अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या भावाशी निगडीत ठेवली आहे.
टीव्ही पाहताना रिमोटचा वापर अपरिहार्य बनला आहे. पण हल्ली टीव्ही केवळ वाहिन्या पाहण्यासाठीच नव्हे तर इंटरनेट, नेटवर्किंग साईट्स आणि इतरही अनेक अॅप्लीकेशन्साठी वापरला जातो. अशा वेळी ग्राहकाला रिमोटद्वारे टायपींगचीही गरज पडते. म्हणून स्मार्ट फोनचाच रिमोट म्हणून वापर करता यावा यासाठी काही अॅप्लीकेशन्स तयार करण्यात आली आहेत. टीव्ही कंपन्याही अशी अॅप्लीकेशन्स तयार करू लागल्या आहेत.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
“लाय लाय लायेकरणी” हे असेच एक कोळीगीत. त्यात त्याकाळच्या वेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या कोळी बायकांच्या विशिष्ट वेषभूषेवरून, चाली रीती वरून, बोली भाषेवरून ती कोणत्या गावातील आहे हे ओळखता यायचे. ह्या गाण्यात त्याचेच वर्णन केले आहे. नीट ऐकाल तर त्यावेळच्या मुंबईत असणाऱ्या गावांची नावे (वेसाव, भांडुप, वरळी, दांडा, मालवणी, कुलाबा, शिवडी, शिव, वसई, कर्जत माहीम वगैरे) आपल्या कानावरून जातील.
उर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.
प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या न कोणत्या कारणासाठी इतरांवर अबलंबून असते काही वेळा मानसिक दृष्ट्या तर काही इतर कारणांनी.. परस्परावलंबनाची ही जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे ..कृतज्ञता यालाच म्हणतात …ही कृतज्ञता ज्यांना समजते ती माणसे कधीच कोणाचा तिरस्कार करत नाहीत ..कधीच व्यसने करत नाहीत ..किवा समाजविघातक कृत्ये करत नाहीत ..उलट अशी माणसे सर्वांच्या विकासासाठी आपली आपला पैसा ..श्रम आणि बुद्धी यांचा वापर करून स्वतचे आणि इतरांचेही जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात .. सोप्या भाषेत कृतज्ञता म्हणजे काय हे समजावून सांगितले…
शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी “ग्राहक तक्रार मंच”
तू असतोस
तेव्हाच फक्त जगणं असतं
एरवी फक्त सावली पांघरते जगण्याची
सदनिकाचा ताबा घेतल्यानंतरचे काही वर्ष विकासक देखभाल करतात. त्याचे पैसे त्यांनी आगाऊ घेतलेले असतात. ते सदनिकेच्या आकारमानाप्रमाणे असते. परंतु जेव्हा संस्था नोंदणी होते तेव्हा देखभाल शुल्क हे संस्थेने अवलंब केलेलेल्या उपविधी प्रमाणे करावे लागते. काही संस्था आजही आकारमानाप्रमाणे देखभाल शुल्क आकारतात ते बरोबर आहे असे नाही. संस्थेचे सदस्य सेवा शुल्क म्हणजेच देखभाल शुल्क असे आपण समजत असाल तर ते चुकीचे आहे. या दोन्ही भिन्न बाबी आहेत. असेही म्हणता येइल की, देखभाल शुल्कात सेवा शुल्क समाविष्ट असते परंतु सेवा शुल्क म्हणजे देखभाल शुल्क नव्हे. संस्थेमध्ये उद्भवणाऱ्या अनेक वादांपैकी एक म्हणजे मासिक देखभाल शुल्क. ज्याला आपण “मेन्टेनन्स” असेही म्हणतो. नविन बांधल्या गेलेल्या इमारतीतील सदनिका ह्या एकसमान नसतात त्या वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात. उदा. 1BHK ते 5BHK … त्यामुळे सदस्यांना आकारणी कशी करावी यात एकमत होत नाही. अर्थात, सेवा शुल्क सदनिकेच्या आकाराप्रमाणे करता येत नाही. आजच्या लेखात काय आहे सेवा आणि देखभाल शुल्क यामधील नेमका फरक, कशाप्रकारे सदस्यांना मासिक बिलात लावावे शुल्क याबाबतची माहीती आपल्यासाठी.
Copyright © 2025 | Marathisrushti