देवाचा मोबाईल

देवाचा मोबाईल नंबर मिळाला तर?



किती करू मी तुझा धावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा
नाही माणस कलीयुगी खरी
येता जाता चालती कुरबुरी
मुखी राम बगल मे छुरी
नाही कळत त्यांचा कावा||१||

अवतरलास तू द्वापारी
खूण होती तुझी बासरी
पण जमाना आला नवा
आता नाही चालणार तुझा पावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा||२||

चारी युगात तुझा बोलबाला
फार नाही मागायचं मला
घाई गर्दीत शोधू कुठे तुला
आहे एकच उपाय ठावा||३||

— प्रभा मुळे

Author