अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.
दृढ निश्चय करुन सकाळी उठलो, आवरलं, आणि पिशवी भरायला घेतली.
बायको: कुठं निघालात?
आम्ही: हिमालयात
बायको: ट्रेकिंगला?
आम्ही: सन्यास घेतोय.
(बायकोने आमच्या कपाळाला वगैरे हात लाऊन पाहिले, बहुतेक ताप चेक करत असावी)
बायको: आता हे काय मध्येच?
आम्ही: सन्यासी लोकांना सध्या चांगला स्कोप आहे. 2024 ला या अखंड महाराष्ट्राचा मामु…………
बायको: अहो, पण तो पर्यंत मार्केट राहील का सन्याशांच?
आम्ही: जो पर्यंत सुर्य-चंद्र …………
बायको: (किंचाळत) आणि हे काय? या तांब्याच्या तांब्याचे हे हाल कोणी केले?
(काल आम्ही गुपचुप तांब्याला दोन भोकं मारुन नायलॉनची दोरी बांधली होती.)
आम्ही: ते कमंडलु आहे.
बायको: (रागाने) आपल्या लग्नात मिळालेला तांब्या होता, माझ्या बाबांनी ………
आम्ही: हे बघ आता मोह, माया यापासुन दुर राहिले पाहिजे. आम्ही दोन वर्षाने परत येऊ, पण आपण 14 वर्ष तपश्चर्या केली असं लोकांना सांगायचं.
बायको: (ओरडत) कायपण काय? अजुन लग्नाला दहा वर्ष झाली नाहीत.
आम्ही: गणित चुकतय काय?
बायको: साफ चुकतय.
आम्ही: ठिक, मग सात वर्ष दिवस रात्र घोर तपश्चर्या केली असे सांगु.
बायको: (त्राग्याने) काय करायचे ते करा, माझी मला कामे पडलीत.
(आम्ही आमचे उरकुन निघायच्या तयारीत,बायकोची परत एंट्री)
बायको: (किंचाळत) अहो काय घातलयं हे?
आम्ही: (निर्विकारपणे) भगवी वस्त्र
बायको: कसली डोंबलाची वस्त्र, माझा गाऊन आहे तो.
आम्ही: पण भगवाच आहे ना?
बायको: गप काढा.
(मधेच पोराची एंट्री, कापडी पिशवी घेऊन)
मुलगा: बाबा पैसे द्या.
आम्ही: कशाला?
मुलगा: रविवार आहे, मटण आणायचेय.
बायको: (आमचे पाकिट काढुन घेत) हे पाकिट आणि एटीएम इथच ठेवा, याची गरज नसतेय सन्याशाला, (मुलाला उद्देशुन) हे घे पैसे.
मुलगा: बाबा तुमचं फायनल झालयं का?
आम्ही: काय बेटा?
मुलगा: हिमालयात जायचे.
आम्ही: कारे?
मुलगा: नाही म्हणजे जाणार असाल तर मटण आमच्या दोघांच्या पुरतेच आणायला.
(मनात चलबिचल)
बायको: जा, दोघांसाठीच आण, यांच डोकं फिरलयं.
(मुलगा चप्पल घालुन बाहेर पडणार, एवढ्यात)
आम्ही: थांब, हे बघ मांडीचं जास्त दे म्हणावं, आणि थोडे चॉप्स, चरबी जास्त टाकु नको म्हणाव, मागच्या वेळी…………
मुलगा: माहिति आहे सगळं (आम्हाला दुर्लक्षित करुन बाहेर)
बायको: अहो इकडं या, जरा कांदा कापायला घ्या.
(सदर क्षणिक मोहापायी अखंड महाराष्ट्र एका हुशार आणि प्रामाणिक मुख्यमंत्र्याला मुकला)
नुकताच कांदा कापुन झाल्यावर अश्रुनयनांच्या साक्षिने पोस्ट टाईप केली आहे.
माहितीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञातील प्रगतीच्या जोरावर देश-विदेशात नवनवीन शोध लागताहेत आणि तरुणपिढीबरोबर इतरही मंडळी वाचन संस्कृती पासून दुरावत चालली आहेत असे काही विश्लेषकांच्या माहितीच्या आधारे कळते.
आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा...... मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं.....
मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा... आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन... जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा... तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा...... मोकळी सोडलेली पुर्ण दिवस....
काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता.... सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा.... 8. ला जनावरे सोडायचं काम... मोकळा वारा प्यायचा... तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे... 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा....
मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे... तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे... ऊद्याला...
एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या... कुणाच्याही...
11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा... मग 2 तास डुबणे नदित.... जनावरांची आंघोऴ... आणि ऱाखण्यांची पण... एकत्रच....
म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी.... अगदी थोड्यांकडेच....
मग घरी अडीजवाजता.... जेवण झालं की काजीनी खेऴायचं... मुकरीचा मांड खासच....
गल.... ढोपो...... जुगी..... सप..... फगाम....
हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत....
परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट... पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही "कटीनी" खेळायचं म्हणजे खासच.. .......
मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत...
काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल.....
"म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता"
मग जनावरं बांधायची....आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा.... असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस... आणि चढणेचे मासे चढा पर्यंत....
बापुर्झा
डॉ. बापू भोगटे
कॅरम खेळताना आपण गोटीवर स्ट्रायकर मारतो. तो जाऊन त्या गोटीवर आदळतोही. पण पुढं त्या गोटीचं काय होतं?
“माणसाचं मन हे सर्जन व सृजनशील असलं की प्रयोशीलता ही उदयास येते आणि त्यातून निर्मिती होते दर्जेदार कृतीची, नृत्या सारख्या कलेत सतत नवनवीन प्रयोग करुन, समृद्धीच्या शिखरावर नेऊ पहाणार्या युवा नृत्य दिग्दर्शक जितेंद्र निकम चा प्रवास.”
आपल्या मुलांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन, पुढे एखादी सरकारी अथवा निमसरकारी सेवेत नोकरी असं काहीसं चित्रसर्वसाधारण मराठी कुटुंबामध्ये पहायला मिळतं, पण काही मुलं याला अपवाद असतात, जितेंद्र निकम सारखे आपण एक नृत्यकार म्हणून कारकीर्द घडवू शकतो, आणि या कलेत नवीनता, प्रयोगशील आणि सातत्य ठेऊन ही कला सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत नेऊन ज्ञान आणि रंजनता प्रदान करु शकतो, असं महाविद्यालयीन जीवनामध्ये जितेंद्रला वाटू लागलं, आणि मग नृत्याचा क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निश्चय केला. त्याआधी महाविद्यालयीन स्तरावर नाटकांमधून भूमिका ही केल्या, यात उल्लेख करण्याजोगी “तळीराम” ही “एकच प्याला” या नाटकातील व्यक्तीरेखा. नाटकांमध्ये कामाचा अनुभव नृत्यात ही उपयोगी आला. कारण “थेट परफॉर्मन्स” हे सूत्र दोन्हीकडे लागू पडतं.
आत्तापर्यंत जितेंद्रनी “वेस्टर्न फ्री स्टाईल”, “बॉलीवुड”, “हीप हॉप”, “क्युबन साल्सा”, “शास्त्रीय” तसंच “लोकनृत्याचं” शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं आहे. इतकच नाहीतर जगातील कोणत्याही नृत्य प्रकारामध्ये वैविध्यता कशी दाखवता येईल याचा कटाक्ष तो पाळतो. केवळ स्वत: नृत्याचं प्रशिक्षण घेऊन तिथेच न थांबता, नृत्य कला टिकून रहावी यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याण या भागात नामवंत शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.
गेल्या ६ वर्षांपासून शिक्षक म्हणून वावरत असताना देखील, अनेक व्यावसायिक सोहळ्यांमधून आपल्या सहकार्यांना प्रशिक्षण देऊन प्रेक्षकांना स्मरणात रहातील असे नृत्य अविष्कार सादर करण्याचा त्याचा मानस राहिला आहे. कधी “डान्स-कम-ड्रामा” कधी “पारंपारिक” तर कधी “पाश्चिमात्य” शैलीची अदाकारी, हे सर्व परफॉर्मन्स किमान एकदातरी “वन्स मोर” ची मागणी करणारे, “पण याचं सारं श्रेय माझ्या टीमला जातं”. असं जितेंद्र नमूद करतो.
खरंतर कलेचं क्षेत्र जिथे बरीचशी स्पर्धा, आणि आर्थिकरित्या अस्थिरता पहायला मिळते, अशातच पूर्णवेळ कारकीर्द घडवायची हे भलंमोठं आवाहनच पण त्यासाठी अनेक वाटा निर्माण होताहेत; कोरियोग्राफर, नृत्यप्रशिक्षक, रियालिटी शो यामुळे आता बर्याच गोष्टी या क्षेत्रात सोप्या होत असून, भारतातील नृत्य प्रकारांना ही जागतिक व्यासपीठ मिळाल्याचं जितेंद्र सांगतो.
राष्ट्रीय स्तरांवर होणार्या नृत्याच्या मोठ्या सोहळ्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये ही जितेंद्र निकम नी सहभाग नोंदवला आहे. तसंच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन २०० पेक्षा ही अधिक परफॉर्मन्स दिले असून, त्याव्यतिरिक्त ५ “म्युझिकल व्हिडिओ” मध्ये सुद्धा नृत्य सादर केलं आहे.
दूरचित्रवाणी, चित्रपट आणि स्टेज शोज या मध्ये “लाईव्ह परफॉर्मन्स” हा सर्वात आव्हानात्मक आहे, कारण जे होईल ती अखेरची असते, पण त्यामध्ये नवीन प्रयोग हीकरता येऊ शकतात असं जितेंद्रच्या नृत्याच्या अनुभवांमधून त्याच्याशी बोलताना लक्षात येतं. म्हणून प्रत्येक “स्टेज शोज” मधून काहीतरी नवीन,रंजक देण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे.
सध्या अनेक हिंदी व मराठी सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शनात व्यग्र असलेल्या जितेंद्र निकम एका गोष्टीकडे लक्ष वेधलो ते म्हणजे, या क्षेत्रात मराठी मुलांची या क्षेत्रासाठी असलेली अनास्था; अर्थात प्रमाण तुलनेनं कमी असल्याचं त्याचं म्हणणं आहे, पण हळू हळू मुलांमध्ये परिवर्तन होतय, या क्षेत्राकडे लोकांची पहाण्याची दृष्टी बदलते आहे, जे नृत्याच्या भवितव्यासाठी सकारात्मक नांदीच म्हणावी लागेल.
आतापर्यंतच्या कारकीर्दीत जितेंद्र निकम ला अनेक सन्मान आणिपुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे, यामध्ये वयाच्या अवघ्या विशीत नृत्य कलेत निपुणता मिळवून स्वत:चीवेगळी ओळख प्रस्थापित करुन, एक आदर्श शिक्षक आणि गुणी तरुण म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जितेंद्र निकम ला “हॅटस् ऑफ”, आणि सदीच्छा ही !
अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भांजी टका शेर ख्वाजा. हजारो साल पुरानी कहावत आपल्या महाराष्ट्र सरकारला लागू होते. महाराष्ट्रा फक्त मुंबई,पुणे येथेच आहे या दृष्टीकोनातून सर्व निर्णय राबवले जात आहे मुलांचा सत्यानाश व्हायचा तो टाळत नाही. १२विचा निकाल जाहीर करण्याची लगीन घाई करते वेळी खेड्या-पाड्याचा विचार ग्रामीण भागातून निवडून आलेला राजकारणी सुद्धा करत नाही हे या देशाचे दुर्देव्य आहे, हा नेता मुंबईच्या चमकोगीरीला भुलून स्वत;च्या मतदाराला विसरून जातो. आणि महमद तुघलक हा राजा बरा असे वाटते.
सवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. गेली ६० वर्षे दर वर्षी नित्य नियमाने सवाई च्या सर्व मैफिली जागवणारे अस्सल रसिक हे ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य ..
खाणे आणि गाणे ह्या दोन महत्वाच्या गरजा इथे उत्तम रीतीने पुरविल्या जातात ...
पुरण पुळ्या , उकडीचे मोदक , उपवासाचे पदार्थ , साबुदाणे वडे , बटाटे वडे .. घरगुती जेवणा पासून भेळ , गरम शेंगा दाणे .. सर्व खवय्यांना नेहमीच आकर्षित करतात ... जोडीला वाफाळलेला गरम फक्कड चहा किंवा सुवासिक कॉफी !!
बहुतेक फक्त ह्याच संगीत महोत्सवाला अनेक परिवार- मित्र-मैत्रिणींचा घोळका एखादी पिकनिक कम मैफिल म्हणुन एकत्र बसलेला दिसतो ! वर्षात फक्त एकदाच शास्त्रीय संगीत ऐकणारे ह्या महोत्सवाला भेटतात .. काही लोकांच्या ओळखी- भेटी तर दर वर्षी फक्त ह्या महोत्सवा च्या दरम्यान होतात !
जागा पकडण्या साठी दोन-तीन तास आधी येऊन चादर अंथरून त्यावर झोपून राहणारे रसिक .. बरोबर निवडायला आणलेली भाजी , पालेभाजी कधी लोकरी चे स्वेटर विणण्याचे साहित्य .. अजून कुठली घरची कामं , ऑफिसची कामं घेऊन शांत पणे ते करत बसलेले "रसिक" हे फक्त सवाई लाच दिसतात...
ह्यात भर म्हणजे ...आजकल अनेक लोकं लॅपटॉप / टॅब / आय पॅड घेऊन काहीतरी काम केल्या सारखे दाखवत सवाई चा "आनंद" घेत असताना दिसतात .. काही लोकं गाणं ऐकण्या पेक्षा ते कुठल्या तरी मोबाईल / स्मार्ट फोन नी रेकोर्ड करण्यात जास्त मश्गुल असतात !
लांब लचक फोटो लेन्स बरोबर गळ्यात कॅमेरा अडकवून (उगाचच) इकडून तिकडे धावणार्या यौवना .. युवक हजेरी लावतात .. तर काही फक्त खाण्या च्या स्टॉल्स वर मुक्कामाला येतात !
हि असली दृष्य फक्त सवाईतंच बघायला मिळतात !
मग खाणे असो वा गाणं .. रसिक नित्य नियमाने सवाई च्या वारी साठी आतुरतेने वाट पहात असतात
तर.... भेटूया नक्की ... १२ ते १५ डिसेंबर !
-- संगीत संगीत या WhatsApp Group वरुन
.
महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिरे आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी ही वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते.
Copyright © 2025 | Marathisrushti