(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रात्र राणी

    अहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्‍हतर्‍हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.

  • मनाची शुध्दी

    एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला स्नान घातले आणि शेवटी बुध्दांकडे गेले. बुध्दांनी त्यांना विचारले की कशी झाली तिर्थयात्रा त्यावर सर्वांना आपआपला अनुभव सांगीतला आणि सर्वांना खुप चांगले वाटले सर्वजण प्रसन्न वाटले . सर्वांचा अनुभव ऐकल्यांनंतर बुध्दांनी त्यांना ती काडी चावण्यास सांगीतले. सर्वांनी सांगीतल्याप्रमाणे ती काडी चावली तर सर्वांची चेहरे पाहण्या लायक होते .काडीचा कडुपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसु लागला . सर्वांच्या तिरकस नजरा बुध्दांकडे होत्या. त्यावर बुध्दांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिर्थस्नान केले त्या त्या ठिकाणी या काडीने सुध्दा तिर्थस्नान केले . जसे तुम्ही पापमुक्त झालात तसेच ही काडीसुध्दा पापमुक्त व्हायला पाहीजे होती . तिर्थस्नानचा परिणाम या काडीवर सुध्दा व्हायला पाहीजे होता. त्यामुळे ही काडी गोड व्हायला पाहिजे होती परंतू तसे झाले नाही ती काडी कडुच राहीली . त्याप्रमाणे आपणाला सुध्दा शरीरशुध्दी करायची असेल तर ती आतुन करणे योग्य . बाहेरुन जरी तुम्ही आंघोळ केली तरी आतुन विचारांनी समृध्द होणे गरजेचे. आतुन मनाची शुध्दी करणे गरजेचे आहे. मनाच्या समृध्द विचारांनी केलेली कृती कल्याणकारी असते.

    बोध :- मनाची शुध्दी ही वरवर नसुन आतुन करावी लागते

  • ३३,६०० सहकारी संस्था आणि कर्मचारी फक्त २५० !

    २१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग. त्यांच्याकडे कर्मचारी अवघे २५०!

  • नात यशस्वी होण्यासाठी

    स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.

  • मुंबईतला १४० वर्षे जुना कॅपिटॉल सिनेमा

    आजही अशा वास्तू आहेत ज्या शेकडो वर्षं जुन्या आहेत. त्या सध्या जरी बंद स्थितीत असल्या तरी त्या मुंबईकरांच्या मनात कायम राज्य करुन आहेत. थोडीथोडकी नाही पूर्ण १४० वर्षं जुनी असलेली वास्तू म्हणजेच “कॅपिटॉल सिनेमा” या वास्तूचं एक विशेष स्थान मुंबईकरांच्या मनात होतं, आजही आहे आणि भविष्यातही ते कायमच राहिल.

  • मनुष्य श्रेष्ठ की प्राणी?

    येथे केवळ हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मागे काय केले, हा विचार सोडून आता यापुढे भगवान श्रीकृष्णांना अनन्यभावाने शरण जाऊन जीवन सार्थकी लावण्याची खरी गरज आहे.

  • आहेर आणि अभिनंदनाच्या आणखी काही तऱ्हा !

    3 L 03विशेष निमित्ताने विविध वयाच्या आणि नात्याच्या माणसांना शुभेच्छा देण्याचा कल आता वाढतोच आहे. पैशांना काही मोलच राहिले नाही. कितीही पैसे खर्च केले तरी आपल्याला आणि उत्सवमूर्तीला विकत घेतलेली वस्तू आवडेलच याचा नेम नसतो. मग "हटके " असे काही द्यावे असे वाटते.त्यासाठीच मी अलीकडेच काही वेगळ्या वस्तू बनवून दिल्या त्याची ही थोडी झलक !

    फक्त महत्वाचे म्हणजे हे काम मिरवून कौतुक करून घेण्याचे आता माझे वय नाही आणि तो उद्देशही नाही. पण याआधी मी जेव्4 L 04हा अशी माहिती शेअर केली तेव्हा अनेकांनी तशा वस्तू स्वत: बनवून आनंद घेतला. त्यावरून आपल्याला आणखी चांगल्या वस्तू सुचल्याचे कळवले. कांही मुलींनी सुट्टीत अशा वस्तू बनवून विकल्या आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत जमवली. आनंद वाटण्याचा एवढाच माझा उद्देश आहे .2 L 02

    मला आईवडिलांसारखे असलेल्या परांजपे दांपत्याने नुकताच लग्नाचा साठावा वाढदिवस साजरा केला.त्यांच्यासाठी 5 L 05मुंडावळ्यांचा ६० आकडा तयार करून सजविलेले पाकीट मलाच भरभरून आशीर्वाद देऊन गेले. ऑफिसमधील एका चेनस्मोकर मित्राला त्याच्या वाढदिवसाला जाड कार्डबोर्डची सिगारेट बनवून त्यात पुष्पगुच्छ अडकवून दिला. देताना अशा शुभेच्छा दिल्या की पुढच्या वाढदिवसापर्यंत मधली ही सिगारेट कायमची जाऊ दे आणि मला थेट पुष्पगुच्छ देता येऊ दे ! एका वकील मित्राला " ऑर्डर ऑर्डर "वाल्या हातोड्यात घालून पुष्पगुच्छ दिला.नुसता नारळ देतांना त्याला जर एखादी नक्षी6 L 06दार लेस बांधून दिली तर त्याचे मोल वाढते. ५००/६०० रुपयांचा खरा पुष्पगुच्छ २ /३ दिवसात फेकून द्यावा लागतो.पण हंस / बदकाच्या आकाराच्या टोपल्यात सजवून दिलेला कृत्रिम फुलांचा गुच्छ कांही वर्षे आपली आठवण ठेवतो.

    एकाच गुच्छाला दोन मुठी ठेवून बनविलेला गुच्छ हा लग्नाच्या रौप्य महोत्सवासाठी ! तोपर्यंत संसार ही २ मुठींची तलवार नाही हे पटलेले असते.

    --मकरंद करंदीकर.

  • लक्षात न घेतलेला बाप

    पूर्वी वडिलांच्या अंगावरील जुने कपडे पाहून, मी त्यांना कित्येकदा "ओरडलो" असेल कि, नवीन कपडे शिवून घ्या, फाटेपर्यंत घालायचे असतात का ?

    पण ते "हो" म्हणून वेळ मारून नेत असतं...

    तसा दिवाळीचा आणि आपला काही संबंध नाही पण, "स्त्रीहट्ट" आणि "बालहट्ट" सांभाळून घेताना, कोणाला कपडे, कोणाला मोबाईल... वगैरे वगैरे अशी खूप मोठी प्लांनिग केली, अचानक लक्षात आले "स्वत:साठी" काहीच ठरवले नाही.... तोच समोर "वडिलांचा चेहरा" समोर आला, वडील तेव्हा का जुने कपडे घालत असतं, ते कळून चुकले,

    मात्र... मी स्वत "वडील" झाल्यावर.... कपड्याने दरिद्री दिसणारे वडील... पैश्याने मोजता येणार नाही असे "धनवान" असतात...

    कुटुंबाच्या सुखातच स्वतचे सुख शोधतात...

    आदर असतोच, पण.... आणखीच वाढला... अन... न कळत डोळ्याची किनार पाणावली....

    बापाची चप्पल आपल्या पायात आली कि, आपण कधी वडिलांना लक्षात घेतंच नाही... कित्येकदा उद्धटासारखेहि वागतो...

    पण आपण "लक्षात न घेतलेला बाप"... लक्षात येतो... मात्र आपण स्वत आई किंवा बाप झाल्यावरच...

  • फिर ये सीट मेरी हुई ना?

    मैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)

  • मी कोरोना !!

    कोरोना विषाणू चे आत्मवृत्त लिहायचा हा एक प्रयत्न.