंट बिडीची प्रचार करणारी गाडी जाणार होती आणि मग तिथेच मुक्काम करून ऐक आठवडाभर आसपासच्या गावात दिवसभर प्रचार करणे , तेथील विक्रेत्यांना तयार माल पुरवणे असे काम होते , मी प्रशिक्षणार्थी म्हणून गाडीसोबत जाणार होतो व त्या गाडीचे व्यवस्थापक , गाडीचे नेहमीचे प्रचारक , चालक आणि ऐक मदतनीस असे आम्ही एकूण पाच जण गाडीत होतो , गाडीच्या मागील बाजूस तयार उंट विड्यांची खोकी भरून ठेवलेली होती , गाडीवर वर दोन भोंगे लावलेले होते व गाडीत ऐक इम्प्लीफायर आणि माईक त्या त्या भोंग्यांना जोडलेले होते . आतील प्रचारक जेव्हा गावात शिरे तेव्हा काही बडबडगीते , उंट बिडीची जाहिरात करणारी घोष वाक्ये म्हणत असे व गाडीभोवती लोक गोळा झाले की मग लकी डूॉ घोषित करण्यात येई ...
म्हणजे गाडीभोवती जमलेल्या लोकांना माहिती सांगितली जाई की प्रत्येकी १ रुपयाला १ बिडी बंडल विकत घ्यावे व ते बंडल फोडून आत ज्या नंबरची चिठ्ठी निघेल ती वस्तू त्याला बक्षिस म्हणून मिळेल , लकी डूॉ साठी खास प्रकारची बिडी बंडल तयार करण्यात आली होती ज्यात १ ते ८ अश्या नंबरच्या चिठ्या टाकलेल्या असत व प्रत्येक नंबर साठी ऐक छोटीशी वस्तू बक्षिस म्हणून मिळत असे यात आठ नंबरला सगळ्यात मोठे बक्षिश म्हणजे प्लास्टिक ची बादली असे ठेवलेले होते तर १ ते सात या नंबर साठी पुठ्याच्या आकर्षक टोप्या , कंगवा , प्लास्टिकची शिट्टी , बॉलपेन ,अश्या किरकोळ वस्तू होत्या गम्मत अशी की या विशेष बनवलेल्या बिडीबंडालामध्ये एकूण आठ नंबर च्या चिठ्या फक्त ५ होत्या , टोप्या , कंगवा , पेन अश्या किरकोळ वस्तूंच्या नंबरच्या चिठ्ठ्या मात्र भरपूर होत्या म्हणजे सर्व आठ दिवसांच्या दौऱ्यात आम्हाला जवळपास २००० विडी बंडल विकायचे होते गाडीभोवती जमलेल्या लोकांना व त्या बदल्यात ५ प्लास्टिक च्या बदल्या आणि इतर किरकोळ बक्षिशे वाटायची होती ...
या योजनेमागे कल्पना अशी होती की बक्षिसाच्या आशेने लोक बिडी बंडल विकत घेतील त्यांना जर तो ब्रांड आवडला तर बिडीचा खप वाढेल , सुंदर कल्पना होती ही विक्री वाढवण्यासाठी. लोकांच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास असावा ही कल्पना ज्याच्या सुपीक डोक्यातून निघाली होती त्या व्यक्तीचा , लोक एकाद्या वस्तूवर दुसरी वस्तू फुकट किवा भेट म्हणून दिली की खूप खुश होतात मग त्या मूळ वस्तूची त्यांना गरज असो अथवा नसो किवा ती मूळ वस्तू महाग मिळाली तरी त्यांच्या ते लक्षात येत नाही कल्पना होती या योजनेमागे .
मला प्रशिक्षण देणारे जुने प्रचारक इस्माईलभाई म्हणून ऐक मध्यम वयीन ग्रूहस्थ होते सरळ नाक , गोरेपान, उंच , मोठे स्वच्छ डोळे , आणि हसतमुख असे इस्माईल भाई मला प्रथमदर्शनीच आवडले , ते मितभाषी होते व या गाडीवर सुमारे १० वर्षांपासून ते नोकरी करत होते असे समजले , त्यांनी सर्वात आधी मला गाणी कोणकोणती येतात ते विचारले , मग आवडता गायक कोणता , शिक्षण किती , घरी कोण कोण अशी चौकशी केली व मग म्हणाले ' तुला घर सोडून असे बाहेर राहणे करमेल का ?' या वर मी त्यांना ' नोकरी म्हंटली की हे असे करावेच लागते' असे उत्तर दिल्यावर ते खुश झाले , या गाडीतील लोकांना मला कोणते व्यसन आहे हे मला कळू द्यायचे नव्हते म्हणून मी अगदी सभ्य मुलासारखा वागत होतो त्यांच्याशी . निघताना नाशिक शहरातून गाडी निघून आधी माझ्या घरी आली मला सोबत घेण्यासाठी आणि मग आम्ही मलकापूरच्या दिशेने कुच केले ,
जेव्हा ती बाहेरून आकर्षक रंग देऊन काढलेले उंटाचे चित्र , वर लावलेले भोंगे , असणारी गाडी आमच्या रेल्वे क्वार्टरच्या दारात आली तेव्हा आसपासच्या मुलांची गर्दी जमली होती , आई वडील त्यावेळी घरीच होते त्यांना तर माझे खूप कौतुक वाटत होते , आईने मला निघताना देवाला नमस्कार करायला सांगितला , मग देवाच्या आणि आई वडिलांच्या पाया पडून मी निघालो .( मी नोकरी करतोय म्हंटल्यावर मला घरून फारशी कटकट न होता पैसे मिळाले होते , माझा सकाळचा डोस मारून झाला होता अर्थात म्हणून मी चांगलाच फ्रेश होतो ) गाडीत बसताना मागे पहिले तर आईचे डोळे भरून आले होते आणि वडील नजरेनेच मला आशीर्वाद देत होते .
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
June 22, 2020
स्वरांची अफलातून किमया असलेल्या मंगेशकर कुटुंबाचा हा दुर्मिळ फोटो
November 24, 2012
खूप शिकलेल्या व्यक्तीला पाश्चात्य देशात ‘वेल-रेड’ (खूप वाचलेला) म्हणतात. तर भारतीय संस्कृतीत बहुश्रुत (खूप ऐकलेला).
छापखान्यांची सोय नव्हती, विद्या गुरुमुखातून शिष्याला मिळायची आणि ऐकून, पाठ करूनच ती जपली जायची तेव्हाची ही संज्ञा. म्हणून विद्वान माणसाला बहुश्रुत’ म्हणत असतील कदाचित.
October 5, 2023
लहानपणी बर होत....
वरच्या इयत्तेतल्या मुलांची पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची.
आता नवीनचं पुस्तक.... ती हि शाळेतूनच घ्यावी लागतात.
मोठ्या भावाचा शाळेचा गणवेश आपल्याला कामी यायचा ...
आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात..
ईतर दिवशी वेगळा आणि पी.टी. च्या दिवशी वेगळा.
आम्हाला एकदा घेतलेला रिलाईबल (Reliable) कंपनीचा रेनकोट दोन तीन वर्ष चालायचा...
आता प्रत्येक वर्षी नवीन कार्टुनच चित्र असलेला रेनकोट आणि सोबत छत्री ही लागते.
आम्ही अर्धा तास चालत मित्रांसोबत गप्पा मस्करी करत शाळा आणि शाळा ते घर गाठायचो...
आता १५/२० मिनिटावरची शाळा गाठायला सुद्धा बस किंवा रिक्षा लागते.
तेव्हा शाळेत फुल दंगा करून एकमेकांना लोळवून घरी गेलो तरी चालायचं...
आता आपल्या मुलाला धक्का लागला तरी पालक तक्रार घेऊन शाळेत पोहोचतात.
तेव्हा बाबा लाईफबॉय साबणाच्या लाल वडीचे दोन तुकडे करायचे आणि आम्ही डोक्यापासून पायापर्यंत तोच साबण वापरायचो...
आता केसांना वेगळा शॅम्पू, चेहेऱ्याला वेगळा साबण, शरीराला वेगळा साबण, ताईला वेगळा साबण, दादाला वेगळा साबण, आईला वेगळा साबण, बाबांना वेगळा साबण लागतो.
तेव्हा आई ५०१ साबणाच्या बार चे चार तुकडे करायची आणि तेच सर्व कपड्यांना वापरायची....
आता वेगळ्या कपड्यांना वेगळा साबण आणि पावडर लागते, वेगळी निळ लागते, स्टार्च ला वेगळं आणि सुगंध यायला वेगळं लिक्विड साबण लागत.
तेव्हा आम्ही सणा सुदीला अत्तर वापरायचो.
आता रात्रंदिवस फॉग चालतोय....
तेव्हा पावसाळ्यात चिखल उडू नये म्हणून पायल स्लिपर्स ला मागे रब्बर लावायचो.
आता घरी वापरायला वेगळी, बाहेर वापरायला वेगळी, पावसाळ्यात वापरायला वेग वेगळी चप्पल लागते.
तेव्हा पावसाळ्यात खाली खराब होऊ नये म्हणून फुल पॅन्ट वर दुमडून विशिष्ट पिन असलेल्या रबर ने फिट्ट करत असायचो.
आता खास पावसाळी कपडे, हाफ पॅन्ट वापरतो.
तेव्हा शाळा सुटली कि... आवळा, बोर, चिंच, पेरू, काळ मीठ, कलर वाला बर्फाचा गोळा खात घर गाठायचो....
आता... कुरकुरे, कॅडबरी, किंडर जॉय, पेप्सी कोला, वेफर्स खातात मुलं....
तेव्हा पेरुवाल्याकडे सहा मित्र जायचे, दोन मित्र दोन पेरू विकत घायचे बाकीचे चार मित्र गलका करत किमान दोन पेरू तरी ढापायचे..
तेव्हाचे पालक अश्या गोष्टींना मुलांचा खोडकरपणा समजायचे.. आताचे पालक चोरी समजतात .
तेव्हा वाढत्या अंगाचे कपडे मिळायचे
आता तोकड्या अंगाचे कपडे मिळतात..
तेव्हा हे अनुभवायला मिळायचं
आता हे वाचायला लागतयं...
August 16, 2017
फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी
July 13, 2021
‘त्याच्या शब्दांना सुरांची जादू आहे, कवितेतून वास्तवाचं प्रतिबिंब खुबीने उमटतं. तसंच अनेक कलांमध्ये मुशाफिरी करुनही लेखन आणि व्यंगचित्रावरचं त्याचं प्रेम कायम अग्रस्थानी राहिलंय.” रुपेरी पडदा, नाटक व मालिकेतून दर्जेदार साहित्याची पर्वणी देऊन नवरंजनाचा अनुभव देणारे सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकूर सांगत आहेत त्यांच्या कारकीर्दीविषयी खास मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या मुलाखतीतून..
July 18, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti