(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

    भ्रष्ट्र राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे. आणि तोच धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ म्हणणारा श्रीकृष्ण असेल

      June 23, 2010


  • पाकिस्तानचे लाख आभार…

    हे वाचाल तर हसून हसून वेडे व्हाल....

    यॉर्कशायरमधल्या एका माणसाने बर्मिंगहॅममधल्या मित्राला लिहिलेले पत्र...

    “माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये गेले बरेच दिवस चोर्‍या होत होत्या. मी यामुळे अगदी वैतागून गेलो होतो. परिसरात ऑटोमॅटिक अलार्म सिस्टिमची व्यवस्था होती पण तिचा काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा मी माझ्या घरातली अलार्म सिस्टिम तोडून टाकली आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतून बाहेर पडलो.

    मी एक वेगळी शक्कल लढवली. मी माझ्या घरासमोरच्या बागेत चार कोपर्‍यात पाकिस्तानचे झेंडे लावले. बरोबर मध्ये “इसिस”चा मोठा झेंडा लावला.

    आता मला कसलीच अडचण नाही. यॉर्कशायर पोलिस दल, राष्ट्रीय सुरक्षा पथके, स्कॅटलंड यार्ड, MI-5, MI-6, सीआयए आणि युरोपमधल्या जवळपास सगळ्याच सुरक्षा यंत्रणा आता माझ्या घरावर २४ तास पाळत ठेऊन असतात.

    माझ्या मुलांवर शाळेत जाता-येताना पाळत ठेवली जाते. माझ्या बायकोवर बाजारात जाता-येताना पाळत ठेवली जाते. मी कामावर जाता-येताना माझ्यावरही सतत पाळत ठेवल जाते.

    इतकी सगळी सिक्युरिटी असताना कुणी चोर माझ्या किंवा माझ्या घराच्या वाटेला कशाला जाईल.. आहे की नाही भन्नाट आयडिया ?

    ही आयडिया सुचण्यासाठी पाकिस्तानचे लाख लाख आभार !!”

    (व्हॉटसअॅप फॉरवर्ड)

      May 17, 2016


  • विज्ञान आणि अध्यात्म ः विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता-गीतेत सामावलेले विज्ञान.

    पौराणिक ग्रंथात भरपूर विज्ञान सामावलेले आहे. पण ते अध्यात्मात बुडालेले आहे. गीतेच्या मुखपृष्टावर असलेल्या चित्रासंबंधाने या लेखात विचार मांडले आहेत.

    धार्मिक ग्रंथातील विज्ञान, शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल.

      February 4, 2012


  • तरीसुद्धा “हयगय” नाही

    विरोधकांचीच व सामान्यातील स्वतःला अतीशहाणे समजणार्‍या ब्लॅकमनीवाल्यांची जास्तीत जास्त जळतीय.

      November 22, 2016


  • स्त्री आणि देवी

    नवरात्रातले दिवे अखंडपणे घरोघरी असतील. मंदिरांमधून घरांमधून देवीची उपासना सुरू असेल. नवरात्र हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा सण, कधी कालीमातेच्या भयंकर, रणकर्कश रूपात, कधी शारदेच्या साहित्य-संगीत-ज्ञान-विज्ञानात रत झालेल्या रूपात, तर कधी समृद्धीचं, शांतीचं, मांगल्याचं आणि स्थैर्याचं वरदान देणाऱ्या शांत – तेजस्वी महालक्ष्मीच्या रूपात या शक्तीचं पूजन होईल.

      December 21, 2023


  • राडियागेट आणि काही प्रश्न

    एरवी सगळीकडे मिरवणार्‍या आणि जमिनीपासून दोन बोटे वर चालणार्‍या मिडियालाही या सरकारबाह्य सत्ताकेंद्राचा तपास करावा असे का वाटले नाही? खा-उ-जा (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) हे परवलीचे शब्द बनलेल्या आपल्या देशात लॉबिंग करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे हीच आपल्या विकासाची व्याख्या झाली आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशातील तथाकथित बोलघेवड्या मध्यमवर्गाने आजतागायत यापैकी एकही प्रश्न कसा उपस्थित केला नाही?

      December 30, 2010


  • बंध ऑनलाईन मैत्रीचे

    तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. प्रत्येक जण एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आहे. मग एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मागे राहील तर ती तरुणाई कसली ! तरुण पिढीची अनेक नवी नाती याच नव्या सोशल कट्टयांवर खुलतात. हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचं ‘नेटवर्किंग ’ करण्यात जास्त रमलेली दिसते. पण या तरुणांना नाती खरंच किती कळतात हा प्रश्नच आहे.

    आजकालच्या तरुणाईचा कुटुंबीयांवर असतो तेवढाच विश्वास फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंड असणा-या मित्रावर किंवा मैत्रिणीवर असतो, तोही अगदी सहजासहजी बसलेला असतो. त्यांची बहुतेक नाती, मग ते मित्र-मैत्रिणीचं असेल किंवा प्रेमातलं, ही सोशल मीडिया पुरस्कृत असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्यक्ष भेटीला वेळ मिळत नसेल तरीही सोशल कट्टयावर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्लिकेशन्समुळे ही ऑनलाईन नाती घट्ट केली जातात. त्यांची खबरबात घेतली जाते.

    नेहमीच न भेटणा-या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्याचं वचन दिलं जातं. पण वेळेअभावी प्रत्येक वेळेला ‘पुन्हा कधीतरी भेटू’चं आश्वासन देऊन नवीन योजना आखल्या जातात. ओढ वाढत जाते. अशा प्रकारे अनेकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येतं. सगळ्यांशी कनेक्ट राहता येतं. सकाळी गुड मॉर्निगच्या आणि रात्रीच्या गुड नाईटच्या संदेशाशिवाय तरुणाईचा दिवस उजडतही नाही आणि मावळतही नाही.

    फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, व्हायबर इत्यादी हे सध्या ‘कनेक्ट’ राहण्यासाठीचे युवा पिढीचे आघाडीचे साथीदार. त्यांच्यामुळे मित्र-मैत्रिणींचा सतत संपर्कात राहता येतं, शिवाय ग्रुप असेल तर सर्व बित्तंबातम्या इतरांना पोहोचवता येतात. कॉलेजमधल्या प्रेमीयुगुलांसाठी तर हे एक वरदानच आहे.
    पण आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाची ही चांगली बाजू किती चांगल्या प्रकारे वापरता येते? ऑनलाईन मैत्रीतले फायदे-तोटे हे सर्वच तरुण-तरुणींना कळतात असं नाही.

    सोशल कट्टयामुळे नात्यांमधला गोडवा टिकवताही येतो हे कळणं कधीकधी कठीण व्हावं असेही प्रसंग पाहायला मिळतात. काल एका मैत्रिणीचा फोन आला. ती रडक्या स्वरातच म्हणाली, ‘कामाच्या गडबडीमुळे दिवसभर ऑनलाईन नाही राहता आलं. याचा वेगळाच अर्थ माझ्या मित्राने काढला, त्याला साधी चौकशीही करावीशी वाटली नाही. त्याने सरळ फोन करून सांगितलं की आता तुझा नि माझा काहीच संबंध नाही. तुला माझ्यासाठी वेळ देता येत नाही तर नात्यामध्ये राहायचं तरी कशाला?’

    आजकालचं जग जसं प्रत्येक गोष्टीत ऑनलाईन होत जातंय, तसंच नातं टिकवण्यासाठीही ऑनलाईन व्हावं लागेल की काय हा प्रश्न पडतो? हे असं का घडतं तर, प्रत्यक्ष माणसापेक्षा सोशल मीडियावर किंवा तांत्रिक माध्यमांवर जास्त विश्वास ठेवल्यामुळेच. कोणाशीही संपर्क ठेवायचा तर तरुणांची पहिली पसंती असते ती या सोशल कट्टयालाच. मात्र त्यावर अति विसंबून राहू नये हे कळण्याची समज या वयात नसते.

    तंत्रज्ञानाचे फायदे असतात तसे तोटेही असतात. यातूनच निर्माण होतात समज-गैरसमज. आता पाहा ना..व्हॉट्सअ‍ॅपचंच उदाहरण घेऊ. तिथे तर दर आठवडयाला काही ना काही बदल घडत असतात. नियम बदलत असतात. त्यामुळे आपले मेसेजेस कोण वाचतंय, कोणापर्यंत पोहोचलेत, अशी सर्व माहिती मिळत असते.

    सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज रिडिंगची निळ्या रंगाची टिक येते याचा अर्थ असा की आपण मेसेज वाचला हे समोरच्याला कळतं. यामुळे झालंय काय तर, आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचलाय हे तर कळतंच; पण तिथून त्वरित कोणताच रिप्लाय नाही आला की समोरच्याच्या मनात आपल्याविषयी आदरच नाही, प्रेमच नाही असा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. यातून अनेक वादविवाद, भांडणे होतात आणि परिणामी नातं कायमचं तुटतं. समोरच्याला समजून घेणं, प्रत्येकाला स्वत:ची स्पेस देणं हेही मैत्रीइतकंच महत्त्वाचं असतं हे तरुण वयाच्या जोशात कळत नाही.

    मैत्रीचं नातं कसं टिकवता येईल? त्यासाठी काय करावं? काय नेमकं करू नये? यासंबंधीचेही अनेक संदेश फिरत असतात, परंतु या संदेशांचा वापर फक्त वाचण्यापुरता आणि संदेश दुसरीकडे (फॉरवर्ड)करण्यापलीकडे केलाच जात नाही. नेहमीच्या आयुष्यातही त्या संदेशाप्रमाणे वागता आलं तर नातं डिसकनेक्ट होणारच नाही ना! अणि नातं कनेक्टेड राहावं यासाठी सतत ऑनलाईन राहण्याचीही गरज भासणार नाही.

    बी. एससी.च्या शेवटच्या वर्षात अभ्यास करणारा अतुल म्हणतो की, ‘मैत्री काय किंवा कोणतंही नातं काय? एकमेकांविषयी विश्वास असणं महत्त्वाचं असतं. पूर्वीच्या काळी तर साधा फोनही नव्हता. तेव्हा मैत्री टिकत नव्हती का? त्यावेळेस कुठे कोण सारखे ऑनलाईन कनेक्टेड असायचे? मनापासून एखाद्याची आठवण येऊन भेटणं हेच महत्त्वाचं होतं.’

    अतुलचं हे म्हणणं १०० टक्के खरं आहे. बी. सी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली पूजा म्हणते, ‘एकमेकांविषयी खडान् खडा माहिती ठेवायच्या नादात आपण समोरच्याचं स्वत:चं असं काहीतरी वेगळं आयुष्य असू शकेल हे विसरुन जातो. तिच्या किंवा त्याच्याशी सतत कनेक्ट राहताना त्यांचंही काहीतरी स्वतंत्र जगणं असतं हे विसरून कसं चालेल?’ आजकालच्या तरुण-तरुणींसाठी नात्यांचा चेहरा हा सोशल कट्टयापुरताच मर्यादित असतो. सतत कनेक्टेड राहण्याच्या नादात तरुण पिढीला नात्यांचा खरा चेहरा कळणं शक्य होत नाही.

    ग्रुपमधल्या एकीने फेसबुकवर तिच्या एका लहानपणीच्या मित्राचा फोटो लाईक केला म्हणून तिच्या प्रियकराने तिला तिचं फेसबुक प्रोफाईलच बंद करायला भाग पाडलं. आता याच्यातून काय निष्पन्न झालं? गमतीची गोष्ट ही की त्यांची ओळखही याच फेसबुकमुळे झालेली. नात्यांमध्ये विश्वास असला की ते जास्त काळ टिकतं, त्यासाठी प्रोफाईल बंद करायची गरज नसते.

    व्हॉट्सअ‍ॅपचा लास्ट सिन स्टेट्स बघून प्रेम ठरवणारी आजची तरुण पिढी किती तकलादू नातं बनवण्याचा प्रयत्न करतेय! एकमेकांशी कनेक्ट राहायच्या नादात समोरच्यालाही काहीतरी स्वतंत्र अस्तित्व असतं, जीवन असतं हे पार विसरून जातो. कुठे आहेस? काय करतेस/करतोस? कोणासोबत आहेस? असे फालतू, खासगीपणावर आक्रमण करणारे प्रश्न सर्रास विचारले जातात. तेव्हा विचार येतो हे नातं म्हणजे प्रेमाचे बंध आहेत की बंधनं? अविश्वासाच्या फे-यात एकमेकांना जीव घुसमटून जाईपर्यंत गुंतवायचं की विश्वासानं केलेल्या प्रेमाचा लगाम सैल सोडायचा हे आपलं आपण ठरवायचं. पूर्वीच्या काळी कितीही लांब असले तरी नात्यांमध्ये रुसवे-फुगवे असायचे; पण अविश्वास नसायचा.

    ‘रोज आठवण न यावी असे होत नाही..रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही. मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात.. आणि तुला याची खात्री आहे याला मैत्री म्हणतात.’, हा एक सुंदर संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या प्रचंड फिरतोय. फक्त वाचण्यापुरता आणि पुढे पाठवण्यापुरता (फॉरवर्ड) याचा वापर करण्यापेक्षा ते समजून घेतलं पाहिजे. तरच आयुष्याची खरी गंमत कळेल. तरुणाईसाठी आजकाल नाती या सोशल नेटवर्किंग साईटवरच जास्त खुलतात आणि अतिरेक झाला की समोरच्याला ब्लॉक करून ती संपतातही.

    लास्ट सीन काय किंवा रिडिंग टिक काय, या गोष्टी एकमेकांविषयी असलेलं प्रेम, आपुलकी सिद्ध करू शकत नाही. संभाषण होणं गरजेचं असतं. ते भेटून जास्त उत्तम प्रकारे होतं. सततच्या आभासी संपर्कामुळे समोरच्याविषयीची ओढ कमी होते. म्हणूनच एक दिवस सोशल नेटवर्किंग साईटसाठी उपवास धारण करा.

    आवडणा-या नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींची आपसुकच आठवण येईल. या ऑफलाईन स्टेटसमुळे संपर्क काही काळ तुटेल; पण मनातून निर्माण झालेली भावना मैत्रीचं नातं घट्ट करेल. मैत्रीच्या नात्यातली आपुलकी आणि जिव्हाळ्याचा खरा अर्थ तेव्हा कळेल. ‘शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण.. सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण.. काढशील आठवण जेव्हा माझी अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.’ ही ओळ नात्यांमधील जिव्हाळ्याचं ख-या अर्थानं वर्णन करते.

    -- स्नेहा कोलते

      February 27, 2017


  • दयार्द्र पिलू

    "भरुनी राहिलीस तूच माझिया नेत्रांमधुनी
    निद्रेमधुनि, स्वप्नामधुनी, जागृतीतुनी
    कळले आता असून डोळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन
    इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन"
    कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम प्रणयी कवितेतील काही ओळी. अर्धोन्मिलित अवस्थेत असताना, निद्रीस्तावस्थेत जाणवणाऱ्या मुग्ध प्रणयाची सुंदर छटा आपल्याला या ओळींतून प्रतीत होते.
    आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी पण झोप दूर असावी, आसमंत निरव शांत असावा, आकाश निरभ्र असावे आणि कानावर "पिलू" रागाचे स्वर यावेत!! आपोआप डोळे मिटण्याची क्रिया सुरु होते. पिलू रागच असा आहे,, स्वर ऐकताना मनावर गुंगीचे साम्राज्य पसरते. "रिषभ" वर्जित स्वर (आरोही सप्तकात) परंतु "गंधार","मध्यम" आणि "निषाद" दोन्ही प्रकारे लागतात. "धैवत" स्वराचा किंचित वापर. शास्त्रात हा राग "औडव-संपूर्ण" असा दर्शविला आहे आणि तो केवळ, या "धैवत" स्वराच्या स्पर्शाने!! "गंधार" आणि "निषाद" हे वादी-संवादी स्वर. अर्थात हा झाला रागाचा तांत्रिक भाग. रागाचे स्वर आणि लिपी कितीही अर्थवाही असली तरी त्याला एक ठराविक मर्यादा असते. म्हणजे ज्यांना स्वरज्ञान आहे, त्यांनाच ही भाषा समजून घेता येते अन्यथा इतरांना ही भाषा अगम्य असते. खरतर पिलू रागाचे "टेक्श्चर" बघायला गेले तर इथे प्रणय, करुणा, भक्ती समर्पण इत्यादी सगळ्या भावनांचा कल्लोळ ऐकायला मिळतो.
    गमतीचा भाग असा आहे, हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही म्हणजे जसे यमन, भूप हे राग सलग तासभर आळवले जातात, तशा प्रकारचे सादरीकरण या रागाचे होत नाही, बहुतांशी, ठुमरी, दादरा, होरी अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारातून हा राग मांडला जातो. अर्थात, चित्रपट गीत आणि भावगीत, यांत मात्र अपरिमित पसरलेला आहे.
    बेगम परवीन सुलताना यांची एक रचना आहे. "तुम राधे बन श्याम" ही रचना राग पिलू रागात बांधलेली आहे. बेगम साहिबांचा आवाज म्हणजे तानेला कुठेही अटकाव म्हणून नाही. तरीही तार सप्तकात अधिक आनंद घेणारी गायकी. ज्या सहजतेने, ताना आणि त्याच्या जोडीने हरकती येतात, ते खास ऐकण्यासारखे आहे. एकतर तार स्वरात सहज जाणे, हीच गळ्याची एक कसोटी मानली जाते पण इथे तर, तार स्वरात जाताना आणि तिथे ठेहराव घेताना, त्यालाच जोडून एखादी हरकत घेण्याची असामान्य करामत करण्याची क्षमता थक्क करते. या रागात आणखी एक मजा आढळून येते. मैफिलीत हा राग, फारसा गायला जात नाही, वादक मात्र वाजवताना आढळतात. अर्थात केवळ तार सप्तकात गायन करणे, इतकीच या गायिकेची खासियत नसून, मंद्र सप्तकात तसेच शुद्ध स्वरी सप्तकात, स्वरांचे तितकेच विलोभनीय दर्शन आपल्याला घडते. स्वरांवर घट्ट पकड पण तरीही गायनात मृदुपणा आणायचा, गाताना लयीच्या अंगाने ताना किंवा बोलताना घ्यायच्या अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील.
    इथे आपण उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांची या रागातील एक रचना ऐकुया. उस्तादांचा लडिवाळ स्वर तसेच सगळ्या सप्तकात सहज फिरणारा गळा, त्यामुळे ही रचना केवळ संस्मरणीय झाली आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढल्या क्षणी तार सप्तकात जाउन, परत समेवर ठेहराव घेण्याची पद्धत तर लाजवाब!! "सैय्या बोलो" ही रचना म्हणजे पिलू रागाची ओळख, इतकी प्रसिद्ध रचना झाली आहे, ती काही उगीच नव्हे. उस्तादांच्या गायकीची सगळी वैशिष्ट्ये या सादरीकरणात ऐकायला मिळतात. या रचनेतील, हरकती तर इतक्या विलोभनीय आहेत की प्रत्येक वेळेस, फार बारकाईने ऐकाव्या लागतात. तेंव्हाच स्वरांचा "डौल" समजून घेता येतो. "पतियाळा" घराण्याची सगळी सगळी "खासियत" या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते.
    आत्ता मी ज्या गाण्याबद्दल लिहिणार आहे,ते एकूणच "पिलू" रागाच्या स्वभावात बसणारे नाही. "ऐ मेरी जोहराजबी" हे "वक्त" या चित्रपटातील गाणे. खरतर हीच खासियत, सुगम संगीताची आहे. रागातील एखादी हरकत, एखादा स्वर, संगीतकाराला नेमका भावून जातो आणि गाण्याची "तर्ज" निर्माण होते. त्यामुळेच गाण्याची चाल आणि त्याचे "मूळ" शोधणे, बरेचवेळा आवाक्याबाहेरचा शोध होतो. मुळात, मन्ना डे यांचा अत्यंत सुरेल स्वर आणि त्याला मिळालेली कव्वालीबाजाची चाल. त्यामुळे हे गाणे फारच सुरेख जमून गेलेले आहे. गाण्याच्या पहिल्या आलापीतील हुंकारापासून हे गाणे सुंदरपणे "चढत" जाते. प्रत्येक स्वर खणखणीत, सुरेल आणि योग्य त्या शब्दावर अचूक वजन, त्यामुळे कव्वाली असली तरी अतिशय खेळकर रचना होऊन जाते. वास्तविक "कव्वाली" सारखी रचना बहुतांशी द्रुत लयीत चालत असते. अशा प्रकारच्या रचनेत रागाची लक्षणे शोधणे तसे फार दुरापास्त असते आणि एका दृष्टीने विचार केल्यास, तशी लक्षणे शोधणे व्यर्थ असते.
    लगान चित्रपटातील गाणे आहे. गाण्याचा बाज, लोकसंगीतावर आधारित आहे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, पिलू रागात, चैती, ठुमरी, होरी किंवा पुरबी सारख्या असंख्य रचना ऐकायला मिळतात. एका दृष्टीने बघितल्यास, चैती, पुरबी किंवा होरी, ह्या सगळ्या उत्तर भारतातील लोकसंगीतातून पुढे शास्त्रीय स्वरूपात, स्थानापन्न झालेल्या आहेत. त्यामुळे, पिलू रागात, या रचनांचा "मूलस्त्रोत" सापडणे साहजिक आहे. अर्थात, गाण्याची चाल रेहमानची आहे आणी अर्थात, त्याच्या प्रकृतीनुसार गाण्याची बांधणी केली आहे. सुरवातच लोकसंगीताच्या आधारावर झाली आहे. गाण्यात, रेहमान, अलका याज्ञिक, उदित नारायण, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन असे दिग्गज आवाज आहेत. गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यानंतर पिलू रागाची सावली ऐकायला मिळते.
    गाणे केरवा तालात आहे पण तालाचे वादन अगदी अनोखे आहे. वास्तविक आपण, भारतीय ताल म्हणजे पारंपारिक तबला नजरेसमोर ठेऊन अदमास घेत असतो परंतु संगीतकार , जर व्यासंगी, अभ्यासू असेल तर, गाण्यात वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि या गाण्यात रेहमानचे हेच वैशिष्ट्य ऐकायला मिळते. साधारणपणे समूह गीत म्हटले की वैय्यक्तिक गायकीला अवसर कमीच मिळतो पण इथे संगीतकाराने त्याची योग्य ती काळजी घेतली असल्याने गाणे श्रवणीय होते.
    पिलू रागातील हे आणखी असेच आनंददायी गाणे. चित्रपटातील प्रसंग ध्यानात घेऊन, त्यानुरूप गाण्याची रचना करण्यात, जे फार थोडे संगीतकार आहेत, त्या यादीत एस. डी. बर्मन यांचा क्रमांक लावावा लागेल. विशेषत: हाती असलेली चाल, फुलवायची कशी याचे असामान्य भान या संगीतकाराकडे होते त्या दृष्टीने, हा संगीतकार,हाडाचा चित्रपट गीतांचा संगीतकार होता, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. आता "अब के बरस" हे "बंदिनी" चित्रपटातील गाणे बघा. सुरवातीला किती लडिवाळ आलाप आहे आणि हा हा जो आलाप आहे, तों शब्दांना जोडून घेतलेला आहे. आशा भोसले यांच्या गायनाची साक्ष देणारे गाणे. त्यातूनच पिलू रागाचे सूचन होते. पुढे चाल वेगळी सरते आणि स्वतंत्र जन्म घेते, हा भाग वेगळा. गाण्यातील सतारीची गत देखील फार वेधक आहे. गाणे तसे ठाय लयीत सुरु होते पण, पुढे चाल विस्तारित होताना, लय देखील त्याच ठाय लयीत बदल घेते आणि पार्श्वभागी असणारा वाद्यमेळ देखील. अर्थात असे कितीही वेगवेगळे बदल झाले तरी समेवर येताना, जो सूर पकडून गाणे परतते, तो भाग विलक्षण सुंदर आहे. वास्तविक गाण्यावर बंगाली लोकसंगीताचा ठसा आहे, गाणे अतिशय विरही, व्याकूळ करणारे आहे परंतु चाल कुठेही रेंगाळत नाही.
    गाण्याची जी प्रकृती आहे, ती प्रकृती उत्तरोत्तर अधिक दाट होत जाते आणि ही किमया आशा भोसल्यांच्या गायनाची. अर्थात, संथ लयीच्या गाण्यांना असा एक फायदा नेहमी मिळतो. चाल लगेच मनात उतरत नाही पण जेंव्हा चालीचे मर्म ध्यानात येते त्यावेळी, ती चाल मनात खोलवर रुतून बसते. अशी गाणी कधीच मन:पटलावरून नाहीशी होत नाहीत. हा लोकसंगीताच्या गोडव्याचा भाग देखील म्हणता येईल.
    आता पर्यंत आपण या रागाची काही रूपे बघितली, काही रागाच्या स्वरावलीशी थोडे फटकून तरीही श्रवणीय रचना ऐकल्या. या लेखाच्या सुरवातीला, मी म्हटले होते, या रागाचे स्थूल स्वरूप हे शांत, रमणीय असे आहे. प्रणयी भावना या रागात फार खुलून येते. अशीच अतिशय शांत आणि केवळ अजोड रचना म्हणावी, असे एक गाणे ऐकणार आहोत. ही गाणे म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील अंगाईगीतातील "मानदंड" आहे आणि आज इतकी वर्षे झाली तरीही या गाण्याची खुमारी रतिभर देखील ओसरत नाही. गाण्यातील, लय, गोडवा इतका अश्रूत आहे की, आपणही या गाण्यात कधी गुंगून जातो, याचा पत्ताच लागत नाही.
    "धीरे से आजा री अखियन मी निंदिया" हेच ते अजरामर गाणे. या गाण्याचा ठेका - दादरा आहे पण, तालाचे बोल आणि वापर किती वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा. अंगाईगीत आहे तेंव्हा गाण्याचा ताल देखील डोक्यावर हळुवार थोपटल्यासारखा आहे, जेणे करून झोपी जाणारी व्यक्ती विनासायास झोपेच्या आधीन होईल. गाण्याचे शब्द देखील सहज, सुंदर, कुणालाही कळण्यासारखे आहेत. "निंदिया" आणि "निन्दियन" या शब्दातील श्लेष बघण्यासारखा आहे. पिलू राग किती अप्रतिम आहे, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरेल. तसे पाहिले तर, पिलू रागाचे स्वर, चलन हे, या गाण्यापासून फारकत घेणारे आहे पण तरीही नाते जोडणारे आहे. चाल, गायन, वाद्यमेळ या सगळ्याच दृष्टीने हे गाणे अभ्यासनीय आहे.हिंदी चित्रपट गीतांतील हे गाणे खऱ्या अर्थाने अजरामर गाणे.
    पिलू रागाची आणखी एक वेगळी ओळख आपल्याला "मैने शायद तुम्हे पहले भी कभी" या गाण्यातून घेत येईल. "बरसात की रात" या चीत्रापातैल हे गाणे संगीर्कार रोशन यांनी स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात मात्र पिलू रागाची बऱ्याच अंशी ओळख मिळते परंतु तरीही रागापासून दूर जाउन देखील, रागाशी नाते राखण्याची प्रशंसनीय क्षमता, रोशन यांच्या रचनेतून नेहमी आढळते. मोजकीच वाद्ये पण तरीही वाद्यातून निरनिराळे स्वनरंग पैदा करण्याचे कौशल्य. या गाण्यात आणखी एक मज आहे. गाण्याची सम किंचित वेगळ्या स्तरावर केली आहे, म्हणजे जर का लयीच्या अंगाने गाणे ऐकायला घेतले तर जिथे "सम" येईल असे वाटत असते, तिथे न घेता, पुढील शब्दावर घेऊन, गाण्यात वेगळाच रंग निर्माण केला आहे. रोशन यांची प्रकृती मुळातच अति शांत, संथ रचना करण्याकडे असल्याने, इथे देखील जरी प्रणयी ढंगाचे गाणे असले तरी प्रेमाची वाच्यता, भर मैफिलीत करीत असल्याने, तिथे संयत भावना आवश्यक असते आणि तोच भाग या गाण्यातून दिसतो आणि हा संयत, मुग्ध प्रेमाचा भाव दर्शविण्यासाठी पिलू रागाने अनंत छटा आपल्याला बहाल केलेल्या आहेत.
    -- अनिल गोविलकर

      November 30, 2018


  • ताना तोराजा

    सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता.

      April 21, 2024


  • आरटीआय चमकू नेते, ब्लॅकमेलरना रोखण्यासाठी…!

    पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी खासगी आयुष्यावर आरटीआय कायद्याचे अतिक्रमण होत असल्याची चिंता व्यक्त करून अतिक्रमणचा त्रास रोखण्यासाठी ‘राईट टू प्रायव्हसीचा कायदा’ मजबूत करण्याची गरज असल्याचे सुतोवाच केले.

      October 17, 2012