(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मन

    मन

      July 1, 2010


  • वास्तुशास्त्र पेंटिंग – एक अद्भुत रसायन

    अनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो !

      August 16, 2018


  • नवमध्यमवर्गाचे राजकारण

    चिनी बनावटीच्या गृहोपयोगी वस्तू पार केरळपर्यंत मिळायला लागल्याला आता काही वर्षे होऊन गेली. या सर्व वस्तू खासगी क्षेत्रातील उत्पादने आहेत. चिनी उत्पादक हे कसे करू शकले? आर्थिक उदारीकरणाची, खासगीकरणाची चीन व भारतातील प्रक्रिया जवळजवळ एकाच वेळी सुरू झाली.

      August 19, 2010


  • निसर्ग व्याप्ती

    निसर्ग व्याप्ती
    उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला
    गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला

      March 25, 2013


  • सारोळ्याचे वनपर्यटन

    औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.

      February 6, 2010


  • मुक्तांगण, अलिबाग

    मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात.

      June 29, 2011


  • संदुक आणि वळकटी

    बोलता बोलता सहज मी
    दिवाळीचा विषय काढला
    एकदम माझ्या मित्राचा
    चेहरा पांढरा पडला

    तो म्हणाला दिवाळी आली की
    हल्ली धड धड होतं
    जुनं सारं वैभव आठवून
    रडकुंडीला येतं

    चार दिवसाच्या सुट्टीत आता
    कसं होईल माझं
    एवढ्या मोठ्या वेळेचं
    उचलेल का ओझं ?

    मी म्हटलं अरे वेड्या
    असं काय म्हणतोस
    सलग सुट्टी मिळून सुद्धा
    का बरं कण्हतोस ?

    काय सांगू मित्रा आम्ही
    चौघ बहीण भाऊ
    कुणीच कुणाला बोलत नाही
    मी कुठे जाऊ ?

    आता कुणी कुणाकडे
    जात येत नाही
    आम्हालाही दोन दिवस
    कुणीच बोलावीत नाही

    चार दिवस कसे जातील
    मलाच प्रश्न पडतो
    लहानपणीचे फोटो पाहून
    मी एकटाच रडतो

    पूर्वीच्या काळी नातेवाईक
    बरेच गरीब होते
    तरीही ते एकमेकाकडे
    जात येत होते

    कुणाकडे गेल्या नंतर
    आतून स्वागत व्हायचं
    सारं काम साऱ्यानी
    मिळून मिसळून करायचं

    सुबत्ता फार नव्हती
    पण वृत्ती चांगली होती
    गरिबी असून सुद्धा
    खूप मजा होती

    मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
    एखादाच शेंगदाणा भेटायचा
    त्याप्रसंगी आनंद मात्र
    आभाळा एवढा असायचा

    लाल,हिरव्या रंगाचे
    वासाचे तेल असायचे
    अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
    बुडाला जाऊन बसायचे

    उत्साह आणि आनंद मात्र
    काठोकाठ असायचा
    सख्खे असो चुलत असो
    वाडा गच्च दिसायचा

    चपला नव्हत्या बूट नव्हते
    नव्हते कपडे धड
    तरीही जगण्याची
    मोठी धडपड

    सारे झालेत श्रीमंत
    पण वाडे गेले पडून
    नाते गोते प्रेम माया
    विमानात गेले उडून

    घरा घरात दिसतो आता
    सुबत्तेचा पूर
    तरी आहे मना मनात
    चुली सारखा धूर

    पाहुण्यांचे येणे जाणे
    आता संपून गेले
    दसरा आणि दिवाळीतले
    आनंदी क्षण गेले

    श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
    मोठे सण असतात
    फ्लॅट आणि बंगल्या मधे
    दोन चार माणसं दिसतात

    प्रवासाची सुटकेस आता
    अडगळीला पडली
    त्या दिवशी माझ्याजवळ
    धाय मोकलून रडली

    हँडल तुटलं होतं तरी
    सुतळी बांधली होती
    लहानपणी तुमची मला
    खूप सोबत होती

    सुटकेस म्हणली सर मला
    पाहुण्याकडे नेत जा
    कमीत कमी दिवाळीत तरी
    माझा वापर करीत जा

    सुटकेसचं बोलणं ऐकूण
    माझं ही काळीज तुटलं
    म्हणलं बाई माणसाचं
    आता नशीब फुटलं

    म्हणून म्हणतो बाबांनो
    अहंकार सोडा
    बहीण भाऊ काका काकू
    पुन्हा नाती जोडा

    ' संदुक ' आणि ' वळकटीचे '
    स्मरण आपण करू
    दिवाळीला जाण्यासाठी
    पुन्हा सुटकेस भरु

      October 22, 2016


  • सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी

    चेहऱ्यावर हास्य ठेवा.
    सकाळी किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.
    आसपास प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्ती राहतील याची काळजी घ्या.अगदी ऑनलाईनदेखील
    सकारात्मक विचारांच्याच लोकांशी संवाद साधा.
    काही तरी नवीन शिकवणारे प्रेरणा देणारे वाचा.
    कुठल्या न कुठल्या कामात राहा.
    आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात करा.
    उठल्यावर आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या.
    हसा.
    मदत करा.
    झटकून टाका.
    स्वप्ने पहा.
    गोष्टीतून स्वस्थता मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करा.
    आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
    प्राण्यांशी खेळा.
    ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या कायम स्मरणात ठेवा. त्याची उजळणी करत राहा.
    पुरेशी झोप घ्या.गरज वाटेल तेव्हा एखादी डुलकी घ्या.
    व्यायाम करा.
    विश्वास ठेवा.
    जगण्यासाठीच्या सवयी
    उद्दिष्ट साध्य करा आणि नवीन उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामाला लागा.
    विसरू नका.
    पाच जणांना कडकडून मिठी मारा.
    केंद्रित करा, केंद्रित करा आणि केंद्रित करा.
    ऐका किंवा तुमची आवडती गाणी गुणगुणा.
    चांगल्या आठवणींना उजाळा द्या.
    काहीतरी शिका.
    भरपूर प्रेम करा.
    मिटा आणि तुमची स्वप्ने आणि ध्येय शांतपणे पहा.
    मनापासून कौतुक करा.
    सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा.
    रहा, चेष्टामस्करी करा.
    सामोरे जा.
    उचला.
    करा.
    महत्त्वाकांक्षांना महत्त्व द्या. रोज त्यावर थोडेतरी काम करा.
    कष्टांचे तुम्ही सकारात्मक पद्धतीने कौतुक करा.

    -- दीपक गायकवाड

      March 12, 2017


  • शिकागोच्या O’Hare आंतरराष्ट्रीय विमानतळाची गोष्ट

    आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम किती आणि कसा होतो

      June 9, 2017


  • गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ…!!!

    ” गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |

    संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||

    दोषज्यामतृडदाहमेहकासाश्च पाण्डूताम |

    कामला कुष्ठवातास्रज्वरकृमीवमीर्हरेत ||”

    -(भाव प्रकाश )

    गुळवेल ह्या वनस्पतीला भारतीय उपचार पद्धती तथा आयुर्वेदात फार महत्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे,जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती सहजतेने जीवंत असते.

    रासायनिक घटक- ग्लुकोसीन, जीलोईन, १.२ टक्के स्टार्च, बर्वेरीन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कैसमेंथीन, पामारीन, रीनात्पेरीन, टीनास्पोरिक, उडनशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लीस्टोराल इत्यादी घटक आढळतात.

    एवढे महत्वपूर्ण घटक असलेल्या या वनस्पतीमध्ये ‘मायक्रोबैक्टेरीयम ट्युबरकुलौसिस’ (Tuber Culosis), ‘एस्केनीशिया कोलाई’ या आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगाणु ला नष्ट करते, तसेच विषाणू समुह व कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता या दिव्या वनस्पतीमध्ये आहे.

      August 24, 2011