(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हॉटेलींग…. एक विचार करण्याचा मुद्दा.

    पुर्वी हॉटेल मधे जाणे हा एक रिलॅक्सेशन चा भाग होता पण आता तो मनस्ताप देणारा व अति खर्चीक भाग झालाय त्यामुळे त्याचे किती अनुकरण करायचे आणी किती नाही यावर प्रकाशझोत टाकाण्याचा हा प्रयत्न आहे.

  • लाखाची गोष्ट (१९५२)

    लाखाची गोष्ट (१९५२)

    ग.दि. माडगूळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकार झालेली अनमोल कलाकृती म्हणजे १९५२ साली प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन होते राजा परांजपे यांचे..

  • योग्य विमा योजना ठरवताना…

    विमा हे केवळ करसवलत मिळवण्याचे साधन नसून भविष्यात कर्त्या पुरुषाचे उत्पन्न थांबल्यानंतरही कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये हे विम्याचे मूळ उद्दिष्ट आहे. विम्याची गरज पटूनही नेमकी कोणती योजना निवडावी हे ग्राहकाला समजत नाही. आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यात उत्पन्नाची सांगड घातली की, काही समीकरणे मांडून योग्य योजना ठरवणे सोपे जाते.

  • वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ४

    या लेखात आपण आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने साधारणपणे कोणत्या रंग संवादाचे आणि रंग आकार यांचे पेंटिंग आपल्या नजरेसमोर ठेवावे यावर विचार करू.

  • पार्सल आते हैं… संदेसे लाते हैं…

    पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड वर 30 वर्षांपूर्वी दूर गावच्या लेकीला सणावाराचे आशीर्वाद लिहून तुमची अशा वेळी आठवण येते हो ,पण असाल तिथे सुखी रहा,आनंदात सण साजरा करा आणि शुभाशीर्वाद असे मजकूर लिहिलेले असत.

  • मेघ बरसला

    मेघ बरसला
    विरही अश्रूंचा
    खारा खारा.

    मेघ बरसला
    प्रथम आषाढी
    प्रिय वार्तेचा.

    मेघ बरसला
    माळात रानात
    काळा काळा.

    मेघ बरसला
    भिजली धरणी
    हिरवी हिरवी.

    -- विवेक पटाईत

  • महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?

    महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ? असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर एकच...

    महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो... इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.

  • नवीन घर घेणार्‍यांनो.. सावधान

    नवीन घर घेणाऱ्यांनो सावधान !!! सर्व मराठी मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाचा सल्ला

    इलेक्शनच्या तोंडावर अनेक राजकीय नेत्यांनी या बिल्डर-डेव्हलपरकडे ठेवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक बिल्डर-डेव्हलपर्सच्या पायाखालची माती सरकली आहे. कारण त्यांनी विकसित केलेल्या अनेक गृहसंकुलांमध्ये गिऱ्हाईकच नाही. कोटींच्या घरातले फ्लॅट इथेकुणाला परवडणार आहेत?

    पण राजकारण्यांना इलेक्शनसाठी त्यांचं काळं धन परत करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे बिल्डर-डेव्हलपरला जागांचे भाव खाली आणण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे रिअल इस्टेट म्हणजे राहत्या जागांचे भाव झपाट्याने खाली येणार यात शंकाच नाही.

    शहापूरमध्ये तीन महिने पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असतानाही तिथल्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्या बिल्डरने तर आघाडीच्या हिंदी सिनेमा नटीचा चेहरा वापरून लोकांनी स्वस्तातले फ्लॅट घ्यावेत म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सोबत कार, दागिने, किचन अक्सेसरीज वगैरे निःशुल्क देण्याचं आमीषही दाखवलंय.

    पण मराठी मध्यमवर्गीयांनो सावधान. हीच वेळ आहे एकजूट दाखवण्याची. या जाहिरातींना भुलून धावू नका. कारण बड्या बिल्डर-डेव्हलपर लॉबीची नुकतीच एक गोपनीय मीटिंग झाल्याचं समजतं. त्यात त्यांनी जागांचे भाव ५० टक्क्यांपर्यंत उतरू द्यायचे नाहीत, अशी स्ट्रॅटेजी आखल्याचं समजतं. केवळ २५ टक्क्यांपर्यंत भाव उतरवले तर मिडलक्लास जागांवर उड्या मारेल आणि रिअल इस्टेट तेजीत येईल अशी त्यांची योजना आहे. पण मराठी मध्यमवर्गीयांनो ध्यान्यात घ्या.

    तुम्ही एकजूट ठेवा. जागांचे भाव आता आहेत त्याच्या निम्मे येईपर्यंत घाई करू नका. हा गेम ऑफ पेशन्स आहे. प्रचंड होल्डिंग कपॅसिटी असलेले बिल्डर जिंकतात की घरांची गरज असलेला सर्वसामान्य जिंकतो, हे आता लोक बघतायत. यात काही बँकाही भरडल्या जाण्याचा
    संभव आहे. बिल्डरांना कोट्यवधी रुपयांचं कर्ज देणारी एक बँक सध्या डगमगते आहे. अनेक बँकांना गिऱ्हाईके नाहीत. कारण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असेच लोक सध्या जागा विकत घेताहेत. इथल्यापेक्षा दुबईतले घर स्वस्त झाले आहे.

    मराठी मध्यमवर्गीयांनो जागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवणाऱ्या बिल्डरांना नमवण्याची हीच संधी आहे. तुम्ही जर एकजूट दाखवून पेशन्स दाखवला आणि जागांचे भाव ५० टक्के खाली आल्याशिवाय नवे घर घेणार नाही अशी धमक दाखवली तर सर्वसामान्य लोकांना ग्राण्टेड धरणाऱ्या बिल्डरांना कायमचा धडा शिकवता येईल.

  • मराठी आडनावे ः परिवर्तनाची त्सुनामी

    नाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आिण जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे,नाव, आडनाव आिण धमर्, ती व्यक्ती मोठी झाल्यावर आवडतातच असे नाही. त्यामुळे त्या आवडीनुसार बदलून घेण्याचा हक्क आपण त्यांना दिलाच पाहिजे.

  • संस्कृत सारी या शब्दाचा अर्थ कापडाची पट्टी.

    इसवीसनाच्या पूर्वी तीन हजार मध्ये लिहिलेल्या ऋग्वेदामध्ये सारी या वस्त्राचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. याचा अर्थ सारी ही त्याही पूर्वी अनेक वर्षे वापरली जात असावी.