(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शुभ दीपावली !

    वर्षा मागून वर्षे गेली त्याबरोबर सण आणि उत्सवांनी त्या काळाला धरून आपले मार्ग चोखाळले आणि त्याला प्रतिसाद देत तर कधी वेगवेगळी करणे सांगून त्यातून रीतीरिवाज, रूढी परंपरा बदलत गेल्या या छोट्याश्या कवितेतून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

  • स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी सिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी सुचविलेला मराठी शब्द.

    सिग्नल या िअंग्रजी शब्दासाठी अग्निरथ-गमनागमन-भयनिर्भयतासूचक-लोहताम्र-सदीप-पट्टिका हा शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविला असा, सुमारे ६० वर्षांपूर्वी समज होता. परंतू हा शब्द सावरकरांचा नाही हे, या लेखात स्पष्ट केले आहे.

  • बँक कर्मचारी – विशेषतः कॅशियर्स यांची देशसेवा

    देशहितासाठी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या अंमलबजावणीत अमूल्य योगदान दिले बँक कॅशियर्सनी !

    प्रचंड गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ग्राहक - ग्राहक नाहीत तर अनोळखी माणसं यांच्या लांबच लांब रांगा , यात काळजीपूर्वक , जबाबदारीचे काम - थोडीशी चूक की ती न निस्तरता येण्याजोगी - डायरेक्ट खिशालाच चाट -

    अशा परिस्थितीत अविरत, मान खाली घालून तासन तास, तेच आणि तसेच काम - बरं तेही एका दिवसापुरते नाही तर तब्बल ५० दिवस करायचे, अचानक हक्काच्या सुट्ट्या रद्द करून !

    मान लिया ! ??

    देशसेवा ही अजून ती वेगळी काय ? आपल्याकडे माहिती असलेली देशसेवा / देशभक्ति म्हणजे सीमेवर शत्रूशी लढणे.
    - बँक कर्मचारी आत्ता करत असलेले काम म्हणजे तशीच देशसेवा नव्हे काय ?

    याची आपण सर्व लोकांनी जाणीव ठेवू या ! यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागू या ! बँका बंद होण्याच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी जाऊन नंबर लावू या कारण या लोकांचे रेल्वे तिकीट खिडकी सारखं नसतं की वेळ झाल्याबरोबर खिडकीच बंद! - उलट, तेव्हा आत आलेल्या शेवटच्या व्यक्तिला सेवा द्यावी लागते - त्यासाठी अधिकचे खूपच काम पडते !

    शेवटी बँक कर्मचारी ही सुद्धा माणसंच आहेत याचे भान आपण सर्वांनी ठेवले तरी पुरे !

    बघा पटलं तर ! हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे ही विनंती !

  • प्रवास

    रविवारी सकाळी उठता उठताच तो तिला म्हणाला, “थोडं भराभर आवरून घेतो, एकाला भेटायला जायचंय.” त्याचा एक जवळचा, नी जूना colleague आहे, लिंगा नावाचा. त्याचे वडील वारलेले ४ दिवसांपूर्वी. आज सुट्टी आहे तर भेटता येईल. काही वर्षांपूर्वी एकदा mild attack आलेला त्यांना, त्यामुळे हे तसं अनापेक्षितच होतं! त्याचे स्वतःचे वडीलही नुकतेच घरी राहून गेलेले, त्यामुळे तोही जरा emotional झालेला.

    पण तेवढ्यात तिने आठवण करून दिली, की संध्याकाळी त्याच्या दुसऱ्या एका colleagueच्या मुलाची 1st birthday पार्टी आहे! हा colleague सुद्धा जवळचाच आहे. Team मध्ये इतरांपेक्षा खरं तर त्याचं ह्याच्याशी जास्त पटतं.

    अरे बापरे! म्हणजे birthday आणी death बद्दलची visit एकाच दिवशी करायची!? म्हणजे “आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत” आणी “आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोत” हे दोन्ही तेवढ्याच आत्मीयतेने दोघांना सांगायचं!?

    बरेच जण मयतांच्या घरी अगदी जायचं असतं, म्हणूनच जाऊन येतात, नी birthdays सारखे सोहळे चुकवूच कसं? म्हणूनही जातात.

    पण तो त्यांतला नाहीये. फारशी माणसं जोडायला बघत नाही, पण जोडलेल्यांचं प्रत्येक सुख दुःख आपलं मानतो.

    Self drive करत तो निघाला तर खरा, पण मन दोन्ही प्रसंगांची तुलना थांबवत नव्हतं.. एका जन्माचा सोहळा तर एका मरणाप्रित्यर्थ शोकांतिका. दोन्ही ठळक चेहेरे जीवनाचेच, पण एक म्हणे प्रवासाची सुरुवात, तर एक संपल्याचा आभास! एकीकडे गेलेल्यांच्या विरहाने कष्टी होतील तर दुसरीकडे नावागताला घरात/कुटुंबात/समाजात सामावून घेण्यासाठीच्या प्रयत्नांत असतील! दोन्ही अतीव! दोन्ही अगतिक, दोन्ही आभास!..?

    विचार संपले नाहीत, पण प्रवास संपला. तो लिंगाच्या घरी पोचला. आत फारसे कुणी नव्हते. त्याची आई, बहीण, नी भाचा, एक शेजारचे कुणीतरी.. प्रत्येक जण काही ना काही उद्योगात होता. तो लिंगाच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसला. कसं काय वगैरे विचारलं, तेवढ्यात रडत ओरडत लिंगाचा भाचा बाहेर आला. त्याला जेवायचं नव्हतं, आणी आई भरवल्याशिवाय सोडणार नव्हती. ते पाहून लिंगा उठला, नी त्याच्या भाच्याचं आवडतं गाणं त्याला त्याच्या खेळण्यातल्या keyboardवर वाजवून दाखवू लागला. बहिणीनेही संधी साधली, नी ती मुलाला घास भरवू लागली. हे सगळं पाहता पाहता तो काही क्षणांसाठी तिथे कशासाठी गेलेला तेच विसरून गेला!

    ह्या प्रवासाची अखंडता हेच तर ह्यातलं गमक आहे! कोणी कधीही, कुठेही, कसाही असो, पुढे जात राहणे, या पेक्षा काहीही कुणाकडूनच अपेक्षित नाही! नाही का?

    तो लिंगाच्या घरून निघाला, निवांत मनाने काही वेळापूर्वी ऐकलेलं गाणं गुणगुणत drive करू लागला…happy birthday to you.. happy birthday to you.. happy birthday dear baby.. happy birthday to you..

  • महालय

    भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.

  • एसओएस (SOS) चिल्ड्रेन्स व्हिलेज, परगुरपाडा, अलिबाग

    खरी समाजसेवा ही कुठल्याही जात, रंग, धर्म, वंश, प्रादेशिकतावाद किंवा अगदी राष्ट्रवाद या पारंपारिक बंधनांच्या पलीकडची असते. कारण मानव कुठलाही आणि कसाही आणि कसाही असो त्याच्या गरजा आणि समस्या सारख्याच असतात अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आज भारतातील विविध स्तरांमधील लोकांसाठी कार्यरत आहेत, आणि समाजसुधारणा क्षेत्रातील अनेक विकासकामांना आज गती आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

  • टच स्क्रीन

    बहुतेक सर्व जहाजांवर एकच मेन इंजिन असते. हे मेन इंजिन जहाजाच्या नेव्हीगेशनल ब्रिज, इंजिन कंट्रोल रूम तसेच प्रत्यक्ष इंजिन जवळील कंट्रोल वरून चालू करता येते. पुढे जाण्यासाठी अहेड मुव्हमेन्ट आणि मागे किंवा रिव्हर्स येण्यासाठी अस्टर्न मुव्हमेन्ट असा शब्द प्रयोग केला जातो. जहाज सुरु करून त्याचा वेग कमी जास्त करण्यासाठी इंजिन कंट्रोल कॉन्सोल नावाचा एक लिव्हर असतो ज्याला अहेड आणि अस्टर्न म्हणजेच पुढे आणि मागे नेण्यासाठी डेड स्लो, स्लो, हाफ आणि फुल्ल तसेच मॅक्स फुल्ल अशा दोन्हीही बाजूला इंजिनचा स्पीड सेट केलेला असतो.

  • पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .

    या मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे. राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .

  • कोकण विंशेष

    रतनागिरी कोकणचा एक चानगला शहर आहे.

    तरी सुददा बरेचशे लोग बेरोजगार आहेत.

  • वेध

    कविता कशी जन्माला येते याबद्दलची कविता